मुलगी का नको?

युयुत्सु's picture
युयुत्सु in काथ्याकूट
16 Aug 2011 - 2:01 pm
गाभा: 

धनाजीरावांच्या "मुलगी वाचवा" या धाग्याला फारसे प्रतिसाद नाहीत हे बघून मी मूळ मुद्द्यावर चर्चा व्हावी म्हणून हा धागा टाकला.

मला स्वत:ला एक मुलगी आहे आणि मला त्याचे अजिबात दू:ख नाही. उलट कधी कधी (काही लोक आत्तापासून तिचा भावी सून म्हणून विचार करतात तेव्हा) मनोमन सुखावायलाच होते.पण समाजाचा मुलीबद्दल असलेला दृष्टीकोन लक्षात घेताना काही गोष्टी लक्षात येतात.

० मुलगी ही परक्यांच धन हा समज - त्यामुळे मुली वाढविण्यावर होणार्‍या खर्चाचा मुलगी वाढविणार्‍या कुटुंबाला परतावा/फायदा मिळत नाही. जो मुलाच्या बाबतीत थोडाफार मिळु शकतो.
० मुलगी नवर्‍याचा वंश वाढवते - एकुलती एक मुलगी असेल तर प्रॉपर्टी परक्या घरी घेऊन जाते, हा दृष्टीकोन

लोकांच्या दू:खाची नेमकी कारणे हीच आहेत.

एकुलती एक मुले वाढवणे जसजसे अनिवार्य होणार तसे सध्याची समाजाची मानसिकता या समस्या जास्त गंभीर बनवणार. या दोनही समस्यांची "समाधानकारक" उत्तरे समाजाला मिळत नाहीत तो पर्यंत मुलींबद्दल समाजात आकस राहणार.

टीप : ही जाहीरात नाही!

प्रतिक्रिया

अर्धवट's picture

16 Aug 2011 - 2:12 pm | अर्धवट

>>एकुलती एक मुलगी असेल तर प्रॉपर्टी परक्या घरी घेऊन जाते, हा दृष्टीकोन
हे काही मान्य नाही बुवा.. मृत्यूपत्र करून तसं न होण्याची सोय करताच येते की..

मराठी_माणूस's picture

16 Aug 2011 - 2:23 pm | मराठी_माणूस

सहमत

स्वैर परी's picture

16 Aug 2011 - 3:46 pm | स्वैर परी

सध्याच्या काळात, बरोबरीचा वाटा वगैरे प्रकरण सुरु झाल्यापासुन, मुलगी प्रॉपर्टी घेउन जाणार ही धास्ती लोकांना अस्तेच!

युयुत्सु's picture

16 Aug 2011 - 6:13 pm | युयुत्सु

आणि हा वाटा मुलीने नेऊ नये म्हणुन त‍‌-हेत-हेचे प्रयत्न केले जातात. मला तर असं कळलं आहे की कमाल जमीन धारणा कायद्या खाली सरकारने जी जमीन हडप केली ती त्यात्या कुटुंबातील मुलींच्या वाटणीची होती (ही ऐकिव माहिती आहे. शहानिशा केलेली नाही.).

मागे न्या नरेंन्द्र चपळ्गावकरानी एका सकाळ मध्ये लेखात सतीची चाल ज्या प्रदेशात स्त्रीयाना संपत्तीत वाटा दिला गेला होता, त्या ठिकाणी जास्त प्रकर्षाने पाळली जात असल्याचे निरीक्षण नोंदविले होते. त्याची या निमित्ताने आठवण झाली.

सुनील's picture

18 Aug 2011 - 10:28 am | सुनील

सतीची चाल ज्या प्रदेशात स्त्रीयाना संपत्तीत वाटा दिला गेला होता, त्या ठिकाणी जास्त प्रकर्षाने पाळली जात असल्याचे निरीक्षण नोंदविले होते.
सतीची चाल प्रामुख्याने बंगाल आणि राजस्थानात होती. पैकी बंगालबाबत वरील वाक्य खरे आहे (दायभाग पद्धत). परंतु, राजस्थानबाबतमात्र हे वाक्य खरे नाही (मिताक्षर पद्धत).

युयुत्सु's picture

16 Aug 2011 - 2:16 pm | युयुत्सु

वडिलोपार्जित इस्टेटिचे मृत्युपत्र करता येत नाही . स्वकष्टार्जित मालमत्तेचे आणि आपल्या वाट्याचेच
मृत्युपत्र करता येते.

अर्धवट's picture

16 Aug 2011 - 2:22 pm | अर्धवट

>>वडिलोपार्जित इस्टेटिचे मृत्युपत्र करता येत नाही . स्वकष्टार्जित मालमत्तेचे आणि आपल्या वाट्याचेच
मृत्युपत्र करता येते.

मग चांगलंच आहे की.. स्वतः कमावलेली मालमत्ता मुलगी परक्या घरी नेत असेल नसेल तर बोलायचा हक्क राहतो.. वडिलोपार्जीत मालमत्तेवर कसा काय येइल..

मराठी_माणूस's picture

16 Aug 2011 - 2:33 pm | मराठी_माणूस

एकदम बरोबर

मराठी_माणूस's picture

16 Aug 2011 - 2:21 pm | मराठी_माणूस

मुलगी ही परक्यांच धन हा समज - त्यामुळे मुली वाढविण्यावर होणार्‍या खर्चाचा मुलगी वाढविणार्‍या कुटुंबाला परतावा/फायदा मिळत नाही. जो मुलाच्या बाबतीत थोडाफार मिळु शकतो.

स्वतःच्या अपत्याच्या बाबतीतला असला विचार हा अगदी हीन दर्जाचा आहे. मुलगी म्हणजे काय पैसा आहे का, परतावा आणि फायदा मिळायला ?

कमावती मुलगी ही पैसा नसली तरी लक्ष्मी असतेच...

स्वैर परी's picture

16 Aug 2011 - 3:58 pm | स्वैर परी

१००% सहमत!

कमावती मुलगी ही पैसा नसली तरी लक्ष्मी असतेच...

कमावती मुलगी ही पैसा नसली तरी लक्ष्मी असतेच...

परिकथेतील राजकुमार's picture

16 Aug 2011 - 2:41 pm | परिकथेतील राजकुमार

धनाजीरावांच्या "मुलगी वाचवा" या धाग्याला फारसे प्रतिसाद नाहीत हे बघून मी मूळ मुद्द्यावर चर्चा व्हावी म्हणून हा धागा टाकला.

हे तिथेच लिहिले असतेत तरी तो धागा वर आलाच असता की :)

का आता तुम्हीपण 'दिसमाजी काहीतरी लिहावे(च)' क्लबचे 'डायरीया' झालेले मेंबर होत आहात ?

प्रॉपर्टी घेऊन जाणार यापेक्षाही आपले अपत्य वीसेक वर्षांनी आपल्याला सोडून जाणार आणि आपल्याला म्हातारपणी तितकासा "आधार" देऊ शकणार नाही.

त्याइतकेच किंवा जास्त महत्वाचे म्हणजे वंश हा आडनावाने चालतो अशी समजूत. मुलगी दुसर्‍या घरी जाते आणि आडनाव बदलते. त्यामुळे तुमची (तथाकथित) वंशपरंपरा खंडित होते.

तस्मात जराशा वरच्या शैक्षणिक / आर्थिक वर्गात पैशापेक्षाही हे वरचे मुद्दे जास्त म्याटर करतात असे वाटते. त्यामुळे या वर्गात "मुलगी नको" पेक्षा "किमान एकतरी मुलगा असावा" अशी वृत्ती असते.

खूपच हलाखीच्या आर्थिक परिस्थितीवाल्या वर्गात मात्र मुलगी नकोच असा अ‍ॅटिट्यूड असू शकतो कारण तिथे कमावणे / पैसा याला अत्यंत महत्व असते. त्यांना "मुलांना पैशांसाठी वाढवतात. काय ही लोभी वृत्ती.." असं म्हणणं बरोबर नाही कारण त्यांच्या वंशाला गेल्याशिवाय आपल्यासारख्या सुखवस्तूंना ते कळणार नाही.

या सर्वाला उपाय म्हणजे मुलगी सासरी जाणे म्हणजे काहीतरी "गमावणे" अशी भावना नष्ट होण्यासाठी काही सिस्टीम बदल. अर्थात मुलीचे आडनाव पुढे चालावे. मुलाने आईवडिलांचे दोघांचे नाव / आडनाव लावावे वगैरे असे उपाय पुन्हा दुसर्‍या दिशेने नवे प्रश्न उभे करतीलच. (उदा. किती आडनावांची आगगाडी लावायची? मुलगा लग्नानंतर बायकोचे आडनाव लावतो म्हटल्यावर नवर्‍याच्या साईडचा वंश बुडाला. इ इ. त्यापेक्षा लग्न केल्यावर मूळ नावे आणि इस्टेटी तशाच जपाव्या हे बरं..)

प्रियाली's picture

16 Aug 2011 - 3:01 pm | प्रियाली

मुलगी नको असते कारण

  1. आपल्या देशात मुलगा हा सोशल सिक्युरीटी मानला जातो.
  2. मुलगी झाल्याने वंश पुढे चालत नाही ही भावना.

असो. तशी आता आईचे आडनाव लावतात काही मुलं. विशेषतः आई प्रसिद्ध घरातली असेल तर ते मुलांना बरेच पडते. उदा. आमीरचा भाचा इम्रान खान.

शैलेन्द्र's picture

16 Aug 2011 - 3:06 pm | शैलेन्द्र

"प्रॉपर्टी घेऊन जाणार यापेक्षाही आपले अपत्य वीसेक वर्षांनी आपल्याला सोडून जाणार आणि आपल्याला म्हातारपणी तितकासा "आधार" देऊ शकणार नाही."

अगदी बरोबर, मुलीच्या आइवडीलांनी तिच्या घरी वृद्धापकाळी हक्कने येवुन राहणे समाजमान्य व रुढीमान्य होवोस्तर हा प्रश्न सुटणार नाही.

प्रियाली's picture

16 Aug 2011 - 5:20 pm | प्रियाली

मुलीच्या आइवडीलांनी तिच्या घरी वृद्धापकाळी हक्कने येवुन राहणे समाजमान्य व रुढीमान्य होवोस्तर हा प्रश्न सुटणार नाही.

म्हातार्‍या माणसांना आपलं राहतं घर सोडून, गाव सोडून, आजूबाजूचे शेजारी पाजारी सोडून परक्या ठीकाणी राहायला जाणं कठीण होतं असा अनुभव आहे. विशेषतः ते परावलंबी असतील तर अजूनच. अगदीच नाईलाज असेल तर माणूस नाराजीने मान्य करतो पण तो वेगळा मुद्दा. तेव्हा वरचा पर्याय मान्य करणे कठीण आहे. मुलीच्या आईवडिलांनी हक्काने मुलीकडे येऊन राहण्यापेक्षा जावयानेच लग्न झाल्यावर मुलीकडे राहायला जाणे योग्य होईल.

अर्थात, या गोष्टीला किती तरुण तयार आहेत? ;)

या गोष्टीला किती तरुण तयार आहेत

पोरगी "माल"दार असेल तर आणी तरच....

नगरीनिरंजन's picture

16 Aug 2011 - 6:51 pm | नगरीनिरंजन

>>जावयानेच लग्न झाल्यावर मुलीकडे राहायला जाणे योग्य होईल.
हे गंभीरपणे लिहीलं आहे?

प्रियाली's picture

16 Aug 2011 - 7:36 pm | प्रियाली

जावयानेच लग्न झाल्यावर बायकोकडे राहायला जाणे योग्य होईल असे वाचावे. हे गंभीर मत आहे.

नगरीनिरंजन's picture

16 Aug 2011 - 8:36 pm | नगरीनिरंजन

हजारो वर्षांपूर्वी पुरुषांची घटती संख्या आणि शेतीला कमी पडणारे मनुष्यबळ याने चिंतीत होऊन मुलीनेच नवर्‍याच्या घरी राहायला जाणे योग्य होईल असा निर्णय घेतला गेला असण्याची काही शक्यता असेल का असा विचार मनाला चाटून गेला. पूर्वी बर्‍याच प्रदेशांत मातृसत्ताक पद्धत होती असं ऐकल्यासारखं वाटतंय. (देवकीची सात मुले मारली पण आठवी मुलगी मात्र मेली नाही ही गोष्ट आठवली उगाचच)

पंगा's picture

16 Aug 2011 - 9:03 pm | पंगा

देवकीची सात मुले मारली पण आठवी मुलगी मात्र मेली नाही

देवकीची आठवी मुलगी??????

पण ती तर डीकॉय म्हणून ठेवण्यासाठी उचलून आणली होती ना, कोणाकडून तरी?

(चूभूद्याघ्या.)

अतिअवांतर: याला आपल्या संस्कृतीतील स्त्रीभ्रूणहत्ये(च्या प्रयत्ना)चे आद्य उदाहरण मानता येईल काय?

नगरीनिरंजन's picture

17 Aug 2011 - 4:13 am | नगरीनिरंजन

>>पण ती तर डीकॉय म्हणून ठेवण्यासाठी उचलून आणली होती ना, कोणाकडून तरी?

बरोबर. पण ते मारणार्‍यांना माहित होते का? शिवाय ती उडून आकाशात गेली आणि आकाशवाणी झाली असं खरोखर झालं असेल?
असो. मला त्यावरून काही सुचवायचे नाही.

प्रियाली's picture

16 Aug 2011 - 9:11 pm | प्रियाली

ती कोण बरे?

(गोंधळात)

नगरीनिरंजन's picture

17 Aug 2011 - 4:16 am | नगरीनिरंजन

अहो, यशोदेचा कृष्ण नाही का? तशीच देवकीची आठवी मुलगी.

(यात गोंधळण्यासारखे काय आहे ते न कळल्याने गोंधळलेला)

प्रियाली's picture

17 Aug 2011 - 6:40 am | प्रियाली

यशोदेने कृष्णाचा सांभाळ केला त्याला आईचे प्रेम दिले म्हणून यशोदेचा कृष्ण. देवकीचे तसे काही नाही. उगीच नसलेले संबंध आणि मातृत्व तिच्यावर का लादा?

नगरीनिरंजन's picture

17 Aug 2011 - 7:44 am | नगरीनिरंजन

मी कुठे असं म्हटलंय की तिने सांभाळ केला. त्या प्रसंगापुरती तरी ती तिची मुलगी होती एवढंच मला म्हणायचं होतं. :)

प्रियाली's picture

17 Aug 2011 - 2:40 pm | प्रियाली

तुमचे मूळ विधान त्या प्रसंगापुरते वगैरे नाही पण तरीही त्या प्रसंगात कंसाचा गैरसमज झाला की ते देवकीचे मूल आहे. आपण असले गैरसमज कशाला करून घ्या! पण असो. :)

नगरीनिरंजन's picture

17 Aug 2011 - 2:54 pm | नगरीनिरंजन

ओक्के.

प्राजु's picture

16 Aug 2011 - 10:05 pm | प्राजु

अहो मुलगी यशोदेला होती हो. देवकीचा आठवा मुलगा म्हणजे कृष्ण.

पंगा's picture

16 Aug 2011 - 10:28 pm | पंगा

पण मुळात यशोदेने/नंदाने तरी आपली मुलगी दिलीच कशी? दुसर्‍याच्या मुलाच्या बदल्यात? मरायला?

म्हणजे त्यांनाही मुलगी नकोशी होती काय?

म्हणजे 'मुलगी का नको' हा प्रश्न तेव्हापासून लागू आहे तर.

रेवती's picture

17 Aug 2011 - 12:09 am | रेवती

नाही नाही.
क्रिष्णाला ;) गोकुळात सोडून येताना तिथली मुलगी एक्स्चेंज म्हणून (उचलून) आणली.
ती मेल्या कौंसाने मारायला घेतली तर हातातून सुटून आकाशात गेली, मग पुढे आकाशवाणी वगैरे....

नगरीनिरंजन's picture

17 Aug 2011 - 4:23 am | नगरीनिरंजन

>>म्हणजे त्यांनाही मुलगी नकोशी होती काय?
किंवा मुलग्याला मारू नये म्हणून मुलीला तिथे ठेवले असेल. त्या काळी मुलीला मारत नसावेत कदाचित.
असो. नेहमीप्रमाणे जे सुचवायचंय ते सोडून भलत्याच गोष्टीवर पांडित्यपूर्ण कीस काढणे चालू झालेले पाहून आश्चर्य वाटले नाही. चालू द्या.

पंगा's picture

17 Aug 2011 - 9:26 am | पंगा

असो. नेहमीप्रमाणे जे सुचवायचंय ते सोडून भलत्याच गोष्टीवर पांडित्यपूर्ण कीस काढणे चालू झालेले पाहून आश्चर्य वाटले नाही. चालू द्या.

अगदी अगदी!

आणि हो, बादवे, माझेही तुमच्यावर खूप्खूऽऽऽऽऽऽप प्रेम आहे... अग्दी आभाळाएवढे! उम्मऽऽऽऽऽऽऽऽऽम्मा!

परिकथेतील राजकुमार's picture

17 Aug 2011 - 7:05 pm | परिकथेतील राजकुमार

आणि हो, बादवे, माझेही तुमच्यावर खूप्खूऽऽऽऽऽऽप प्रेम आहे... अग्दी आभाळाएवढे! उम्मऽऽऽऽऽऽऽऽऽम्मा!


पंगाशेठ हा कुठला मोड आता ?

बेक्कार हसायला आले वाचून.

पंगा's picture

18 Aug 2011 - 12:15 am | पंगा

धन्यवाद.

याला 'आय लव यू टू!', मोड म्हणतात.

(मराठीत: 'जगाला प्रेम अर्पावे'.)

वाटाड्या...'s picture

18 Aug 2011 - 1:12 am | वाटाड्या...

त्यावरुन कंसाने तरी कशाला देवकी आणि वसुदेवाला एकत्र एका कोठडीत ठेवायच? अस एक जोक ऐकल्याचं आठवत... :)

खुप साधी गोष्ट आहे ना. अगदी शेंबडया पोराला सुद्धा कळेल हे. पण म्हणतात ना, विनाशकाले विपरीत बुद्धी :)

एन जी ओ असतील त्या काळचे जे मध्ये पडले असतील ;)

प्रियाली's picture

18 Aug 2011 - 7:16 pm | प्रियाली

कंसाने तरी कशाला देवकी आणि वसुदेवाला एकत्र एका कोठडीत ठेवायच?

नाहीतर कहानीमें ट्विस्ट येऊन महाभारत कसे झाले असते. कित्ती कित्ती एपिसोड्स वाढले कंसाच्या एका निर्णयाने. ;)

छ्या... तुमी काय तरी गल्लत करताय प्रियालीताय... म्हाबारत पांडवांचा व्हता... किश्नाचा नाय काय... किश्ना सप्पोर्टींग रोलमदी व्हता बा...

प्रियाली's picture

18 Aug 2011 - 7:40 pm | प्रियाली

त्या किस्नाने त्या गीतेपायी किती एपिसोड वाढवले. आपल्या शिरियलची हीच कमाल असते, सपोर्टींग रोलमधली क्याराक्टरं पण जाम फूटेज खाऊन जातात आणि टिआरपी वाढवतात. ;)

हाहाहा... तरी बरंय त्यावेळी सिरियलींमध्ये पॉवरपाईंट ईफेक्ट वापरण्याची अनिष्ट रुढी नव्हती... :)

शैलेन्द्र's picture

16 Aug 2011 - 9:14 pm | शैलेन्द्र

"म्हातार्‍या माणसांना आपलं राहतं घर सोडून, गाव सोडून, आजूबाजूचे शेजारी पाजारी सोडून परक्या ठीकाणी राहायला जाणं कठीण होतं असा अनुभव आहे."

वृद्धाश्रमात राहण्यापेक्षा आपल्या माणसात राहणे कुणीही पसंत करेल..

बाकी इतर काँम्प्लीकेशन करण्यापेक्षा, जर एकुलती एक मुलगी असेल तर तिने आपल्या आई-वडिलांना स्वतःच्या घरी आणनेच श्रेयस्कर ठरते. फक्त त्याकडे मुलीच्या सासरच्यांनी व समाजाने काही वेगळी गोष्ट म्हनुन पहायला नको..

प्रियाली's picture

16 Aug 2011 - 9:17 pm | प्रियाली

म्हातार्‍यांची उचलबांगडी कशीही होवो आम्ही घरजावई* होणार नाही मुलीकडे राहायला जाणार नाही असे का? ;)

* हा शब्द मला पसंत नाही.

शैलेन्द्र's picture

16 Aug 2011 - 10:03 pm | शैलेन्द्र

मुलांनाही आई बाबा असतात हो.. एकाला न्याय देताना दुसर्‍यावर अन्याय का?

प्रियाली's picture

16 Aug 2011 - 11:02 pm | प्रियाली

आतापर्यंत सरसकट मुलींच्या आईबापांवर अन्याय चालला होता हे मान्य आहे का? ;) मुलाच्या आईवडिलांनी जावं की सुनेकडे राहायला मुलासोबत.

शैलेन्द्र's picture

16 Aug 2011 - 11:55 pm | शैलेन्द्र

हेहे.. साधा उपाय म्हणजे, आई बाबांनी आपापल्या मुलांकडे रहायला जाव.. मुलगा मुलगी न बघता.. आणी त्यासाठी प्रत्येक कुटुंबाने स्वता:चे वेगळे घर करावे..

नगरीनिरंजन's picture

17 Aug 2011 - 4:37 am | नगरीनिरंजन

अगदी बरोबर! 'आत्तापर्यंत' हे ठीक आहे. पण कधीपासून ते सांगता येईल काय? त्यापूर्वी परिस्थिती उलट नव्हतीच आणि मुलगे मुलींकडे जात नव्हते हे सिद्ध झाले आहे काय? पूर्वी बर्‍याच प्रदेशांमध्ये मातृसत्ताक पद्धत होती असं ऐकलंय ते खोटं आहे का?

असो. मुद्दा एवढाच आहे की हे ही एक चक्रच असू शकते. यात मुलीच्या किंवा मुलाच्या भ्रूणहत्येचे समर्थन करण्याचा हेतू नाही. आता चाललंय त्याच्या उलट निर्णय घेऊन चक्र उलट फिरण्याशिवाय काहीही होणार नाही. आज मुलांना म्हत्व आहे म्हणून स्त्रीभ्रूणहत्या होतात, उद्या मुलींना महत्व आले तर पुरुषभ्रूणहत्या होतील. म्हणून व्यवस्थेत वेगळा काहीतरी बदल हवा असे वाटते.

प्रियाली's picture

17 Aug 2011 - 4:55 am | प्रियाली

पण कधीपासून ते सांगता येईल काय? त्यापूर्वी परिस्थिती उलट नव्हतीच आणि मुलगे मुलींकडे जात नव्हते हे सिद्ध झाले आहे काय? पूर्वी बर्‍याच प्रदेशांमध्ये मातृसत्ताक पद्धत होती असं ऐकलंय ते खोटं आहे का?

मी तरी भारतात परिस्थिती उलट असल्याबद्दल ऐकलेले नाही. तसे काही जमातींमध्ये मातृसत्ताक पद्धती असल्याचे ऐकले आहे पण सरसकट तशी परिस्थिती असल्याचे ऐकलेले नाही. तुम्ही ठामपणे म्हणताय तर त्या बर्‍याच प्रदेशांची माहिती द्या बघू.

मुद्दा एवढाच आहे की हे ही एक चक्रच असू शकते. यात मुलीच्या किंवा मुलाच्या भ्रूणहत्येचे समर्थन करण्याचा हेतू नाही. आता चाललंय त्याच्या उलट निर्णय घेऊन चक्र उलट फिरण्याशिवाय काहीही होणार नाही. आज मुलांना म्हत्व आहे म्हणून स्त्रीभ्रूणहत्या होतात, उद्या मुलींना महत्व आले तर पुरुषभ्रूणहत्या होतील. म्हणून व्यवस्थेत वेगळा काहीतरी बदल हवा असे वाटते.

म्हणजे काय? चक्रात घालून फिरवल्याप्रमाणे शब्द वाटले. अर्थ काहीच कळला नाही. ;)

नगरीनिरंजन's picture

17 Aug 2011 - 6:00 am | नगरीनिरंजन

माझा नृवंशशास्त्राचा अभ्यास नसल्याने आत्ता माहिती देऊ शकत नाही. मिळवून देईन.
उर्वरित भाग कळला नाही त्याला मी काही करु शकत नाही.

कसला बदल? : पैशाचं अतोनात महत्व कमी करु शकत नसल्यास विवाहाचं अतोनात महत्व कमी करणे, विवाहाशिवायच्या शरीरसंबंधांना व संततीला हीनत्व न देणे आणि योनिशुचितेच्या कल्पना बाद करणे असे काही बदल करता येतील.

विवाहाशिवायच्या शरीरसंबंधांना व संततीला हीनत्व न देणे आणि योनिशुचितेच्या कल्पना बाद करणे असे काही बदल करता येतील.

तुम्ही तर अगदी संस्कृतीच्या मुळावरच घाव घालायला उठलात राव ;)

नगरीनिरंजन's picture

17 Aug 2011 - 9:54 am | नगरीनिरंजन

खरं आहे. संस्कृतीला मूळव्याध झाला तर घाव घालावेच लागतील. ;)

संस्कृतीवर कुणी घाला घातला तर त्यांच्या घरांवर दगड मारायचीही संस्कृती आहे... जपून राहा ;)

नगरीनिरंजन's picture

17 Aug 2011 - 11:35 am | नगरीनिरंजन

याला इशारा म्हणायचं की धमकी? ;-)

सुधीर१३७'s picture

17 Aug 2011 - 3:01 pm | सुधीर१३७

केवळ वस्तुस्थितीची जाणीव........................ :wink:

नगरीनिरंजन's picture

17 Aug 2011 - 3:15 pm | नगरीनिरंजन

मिपावरच्या "चर्चा" कोणी किती गंभीरपणे घेत असेल त्या वस्तुस्थितीचीही जाणीव आहे मला. :)

विवाहाशिवायच्या शरीरसंबंधांना व संततीला हीनत्व न देणे आणि योनिशुचितेच्या कल्पना बाद करणे असे काही बदल करता येतील.

अभिनंदन वांझोट्या चर्चेपेक्षा एकदम मूळमूद्याला हात घातल्या बद्दल खरोखर अभिनंदन. पण लगेच केवळ एखादा असा विचार अभ्यासासाठी मांडणेही त्यावर मूक्त चर्चा/मंथन न करता तडक संस्कृती वोरोधी ठरवले जाइल असं वाटलच होतं. पण हे संस्कृती विरोधी ठरवणार्‍यांना एकच प्रश्न ? स्त्रियांना पूरूषांसमान मानणे हे तूमच्या संस्कृती विरोधी नाही काय ? पूरूषांनी कसेही बदफैली जगावे आणी स्त्रीने मात्र लग्न करूनच मग माता बनावे.. वा वा वा, छान उध्दार होणार अशा संस्कृती रक्षकांकडून स्त्रियांचा :(. एकदम समान.

सहज's picture

17 Aug 2011 - 4:43 pm | सहज

समांतर अवांतर- समानतेच्या गफ्फात व्यसनी बाई चालेल का? जी कारणे पुरुष सर्रास दारु प्यायला देतात ती बायकोने दिली गेली व समाजाने स्वीकारली तर ती समानता म्हणायची का संस्कृती बुडाली म्हणून गळा काढायचा?

दुवा फु बै फु

आत्मशून्य's picture

17 Aug 2011 - 5:49 pm | आत्मशून्य

काकूला मिशा असत्या तर तिला काका म्हटले असते म्हणण्यासारखे झाले.

असो, थोडा गोंधळ आहे आपल्या विधानात, तूम्ही संस्कृती बुडाली म्हणून गळा नक्कि केव्हां काढणार ?
१) स्त्रि ने दारू पीली म्हणून ?
की
२) तीने गफ्फा मारताना पूरूषांची कारणे ढापली म्हणून ?
का
३) ह्या गोश्टी समाजाने स्विकारल्या म्हणून ?

बाकी प्रश्न क्लिअर झाला की संस्कृती रक्षक याचे उत्तर तूम्हाला नक्कि देतील ही अपेक्षा आहे..

प्रियाली's picture

17 Aug 2011 - 5:53 pm | प्रियाली

संस्कृतीला मूळव्याध झाला तर घाव घालावेच लागतील.

संस्कृतीला मूळव्याध झाला आहे हे तुमचे वैयक्तिक मत आहे परंतु तसे मानून बघायला गेले तर जगातील प्रत्येक संस्कृती मूळव्याधीग्रस्त आहे असेच म्हणावे लागेल. ज्या देशांत योनिशुचिता, कुमारीमाता वगैरे प्रश्नांना प्रश्न मानले जात नाहीत त्यांच्याकडे वेगळ्या अडचणी आहेत.

कोणतीही संस्कृती घाव घालून दोन तुकडे केल्याने सुधरत नसते तेव्हा संस्कृतीत बदल हवे असतील तर ते टप्प्या टप्प्याने, पायरी-पायरीने यायला हवेत असे वाटते.

त्यातील पहिली पायरी, मुलांनी लग्न झाल्यावर शक्य असल्यास मुलीकडे राहायला जावं. (या विचाराने अनेक मिपाकर पुरुष का बरे गठळले ते कळले नाही. ;) )

नगरीनिरंजन's picture

17 Aug 2011 - 8:13 pm | नगरीनिरंजन

अडचणी या असो की वेगळ्या, जोपर्यंत योग्य ते बदल घडवण्याचे प्रयत्न होतात तो पर्यंत आशा असतेच. मुलीच्या घरी मुलाने जाऊन राहिल्याने हळूहळू मुलींचे महत्व वाढत जाईल हे खरेच, पण मग हळूहळू मुलींचे महत्व आजच्या मुलांएवढे होऊन फक्त अदलाबदल होऊन हा प्रश्न उलटा होऊन पुन्हा उद्भवणार नाही असे ठामपणे म्हणता येईल का?
बायकोच्या घरी जाऊन राहायचे या कल्पनेने मिपाकर पुरुष गळाठले कारण स्वतःच्या घरात बायको इतका अधिकार आणि नियम गाजवते तर तिच्या घरी गेलो तर काय होईल याची कल्पना करून पाहिली असेल बहुतेकांनी.
यावर एक छान कल्पनारंजक गोष्ट होईल खरी. जसा सालस गरीब बायकांना दुष्ट सासरच्यांचा त्रास असतो, माहेरी जाऊ दिले जात नाही, माहेरच्या कोणाला येऊ दिले जात नाही तसं सालस जावयांच्या बाबतीत व्हायला किती वर्षे लागतील असा अंदाज आहे?

प्रियाली's picture

17 Aug 2011 - 8:16 pm | प्रियाली

हळूहळू मुलींचे महत्व आजच्या मुलांएवढे होऊन फक्त अदलाबदल होऊन हा प्रश्न उलटा होऊन पुन्हा उद्भवणार नाही असे ठामपणे म्हणता येईल का?

अदलाबदल होणे म्हणजे १००% असे थोडेच? जिथे गरज असेल तिथे मुलांनी मुलीकडे जावे, किंवा मुलींनी मुलांकडे. उलट त्यामुळे बॅलन्स येईल असे वाटते.

यावर एक छान कल्पनारंजक गोष्ट होईल खरी. जसा सालस गरीब बायकांना दुष्ट सासरच्यांचा त्रास असतो, माहेरी जाऊ दिले जात नाही, माहेरच्या कोणाला येऊ दिले जात नाही तसं सालस जावयांच्या बाबतीत व्हायला किती वर्षे लागतील असा अंदाज आहे?

कधी लिहिताय? वाचण्यास उत्सुक....

नगरीनिरंजन's picture

17 Aug 2011 - 8:50 pm | नगरीनिरंजन

>>जिथे गरज असेल तिथे मुलांनी मुलीकडे जावे, किंवा मुलींनी मुलांकडे. उलट त्यामुळे बॅलन्स येईल असे वाटते.
हे पटले. कोणतीही रुढी करण्यापेक्षा परिस्थितीप्रमाणे लोकांना जगू देणे आपल्या समाजाला इतके अवघड का जाते कोण जाणे? एकत्र राहणार नाही अशी अट घालणे आणि ती मान्य करणे हे सध्याच्या काळात होते आहेच. कदाचित पुढच्या पिढीत तुम्ही म्हणता तसेही होईल.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Aug 2011 - 9:09 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पण तरीही कल्पनाविलासाच्या बाबतीत प्रियालीशी सहमत. वेताळाला पुन्हा झाडावर चढवाच.

llपुण्याचे पेशवेll's picture

18 Aug 2011 - 9:23 am | llपुण्याचे पेशवेll

खरं आहे. संस्कृतीला मूळव्याध झाला तर घाव घालावेच लागतील.

हा हा हा चालूद्या. तुमच्याकडे मूळव्याध झालीतर घाव घालतात का? आम्ही तर काही लोकांना कैलास जीवन लावताना पाहीले आहे. बाकी संकृती बदलण्याच्या गोष्टी करणारे अंमळ अपरीपक्व असतात असे आमचे वैयक्तीक मत आहे. बाकी चालूद्या.

नगरीनिरंजन's picture

18 Aug 2011 - 9:31 am | नगरीनिरंजन

परिपक्व म्हणजे मराठीत पिकलेले ना हो? आम्ही अंमळ नाही तर अगदी १००% अपरिपक्व आहोत आणि बालीशही आहोत हे आम्हाला मान्य आहे आणि मरेपर्यंत आम्ही तसेच राहायचा प्रयत्न करणार आहोत.
चालू आहेच.

पंगा's picture

18 Aug 2011 - 5:57 pm | पंगा

तुमच्याकडे मूळव्याध झालीतर घाव घालतात का? आम्ही तर काही लोकांना कैलास जीवन लावताना पाहीले आहे.

हो असेच काही उपाय करतात (कैलास जीवन, प्रिपरेशन एच वगैरे) असे ऐकले होते खरे. क्वचित्प्रसंगी शस्त्रक्रिया करावी लागते असेही ऐकले होते, पण शस्त्रक्रियेच्या निश्चित स्वरूपाविषयी कल्पना नव्हती. ती करून देऊन माझ्या सामान्यज्ञानात भर घातल्याबद्दल श्री. नगरीनिरंजन यांचे मनापासून आभार.

शस्त्रक्रिया इतकी अघोरी आणि "मूलगामी" असेल याची कल्पना नव्हती. असो.

नगरीनिरंजन's picture

18 Aug 2011 - 6:48 pm | नगरीनिरंजन

>>शस्त्रक्रिया इतकी अघोरी आणि "मूलगामी" असेल याची कल्पना नव्हती.
शस्त्रक्रिया मूलगामी नसेल आणि मुळावर नुसतीच मलमपट्टी लावून ठेवली तर मूळ बरे होत नाही आणि पुनःपुन्हा वाढते.
>>असो
हो हो. असो. असो.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Aug 2011 - 5:15 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

वृद्धाश्रमात राहण्यापेक्षा आपल्या माणसात राहणे कुणीही पसंत करेल..

पटलं नाही.

आर्थिक स्वावलंबन असल्यास आपल्या स्वतःच्याच घरात रहाणे हा मार्ग वृद्धांना आपलासा का वाटू नये? मुलांच्या (मुलाच्या अगर मुलीच्या) घरात रहाणे म्हणजे दुसर्‍याच्या घरात रहाणे, जिथे आपल्याला तडजोडी कराव्या लागणार. तसं करण्यापेक्षा स्वतःच्या घरात रहाणं श्रेयस्कर नाही का? मुलांना जन्म देण्याचं एक आणि/किंवा महत्त्वाचं कारण म्हातारपणी काळजी घ्यायला कोणी असावं असंही असतं का? (तसं असेल तर त्या मुला-मुलींसाठी मला "अरेरे" म्हणावंसं वाटलं.)

अपत्यांच्या नोकरीची ठिकाणं आवडली नाहीत किंवा जीवनपद्धती पटली नाही किंवा माझं आयुष्य मला हवं तसं मी जगेन किंवा अपत्यांना तीन खोल्यापेक्षा मोठं घर परवडत नाही (जे तसंही लहान पडतं) म्हणून आपापल्या घरात आनंदात रहाणारे वृद्ध मी स्वतःच्या घरात आणि ओळखीतही पाहिलेले आहेत.

मी स्वतः एकही वृद्धाश्रम पाहिलेला नाही, पण होस्टेलात जसं मुलं-मुली आनंदात रहातात आणि/किंवा रहायला शिकतात तसं वृद्धांच्या बाबतीत होत नाही का?

१००% सहमत.
माझ्या नव्व्दीच्या घरातल्या (चुलत्) आजेसासूबाई त्यांच्या मुलाकडे किंवा मुलीकडे न राहता वृद्धाश्रमात राहतात आणि न चुकता अपत्यांच्या भेटत राहतात. त्यांना हे जेटयुगातले फाष्ट संसार मान्य नाहीत तसेच त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहेत. त्यांना उगीच रिक्षाने फिरणेही पसंत नाही. त्यांच्या वृद्धाश्रमापासून सक्काळी लवकरची बस (कमी गर्दीची) पकडून मुलाबाळांना भेटायला जातात. सगळ्या समारंभांना वेळेत हजर असतात.
मुलांची (आता नातवंडांचीही) आयटी जीवनपद्धती न आवडणे हे कारण आहे पण म्हणून उगीच रुसून बसल्या आहेत असे नाही.
वृद्धाश्रमात डॉक्टरी तपासण्या होत असतात. शिवाय मुलांना वेळेवर स्वत: होवून स्पेशल तपासणीची आठवण करून देतात. "बघुया त्याला/ तिला आईच्या चेक अपची आठवण तरी आहे का?" असले प्रकार नाहीत म्हणून त्यांचं कौतुक वाटतच वाटतं.
इतकच नाही तर माझ्या बाबांच्या मित्राचे दोन नातेवाईक (मुले हिरवी झाल्याने) इथल्या असिस्टेड निवासात राहतात. बाबांनी एवढ्यात त्यांना फोन केले तर ८४ आणि ८५ वर्षाचे ते बहिण भाऊ त्यांच्या वयाला साजेश्या आनंदात होते आणि विकांताला मुला/मुलीकडे जात होते.

तुमच्या आजेसासूबाई दाखवत असलेला समजूतदारपणा जर सासवांनी दाखवला तर मुलींच्या बर्‍याचशा समस्या निकालात निघतील. म्हणजे अगदीच काही वृद्धाश्रमात जायला हवं अस काही नाही, पण रोजच्या आयुष्यात रुसवेफुगवे, मानसन्मान बाजूला ठेवलं, "आमच्या वेळी नव्हतं हो बाई असं काही" हे पालूपद बंद केलं तर कौटुंबिक स्वास्थ्य चांगलं राहण्यास नक्कीच मदत होईल.

मुले हिरवी झाल्याने

कल्पना छान आहे. उगाच आपलं देशस्थ, परदेशस्थ शब्द वापरुन वादाला तोंड देण्यापेक्षा त्या त्या देशाचा त्यांच्या चलनी नोटांच्या रंगांचा उल्लेख करायचा. :)

मुले हिरवी झाल्याने

ह्याचा अर्थ ग्रीन कार्ड होल्डर असा अहे हो वाक्डे !!!!
चलनी नोटा तर भारतातही हिरव्याच आहेत....

धन्या's picture

18 Aug 2011 - 10:16 am | धन्या

उप्स... गडबड झाली असं दिसतंय... तिकडे साता-समुद्रापार जाउनही ग्रीन कार्डच्या नादी न लागल्यामुळे या गोष्टीचा फार विचार केला नाही ;)

शैलेन्द्र's picture

17 Aug 2011 - 10:10 am | शैलेन्द्र

व्यक्ती तितक्या प्रवृत्ती,

स्वता:चे छंद जपत मुरलेला वानप्रस्थ जगणारे जितके आहेत त्याहुन खचीतच जास्त मुला- नातवंडांच्या संसरात, "भरल्या गोकुळात" आनंद मानणारे आहेत. आपण जे कमावलं, जे मागे ठेवलं, ते आज आपला वंश उपभोगतोय हे पाहण्यात अतिव समाधान मानणारे सगळे जेष्ट नागरीक खेडवळ किंवा बुरसटलेल्या विचारांचे आहेत असं म्हणता येइल काय? माझ्या आईला देवदर्शनापेक्षा नातवाची शी साफ करण्यात जास्त आनंद मिळतो म्हणुन तिच काही चुकतं अस मला वाटत नाही, तसचं तिच्या मानसिकतेविरुद्ध तिला तथाकथीत अभिजात आवडींकडे ढकलणेही पटत नाही. आपल्या पालकांना एकटं ठेवण्याच्या विरुद्ध असलेला तरुण वर्ग आजही भारतात तरी बहुसंख्य आहे, तसच ही कल्पणाही सहन न होणारे जेष्टही बहुसंख्य आहेत. कितीही म्हटल तरी एकट राहण्यात अनेक तडजोडी कराव्या लागतात, सगळ्यांचीच प्रक्रुती निकोप नसते. मानसीक आंदोलन, एकटेपणाचा त्रास, तुटलेपणाची भावना या सार्‍याचा सामना करावा लागतो. जे विदेशात चांगल वाटत ते भारतात तितक सोप नाही. मुळातच भारतिय माणुस हा जरा दाटीवाटीने राहणारा प्राणी आहे..

हे सगळ बघता शक्य असेल तेंव्हा बहुसंख्य मुलं आपल्या पालकांना आपल्याच बरोबर ठेवतात(व ठेवाव- वैयक्तीक मत) व पालकही तेच पसंत करतात..

राहता राहील, पालकांनी मुलांकडुन ही अपेक्षा करावी का? करु नये.. पण कुठेतरी असते हे कसं अमान्य करायचं? तसच जे आयुष्य/वेळ्/श्रम आपल्या पालकांनी आपल्याला दिले, त्यांच्यासाठी, जर आपल्या तारुण्यात काही तडजोडी कराव्या लागल्या तर त्या करण्यातही आनंद मानणारे सगळी जोडपी वेडी कालबाह्य ठरतात का?

युयुत्सु's picture

17 Aug 2011 - 3:48 pm | युयुत्सु

मी स्वतः एकही वृद्धाश्रम पाहिलेला नाही, पण होस्टेलात जसं मुलं-मुली आनंदात रहातात आणि/किंवा रहायला शिकतात तसं वृद्धांच्या बाबतीत होत नाही का?

साधी गोष्ट आहे. तारूण्य आणि वार्धक्य या दोन जीवनाच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत, प्रत्येक वृद्ध व्यक्तीच्या मानसिक आणि शारीरिक गरजा वेग वेग ळ्या असू शकतात.

प्रियाली's picture

17 Aug 2011 - 6:13 pm | प्रियाली

तारूण्य आणि वार्धक्य या दोन जीवनाच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत, प्रत्येक वृद्ध व्यक्तीच्या मानसिक आणि शारीरिक गरजा वेग वेग ळ्या असू शकतात.

युयुत्सुंशी चक्क सहमत आहे असे म्हणावे लागत आहे. ;)

llपुण्याचे पेशवेll's picture

18 Aug 2011 - 9:44 am | llपुण्याचे पेशवेll

सहमत आहे. पण नुसता आर्थिक स्वावलंबन हाच निकष नसतो त्यात. थोडेसे शारीरीक परावलंबित्व आले तर एका वृद्ध व्यक्तीचे दुसर्‍या वृद्ध व्यक्तीला करायला तितकेच झेपेल असे नाही. त्यात ती व्यक्ती जोडीदार गमावलेली असेल तर एकट्याने राहणे वृद्धापकाळी जीवावर येते. म्हणूनच कदाचित मुलाकडे जाणे वगैरे गोष्टी असाव्यात.
वृद्ध झाल्यावर थोडेसे मानसिक आणि शारीरीक परावलंबित्व आल्यावर, मानसिक आधार असलेले , जवळीक असलेले कोणतरी बरोबर असावे असे वाटते म्हणून वृद्धाश्रमात किंवा होस्टेल मधे राहणे वृध्दांना तितकेसे जमत नसावे.

"मुलीच्या आईवडिलांनी हक्काने मुलीकडे येऊन राहण्यापेक्षा जावयानेच लग्न झाल्यावर मुलीकडे राहायला जाणे योग्य होईल."

हे वाक्य विचारपुर्वक लिहिले गेले असावे!! हो, कारण सध्याच्या परिस्थितीत ९०% पुरुष ( लग्न झालेले) हे नोकर्‍या करीत नसल्यामुळे ते सहजपणे आपल्या सासरी राहायला जाउ शकतील किंवा नोकरी असेल तर तिला ( म्हणजे नोकरीला) लाथ मारुन आपल्या सासरी जातील. ( तिथे घरी बसेल/ टवाळक्या करेल/ घरकाम करेल ..वगैरे वगैरे..) तोपर्यंत घरातील कर्ती-सवरती बायको नोकरी -व्यवसाय करेल; ....

असो;
तुम्ही सध्या सासरी की माहेरी ( अर्थात लग्न झालेले असेल तरच उत्तर द्या), आणि हो, तुमचा बेटर हाफ ( म्हणजे नवरा हो) कुठे मुक्कामाला असतात? ( त्यांच्या ) माहेरी कि सासरी ?

प्रियाली's picture

17 Aug 2011 - 5:20 pm | प्रियाली

हे वाक्य विचारपुर्वक लिहिले गेले असावे!!

नक्कीच!

परिस्थितीत ९०% पुरुष ( लग्न झालेले) हे नोकर्‍या करीत नसल्यामुळे ते सहजपणे आपल्या सासरी राहायला जाउ शकतील किंवा नोकरी असेल तर तिला ( म्हणजे नोकरीला) लाथ मारुन आपल्या सासरी जातील. ( तिथे घरी बसेल/ टवाळक्या करेल/ घरकाम करेल ..वगैरे वगैरे..) तोपर्यंत घरातील कर्ती-सवरती बायको नोकरी -व्यवसाय करेल; ....

हे मात्र तुम्ही अजिबात विचार न करता लिहिले आहे. नोकरी करणे आणि सहजपणे सासरी राहायला जाणे यांचा परस्परसंबंध काय? आज अनेक बायका ज्या नोकरी करतात त्या सहजपणे आपल्या सासरी जातात पण आजही पुरुषांची ही मानसिकता नाही हे स्पष्ट दिसून येते. किंबहुना, वरील प्रतिसादातून प्रदर्शित झालेली मानसिकता स्त्रियांच्या विरोधी आहे हे स्पष्ट दिसून येते. नवर्‍याने घरकाम केले तर काहीही बिघडत नाही. उलट कंबर कसून घरकाम करायलाच हवे. घरी बसणारी बाई टवाळक्या करते असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या आई/ बहिणीबद्दल किंवा बायकोबद्दल तुमचे विचार पाहून वाईट वाटले.

तुम्ही सध्या सासरी की माहेरी ( अर्थात लग्न झालेले असेल तरच उत्तर द्या), आणि हो, तुमचा बेटर हाफ ( म्हणजे नवरा हो) कुठे मुक्कामाला असतात? ( त्यांच्या ) माहेरी कि सासरी ?

मी माझ्या स्वतंत्र घरात राहते. त्याआधी जेव्हा परदेशातून देशात काही वर्षे होतो तेव्हा मुंबईत घर नसल्याने माझ्या आईवडिलांच्या घरी राहिलो आहोत. त्यात मला किंवा माझ्या नवर्‍याला शरम वाटत नाही पण तुम्ही अगदी वैयक्तिक उतरलात त्यावरून तुमची मानसिकता लक्षात आली.

"आज अनेक बायका ज्या नोकरी करतात"

किती टक्के बायका नोकरी करतात? आकडे द्या , मग बोलु या विषयावर.

"नोकरी करणे आणि सहजपणे सासरी राहायला जाणे यांचा परस्परसंबंध काय?"

सहजपणे सासरी राहायला जाणे हे नविनच ?

"आजही पुरुषांची ही मानसिकता नाही "

मानसिकतेचा प्रश्नच नाही. ... जास्त लिहिण्यात अर्थ नाही.

"त्याआधी जेव्हा परदेशातून देशात काही वर्षे होतो तेव्हा मुंबईत घर नसल्याने माझ्या आईवडिलांच्या घरी राहिलो आहोत त्यात मला किंवा माझ्या नवर्‍याला शरम वाटत नाही पण तुम्ही अगदी वैयक्तिक उतरलात त्यावरून तुमची मानसिकता लक्षात आली"

मुंबईत घर नसल्यामुळे तुम्ही तुमच्या आईवडिलांकडे राहीला- हे तुम्ही स्वतः मान्य करता. त्यात शरम काय वाटायची? अशा परिस्थीतित "आईवडिलांकडे राहणे " हे त्यावरचे अत्यंत practical उत्तर होते. बाकी तुमच्या
अगदी वैयक्तिक अशा बाबींमध्ये मला बिलकुल रस नाही, तुम्हाला असा भास झाला असल्यास तो तात्काळ दुर करावा.

प्रियाली's picture

17 Aug 2011 - 5:59 pm | प्रियाली

टक्केवारी द्यायला मी संख्याशास्त्री नाही. किंबहुना, तुम्हाला टक्केवारी हवी असेल तर तुम्ही काढा शोधून. अनेक स्त्रिया नोकरी करतात एवढे सत्य तुम्हाला का बरे नाही चालत? टक्केवारी मागणं वगैरे म्हणजे मुद्दे नाहीत म्हणून वाद घालणं आहे. गेली ५०पेक्षा अधिक वर्षे अनेक बायका नोकरी करत आहेत आणि त्यापैकी जवळपास सर्वच बायका नवर्‍याच्या घरी राहायला गेल्याचे दिसते. तुमच्याकडे त्यापेक्षा वेगळा डेटा असेल तर अवश्य सादर करा.

सहजपणे सासरी राहायला जाणे हे नविनच ?

सहजपणेच जातात. जात नसतील तर सिद्ध करा. बाकी सहजपणे हा शब्द तुमचाच आहे. :)

मानसिकतेचा प्रश्नच नाही. ... जास्त लिहिण्यात अर्थ नाही.

मानसिकता नाही हा तुमचा प्रतिसाद सिद्ध करत होता.

बाकी तुमच्या
अगदी वैयक्तिक अशा बाबींमध्ये मला बिलकुल रस नाही, तुम्हाला असा भास झाला असल्यास तो तात्काळ दुर करावा.

जर रस नव्हता तर विषय काढलात कशाला? माझ्या व्यक्तिगत आयुष्यावर उतरलात कशाला? बायका घरात बसून टवाळक्या करतात हे सांगायला? की आपण बायकोकडे राहायला गेलो तर पुरुषी इगो दुखावतो हे दाखवून द्यायला?

मुंबईत घर नसल्यामुळे तुम्ही तुमच्या आईवडिलांकडे राहीला- हे तुम्ही स्वतः मान्य करता. त्यात शरम काय वाटायची? अशा परिस्थीतित "आईवडिलांकडे राहणे " हे त्यावरचे अत्यंत practical उत्तर होते.

धन्यवाद. माणसाने प्रॅक्टिकलच राहायला हवे. किंबहुना, एकुलती एक मुलगी असेल आणि तिच्या आईवडिलांकडे लग्नानंतर एखादा मुलगा राहायला गेला तर तोही अत्यंत प्रॅक्टिकल आणि योग्य विचार आहे असे मला वाटते.

सही रे सई's picture

18 Aug 2011 - 5:29 pm | सही रे सई

मी प्रियालीशी पूर्ण सहमत.
खरं तरं या विषयावर वेगळा धागा काढून चर्चा व्हायला पाहिजे. जावयाने गरजेप्रमाणे आपल्या सासूसासर्‍यांकडे जावून राहायला काहिच हरकत नाही.

या कडे समाजाने जर वेगळ्या द्रुष्टीने पाहिले नाही तर मग मुलीच्या भ्रूणहत्येला थोडा तरी आळा बसेल.

पंगा's picture

18 Aug 2011 - 5:41 pm | पंगा

जावयाने गरजेप्रमाणे आपल्या सासूसासर्‍यांकडे राहण्याने (आणि समाजाने त्याकडे विचित्र नजरेने न पाहण्याने) मुलीच्या भ्रूणहत्येला आळा नेमका कसा बसेल ते कळले नाही.

बाकी चालू द्या.

शाहिर's picture

16 Aug 2011 - 4:39 pm | शाहिर

आज च्या युगा मध्ये सुद्धा किति जन एकुलत्या एक मुलि च्या आइ वडिलांना कायमचे संभालायल तयार असतात ??

llपुण्याचे पेशवेll's picture

18 Aug 2011 - 9:59 am | llपुण्याचे पेशवेll

पुष्कळ लोक असतात. अगदी स्वतः च्या घरात सांभाळत नसले तरी त्यांना जवळचे घर बघून देणे दिवसातून एकदा जाऊन त्यांची विचारपूस करणे, काही मदत लागली तर करणे, त्यांच्या घरी काही धर्मकार्य करायचे असेल तर पूर्ण मदत करणे अशा गोष्टी करणार्‍या अनेक एकुलत्या एक मुली आणि त्यांचे पती मी पाहीले आहेत.

अभिनंदन. अभिनंदन. अभिनंदन. असं त्रिवार अभिनंदन.

टिपः- तूमच्या टिपांना फार महत्व देण्यापेक्षा मिपाकर्स धाग्याचा मजकूर काय आहे याचे अवलोकन करून अनूमान काढायला प्राधान्य देतात, असं निरीक्षण आहे

शिल्पा ब's picture

17 Aug 2011 - 5:17 am | शिल्पा ब

युयुत्सु, तुम्हालाही मुलगी आहे हे वाचून आनंद झाला. पण मग तरीही तुम्ही बायकांच्या विरुद्ध कसे काय हो? तुमचे आधीचे लेख(?) वगैरे वाचलेले असल्याने उगाचच एक प्रश्न मनात डोकावला इतकेच.

धन्या's picture

17 Aug 2011 - 10:03 am | धन्या

हाहाहा... त्यांचा राग त्यांच्या पिढीतल्या बायकांविरुद्ध असावा. त्यांच्या मुलींच्या पिढीविषयी त्यांची काही तक्रार नसावी ;)

ह घे. :)

पण मग तरीही तुम्ही बायकांच्या विरुद्ध कसे काय हो?

मी सरसकट स्त्री विरोधक नाही, हे आता तुम्हाला पटले असेलच.

प्रियाली's picture

17 Aug 2011 - 5:09 pm | प्रियाली

मी सरसकट स्त्री विरोधक नाही, हे आता तुम्हाला पटले असेलच.

तुम्ही स्त्रियांच्या कुठल्या बाबींमध्ये सहमत आहात, कुठे त्यांना पाठिंबा देता हे तरी कळू दे. अन्यथा, तुम्ही सरसकट स्त्रियांचे विरोधक नाहीत हे कसे पटायचे?

मुलगी ही परक्यांच धन हा समज - त्यामुळे मुली वाढविण्यावर होणार्‍या खर्चाचा मुलगी वाढविणार्‍या कुटुंबाला परतावा/फायदा मिळत नाही. जो मुलाच्या बाबतीत थोडाफार मिळु शकतो.
हे पटले नाही.
आपली मुले( मुली/ मुलगे) हे आपले धन का समजावे? त्याना स्वतन्त्र व्यक्तीमत्व असते. एक स्वतन्त्र व्यक्ती म्हणून ती समाजात वावरत असतात.मुलाना वाढवण्याच्या खर्चाचा इतका विचार करावा लागत असेल तर तो खर्च करून नये. आपण मुलांवर( मुली/ मुलगे) जो खर्च करतो तो त्यानी आपल्याला त्याचा परतावा द्यावा म्हणून नव्हे तर मुलांनी ( मुली/ मुलगे) स्वतःच्या पायावर उभे रहावे यासाठी.
स्वतःची मुले स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभी राहिलेली मुले( मुली/ मुलगे) पहाणे हा प्रत्येक आईबापासाठी अभिमानाचा, आनंदाचा विषय असतो. त्यातून परतावा मिळेलच हा विचार बांडगूळ आहे.
आपण मुलाला वाढवले म्हणून त्याने म्हातारपणी आपल्याला आधार द्यावा. आपले ओझे मुलाने वहावे हा विचार करण्यापेक्षा आपण म्हातारपणीसुद्धा कोणावरच भार न होता रहाता येईल या पद्धतीने पैशाचे प्लॅनिंग करावे.
त्यामुळे मुली वाढविण्यावर होणार्‍या खर्चाचा मुलगी वाढविणार्‍या कुटुंबाला परतावा/फायदा मिळत नाही
कोणत्या काळात वावरताय हो तुम्ही? नीट संबन्ध ठेवले तर जावई आणि मुलीदेखील आईबापाची तितकीच काळजी घेतात जितकी सुना आणि मुले घेतात

० मुलगी नवर्‍याचा वंश वाढवते - एकुलती एक मुलगी असेल तर प्रॉपर्टी परक्या घरी घेऊन जाते, हा दृष्टीकोन

मुलगी नवर्‍याचा वंश वाढवते. हे लॉजीकच चुकीचे आहे. मुलगी तिचा स्वतःचा वंश देखील वाढवते.
मुलीने एकुलते असणे हा तिचा दोश आहे का? आणि समजा एकुलती एक मुलगी असली तर आईबापाची प्रॉपर्टी तिने स्वतःसोबत नेली तर त्याबद्दल आक्षेप कशाला?
समजा तिने ती प्रॉपर्टी स्वतःसोबत नेली नाही तर त्याचे काय होईल? दुसरा कोणीतरी उपटसुंभ त्याचा मालक बनेल.
मला स्वत:ला एक मुलगी आहे आणि मला त्याचे अजिबात दू:ख नाही. उलट कधी कधी (काही लोक आत्तापासून तिचा भावी सून म्हणून विचार करतात तेव्हा) मनोमन सुखावायलाच होते
युयुत्सुजी अगदी खरे बोलायचेच झाले तर तुम्ही अजूनही मध्ययुगीन मानसिकतेत वावरताय असेच म्हणावे लागेल.
आपली मुलगी शिकुन मोठी होईल. तिच्या आवडीच्या क्षेत्रात ती यशस्वी करीयर करेल. समाजात मानावे वावरेल असा विचार करण्यापेक्षा. ती कोणाचीतरी सून होईल इतका तोकडा आणि काल् बाह्य विचार करून मुलीच्या मनात ( चूल अणि मूल) हीच प्रतिमा रुजवण्याचे काम आपणच करीत असतो
मुलींबद्दलची समाजाची अशी आजारी मानसीकता घडवण्याचे काम ही विचारसरणीच करीत असते.
समाजाची मानसिकता बदलायची असेल तर आपण आपल्या मुलीला योग्य शिक्षण देवुन तिला खंबीरपणे स्वतःच्या पायावर उभे राहता येईल असे तिचे व्यक्तीमत्व घडवणे हे प्रत्येक पालकाने केले पाहिजे.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

17 Aug 2011 - 11:03 am | विश्वनाथ मेहेंदळे

या धाग्यावरचे काही प्रतिसाद "Shooting the messenger" प्रकारचे वाटताहेत. युयुत्सुंनी वर दिलेली मते त्यांची असतील असे गृहीत धरण्याचे कारण नाही. त्यांनी समाजात काय दृष्टीकोन आहे ते लिहिले आहे. त्यांना ती मते पटतात असे निदान या धाग्यात तरी म्हटले नाही. असे असताना त्यांच्यावर टीका करण्यात काय हशील आहे ?

विजुभाऊ's picture

17 Aug 2011 - 11:21 am | विजुभाऊ

मुलगी म्हणजे फक्त लग्न करून सासरी जाणार यातच तिची इतीकर्तव्यता या विचारसरणी बद्दल वाईट वाटते. ही विचारसरणी सोडून मुलीना पालकानी भक्कम पाठिंबा दिला तर मुली कर्तृत्ववान होऊन आईबापाना आधार होऊ शकतील. मुलगी म्हणजे ओझे हा विचार आपल्या समाजाने सोडून द्यायला हवा

गणा मास्तर's picture

17 Aug 2011 - 8:31 am | गणा मास्तर

ह्या मुलगी नको असणारर्‍यांना बेकायदा गर्भलिंगनिदान करणार्‍यांची साथ मिळते.
खरेतर त्यामुळे हा प्रश्न आणखी बिकट होत चालला आहे.
गर्भलिंग निदान टाळण्यासाठी काय करता येइल.

गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

गर्भलिंग निदान टाळण्यासाठी काय करता येइल.

गर्भपाताचे प्रमाण जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र शासनाने बर्‍याचशा गर्भलिंगनिदान करणार्‍या इस्पितळांना टाळे ठोकले आहेत अशी ऐकीव माहिती आहे.

हेच आपल्याला करता येईल. जर आपल्या लक्षात आलं की एखादया इस्पितळात गर्भलिंगनिदान चाचणी केली जाते तर त्याविरुद्ध आवाज उठवायचा. आपल्याला नाहीच जमलं तर एखादा मोठा झिंदाबाद-मुर्दाबादवाला पकडायचा. त्याला व्यवस्थित समजावून सांगायचं. अगदी समाजाचं भलं व्हावं म्हणून नाही केलं तरी त्याला चमकायला मिळतंय म्हणून तो पुढचं सारं नक्की करेल. :)

सरसकट गर्भलिंग निदान कशाला टाळायला हवे? एखाद्याला माहित करुन हवे असेल की त्याला मुलगा होणार की मुलगी तर तसे त्याला माहित करुन घेता यायला हवे. गर्भलिंग निदान साधारण ५ व्या महिन्यानंतर केल्यास त्यास हरकत नसावी., कारण त्या महिन्यानंतर गर्भ वाढीला लागलेला असतो आणि त्यावेळी शक्यतो गर्भपात करता येत नाहि / केला जात नाही. स्रर्वसाधारणपणे ३ र्‍या महिन्यापर्यंत गर्भपात केला जातो त्यामुळे त्या ठराविक काळापर्यंत गर्भलिंग निदान केले जाऊ नये. नंतर ५ व्या महिन्यानंतर केल्यास त्यास काहि हरकत नसावी असे मला वाटते.

शैलेन्द्र's picture

17 Aug 2011 - 2:27 pm | शैलेन्द्र

साहेब, रोगापेक्षा औषध वाईट होइल हे..

पाचव्याच काय, अगदी सहाव्या/ सातव्या महीन्यातही गर्भपात्/अर्भक काढुन टाकणे शक्य आहे. यात आईच्या जीवालाही धोका संभवतो, कारण असं करण्याचा प्रयत्न करणारे, डॉक्टर कडे जास्त पैसे लागतील म्हणुन स्थानीक पातळीवरच, घरगुती उपायाने हे करायचा प्रयत्न करतील..

काही गोष्टींची हुरहुरच चांगली असते हो.. कशाला सगळ जाणुन घ्यायच?..

पक्या's picture

17 Aug 2011 - 2:32 pm | पक्या

आईच्या जीवाला धोका असतो म्हणूनच ५ व्या महिन्यानंतर तसे कुणी करत नाही. अगदि घरगुती उपाय पण नाहि कुणी करत .
पुर्वी जेव्हा बर्थ कंट्रोल ची साधने नव्हती त्यावेळी बिब्बा खाणे वगैरे प्रकार बायका करत असत. पण हल्ली असे काही होत नाही.

आईच्या जिवाला असलेल्या धोक्याची काळजीतरी इतरांना असते हीच मोठी गैरसमजूत वाटते. मेट्रोसेंट्रिक दृष्टीकोन न ठेवल्यास..

माझं म्हणणं आहे की कोणत्याही गर्भपातालाच विरोध असावा. मुलगा असो किंवा मुलगी.

त्यासाठी भावनात्मक आवाहन करावे. मुलीचा गर्भ असे वेगळे न म्हणता कोणताही गर्भपात म्हणजे जीवहत्या असं आवाहन आणि नियम सर्वत्र करावेत. गर्भपात करणारी केंद्रे बंद करण्याची गरज नाही. फक्त लोकांच्या भावनेला हात घालायला हवा. आणि तो एकूण अपत्य या विषयाबाबत. मुलगी / मुलगा असे नव्हे.

मग ज्यांना खरेच वैद्यकीय इमर्जन्सी म्हणून करायचा आहे ते करतील.

किंवा मग जन्माला आलेली मुलगी आईबापांना नको असेल तर तिला जन्मताच थेट आणि रीतसर सरकारी चाईल्ड केअर सेंटरमधे दाखल करुन घेण्याची सोय हवी. (नो क्वेश्चन्स आस्क्ड).

तिथे अनाथाप्रमाणे वाढेल पण मरण्यापेक्षा बरं ना ते..

कारण.. गर्भात मारता आलं नाही म्हणून जन्मल्यावर दोनतीन दिवसांतच तिला कचर्‍यात फेकल्याच्या, गळा चिरल्याच्या, पिंपात बुडवून मारल्याच्या असंख्य घटना जवळजवळ रोज वाचण्यात येतात.

म्हणजे मुलीला जन्माला घालण्याची सक्ती आईबापांवर केली तरी तिला पुढे प्रेमाने वाढवण्याची कायदेशीर सक्ती कधीच शक्य नाही.

अगदी कचर्‍यात नाही फेकले तरी मग अशा नकोशा मुलीला अगदी लहानपणापासून रोजच कचर्‍यासारखे वागवताना मी अनेक घरांत पाहिले आहे.

प्रतिसाद छान लिहीला आहे फक्त एक मुद्दा खोडावासा वाटतो -
गर्भपातालाही सरसकट विरोध नसावा . फक्त मुलगा / मुलगी ह्या निव्व़ळ लिंगभेदावर गर्भपात केला जात असेल तर ते चूक आहे.
गर्भातील दोष, आईला काही मोठे आजारपण उद्भवल्यास आणि मुळात म्हणजे आईला मूल नको असताना / मुलाला जन्मानंतर वाढवण्याची मानसिक किंवा इतर.. आर्थिक वगैरे तयारी नसताना चुकून गर्भ राहिल्यास अशा कारणास्तव गर्भपातास विरोध नसावा.

गर्भपातालाही सरसकट विरोध नसावा

म्हणून तर भावनिक आवाहनावर भर दिलाय ना. मुलगा / मुलगी असा भेद मधे न आणणे हे तात्कालिक (भावनिक) दृष्ट्या आणि लाँग टर्ममधे उलट इफेक्ट न होण्यासाठीही चांगलेच ठरावे.. शिवाय नीट विचार करुन पाहिलं तर अशा आवाहनात "तुम्ही स्त्रीभ्रूण हत्याकर्ते आहात, किंवा तशा मेंटॅलिटीचे आहात असा थेट आरोप अतएव ऑफेन्सिव्ह वाक्य टाळले जाते. सर्वसमावेशक करायचे तर कोणताच गर्भपात करु नका हे आवाहन जास्त अपील होऊ शकेल. (सर्वच भ्रूणांना जीवनाचा हक्क आहे. प्रत्यक्षात "मुलगा" म्हणून कोणीच हत्या करत नसले तरी..)

वैद्यकीयच काय पण इतर कारणांनीही करणारे करत राहतील. बेकायदेशीर ठरवू नये. "नियम" हा शब्द मी चुकून वापरला.

भावनिक आवाहन म्हणजे मुलगा असो किंवा मुलगी. आता प्रेग्नंट आहात तर त्याला जगू द्या. (अनलेस मेडिकल इश्यू.. इ इ ओघाने आलेच... ते घोषणेतच नको .. इतकेच.. )

म्हणजे आईला मूल नको असताना / मुलाला जन्मानंतर वाढवण्याची मानसिक किंवा इतर.. आर्थिक वगैरे तयारी नसताना चुकून गर्भ राहिल्यास अशा कारणास्तव गर्भपातास विरोध नसावा.

हे काहीसे इंटरेस्टिंग आहे. आईला मूल "नको" असणे मान्य. पण त्या नको असण्याच्या कारणातील काही कारणे आपण वैध ठरवणार आणि काही अवैध.. मुलगी आहे म्हणून नको हाही नको असण्याचा प्रकार असू शकतो. त्यासाठी चाचणी आहे म्हटल्यावर ती करुन गर्भपात का करु नये?

आणि "चुकीने" प्रेग्नंट राहिले तर चुकीचे प्रायश्चित्त / सुधारणा / उतारा म्हणून केवळ अ‍ॅव्हेलेबल असल्याने गर्भपात केला जाणे याला कसली वैधता आणि नैतिकता आहे? त्या जन्माला येणार्‍या मुलाची चूक आहे का?

चूक झाली तर मूल जन्माला घालून वाढवणे, त्यासाठीची मानसिक तयारी करणे हेच त्या चुकीचे प्रायश्चित्त योग्य ठरेल.

चूक करण्याइतपत मानसिक तयारी आहे आणि त्याचे फळ भोगायला मात्र अजून तयारी होत नाही हे अनाकलनीय आहे.

जबरदस्तीने / बलात्कारातून गर्भ राहिला असेल त्याला "चुकीने" म्हणणे चुकीचे ठरेल.. तरीही तो जन्माला येऊ दिलाच पाहिजे.. मग आईची असमर्थता सिद्ध होत असेल तर सरकारने त्या पोराची / पोरीची जबाबदारी घ्यावी.

शैलेन्द्र's picture

17 Aug 2011 - 4:02 pm | शैलेन्द्र

"जबरदस्तीने / बलात्कारातून गर्भ राहिला असेल त्याला "चुकीने" म्हणणे चुकीचे ठरेल.. तरीही तो जन्माला येऊ दिलाच पाहिजे.. मग आईची असमर्थता सिद्ध होत असेल तर सरकारने त्या पोराची / पोरीची जबाबदारी घ्यावी."

हे बरयं ..

म्हणजे त्या जबरदस्तीची शिक्षा मुलीने भोगायची? कुठल्या काळात आहात आपण राजे? हा चुकीने नाही तर "अपघाताने" राहीलेला गर्भ असेल, व प्रयश्चीत्त म्हणुन बलत्कार्‍यास(जर खरच बलात्कार असेल तर), मनुष्यवधाची शिक्षा ठोठावली जावी.

बाकी तुमचा सरकारवर जरा जास्तच विश्वास आहे..

मी याच काळात आहे. म्हणूनच तुमच्या प्रतिसादातला मुद्दा मला पटला आहे.

म्हणजे हा विचार मी केलाच नव्हता.. गर्भधारणा ते प्रसूती हा काळही अत्याचारित मुलीला शिक्षेप्रमाणे असू शकतो हे पटलं.

मी ते तेवढे विधान मागे घेतो. बलात्कारपीडित किंवा तत्सम अत्याचारांतून राहिलेल्या गर्भांबाबतीत मॉरॅलिटीपेक्षा त्या मुलीच्या चालू आयुष्याला प्राधान्य देऊन तिचा निर्णय अंतिम मानावा.

बाकी बाबतीत (चुकीने, मानसिक तयारी नसणे इ इ) विधाने तशीच ठेवत आहे.

बाकी सरकारविषयीच्या विश्वासाचे काय बोलावे? हे सर्व नियम, कायदाकानून तरी काय.. ? सरकारचेच आहेत हो ते.

वपाडाव's picture

17 Aug 2011 - 5:22 pm | वपाडाव

सर्व प्रतिसादांचा सार ह्या प्रतिसादात आहे....

पक्या's picture

19 Aug 2011 - 4:19 am | पक्या

@गवि,
अहो 'चुकून ' असे जे लिहीले आहे ते बेजबाबदार या अर्थी नव्हे.
कुठल्याही बर्थ कंट्रोलवर बघा काय लिहीलेले असते. १००% खात्री कोणताच बर्थ कंट्रोल देत नाही. मूल नको म्हणुन ते वापरले जात असतील आणि तरिही गर्भ राहिला तर त्या केस मधे गर्भपात करण्यास विरोध नसावा .

अगदी मान्य..

ते कशा अर्थाने म्हटले आहे हे कळलं.

तरीही मला यावर अजून म्हणावंसं वाटतं की त्या उत्पादनाचा वापर करुन आपण ती लिखित (टक्के) रिस्क घेत असतो. रिस्क घेणे याचा अर्थ त्या उत्पादनाच्या काही टक्के फेल्युअरची जबाबदारी आपण घेणे. ती जबाबदारी घेतली की मग उत्पादनाच्या चुकीने जरी गर्भ राहिला तरी त्याची किंमत गर्भाने चुकवायची हे लॉजिक दुरित वाटते.

कोणतीही कार कितीही काळजीपूर्वक चालवली तरी ती वेगात असताना पंक्चर होऊन नियंत्रणाबाहेर जाऊ शकते आणि एखाद्या पादचार्‍याला उडवू शकते (अशी समजा १ टक्का शक्यता प्रति प्रवास आहे) . कारचा किंवा टायरचा मॅन्युफॅक्चरर याला जबाबदार असेल नसेल.. तुम्ही जबाबदार असाल नसाल..

पण पादचार्‍याला त्याची किंमत मोजायला लावणे हे चूकच. याठिकाणी आपण त्याला हॉस्पिटलात नेऊन वाचवण्याची आणि खर्चपाण्याची जबाबदारी घेतलीच पाहिजे.

मोटारीच्या डिझाईनमुळे झाली चूक, आता हे पादचार्‍या तू मर रस्त्याकडेला पडून असे म्हणून निघून नाही जाता येत.

युयुत्सु's picture

17 Aug 2011 - 3:38 pm | युयुत्सु

माझं म्हणणं आहे की कोणत्याही गर्भपातालाच विरोध असावा. मुलगा असो किंवा मुलगी.

कुमारी मातांचा प्रश्न निर्माण होईल त्याचे काय?

वरील प्रतिसादात हा मुद्दा थोडा मांडलाच आहे.

कुमारी मातांचा प्रश्न निर्माण होईल त्याचे काय?

गर्भपातांमुळे कुमारी मातांचा प्रश्न निर्माण कसा होईल?

कौमार्यभंग उघडकीस येतील असे म्हणायचे आहे का?

की फक्त कुमारी मातेस (लग्नाशिवाय) मूल झाले तरच ती समस्या.. आणि वेळेत गर्भपात केला की ती समस्या नाही?

अविवाहित / कुमारी मातांच्या मुलांचे काय करायचे हा प्रश्न जेन्युईन आहे. ते सरकारने आणि एनजीओजनी ठरवता येईल. जन्माला येऊच न देणे हा उपाय अनिष्ट आहे.

नगरीनिरंजन's picture

17 Aug 2011 - 3:55 pm | नगरीनिरंजन

अविवाहित मातांमध्ये वाईट काय आहे हे मला आजतागायत कळले नाहीय. एखाद्या एकट्या स्त्रीने एखादी मुलगी दत्तक घेतली तर तिचे कोण कौतुक (पाहा: कु.सुश्मिता सेन) पण हेच जर एखादीने लग्न न करता मूल जन्माला घालायचे ठरवले तर समाजाला काय अडचण येते कोण जाणे? अगदीच टीनेजर असतील तर गोष्ट वेगळी पण २१-२२ वर्षाच्या वरच्या कमावत्या स्त्रीने असं केलं तर काय हरकत आहे?

तुमचे म्हणणे अगदी योग्य असले तरी तो पी एच डी च्या लेव्हलचा मुद्दा (म्हंजी एकदम उदारमतवादी) झाला.

आयडियली तशी वृत्ती सर्वत्र झाली पाहिजे..

तरी मी तर त्यापेक्षा बर्‍याच खालच्या यत्तेतला प्रश्न उपस्थित केलाय.. ;)

:)

शैलेन्द्र's picture

17 Aug 2011 - 4:10 pm | शैलेन्द्र

"अविवाहित मातांमध्ये वाईट काय आहे हे मला आजतागायत कळले नाहीय. एखाद्या एकट्या स्त्रीने एखादी मुलगी दत्तक घेतली तर तिचे कोण कौतुक (पाहा: कु.सुश्मिता सेन) पण हेच जर एखादीने लग्न न करता मूल जन्माला घालायचे ठरवले तर समाजाला काय अडचण येते कोण जाणे? अगदीच टीनेजर असतील तर गोष्ट वेगळी पण २१-२२ वर्षाच्या वरच्या कमावत्या स्त्रीने असं केलं तर काय हरकत आहे?"

प्रश्न अविवाहीत मातांचा किंवा योनीशुचीतेचा नसुन, जन्माला येणार्‍या अपत्याचा आहे.. आधीच भारतात मुलांची तशी परवडच होते, त्यातुन जर अशी संतती जन्मास आली जिची जबाबदारी फक्त एक पालक घेणार, तर त्या मुलांचे आयुष्य भावनात्मकदृष्तट्या तितकेसे तितकेसे स्थीर नसेल.. कुटुंब व्यवस्थेत एक जे संरक्षन आज मिळतय त्याला ही मुल मुकतील.

नगरीनिरंजन's picture

18 Aug 2011 - 6:11 am | नगरीनिरंजन

मुलांची परवड होऊ नये या उदात्त हेतूने अविवहित गर्भवतींना लपूनछपून (क्वचित उघडपणे) गर्भपात करण्यास किंवा प्रसंगी झालेले मूल टाकून देण्यास भाग पाडले जाते असे तुम्हाला म्हणायचे आहे का?

प्रियाली's picture

17 Aug 2011 - 5:07 pm | प्रियाली

अगदीच टीनेजर असतील तर गोष्ट वेगळी पण २१-२२ वर्षाच्या वरच्या कमावत्या स्त्रीने असं केलं तर काय हरकत आहे?

कमालच करता! गॉसिप करणे, इतरांच्या घरात घुसून चौकशा करणे, उणीदुणी काढून त्यावर गफ्फा मारणे हा भारतीय संस्कृतीचा हक्क आहे नाही का? तो तुम्ही हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहात. ;)

पंगा's picture

17 Aug 2011 - 6:18 pm | पंगा

अगदीच टीनेजर असतील तर गोष्ट वेगळी पण २१-२२ वर्षाच्या वरच्या कमावत्या स्त्रीने असं केलं तर काय हरकत आहे?

मुळात हरकत असावी की नसावी हे ठरवणारे आपण (म्हणजे तुम्ही, मी किंवा संबंधित स्त्री वगळता इतर कोणीही) कोण?

हा त्या संबंधित स्त्रीचा वैयक्तिक मामला आहे.

मामला खतम.

मुलींची घटती स्म्ख्या पहाता एक दिवस मुलाचे व्डील मुलीच्या वडिलाचे पाय धरतील असे दिवस आणखी २० वर्षानी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. :) त्यातच ३३% महिला आरक्षण झाले म्हणजे ही वेळ त्याहीपेक्षा आधीच येणार. :)

पक्या's picture

17 Aug 2011 - 2:47 pm | पक्या

>>मुलगी का नको?
लेखात दिलेल्या कारणांव्यतिरिक्त अजून १-२ कारणे म्हणजे सुरक्षितता आणि लग्नाची समस्या.

मुलाच्या बाबतीत पालक तसे अति काळजी करत नाहित. पण मुलीच्या बाबतीत पालकांना सुरक्षितता, इज्जतीचा मोठा प्रश्न वाटत असतो. काही कारणास्तव मुलाचे लग्न झाले नाही तरी आई वडिलांमागे तो एकटा राहू शकेल पण मुलीचे लग्न जमलेच नाही तर ती कशी एकटी राहील हा काळजीचा प्रश्न पालकांना भेडसावत असावा.
शिवाय लग्नाचा सर्व खर्च मुलीकडच्यांनी करणे, मुलगि सासरी गेल्यावर तिच्यावर आई वडीलांना कसलाही हक्क दाखवता न येणे वगैरे गोष्टी अजूनही होत असलेल्या पाहण्यात आल्या आहेत.
सधन स्थितीतले, उच्च शिक्षण घेतलेले एक ओळखीतले पालक 'बरय मला मुलगा आहे , मुलींचं खूप कराव लागत ' असं बोलताना प्रत्यक्षात ऐकलं आहे . (म्हणजे मुलींना वाढवताना मुलांपेक्षा जास्त कष्ट , काळजी घ्यावी लागते ह्या अर्थाने ते वाक्य होतं)

मुलींना वाढवताना मुलांपेक्षा जास्त कष्ट , काळजी घ्यावी लागते
महानच म्हणायला हवेत असे लोक्स!;)
खरं तर मुलगा आणि मुलगी यात भेद करण्याचं कारण नाही. पण आपणच आपली परिस्थिती अवघड करून ठेवलिये.
माझ्या मुलाचा संसार उद्याच्या काळात कसा यशस्वी आणि सुखाचा होईल?
आज त्याला मी ज्या चांगल्या किंवा प्रॅक्टीकल सवयी (जसे घरकामात बरोबरीचा एवढेच नव्हे तर वेळप्रसंगी जास्त वाटा उचलणे, माझे तुझे अशी भांडणे न करणे, बालसंगोपन इ.) लावीन म्हणजे त्याच्यासमोर तसे मी आणि नवरा दोघेही वागू तितके त्याला सोपे जाईल. अश्यावेळी काय अवघड नि काय सोपं? मुलांना अथवा मुलींना सगळं सारखच शिकवावं लागणार (काही नैसर्गिक फरक सोडल्यास). पण असे लोक भेटतात हे खरेच! माझ्या ओळखीच्या एकीला दोन मुली आहेत. ती म्हणाली की मला मुलींची इतकी भयानक आवड आहे की मुलगा जन्माला आला असता तर त्याचे तुकडे करून टाकले असते. माझं वर्षाचं लेकरू कडेवर होतं. अंगावर सरसरून शहारा आला. त्यानंतर पुन्हा तिला भेटले नाही. नुसती दिसली तरी वाट बदलून जात होते.

रेवती's picture

18 Aug 2011 - 12:46 am | रेवती

आणखी म्हणजे मुलांनाही जबाबदारीनं वाढवलं तर मुलींना त्रास होण्याची शक्यता किती कमी होईल? बरीच!
पोरांना बिघडायला मोकळं रान द्यायचं मग मुलींना "तूच कशी सांभाळून रहा." हे सांगताना जास्त कष्ट होतात. ते या अश्या महान लोकांमुळेच! एका मर्यादेपलिकडे लहान वयात सांभाळून राहताना कधितरी त्या मुलींचा कडेलोट होतो आणि त्या हवे तसे वागू लागतात, मग कमी कपडे आणि काय केलं की पुन्हा त्याच वाईट!

चेतन सुभाष गुगळे's picture

17 Aug 2011 - 7:00 pm | चेतन सुभाष गुगळे

लग्न झाल्यावर पुरूष बायकोच्या घरी राहायला गेले पाहिजेत, परंतू ते तसे जायला तयार नसतात असा काहींचा सूर दिसला. यावर काही मतप्रदर्शन करावेसे वाटते.

माझ्या परिचयाचे एक ६५ वर्षीय विधूर गृहस्थ आहेत. पुण्यात मोठे घर आहे. दोन विवाहित मुले असून त्यांचीही स्वतंत्र घरे आहेत. या गृहस्थांना पुन्हा विवाह करावयाचा आहे. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे वधू संशोधन सुरू झाले आणि उदयपूर येथील एक स्थळ पाहिले गेले. सदर महिला ५३ वर्षीय विधवा असून तिला कोणतेही अपत्य नाही.

दोघांनी एकमेकांना पसंत केले तरीही या पसंतीची परिणती विवाहात होऊ शकली नाही.

कारण -

६५ वर्षाचे गृहस्थ पुण्यातील आपले घर सोडून जायला तयार नाही, इथे त्यांची बर्‍यापैकी स्थावर / जंगम मालमत्ता आहे, तिचा ही त्यांना सांभाळ करायचा आहे. उदयपूरच्या ५३ वर्षीय महिलेची देखील हीच अडचण आहे. त्यांची उदयपूरची मालमत्ता तर "अतिप्रचंड" या सदरात मोडणारी आहे. उदयपूर येथील महाल सोडून जायची तर त्या कल्पनाही करू शकत नाहीत.

अर्थात इतके सगळे असले तरीही, या दोन्ही व्यक्तिंच्या जोडीदारविषयक अपेक्षांमध्ये काही फरक नक्कीच आहेत. पुण्याचे ६५ वर्षीय गृहस्थ ४० ते ५५ दरम्यानच्या वयातील महिलेशी विवाह करण्यास तयार आहेत जी त्यांच्यासोबत येऊन त्यांच्या घरी राहण्यास तयार असेल. तिच्या सांपत्तिक / शैक्षणिक पात्रतेविषयी त्यांच्या कुठल्याही अटी नाहीत. थोडक्यात, एखाद्या गरीब, कमी शिक्षित महिलेशी विवाह करण्यास त्यांना कुठलीही अडचण नाही. त्यामुळे त्यांना जोडीदार मिळणे फारसे अवघड वाटत नाही.

याउलट, उदयपूरच्या ५३ वर्षीय महिलेची अपेक्षा जोडीदाराने त्यांच्यासोबत (उदयपूर येथे) येऊन राहावे अशी असली तरीही जोडीदाराविषयी त्यांच्या इतर अटी पारंपारिकच आहेत, जसे की - तो वय, शैक्षणिक / सांपत्तिक स्थिती याबाबत या महिलेपेक्षा वरचढ असावा. आता असा पुरूष (जो त्या महिले इतका / अधिक श्रीमंत आहे) स्वत:ची मालमत्ता सोडून तिच्याकडे का बरे राहावयास जाईल? स्वत:पेक्षा कमी (ही महिला पदवीधर आहे) शिकलेला / कमी वयाचा / गरीब पुरूष जोडीदार म्हणून या महिलेला मान्य नाहीय. या महिलेला (त्यांच्या अपेक्षेप्रमाणे) जोडीदार मिळणे अवघड नाही का?

स्त्रियांच्या आपल्या जोडीदाराकडून असणार्‍या अपेक्षा पाहता त्यांना त्यांच्या घरी राहायला येणारा पुरुष जोडीदार भेटणे अवघड दिसते. त्यांना त्यांच्या घरी राहू शकणारा जोडीदार हवा असल्यास त्यांनी त्यांच्या जोडीदार विषयक इतर अपेक्षांमध्येही बदल करायला हवा.

प्रियाली's picture

17 Aug 2011 - 7:05 pm | प्रियाली

२५ आणि २७ वर्षांच्या मुलाकडे (म्हणजे लग्नाचे प्रचलित वय) स्थावर मालमत्ता असणे थोडे कठीण आहे. इथे सरसकट पुरुषांनी स्त्रियांकडे राहायला जावे असे म्हटलेले नसून जर मुलगी एकुलती एक असेल, फक्त मुली असतील, आई वडिलांना आधार नसेल आणि त्याना शक्य असेल तर नवर्‍याने बायकोकडे राहायला जाण्यात काय गैर आहे असे विचारले आहे.

स्त्रियांच्या आपल्या जोडीदाराकडून असणार्‍या अपेक्षा पाहता त्यांना त्यांच्या घरी राहायला येणारा पुरुष जोडीदार भेटणे अवघड दिसते. त्यांना त्यांच्या घरी राहू शकणारा जोडीदार हवा असल्यास त्यांनी त्यांच्या जोडीदार विषयक इतर अपेक्षांमध्येही बदल करायला हवा.

हे मात्र ठीक आहे. मान्य करण्यासारखे आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Aug 2011 - 8:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाचतोय.

-दिलीप बिरुटे

नर्मदेतला गोटा's picture

17 Aug 2011 - 9:37 pm | नर्मदेतला गोटा

मुलींवरचे अत्याचार, असुरक्षितता

यामुळे मुलीची जबाबदारी नको वाटते

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Aug 2011 - 9:58 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

जबाबदारी फक्त मुलगी आणि तिच्या पालकांचीच का? स्लटवॉकबद्दल ऐकले आहेत का?

आत्मशून्य's picture

17 Aug 2011 - 11:08 pm | आत्मशून्य

१० पैकी २ जणी उत्तान कपडे घालून फिरू लागल्या तर उरलेल्या ८ मूलींची त्या २ मूलींसोबत विनाकारणच पंचाइत होइल की ? हेच जर १० च्या १० मूलि तसेच उत्तान कपडे घालून फिरायला लागल्या तर मात्र ती एक जनरलाइज्ड गोश्ट बनेल. मग मात्र त्यात कोणी (विषेश) लक्ष वेधून घेणार नाही. पण हे केव्हां १०/१० उत्तान कपडे वापरू लागल्या तर. पण हे घडलं नाही तर मात्र २ जणींमूळे उरलेल्या ८ मूलीनाही त्रास संभवतो. तसही केवळ जॉकी घालून कोठेही कसेही फिरायला मीळ्णे हा मूलांचा हक्कच आहे. लवकरच त्यासाठी स्टडवॉक आयोजीत करावा म्हणतो.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Aug 2011 - 11:28 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

बाकीच्यांनी काहीही कपडे घातले तरी तुझी* पंचाईत होते का? माझी तरी होत नाही. तर हा मुद्दा समजला नाही.

(कमी कपड्यातल्या स्त्रिया आजूबाजूला असतानाही) पूर्ण कपडे किंवा शरीराचा बराचसा हिस्सा झाकणारे कपडे घालणार्‍या मुलींकडे पुरूषांचं लक्ष वेधलं जात नाही असं तुला* वाटतं का? माझा तरी असा अनुभव नाही. तुझा* अनुभव वेगळा असेल तर जरूर सांग.

स्लटवॉकमधे सामील होणार्‍या, कमी कपडे घालणार्‍या (ज्यांना तू* आणि इतर काही लोकं उत्तान कपडे(?) म्हणत आहात) मुली आणि स्त्रियांचा आक्षेप काय आहे हे तुला* समजलं आहे काय? आक्षेप आहे तो कमी कपडे घालणार्‍या स्त्रियांनाच त्यांच्यावर होणार्‍या अत्याचारासाठी जबाबदार धरण्याला! घरातून बाहेर पडताना चिक्कार कड्याकुलपं घातली नाहीत म्हणून चोराला चोरी करण्याचा नैतिक अधिकार मिळत नाही; चोरी अश्लाघ्यच ठरते.

*शक्यतोवर अनोळखी लोकांचा एकेरीत उल्लेख करत नाही, पण तूच एवढा आदर देऊन 'वडील'पण देतो आहेस तर तुझा एकेरीत उल्लेख करते.

आत्मशून्य's picture

18 Aug 2011 - 12:14 am | आत्मशून्य

बाकीच्यांनी काहीही कपडे घातले तरी तुझी* पंचाईत होते का? माझी तरी होत नाही. तर हा मुद्दा समजला नाही.

अवघडं आहे. तूमच न्हवे बहूतेक माझच. कारण माझा मूद्दाच तूमाला कळला नाही. :( आणी इतकं वडीलपण देऊनही या जन्मी तो कळेल असं आता तर अजिबात वाटत नाही. काही लोकांना कदाचीत मोठेपणा पचनी पडत नसावा.

(कमी कपड्यातल्या स्त्रिया आजूबाजूला असतानाही) पूर्ण कपडे किंवा शरीराचा बराचसा हिस्सा झाकणारे कपडे घालणार्‍या मुलींकडे पुरूषांचं लक्ष वेधलं जात नाही असं तुला* वाटतं का? माझा तरी असा अनुभव नाही. तुझा* अनुभव वेगळा असेल तर जरूर सांग.

तूम्ही अनावश्यक वैयक्तीक होताय. पण तूमच्या विधानाचा अभ्यास म्हणून ज्या पूरूषांच्या आजू बाजूला तूम्ही वावरता त्यांची मूलाखत घेता येइल काय ? बाकी माझा वयक्तीक अनूभव मी व्यनी क्रेन म्हणतो. इथचं टाकू म्हणत असाल तर त्याची जबाबदारी आपण घेतली पाहीजे आहे का तयारी ?

स्लटवॉकमधे सामील होणार्‍या, कमी कपडे घालणार्‍या (ज्यांना तू* आणि इतर काही लोकं उत्तान कपडे(?) म्हणत आहात) मुली आणि स्त्रियांचा आक्षेप काय आहे हे तुला* समजलं आहे काय? आक्षेप आहे तो कमी कपडे घालणार्‍या स्त्रियांनाच त्यांच्यावर होणार्‍या अत्याचारासाठी जबाबदार धरण्याला!

हम्म.... एकमेकांकडे आकर्षले जात आहेत, दोष लोखंडाचा की लोहचूंबकाचा ... कोण जबाबदार ? इथे सामानज्ञान सांगते दोष दोघांचा. (बाकी हे कळत असतं तर मोर्चे कशाला काढावेसे वाटले असते ;) हलके घ्या कंसातील लीखाण हा विनोद आहे)

घरातून बाहेर पडताना चिक्कार कड्याकुलपं घातली नाहीत म्हणून चोराला चोरी करण्याचा नैतिक अधिकार मिळत नाही; चोरी अश्लाघ्यच ठरते.

हे समजयची अक्कल कायदापालणार्‍या सामान्य माणसाला असते चोराला न्हवे, म्हणून त्यासाठी घरंच उघडी टाकून चोरीच्या विरोधात आंदोलन करणे म्हणजे मोठा जोकच. यानं तर चोर काय सामान्य माणसालाही एकदा घर लूटून बघूया म्हणायचा मोह झाला तर ?

*शक्यतोवर अनोळखी लोकांचा एकेरीत उल्लेख करत नाही, पण तूच एवढा आदर देऊन 'वडील'पण देतो आहेस तर तुझा एकेरीत उल्लेख करते.

हे बघा एक गोश्ट कान उघडून लक्षात ठेवा मला प्रेमाने कोणी कसही उल्लेखावे असं माझं स्पश्ट मतं आहे, त्याला मी विरोध कधीही केलेला नाही / करत नाहीच. पण एकेरी उल्लेखच काय आपण माझ्याशी बोलताना अपशब्दांचा वापर केला तरी मला फरक पडत नाही. पटत नसेल तर माझी खरडवही बघा तिथे एका कम्यूनीस्ट महामूर्खांने अशा शब्दांचा सढळहस्ते वापर केलेला आढळून येइल. तेव्हां जस्ट चिलं.. डीस्क्लेमरची अजिबात गरज न्हवती हो :)

पंगा's picture

18 Aug 2011 - 12:51 am | पंगा

हे बघा एक गोश्ट कान उघडून लक्षात ठेवा

कान उघडल्याने एखादी गोष्ट लक्षात कशी ठेवता येईल?

आत्मशून्य's picture

18 Aug 2011 - 1:50 am | आत्मशून्य

कान उघडल्याने एखादी गोष्ट लक्षात कशी ठेवता येईल?

तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे :) आगाऊ सूचना देणं मी माझं कर्तव्य समजतो.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Aug 2011 - 1:49 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

कारण माझा मूद्दाच तूमाला कळला नाही.

मी तेच तर म्हणते आहे. नीट उलगडून सांग की!

तूम्ही अनावश्यक वैयक्तीक होताय. पण तूमच्या विधानाचा अभ्यास म्हणून ज्या पूरूषांच्या आजू बाजूला तूम्ही वावरता त्यांची मूलाखत घेता येइल काय ? बाकी माझा वयक्तीक अनूभव मी व्यनी क्रेन म्हणतो. इथचं टाकू म्हणत असाल तर त्याची जबाबदारी आपण घेतली पाहीजे आहे का तयारी ?

साधारणतः पुरूष आकर्षक दिसणार्‍या स्त्रियांकडे पहातात, मग त्यांनी संपूर्ण अंग झाकलेले का असेना! आता काही डार्विनच्या सिद्धांताएवढा महान सिद्धांत मांडलेला आहे असं नव्हे. साधारण स्त्री-पुरूषांशी बोललं आणि/किंवा थोडं बहुत निरीक्षण केलं की हे समजतं.
इथे लिहीलंत तरी माझी ना नाही. अभिव्यक्तीस्वातंत्र्य काय ते मलाच फक्त एवढ्या कोत्या वृत्तीची मी तरी नाही.

हम्म.... एकमेकांकडे आकर्षले जात आहेत, दोष लोखंडाचा की लोहचूंबकाचा ... कोण जबाबदार ? इथे सामानज्ञान सांगते दोष दोघांचा.

च् च् च् आकर्षणाबद्दल नव्हे, लैंगिक अत्याचाराचे कारण म्हणून तोकड्या कपड्यांकडे निर्देश करण्याला विरोध आहे.

हे समजयची अक्कल कायदापालणार्‍या सामान्य माणसाला असते चोराला न्हवे, म्हणून त्यासाठी घरंच उघडी टाकून चोरीच्या विरोधात आंदोलन करणे म्हणजे मोठा जोकच. यानं तर चोर काय सामान्य माणसालाही एकदा घर लूटून बघूया म्हणायचा मोह झाला तर ?

हे स्पष्टपणे चोरीचं समर्थन आहे ज्याचा मी लिखाणातून निषेध करते, काही स्त्रिया स्लटवॉकमधे सामील होऊन करतात.

बाकी शिव्या द्यायला मलाही आवडतं, पण त्या मी मोजूनमापून आणि समोर कोण आहे हे पाहूनच देते. उगाच का आपला बटवा मोकळा करा आणि खजिना दाखवा. तर हे एक असो.

आत्मशून्य's picture

18 Aug 2011 - 2:25 am | आत्मशून्य

मी तेच तर म्हणते आहे. नीट उलगडून सांग की!

झोपलेल्याला जागं करता येतं म्हणतात. झोपेच सोंग घेतलेल्याला न्हवे. या पलीकडे काय सांगणार ?

च् च् च् आकर्षणाबद्दल नव्हे, लैंगिक अत्याचाराचे कारण म्हणून तोकड्या कपड्यांकडे निर्देश करण्याला विरोध आहे.

हम्म, याबाबत सहमत. बाकी तोकडे कपडे असतील तर आकर्षण जास्त वाटेल इतकचं पण अत्याचारामागे मानसीक विकृती वा क्षणीक तोल जाण्याची प्रवृत्तिच कारणीभूत असते असं वैयक्तीक मत आहे. पण म्हणून स्लट्वॉक करणे (त्याचं समर्थन्/असमर्थन करण्याबाबत नंतर मत नोंदवेन) म्हणजे गाढवपणा होय. यातून कदाचीत विकृतीला प्रोत्साहनच मिळण्याची भीती वाटतेय. :(

हे स्पष्टपणे चोरीचं समर्थन आहे ज्याचा मी लिखाणातून निषेध करते, काही स्त्रिया स्लटवॉकमधे सामील होऊन करतात.

तूम्ही चूकीच्या गोश्टीचा निषेध करत आहात. स्वतः होऊन घरदार उघडं टाकून फिरणं व वरती चोराने चोरी करू नये ही अपेक्षा बाळगण म्हणजे एकतर्फी लादलेला गोड गैरसमज होय. नैतीकतेच्या कल्पना या कम्यूनीजम इतक्याच वाचायला सूंदर असतात, पण प्रत्यक्षात त्या आमलात येणे महाकठीण असते. तसच आपलं म्हणनं हे कोंबडा झाकून ठेवला तर सूर्याने उगवू नये असे मानणे अथवा डोळे मिटून दूध पिलं तर जगाला समजणार नाही अशा गोड गैरसमजात बोक्याने राहणे होय. याबाबत अनेक संतानी फार रोचक दाखले दीले आहेत जे इथे द्यायचा मोह मी आता विस्तारभयाने टाळतो.

उलट तूम्ही स्लट्वॉक करणार्‍या लोकांच्या या बेफिकीर प्रवृत्तींचा निषेध करावा असं मी इथं आवाहन करत आहे. कूलूप लावणे म्हणजे तूरूंगात जाणं न्हवे की ते बंधन वाटावे. आणी तेव्हडी काळजी आपण आपल्या घराची घेतलीच पाहेजे. नाहीतर तूम्हाला तूमच्या घराबद्दल प्रेम आपलेपणा व बंध नाही असेच अधोरेखीत होते. मग ज्या घराशी आपली नाळ जोडली नाहीये ते लूटलं काय अथवा राहीलं काय असा कोणी प्रश्न उपस्थीतत केलाच तर न डगमगता उत्तर द्या. (यासाठी थोडा ऑऊट ऑफ कम्यूनीजम विचारधारा ठेवणे अपेक्षीत आहे )

तसही ज्या गोश्टीमूळे बलात्कार होत नाहीत अशी स्लटवॉक करणार्‍यांची ठाम समजूत आहे त्याबाबत मोर्चा काढायची गरज काय ? जो लोकांना माहीत नाही त्याची जागृती करायला हे मोर्चे वगैरे काढायचे असतात हा बेसीक नियम यांना कळतं नाही काय (बाकी हे कळत असतं तर मोर्चे कशाला काढावेसे वाटले असते :) हलके घ्या कंसातील लीखाण हा विनोद आहे)

बाकी शिव्या द्यायला मलाही आवडतं,

काकू, आपल्या आवडीनीवडी जूळत आहेत असे म्हणतो.

पण त्या मी मोजूनमापून आणि समोर कोण आहे हे पाहूनच देते. उगाच का आपला बटवा मोकळा करा आणि खजिना दाखवा. तर हे एक असो.

आपल्या मतचा आदर आहे पण समोरच्याकडे खजीना असो वा नसो, जसं की मी आधीच स्पश्ट केलंय, आपण काय बोलताय यापेक्षा कसं बोलताय यालाच माझ्यालेखी थोडफांर महत्व असेल. महत्व नसलेल्या गोश्टीच काय होत हे सूज्ञ मिपाकर म्हणून वे.सा.न.ल.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Aug 2011 - 2:29 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

काय बोलताय यापेक्षा कसं बोलताय यालाच माझ्यालेखी थोडफांर महत्व असेल.

म्हणूनच का "मला समजत नाहीये, कृपया समजून सांगणे" याला बगल दिली जात आहे.

बाकी सर्व असोच.

फक्त तूमच्या सारख्या जेष्ठ व खजीनदार व्यक्तीसमोर बोलताना थोड बावरल्यासारखं होतंय, तव्हां बाकी इतर गोश्टी क्लिअर झाल्या असल्यास आपल्याला माझ्या कोणत्या मूद्यावर स्पष्टीकरण हवयं ते जर इथ व्यवस्थीत सांगीतलतं तर तूम्हाला त्याबाबत मदत करेन म्हणतो. किंम्बहूना आपलं म्हणन जिथे पटेल तिथे ते मी उघडपणे मान्य करायचा (अहंकार न्हवे ) स्वाभिमान दाखवेन. धन्यवाद.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Aug 2011 - 2:44 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

इथलं पहिलंच वाक्य पुन्हा एकदा पहाणे.
बाकी मी खजिनदार का म्हणे? मिपा सदस्यतेत श्रेष्ठ असा समज करून घेतला आहे, जो तद्दन चुकीचा असू शकतो. आणि ही चूक मान्य करण्याचा मोठेपणा दाखवण्याच्या फंदात मी पडणात नाही.

आत्मशून्य's picture

18 Aug 2011 - 2:52 am | आत्मशून्य

बाकीच्यांनी काहीही कपडे घातले तरी तुझी* पंचाईत होते का? माझी तरी होत नाही. तर हा मुद्दा समजला नाही.

काकू, हेच वाक्य का ? ... बरं, ठीकाय तूमचा आग्रहच असेल तर उत्तर/स्पश्टीकरण देतोच पण ह्यावर स्पश्टीकरण देण्याआधी तूमची पंचाइत का होत नाही हे कळणे आवश्यक आहे. म्हणजे तूम्हाला व्यवस्थीत समजेल अशा पध्दतीने कौन्सलींग करता येइल.

बाकी मी खजिनदार का म्हणे?

तूम्हीच म्हटलात ना तूमच्याकडे खजीना आहे तो उठसूठ कशाला उघड करायचा ? म्हणून खजिनदार म्हटलयं.

मिपा सदस्यतेत श्रेष्ठ असा समज करून घेतला आहे, जो तद्दन चुकीचा असू शकतो. आणि ही चूक मान्य करण्याचा मोठेपणा दाखवण्याच्या फंदात मी पडणात नाही.

नेमका हाच तर प्रॉब्लेम आहे जी गोश्ट चूकीची असू शकते ती मान्य करण्याचा मोठेपणा दाखवण्याच्या फंदात तूम्ही पडणार नाही. मी म्हणतो नका पडू, पण निदान चूकीच्या गोश्टींच आपल्या प्रतीक्रीयातून निदान समर्थन तरी करू नका ना काकू :(

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Aug 2011 - 3:55 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

अरे देवा, गुरूत्वाकर्षणाचा नियम समजला नाही असं म्हटल्यावर "नक्की काय समजलं नाही" असं माझ्या कोणत्याही गुर्जींनी कधी विचारलं नाही. आमच्या गुर्जींची चूकच झाली म्हणायची.
पंचाईत का होते हेच नाही समजलं तर का होत नाही हे कसं सांगणार?

बाकी आता अवांतरावर माझं मौनच.

असो, आता तूम्ही तूमचा प्रोब्लेम सांगितला म्हणून माझ्या पध्दतीनं कंन्सल्ट करायचा प्रयत्न करतो.

प्रोब्लेम हा आहे की तूमच्या गूर्जीने कधी तूम्हाला एखादा नियम समजला नाही असं म्हटल्यावर "नक्की काय समजलं नाही" असं कधी विचारलंच नाही(जसं आपण म्हणालाच आहात), त्यामूळे मूळातच एखादी गोश्ट समजणे अथवा न समजणे याबाबत तूमच्यामधे बराच गोधळ आहे. पण खरी गंमत नंतरच आहे, तूम्हाला स्वत:लाच हे माहीत नाही की तूम्हाला काय कळलं नाहीये, म्हणजेच जर तूमच्या समोर सफरचंद वरून खाली पाडलं तरी तूम्ही हे गूरूत्वाकर्षण आहे हे मान्य करणार नाही कारण जी गोश्ट तूम्हाला समजली नाही ती समजावून द्यायची सवय तूमच्या गूर्जींना कधी न्हवती व ना ते सामजावून घ्यायची सवय तूमच्या मनाला कधी त्यांनी लागू दीली, याची परीणीती तूम्हाला आधेच सामजावलेल्या गोश्टीही न समजण्यात सतत होत आहे. मघाशी आपण जे म्हणालात की एखादी चूक मान्य करण्याचा मोठेपणा दाखवण्याच्या फंदात तूम्ही पडणार नाही हे सूध्दा एक त्याचेच लक्षण आहे.

पटतयं का ? नाही हे जर पटत असेल तरच आपण पूढे विषय अजून समजण्याकडे जाउया, काही कळत नसेल तर लगेच प्रश्न विचारा, अरे हो राहूदे नका उत्तर देऊ अथवा कोनते प्रश्न विचारू , मौन बाळगा तूम्हाला का पटणार नाही हे विषद इथं मी केलचं आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Aug 2011 - 4:35 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

हाच शब्द आठवला. पूर्वी चांदण्या देण्याची चर्चा असायची. बाकी चालू द्यात. मी वाचते आहे.

आत्मशून्य's picture

18 Aug 2011 - 6:12 am | आत्मशून्य

चर्चेमधे आपल्या मूद्दा मांडायच्या पध्दतीमूळे प्रभावीत झालो हे नम्रपणे नमूद करू म्हण्तो.

बाकीच्यांनी काहीही कपडे घातले तरी तुझी* पंचाईत होते का? माझी तरी होत नाही. तर हा मुद्दा समजला नाही.

हो माझी पंचाइत होते खरी, पण ते कोण, कोणते कपडे, कसे घालतं त्यावर अवलंबून आहे. जसं आता राखी सावंत घ्या तिने कोणतेही कपडे घातले अथवा नाही घातले तर फारशी पंचाइत होत नाही, पण समजा तिच गोश्ट राइसने केली (कोंडेलीजा) तर पंचाइत नाही का होणार ? कसं आहे सगळ्यांकडे राखीसावंत म्हणून बघावं अशी आपली संस्कृती सांगत नाही ना . काय पटतय का माझं बोलणं ?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Aug 2011 - 7:12 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

आता या दोघींचा परस्परसंबंध काय? माझ्या माहितीत या दोन्ही स्त्रिया स्वतःला हवे तेच कपडे घालतात, जगाची काय फॅशन आहे याचा विचार (निदान जाहीरपणे) करत नाहीत.
काँडी राईस तिला शोभेल ते कपडे घालतात आणि राखी सावंतही! काँडी राईसची प्रतिमा त्यांच्या कपड्यांमुळे निर्माण झालेली नाही, राखी सावंतला इंदिरा गांधींच्या फॅशनचे कपडे घातले तर ती राखी सावंत रहाणार नाही. त्यामुळे या दोघींची कपड्यांवरून तुलना करण्याचं कारण समजलं नाही. शिवाय जगातल्या बहुसंख्य स्त्रिया राखी सावंत आणि/किंवा काँडी राईस यांच्याएवढ्या प्रसिद्धही नाहीत.
त्यातूनही काँडी राईस यांनी घरच्यांबरोबर पोहायला जाताना काय कपडे घालावेत हा त्यांचाच प्रश्न आहे.
राखी सावंत घालते तेवढेच कपडे घालूनही सुसंस्कृत दिसणार्‍या अनेक स्त्रिया मी तरी पाहिलेल्या आहेत. तुम्ही पाहिलेल्या नसतील तर ती माझी पंचाईत नाही.

माझ्या आजूबाजूच्या इतर सर्व स्त्रियांनी काय कपडे घातले आहेत यावरून मी माझे कपडे ठरवत नाही. ऋतू, बजेट, त्या-त्या वेळेस करण्याची कामं यावरून मी माझे कपडे ठरवते.

देवा देवा देवा... इथे मुली लोकांना का नकोशा झाल्या आहेत या विषयावर गंभीर चर्चा होत असताना काहींना मात्र कपडयांच्या फ्याशनची पडली आहे... इथेच तर इंडया मार खाते ;)

@३_१४ विक्षिप्त अदिती

आता या दोघींचा परस्परसंबंध काय? माझ्या माहितीत या दोन्ही स्त्रिया स्वतःला हवे तेच कपडे घालतात, जगाची काय फॅशन आहे याचा विचार (निदान जाहीरपणे) करत नाहीत.
काँडी राईस तिला शोभेल ते कपडे घालतात आणि राखी सावंतही! काँडी राईसची प्रतिमा त्यांच्या कपड्यांमुळे निर्माण झालेली नाही, राखी सावंतला इंदिरा गांधींच्या फॅशनचे कपडे घातले तर ती राखी सावंत रहाणार नाही. त्यामुळे या दोघींची कपड्यांवरून तुलना करण्याचं कारण समजलं नाही. शिवाय जगातल्या बहुसंख्य स्त्रिया राखी सावंत आणि/किंवा काँडी राईस यांच्याएवढ्या प्रसिद्धही नाहीत.
त्यातूनही काँडी राईस यांनी घरच्यांबरोबर पोहायला जाताना काय कपडे घालावेत हा त्यांचाच प्रश्न आहे.
राखी सावंत घालते तेवढेच कपडे घालूनही सुसंस्कृत दिसणार्‍या अनेक स्त्रिया मी तरी पाहिलेल्या आहेत. तुम्ही पाहिलेल्या नसतील तर ती माझी पंचाईत नाही.

माझ्या आजूबाजूच्या इतर सर्व स्त्रियांनी काय कपडे घातले आहेत यावरून मी माझे कपडे ठरवत नाही. ऋतू, बजेट, त्या-त्या वेळेस करण्याची कामं यावरून मी माझे कपडे ठरवते.

- अहो काकू, इथे मूद्दा तूम्ही कोणते कपडे घालता हा नाहीच आहे. आता स्पामधे मी सूध्दा काय कूर्ताघालून बसत नाही. तेव्हां कूठे काय घालयच तारतम्य तूम्हाला, राखी सावंतला, काँडीला अथवा इतर कोणाला नाही असं मी म्हणालोच नाय. आता हीना रब्बानीच उदा. घ्या, कीती मॅनर्स पाळणारी व्यक्ती वाटते ? म्हणून काय सर्व स्त्रीयांनी बूरखा घालूनच वावरायचं असा मोर्चा काढला तर मी काय त्याला पाठींबा देऊ म्हणता ? किव्हां उद्या मी केवळ जॉकी घालून स्टडवॉक आयोजीत केला तर बलात्कारांचे प्रमाण वाढेल म्हणता का ? अर्थातच नाही, स्टडवॉकचा त्याच्याशी काही संबंधच नाही. जसं की स्ल्टवॉकचाही बलात्कार घडण्या न घडण्याशी काही संबंध आहे. मग कशाला समर्थन करताय या बेशर्मी मोर्चांच ?

प्र
ति
सा

फा



हो

चा

ले

ना
ही
?
?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Aug 2011 - 8:44 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मग तोच तर मुद्दा आहे ना! त्या Michael Sanguinetti या कनेडीयन पोलिस शिपायाने "महिलांनी उत्तान कपडे घालणे टाळावे जेणेकरून त्यांचा लैंगिक अत्याचाराला बळी पडावं लागेल." असं* विधान केलं. त्या विधानाचा आणि मानसिकतेचा विरोध म्हणून स्लटवॉक ही कल्पना निघाली. मुद्दा हाच आहे की स्त्रियांच्या कपड्यांच्या लांबी रूंदीमुळे काही फरक पडत नाही.
बलात्काराच्या विरोधात, बलात्कार्‍यांच्या विरोधात स्लटवॉक नाही, तेव्हा स्टडवॉकचा मुद्दा निकाली लागतो. तुम्हाला जे कपडे घालून फिरायचं आहे ते कपडे घालण्यास तुम्ही स्वतंत्र आहात, निदान भारतात तरी!

लैंगिक अत्याचार ही काही पुरूषांमधली विकृती असते, पण म्हणून मुलगी नको हे म्हणणं रास्त आहे काय? (हा माझा मूळ मुद्दा होता.) काही पुरूषांमधे विकृती आहे म्हणून मुलगीच नको हा चोर सोडून संन्याशाला सुळी देण्यातला प्रकार आहे असं मला सुचवायचं होतं. तर काय बायकांचे कपडे, दुसर्‍यांच्या कपड्यांमुळे तुमच्यावर काय फरक पडतो, कुठून काँडी, हीना आणि राखी आल्या कोण जाणे. असो.

*साधारण भाषांतर

प्रियाली's picture

18 Aug 2011 - 10:08 pm | प्रियाली

मागे एकदा कुठेतरी आणि कुठल्यातरी संकेतस्थळावर मी असं काहीसं लिहिलं होतं की

पुरूषांच्या पोटाच्या वर, वर म्हणजे बर्‍याच वर, डोकं नावाचा एक भाग असतो. त्याने विचार करून आणि त्याला नियंत्रणात ठेवून काम केले तर स्त्रियांना लैंगिक शोषणाला बळी पडावे लागणार नाही. उत्तान कपडे घालणे एका बाजूला आणि उत्तान कपडे घातल्याने बाई आपल्याला आमंत्रण देते आहे हे एका बाजूला. केवळ बाईने उत्तान कपडे घातल्याने ती आपल्याला आमंत्रण देते आहे असे जर एखाद्याला वाटत असेल तर त्याने डोके तपासून घेणे उत्तम.

आत्मशून्य's picture

18 Aug 2011 - 11:29 pm | आत्मशून्य

मागे एकदा कुठेतरी आणि कुठल्यातरी संकेतस्थळावर मी असं काहीसं लिहिलं होतं की

पुरूषांच्या पोटाच्या वर, वर म्हणजे बर्‍याच वर, डोकं नावाचा एक भाग असतो. त्याने विचार करून आणि त्याला नियंत्रणा

बरं मग ? तो वरचा भाग स्त्रियांमधे मिसींग आहे का ? मग उगाच स्लटवॉकच समर्थन का केलं जातयं ? जर कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही तर एखाद्या महाभागाने दोन शब्द बोलले तर त्यालाच चिकटून जाणीवपूर्वक बेशर्मी मोर्चा आयोजणे म्हणजे काय म्हणावे ?... आम्ही बेशरम न्हवतो पण तरीही थोडफार तशी कृती घडली की माझी आज्जि लगेच पूढील कविता म्हणत खिजवायची... "कोण आम्हा पूसणार.. आम्ही गटारात लोळणार". स्त्रियांवर अशी पाळी खरोखर आलीय का ? मग स्लटवॉकचं समर्थन कशाला ?

तसचं बेशर्मी मोर्चांच समर्थन व या धाग्यामधे त्याचं आगमन हे मूलगी जन्मून मोठी झाल्यावर कोणते कपडे घालेल याच्याशी संबधीत असल्याने इथे घूसडणे म्हणजे धाग्याच्या मूळ विषयाची तिन_तेरा विक्षीप्त फजिती होय.

प्रियाली's picture

19 Aug 2011 - 12:26 am | प्रियाली

बरं मग ? तो वरचा भाग स्त्रियांमधे मिसींग आहे का ?

इथे संबंध कुठे आला स्त्रियांचा? स्त्रियांनी नियंत्रण सोडून पुरूषांवर अत्याचार केले असे कितींदा झाले?

जर कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही तर एखाद्या महाभागाने दोन शब्द बोलले तर त्यालाच चिकटून जाणीवपूर्वक बेशर्मी मोर्चा आयोजणे म्हणजे काय म्हणावे ?...

चला तुम्ही स्वतःला कावळे म्हणून घेतले ते बरे झाले.

आम्ही बेशरम न्हवतो पण तरीही थोडफार तशी कृती घडली की माझी आज्जि लगेच पूढील कविता म्हणत खिजवायची... "कोण आम्हा पूसणार.. आम्ही गटारात लोळणार". स्त्रियांवर अशी पाळी खरोखर आलीय का ? मग स्लटवॉकचं समर्थन कशाला ?

मी समर्थन केल्याचे किंवा न केल्याचे दिसले का वरल्या प्रतिसादात. शांत व्हा! इतकं तापायला काय झालं?

तसचं बेशर्मी मोर्चांच समर्थन व या धाग्यामधे त्याचं आगमन हे मूलगी जन्मून मोठी झाल्यावर कोणते कपडे घालेल याच्याशी संबधीत असल्याने इथे घूसडणे म्हणजे धाग्याच्या मूळ विषयाची तिन_तेरा विक्षीप्त फजिती होय.

मुद्दे नसले की अस्लं काहीतरी बोललं जातं असं स्पष्ट दिसतंय.

इथे संबंध कुठे आला स्त्रियांचा? स्त्रियांनी नियंत्रण सोडून पुरूषांवर अत्याचार केले असे कितींदा झाले?

या विशयी स्वतंत्र धागाच काढावा लागेल. काय आहे उदाहरणांची संख्या फार मोठी आहे.

चला तुम्ही स्वतःला कावळे म्हणून घेतले ते बरे झाले.

आता आपण तूम्ही-आम्ही वर आलाच आहात तर सांगतो, अहो बरे झाले म्हणजे काय ? लोकांना बरे वाटावे अशाच कृती मी सदैव करत असतो. काही वैचारीक गोंधळ असलेले कम्यूनीस्ट मला विरोध करू शकतात, पण मला विश्वास आहे त्यांनी योग्य तो अ‍ॅटीट्यूड बाळगला तर त्यांचे सर्व गैर्समज मी सहजी दूर करू शकतो. असो आता मी जे म्हटलं व ते ऐकून तूम्हाला जे बरं वाटलं त्या अनूशंगाने गाइंनी स्वतःला कोंम्बड्या समजायच्या फंदात पडू नये वा तसं वर्तनही करायचा प्रयत्न करू नये अशी अपेक्षा जर ठेवली तर काय चूकलं असे मी म्हटले तर तूम्हाला त्याचा राग येणार नाही ना ? हो आधी विचारणा आवश्यक आहे, चर्चेमधे नंतर खंड नको.

मी समर्थन केल्याचे किंवा न केल्याचे दिसले का वरल्या प्रतिसादात. शांत व्हा! इतकं तापायला काय झालं?

तूमच्या वर नाही हो जे चूकीचं समर्थन करत आहे त्यांच्यावरचा हा सात्विक संताप आहे. बाकी आपण समर्थन करत नसाल तर आपली मूकसंमतीही नाही हे कृपया समर्थन करणार्‍यांना जरा ठणकावून सांगाल काय ? असो. जागेची जी कूचंबणा होत आहे त्या नादात मी ह्या परिच्छेदापूर्वी @३_१४ विक्षिप्त अदिती असे लिहायचे विसरलो हे आठवायलाच विसरलो, लक्षात आणूदिल्याबद्दल आभारी आहे. असो आपण हा परिच्छेद दूर्लक्शीला तरी चालेल. फक्त बशर्मी मोर्चाचा विरोध करत असाल तर तो इथे त्वरीत नोंदवा ही विनंती.

मुद्दे नसले की अस्लं काहीतरी बोललं जातं असं स्पष्ट दिसतंय.

इथे मात्र फारच चूकताय तूम्ही. मी मूद्दा अत्यंत व्यवस्थीत मांडलाय समजला नसल्यास पून्हा सांगतो, बेशर्मी मोर्चांच समर्थन व या धाग्यामधे त्याचं आगमन हे मूलगी जन्मून मोठी झाल्यावर कोणते कपडे घालेल कशी वागेल याच्याशी संबधीत असल्याने मूलीला जन्म देणापूर्वीच्या चर्चेमधील धाग्यात त्याचा असा अनावश्यक उल्लेख करणे संपूर्ण अप्रस्तूत होय. हे म्हणजे मूलगा जन्मला तर मी त्याला डॉक्टरच करेन असे बापाने आधीच ठरवण्यासारखे आहे. असली असंवेदनशीलता बाळगणार्‍यांचा मी जाहीर निषेध करतो.

प्रियाली's picture

19 Aug 2011 - 2:24 am | प्रियाली

या विशयी स्वतंत्र धागाच काढावा लागेल.

काढा की मग. नाहीतरी इथे प्रतिसाद फारच तिरपे झाल्येत. :) काढाच! माझी विनंती समजा पाहिजे असल्यास.

तूम्हाला त्याचा राग येणार नाही ना ?

मला कशाला राग यायचा? तुम्ही आधी गाई म्हणालात. कोंबड्या वगैरे समजतील हा तुमचा समज आहे माझा नाही.

बाकी आपण समर्थन करत नसाल तर आपली मूकसंमतीही नाही हे कृपया समर्थन करणार्‍यांना जरा ठणकावून सांगाल काय ?

मी समर्थन करत नाही म्हणजे माझी मूकसंमती नाही हे कशावरून? जे स्लटवॉक करू इच्छितात त्यांनी तो अवश्य करावा. माझी अजिबात ना नाही. कोणी काही केले तर माझ्या पोटात दुखत नाही.

मूलगी जन्मून मोठी झाल्यावर कोणते कपडे घालेल कशी वागेल याच्याशी संबधीत असल्याने मूलीला जन्म देणापूर्वीच्या चर्चेमधील धाग्यात त्याचा असा अनावश्यक उल्लेख करणे संपूर्ण अप्रस्तूत होय.

सदर मुद्दा मुलगी झाली तर तिच्यावर अत्याचार होतील या गृहितकापेक्षा फारच कमी अप्रस्तुत आहे असं मला वाटतं.