सर्वप्रथम एक खुलासा: धागा जरी विरंगुळा म्हणून काढलेला असला तरी मी भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाची टिंगल/थट्टा करण्याच्या उद्देशाने हे लिहीत नाही आहे. माझा अण्णांना, रामदेवबाबांना, अजून पुढे कोणी केले तर त्यांना देखील पाठींबा राहील. त्या सर्वांना माझा मनंपुर्वक सलाम! याचा अर्थ त्यांचे प्रत्येक म्हणणे मला पटते अशातला भाग नाही. पण अशा जागरीकरणाची आणि त्यासाठीच्या आंदोलनाची गरज आहे असे मात्र स्पष्ट वाटते... माझ्या लेखी कोणीही यातील कुठलाही कायदा मोडत नसून नागरीकाचे हक्क बजावत आहे. ज्यांच्यात ताकद आहे त्यांचे ऐकले जात आहे, ज्यांच्यात नाही त्यांच्याकडे दुर्लक्ष, इतके सिंपल आहे! तेच इतर विषयांसाठी. कृपया व्यक्तीगत घेऊ नये. हलकेच घेणे. :-)
तर ह्या धाग्यामागची तात्कालीक प्रेरणा जरी भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाच्या चर्चा असल्या तरी ह्या धाग्याचा उपयोग इतर अनेक चर्चांसाठी होऊ शकतो. जरी हे मिपावर लिहीत असलो तरी ते उद्या इतर संस्थळांनाही लागू होऊ शकतेच! ;)
खाली काही वारंवार मांडले जाणारे मुद्दे मांडत आहे. केवळ सुरवात करत आहे. वाचकांनी त्यांना वाटत असलेल्या मुद्यांनी यात भर घालावी. कुठलाही विषय आणि लेखनप्रकार यात वर्ज्य नाही! हवे असल्यास त्या त्या संदर्भातील आपापल्या आवडीचे (लेखाचे/चर्चाप्रस्तावाचे/प्रतिसादाचे) दुवे देखील टाकावेत. म्हणजे सदस्य त्याच त्याच विषयांचे नवीन धागे काढायच्या ऐवजी तेथे जाऊन तीच तीच चर्चा करू शकतील! आणि नवीन कुठल्या विषयावर चर्चा करता येईल याची (होपफुली) प्रेरणा मिळेल. :-)
अण्णायन
- देशातील भ्रष्टाचार हाताबाहेर गेला असल्याने आंदोलनाला पर्याय नाही
- जनलोकपाल विधेयकाने संसदीय कार्यपद्धतीवर आक्रमण केले आहे.
- सरकारचे लोकपाल विधेयक म्हणजे तोंडाला पाने पुसणे आहे.
- अण्णा कृष्णाचा अवतार आहे
- अण्णांच्या मागे राहूल गांधी आहेत.
- अण्णांच्या मागे परकीय हात आहे. (परकीय हात - म्हणजे परकीय शक्ती, हात म्हणून काँग्रेस आणि जन्माने परदेशी म्हणून सोनीया गांधी नव्हेत!)
- अण्णांच्या मागचे साथीदारपण भ्रष्ट आहेत.
- अण्णांचे साथीदार हे आदर्श आहेत.
- अणांच्या मागे संघ आहे.
- अणांच्या विरोधात भाजपा आहे.
- अरूंधती रॉय पेक्षा अण्णा चांगले आहेत.
- ....
(उर्वरीत) राजकारण
- युपिएची खरी सत्ता सोनीयाच्या हातात आहे.
- राहूल गांधींना काँग्रेस लवकरच पिएम करणार.
- भाजपात अंतर्गत लाथाळी आहे.
- मोदींना चांगले राज्यकर्ते म्हणणे हे फॅनॅटीकपणाचे लक्षण आहे.
- शिवसेना म्हणजे गुंडगिरी.
- राज ठाकर्यांना मराठी मनाची नस समजली आहे.
- कम्युनिस्ट हे देशद्रोही आहेत.
- अरूंधती रॉय ह्या साम्यवादी आहेत आणि तथाकथीत विचारवंत (अरूंधती) रॉयवादी!
- .....
ऐतिहासीक
- गांधीजींच्या राजकारणाने देशाचे नुकसान झाले.
- सावरकरांच्या विचाराने देशाचे नुकसान झाले.
- गांधीजी महान होते.
- सावरकर द्रष्टे होते.
- नेहरू होते.
- टिळक सनातनी होते.
- आगरकर सुधारक होते.
- उर्वरीत (ऐतिहासीक) काँग्रेसमन्स सुधारीत सनातनी होते.
- १८५७ चे बंडच होते.
- १८५७ चे स्वातंत्र्य युद्ध होते.
- रँड हा भला होता.
- चाफेकर बंधुंनी रँडला बरोबर धडा शिकवला.
- नेताजींना गांधीजींमुळे काँग्रेस सोडावी लागली.
- नेताजींनी हिटलरसारख्या चुकीच्या व्यक्ती आणि विचाराची साथ घेतली.
- .....
धार्मिक/तत्वज्ञान
- हिंदू हा धर्म आहे इतर धर्म पंथ आहेत.
- हिदू हा धर्म नसून हिंदूत्व हे राष्ट्रीयत्व आहे.
- शिवधर्म हा नव्याने स्थापलेला धर्म आहे. जय जिजाऊ!
- संतांनी निष्क्रीयता शिकवली.
- संतांमुळे जनतेला भक्ती समजली.
- शंकराचार्य हे सूर्य आहेत
- शंकराचार्यांवर टिका करणारे काजवे आहेत.
- मनुस्मृतीने समाजात फूट पडली
- नाडीपट्टीवर आपले जीवन लिहीले/कोरले गेले आहे.
- .....
सामाजीक/काव्य-शास्त्र-विनोद-कला वगैरे
- एम एफ हुसैन यांच्या चित्रांना कला म्हणणे शक्य नाही.
- एम एफ हुसैन अधुनिक पिकासो होते.
- एम एफ हुसैन हिंदूचे विरोधक होते
- सुन्नी मुसलमान एम एफ हुसैनचे विरोधक होते
- भारतीय भ्रष्ट आहेत
- भारतीय षंढ आहेत
- भारतीय अंधश्रद्ध आहेत
- मध्यमवर्ग लोकशाहीविरोधक आहे
- भारत हे राष्ट्र नाही
- भारत हे हिंदू राष्ट्र आहे
- राष्ट्र वगैरे काही नसतेच
- भारतीय हे मुळचे बाहेरून आलेले आर्य
- सचीनला भारतरत्न मिळालेच पाहीजे
- भिमाण्णांच्या तोडीचे कोणी असूच शकत नाही.
- .....
अजून बरेच काही विषय आणि वर्गवारी असू शकेल. पण कोणीतरी कुठल्यातरी स्वाक्षरीत कुठेतरी म्हणले आहे ना तसेच, "ही फक्त सुरवात आहे!" ;)
प्रतिक्रिया
24 Aug 2011 - 2:02 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
'अण्णायन' आणि 'सामाजीक/काव्य-शास्त्र-विनोद-कला वगैरे' या शीर्षकांखाली असणार्या मुद्द्यांकडे नजर टाकता 'तंत्रज्ञान' असाही एक भाग असावा असं वाटलं. त्यातला पहिला मुद्दा
ड्रूपॉलला नवानंतर १० येतात आणि त्यानंतर ११ .... येतात हे समजत नाही का?
सामाजीक/काव्य-शास्त्र-विनोद-कला वगैरेमधला फापटपसारा कमी करण्याचा हा एक क्षीण प्रयत्नः
भ्रष्ट, षंढ, अंधश्रद्ध, लोकशाहीविरोधक, राष्ट्रहीन तरीही हिंदू राष्ट्रीयत्त्व असणार्या, बाहेरून आलेल्या आर्यवंशीय भारतीयांपैकी एक, सचिन तेंडूलकरला भारतरत्न मिळालेच पाहिजे.
24 Aug 2011 - 2:22 am | विकास
ड्रूपॉलला नवानंतर १० येतात आणि त्यानंतर ११ .... येतात हे समजत नाही का?
खरच की! गडबडीत प्रकाशीत करण्याच्या नादात माझ्या लक्षातच आले नाही! नंतर काहीतरी वेगळी रचना करेन...
भ्रष्ट, षंढ, अंधश्रद्ध, लोकशाहीविरोधक, राष्ट्रहीन तरीही हिंदू राष्ट्रीयत्त्व असणार्या, बाहेरून आलेल्या आर्यवंशीय भारतीयांपैकी एक, सचिन तेंडूलकरला भारतरत्न मिळालेच पाहिजे.
सहमत! "मिळालेच" म्हणत आहात म्हणून विचारतोय, "पुढच्या उपोषणास बसणार का?" ;)
24 Aug 2011 - 2:30 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
"पुढच्या उपोषणास बसणार का?" हा काय प्रश्न झाला. पाच मिनीटांपूर्वी मी दोन बटाटा-वेफर्स तोंडात टाकले त्यानंतर उपोषणच सुरू आहे की माझं! आता अजून तीन तास मी काही म्हणजे काही खाणार नाही.
कोण रे तिकडे म्हणतं आहे स्नॅक्स संपले आणि खायला काही बनवता येत नाही म्हणून उपोषणाचं नाव देते आहे मी?
24 Aug 2011 - 10:40 am | श्रावण मोडक
छे असं कोणीही म्हणत नाही. तो तुला झालेला भास आहे. मनी वसे ते... ;)
24 Aug 2011 - 10:08 am | प्रशांत
+१
"तंत्रज्ञान" असा एक भाग असावा
24 Aug 2011 - 2:11 am | पिवळा डांबिस
नेहरू होते.
याच्याशी सहमत!
बाकी चालू द्या....
:)
24 Aug 2011 - 2:24 am | विकास
मला नेहरू दूरदर्शी होते असे म्हणायचे असावे. ;) पण आता असुंदेत. तसेही जे काही लिहीले गेले आहे त्यात अतिशयोक्ती अथवा विपर्यास नाही आहे.
24 Aug 2011 - 2:19 am | इंटरनेटस्नेही
चान चान!
24 Aug 2011 - 2:47 am | सोत्रि
काहीच कळले नाही ब्वॉ :puzzled:
कोणीतरी हे सगळे नंतर समजवुन सांगा अशी विनंती केल्या जात आहे.
- (वारंवार गुद्दे लगावणारा) सोकाजी
24 Aug 2011 - 3:53 am | नंदन
अनिवासी-निवासी वाद आणि एक-विशिष्ट-शहर वि. इतरेजन वाद ह्यांचा येथे समावेश नसल्याचे पाहून आश्चर्य वाटले. संपादक मंडळ कृपया यात लक्ष घालेल काय? ;)
24 Aug 2011 - 3:55 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
आणि ऐटीतले आयटीवाले विसलास का रे अं.ह. नंदन?
24 Aug 2011 - 4:15 am | मयुरा गुप्ते
सगळेच मुद्दे पट्ले.
नंदन आणि अदिती च्या मुद्द्यांखेरिज हा हि एक अतीमहत्वाचा मुद्दा..
आमवस्या आणि पोर्णिमा ह्यांचा अखिल मानव जातीवर अनिष्ट परिणाम.
---
मयुरा.
24 Aug 2011 - 4:39 am | पंगा
"अखिल मानवजात ही Lunatic(१, २) आहे", असे सुचवावयाचे आहे काय?
26 Aug 2011 - 7:57 pm | चंबा मुतनाळ
ह्याचा संबंध लूना आणी कायनॅटीक ह्यांच्या संगमाशी असावा का?
24 Aug 2011 - 4:48 am | मयुरा गुप्ते
असं सुचवणारी मी कोण?
--मयुरा.
24 Aug 2011 - 4:51 am | पंगा
अखिल मानवजातीपैकीच एक?
24 Aug 2011 - 7:01 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
पाशवीपणा कमी पडतो आहे बहुदा मयुराताईंचा! ;-)
(लुनाटिक) अदिती
24 Aug 2011 - 11:24 am | श्रावण मोडक
असं होय! आम्ही आपलं, 'मयुरा रे...'च्या चालीवरच या आयडीकडं पहात होतो. ;)
लाल रंगातील शब्दांना कसलीही लिंक दिलेली नाही. उगाच तिथं माऊस नेऊन पाहण्याचा प्रयत्न करू नका कोणीही. ;)
24 Aug 2011 - 7:50 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
'पूर्वरंग'मधली मरूत्कन्या = मारूती ही व्युत्पत्ती आठवली.
24 Aug 2011 - 7:08 am | प्रीत-मोहर
इंच इंच विषय... आप्ल ते मुख्य मुख्य विषय कवर नाही केलेले असे मत नोंदवु इच्छिते ;)
24 Aug 2011 - 7:33 am | राजेश घासकडवी
विकासजी,
तुमचं आसपासच्या धाग्यांकडे लक्षच नाही की काय? अहो गेला आठवडाभर स्त्री-पुरुष समानतेच्या विषयावर गर्ल कॉमरेडरीने पाशवी आघाडी उघडलेली दिसली नाही का तुम्हाला? की त्यांच्या पाशवीपणाला घाबरून तुम्ही विषयच काढला नाही?
आणि ते श्रद्धा - अंधश्रद्धा वगैरेसुद्धा राहिलंच...
24 Aug 2011 - 8:01 am | विकास
स्त्री-पुरूष विषय राहूनच गेला. तेच वर आलेल्या इतर विषयांसंदर्भात विशेष करून अनिभा, हिरवा माज (म्हणजे डॉलर्सचा ;) ), आयटीत असणारे आणि नसणारे!
श्रद्धा-अंधश्रद्धा तसा कव्हर केला आहे. पण पौर्णिमा-अमावस्या राहूनच गेलं होते!
24 Aug 2011 - 8:01 am | रेवती
स्त्रीभृणहत्या हा विषय टाळून समस्त स्त्रीवर्गास कमी लेखल्या गेले आहे.
तसेच स्वयंपाक हा विषयही नजेराआड केला आहे.
पाककृतीतही त्याच त्या इतक्या येतात की मागे जाऊन हा प्रकार आधी आला होता काय? हे पाहण्याचे कष्ट कोणी घेत नाही. कितीजणींनी/जणांनी श्रीखंडे, गुलाबजाम, भाताचे तेच ते प्रकार, सुरळीच्या वड्या, इ. धागे चढवून ठेवले आहेत.
घरोघरी तेच पदार्थ किंचित फरकाने होत असतात. कृपया कृपया आता रोजचे होणारे पदार्थ देऊ नका. इकडे फोडणी पडली की क्यामेरा घ्यायला धावत असतील असे वाटून हसू येते.
24 Aug 2011 - 8:13 am | चतुरंग
बाकी काही असो अण्णायन या शब्दाने मात्र फुटलो! =)) =)) =))
-रंगायन
24 Aug 2011 - 8:14 am | रेवती
अरेच्च्या! जातीपातीचे राजकारण राहूनच गेले की! ते बरेचसे धागे अप्रकाशित तरी होतात नाहीतर वाचनमात्र तरी........मग ते लिष्टमध्ये धरायचे की नाही? आणखी म्हणजे संपादकांविषयीचे धागे.
१. संपादक कोणकोण आहेत?
२. कोणकोण संपादक आहेत.?
३. जे आहेत ते लायक आहेत की माणसे आहेत?
४. मिपाचे मालक नक्की कोण?
५. संपादकांचे कार्य नक्की कोणते?
६. यांना संपादक कोणी नेमले?
७. कोण तो, ज्यानी यांना संपादकपद दिले?
८. संपादकांच्या मर्जीतले कोण किंवा कोणकोण?
९. स्वसंपादन सुविधा असावी की नसावी?
स्वत:ची ओळख करून देणारे धागे, जयंत्या, पुण्यतिथ्या, वाढदिवस यांचे अमाप पीक.
24 Aug 2011 - 8:47 am | विकास
आणखी म्हणजे संपादकांविषयीचे धागे.
24 Aug 2011 - 9:01 am | सहज
चलो लगे हाथ ह्या निमित्ताने 'संपादकांचे स्वनियंत्रण, संयम - एक प्रस्ताव' देखील होउन जाउ दे ;-) सगळेच सहमत होतील तुमच्याशी मागल्या वेळेप्रमाणे ;-)
24 Aug 2011 - 9:07 am | विकास
जर मी मराठी भाषेसाठी गुगलप्रमाणे "organize the world's information " अर्थात "मराठी जगतातील माहिती संघटीत" करण्यासाठी शोधयंत्र काढले, तर त्याचे नाव "सहज.कॉम" असे ठेवेन. :-) (हा नवस नाही, केवळ माझा जाहीरनामा आहे.!)
24 Aug 2011 - 9:16 am | मराठी_माणूस
अजुन काही
१)मिपावर किती कंपु आहेत
२)प्रत्येक कंपु मधे कोण कोण आहेत
24 Aug 2011 - 9:31 am | चिरोटा
अर्थव्यवहार-
१) मोबाईल घ्यायचा आहे. बजेट १०,०००. कृपया माहिती द्या.
२) म्युच्युअल फंड - टाटा एआयजी की बिर्ला सनलाईफ ?
24 Aug 2011 - 9:42 am | पल्लवी
भंपक, जिलब्या, भजी, गुर्हाळे, रतीब हे शब्द दिसले नाहीत कुठे !!!!
24 Aug 2011 - 10:08 am | जाई.
+१
24 Aug 2011 - 10:40 am | विसोबा खेचर
विषयांचे संकलन आवडले..:)
अगदी करेक्ट.. :)
तात्या.
24 Aug 2011 - 10:56 am | कुंदन
१) गुंतवणुक सल्ला
२) पाककृती ( दोन्ही व्हर्जन्स : बिन अंड्याची / अंडे घालुन )
24 Aug 2011 - 11:16 am | ऋषिकेश
"मुंबई विरुद्ध पुणे" या विषयाला गाळल्याबद्दल निषेध! :)
24 Aug 2011 - 11:20 am | मृत्युन्जय
बामनांना आणि त्या अनुषंगाने येनारर्या सर्व विषयांना गाळल्याबद्दल निषेढ.
24 Aug 2011 - 12:09 pm | स्वाती दिनेश
भरपूर चिमटे काढले आहेत..
स्वाती
24 Aug 2011 - 1:22 pm | मन१
पण ते भारत्-पाकिस्तान्- काश्मीर आणि अल्पसंख्य, इंच इंच वगैरे राहिलच की.
24 Aug 2011 - 1:22 pm | मन१
पण ते भारत्-पाकिस्तान्- काश्मीर आणि अल्पसंख्य, इंच इंच वगैरे राहिलच की.
24 Aug 2011 - 2:14 pm | विजुभाऊ
पुणे आणि पुणेकर या बद्दल चा एकही विषय लिष्टमध्ये नाहिय्ये.
पुणेकर इतके का घाबरतात त्या चर्चेला
24 Aug 2011 - 7:43 pm | विकास
पुणे आणि पुणेकर या बद्दल चा एकही विषय लिष्टमध्ये नाहिय्ये.
सहमत! विषयच काय वास्तवीक एक वेगळीच वर्गवारी करता येईल! सदाशीव पेठ, पुर्वीचे पुणे, बदलणारे पुणे वगैरे!
पुणेकर इतके का घाबरतात त्या चर्चेला
मला नाही वाटत ते घाबरतात... चर्चा ही मतमतांतरातून होऊ शकते. पण "पुणे आणि पुणेकर" असे नुसते म्हणताच कोणीही काही बोलायच्या ऐवजी तात्काळ "सहमत" म्हणून टाकतो! ;)
24 Aug 2011 - 7:49 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
नंदनला असं दुर्लक्षित करू नका, अंमळ हळवा आहे तो! त्याला अनावृत्त पत्र लिहावी लागतील.
24 Aug 2011 - 8:10 pm | विकास
नंदनला असं दुर्लक्षित करू नका,
कुणाला? कोण नंदन? ;)
(अहो मला माहीत आहे, त्यानं बिचारार्याने आधी लिहीले होते, पण काही झालं तरी विजुभाऊ आमच्या सातार्याचे आहेत ना! ) ;)
24 Aug 2011 - 8:38 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अच्छा, म्हणजे दोष सातारच्या / कृष्णेच्या पाण्याचाच आहे काय?
24 Aug 2011 - 8:43 pm | विकास
अच्छा, म्हणजे दोष सातारच्या / कृष्णेच्या पाण्याचाच आहे काय?
दोष नंदनचाच! कारण तो* सातार्याचा नाही!
--------------------
* नंदन जरी सातार्याचा नसला तरी त्याला. "तो" म्हणायचे आणि आदरार्थी बहुवचन न वापरण्याचे कारण, त्याच्याकडे कितीही दुर्लक्ष केले तरी त्याच्याबद्दल वाटणारी आत्मियता आहे. यात नंदनजींचा अपमान करण्याचा उद्देश नाही. (तसं देखील तो उपोषणाला बसल्याचे ऐकीवात नाही, पण तरी आपले विचार फॉर दी रेकॉर्ड स्पष्ट केलेले बरे! ;) )
24 Aug 2011 - 8:48 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
नंदन मुंबईचाच असणार. अजून त्याच्या समर्थनार्थ कोणीही आलेलं नाहीये ... तसंही मिठी, ओशिवरेचं पाणी तसंही कोणाला आवडतं?
24 Aug 2011 - 11:35 pm | नंदन
ड्वाले पाणाव्ले :)
.
उपोषण आणि मी? ते देखील सागुत्यांची तयारी होत असताना? ;)
24 Aug 2011 - 8:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
१) मिपावर शुद्धलेखन चिकित्सक असावा काय.
२) झाडी बोली
३) खडी बोली आणि मराठवाड्याची बोली
४) व्याकरण म्हणजे काय ?
५) मिपावर लेखन करतांना आदरार्थी बहुवचनाच्या वेळी
अनुस्वार दिला पाहिजे काय ?
६) मिपावर भाषा आणि शुद्धलेखनाच्या चर्चेवर बंदी आहे काय ?
-दिलीप बिरुटे
24 Aug 2011 - 8:46 pm | विकास
जेंव्हा प्राध्यापकाच्या नजरेतुण लेखन जाते तेंव्हा त्यातील तॄटी ते कीति सहजतेने काढु शकतात याचे हे एक ऊत्तम ऊदाहरण आहे. शूद्लेखनावरिल धागे वीसरलोच होतो कि! बिरूटे सर आपला मि आभारि आहे! ;)
24 Aug 2011 - 10:30 pm | आशु जोग
बरोबर
लोक टी पी साठी असे मुद्दे काढतात
24 Aug 2011 - 11:45 pm | विकास
लोक टी पी साठी असे मुद्दे काढतात
म्हणूनच चर्चेची वर्गवारी "विरंगुळा" सदरात केली असावी असे वाटते. :-)
24 Aug 2011 - 11:59 pm | शुचि
सध्या खूपच मजा येते आहे मिपावर. अगदी "मोकलाया दाही दिशा" मिळाल्यासारखे वाटते ;)
सर्वांचे खूप आभार.
25 Aug 2011 - 12:54 am | विकास
वरील दोन्ही मुद्दे मिपावर वारंवार मांडले जात नाहीत. त्यामुळे आपला हेतू कितीही उदात्त असला तरी येथे आपण अवांतर केले आहेत. मजा येणे, आभार मानणे वगैरे गोष्टींची सभासदांना सवय लागली अथवा कल्पना आवडली तर सगळेच खेळीमेळीने राहील्याने, हे संस्थळ चालवणे संपादकमंडळाला कठीण जाऊ शकते. त्यामुळे असा प्रतिसाद परत दिसला तर तो तात्काळ अप्रकाशीत केला जाईल. जर याबद्दल तक्रार करायची असेल तर ती या धाग्यात अथवा या सदस्याकडे करू शकता अथवा त्या सदस्याला आमरण उपोषणाला बसवू शकता. (संपादक मंडळ उपोषण थांबवणार याची खात्री असावी. तेंव्हा एकदम बिन्धास्त!)
;)
25 Aug 2011 - 12:58 am | रेवती
(वारंवार मारले जाणारे गुद्दे);)
25 Aug 2011 - 1:04 am | विकास
(वारंवार मारले जाणारे गुद्दे)
सहमत!
26 Aug 2011 - 6:07 pm | विजुभाऊ
नंदनने ते नाव अप्रत्यक्ष पणे सुचवले.
ते देखील घाबरत असावा त्या विवक्षीत शहराचा प्रत्यक्ष उल्लेख करायला ;)
अवांतर : ठाण्याबद्दल कोणीच कसे लिहीत नाही हो? तिथले इस्पितळ हलवलं का?