मुलगी का नको?

युयुत्सु's picture
युयुत्सु in काथ्याकूट
16 Aug 2011 - 2:01 pm
गाभा: 

धनाजीरावांच्या "मुलगी वाचवा" या धाग्याला फारसे प्रतिसाद नाहीत हे बघून मी मूळ मुद्द्यावर चर्चा व्हावी म्हणून हा धागा टाकला.

मला स्वत:ला एक मुलगी आहे आणि मला त्याचे अजिबात दू:ख नाही. उलट कधी कधी (काही लोक आत्तापासून तिचा भावी सून म्हणून विचार करतात तेव्हा) मनोमन सुखावायलाच होते.पण समाजाचा मुलीबद्दल असलेला दृष्टीकोन लक्षात घेताना काही गोष्टी लक्षात येतात.

० मुलगी ही परक्यांच धन हा समज - त्यामुळे मुली वाढविण्यावर होणार्‍या खर्चाचा मुलगी वाढविणार्‍या कुटुंबाला परतावा/फायदा मिळत नाही. जो मुलाच्या बाबतीत थोडाफार मिळु शकतो.
० मुलगी नवर्‍याचा वंश वाढवते - एकुलती एक मुलगी असेल तर प्रॉपर्टी परक्या घरी घेऊन जाते, हा दृष्टीकोन

लोकांच्या दू:खाची नेमकी कारणे हीच आहेत.

एकुलती एक मुले वाढवणे जसजसे अनिवार्य होणार तसे सध्याची समाजाची मानसिकता या समस्या जास्त गंभीर बनवणार. या दोनही समस्यांची "समाधानकारक" उत्तरे समाजाला मिळत नाहीत तो पर्यंत मुलींबद्दल समाजात आकस राहणार.

टीप : ही जाहीरात नाही!

प्रतिक्रिया

आत्मशून्य's picture

19 Aug 2011 - 2:58 am | आत्मशून्य

मी समर्थन करत नाही म्हणजे माझी मूकसंमती नाही हे कशावरून? जे स्लटवॉक करू इच्छितात त्यांनी तो अवश्य करावा. माझी अजिबात ना नाही. कोणी काही केले तर माझ्या पोटात दुखत नाही.

ओह! यू मीन यूव आर "असंवेदनशील" की ? म्हणजे जो पर्यंत आपल्या पोटात दूखत नाही तोपर्यंत आपण काही कृती करणार नाही हा म्हणजे कहरच आहे.

सदर मुद्दा मुलगी झाली तर तिच्यावर अत्याचार होतील या गृहितकापेक्षा फारच कमी अप्रस्तुत आहे असं मला वाटतं.

आपलं वाटण फार चूकीच आहे असं नम्रपणे नमूद करतो. कारण धागा बघता हा अस्थानी विषय ठरतो.

प्रियाली's picture

19 Aug 2011 - 3:03 am | प्रियाली

ओह! यू मीन यूव आर "असंवेदनशील" की ? म्हणजे जो पर्यंत आपल्या पोटात दूखत नाही तोपर्यंत आपण काही कृती करणार नाही हा म्हणजे कहरच आहे.

नव्हे. मी संवेदनशील कारण संवेदनशील प्राणी दुसर्‍याच्या हक्काचा, अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा विचार करतात. उगीच फुकाचे विरोध करत नाहीत.

आपलं वाटण फार चूकीच आहे असं नम्रपणे नमूद करतो. कारण धागा बघता हा अस्थानी विषय ठरतो.

असं तुम्हाला वाटतंय कारण तुम्हाला तुमचं मत मांडता आलं नाही.

बाकी, नवा धागा काढताय ना की तिथेही पल्टी?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Aug 2011 - 2:31 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> आता आपण तूम्ही-आम्ही वर आलाच आहात तर सांगतो <<

छ्या, ती प्रियाली. मी अजून एकेरीवरच आहे रे बाळ. तिरकसपणात मुद्दा हरवू नये.

आत्मशून्य's picture

19 Aug 2011 - 2:54 am | आत्मशून्य

काकू, हे म्हणजे स्टड्वॉक केल्यास बलात्काराचे प्रमाण वाढेल असं म्हणता काय तूम्ही ?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Aug 2011 - 2:54 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

नाही.

आत्मशून्य's picture

19 Aug 2011 - 2:59 am | आत्मशून्य

.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Aug 2011 - 3:01 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

वेगळा धागा काढ रे बाळ. या वयात असं उभं, जपानी लिपीसारखं वाचणं जमत नाही मला.

आत्मशून्य's picture

19 Aug 2011 - 3:07 am | आत्मशून्य

या वयात असं उभं, जपानी लिपीसारखं वाचणं जमत नाही मला.

काकू, "मिस ल्यूसी केहती है की इन्सान की उमर उतनी होते है जितना वो फिल करे. संदर्भ डी.डी.एल.जे."

वेगळा धागा काढ रे बाळ.

हे स्लटवॉकचा अनावश्यक विषय या धाग्यात विनाकारण घूसडण्यापूर्वी आपल्याला सूचलं असतं तर ते कीती बरं झालं असतं ?

नगरीनिरंजन's picture

19 Aug 2011 - 7:34 am | नगरीनिरंजन

>>पुरूषांच्या पोटाच्या वर, वर म्हणजे बर्‍याच वर, डोकं नावाचा एक भाग असतो.
हे खरं आहे आणि पुरुषांना ते वापरायचंही असतं पण पोटाच्या वर आणि पोटाच्या खाली एकाच वेळी रक्तपुरवठा करणारी यंत्रणाच नसते हो. Genuine problem आहे हा पुरुषांचा. एकदा पोटाखाली रक्तपुरवठा सुरु झाला की डोकं गेलं... :)
(अति ह. घ्या.)

प्रियाली's picture

17 Aug 2011 - 9:58 pm | प्रियाली

तुम्ही लग्नही करू नका, अत्याचार तर बायकोवरही होऊ शकतात ना. चला तेवढीच एक मुलगी वाचेल. :)

नर्मदेतला गोटा's picture

17 Aug 2011 - 10:51 pm | नर्मदेतला गोटा

>>>तुम्ही लग्नही करू नका, अत्याचार तर बायकोवरही होऊ शकतात ना. चला तेवढीच एक मुलगी वाचेल

तुम्ही ???

काकू मला का सांगताय ?

प्रियाली's picture

18 Aug 2011 - 3:50 am | प्रियाली

काकू मला का सांगताय ?

लेका! तू लग्न केलेस तर मुलीशीच करशील ना?

अहो नर्मदेतले गोटेसाहेब, ते अत्याचार मुल्ं/पुरुषच करण्याची शक्यता जास्त असते.
त्यामुळं मुलींनाच असुरक्षित वाटतं....म्हणून मुलगीच नको असं कसं चालेल.
तुमचं म्हणणं म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा झाल्या की!
काय तरी दिवस आलेत.......

नर्मदेतला गोटा's picture

18 Aug 2011 - 10:27 pm | नर्मदेतला गोटा

"मुलींवरचे अत्याचार, असुरक्षितता
यामुळे मुलीची जबाबदारी नको वाटते "

हे मी लिहिलेले मत, अनेक पालकांचे मत आहे

काकू
विषय मी काढला नाही,
आजुबाजूच्या लोकांचा अनुभव मत मी मांडले

--

उगाच बाणेदार पणा दाखवण्याची संधी घेऊ नका, उगाच घसेफोड करू नका
(जसं काही माझ्याशी वैयक्तिक भाण्डणच आहे)

यामुळे मुलीची जबाबदारी नको वाटते "

अच्छा! म्हणजे जबाबदारी नकोच असाच अर्थ आहे हो! (तुमच्या आजूबाजूवाल्यांचा)
मुलगी असली की सुरक्षिततेची काळजी आणि स्वसंरक्षणाची जबाबदारी शिकवावी लागते कारण जबाबदारी नक्कोवाल्यांचे दिवटे नको ते प्रकार करणार. एकंदरीत पालकांना जबाब्दारीच नको असल्याने मुलग्यांनाही ती शिकवायचा प्रश्न येत नाही. म्हणजे बेजबाबदारपणा काय तो हवा, नियम आणि बांधिलकी हा प्रकार गेला चुलीत!
मुलं नको असताना समाजासाठी जन्माला घातल्यासारखीच घातलेली असतात. त्यातून मुलगा झाला की कसं असतं ना एकच असला तरी कोणी तोंड उघडत नाहीत आणि एक मुलगी म्हटलं की अजून एक होऊन जाऊदे गं बै! असं असतं.

उदय के&#039;सागर's picture

18 Aug 2011 - 1:58 pm | उदय के'सागर

काल आयबिएन लोकमत वर "सुरेश जैन", सदाशिव अमरावपुरकर" हे निखिल वागळेंच्या कार्यक्रमात बोलत होते. ह्या (सं)वादात सुरेश जैन चिडले असतांना ते अमरावपुरकरांना बोल्ले "तुम्हि बांगड्या घाला!बांगड्या घाला!" अणि ते हे वाक्य सतत बोलत होते.

माझा सांगायचा मुद्दा हाच आहे कि .. "बांगड्या घाला!" म्हणजे, तुम्हाला काय म्हणायच आहे, कि स्त्रिया दुबळया असतात, असं? जर् देशातले नेते लोकच असं बोलत वा समजत असतिल ह्या तर देशात स्त्रियांना नेहामि अशीच वागणुक मिळेल.

(मि कुठ्ल्याहि पक्षाचा माणुस नाहिये, अणि सुरेश जैन बद्द्ल मला काहि माहित हि नाहि विषेश, पण काल त्यांच हे असं वक्त्यव्यं एकुन खुप वाइट वाटलं :( )

प्रियाली's picture

18 Aug 2011 - 4:02 pm | प्रियाली

वरील अश्लाघ्य प्रकार मी पाहिला/ ऐकला आहे. विकृत माणसाप्रमाणे सुरेश जैन हे अमरापूरकरांना बांगड्या भरा असे तळतळून सांगत होते. खरे तर अमरापूरकरांना तसे सांगायचे काही कारणच नव्हते. केवळ अपमान व्हावा असा जैन यांचा हेतू होता. हे कळत असता चॅनेलने त्यांना वॉर्निंग द्यायला हवी होती. की अशा विकृतांनाच प्रमोट करण्याचा चॅनेलचा प्रयत्न असतो माहित नाही. तशा वागळ्यांकडून फार अपेक्षाही नाहीत म्हणा.

हा प्रतिसाद आत्मशून्य ह्या सद्स्यास आहे. प्रतिसाद तिरके होऊन वाचण्यास त्रास होत आहे म्हणुन तिथेच उत्तर दिले नाही.

आत्मशून्य बाळा, एखाद्या स्त्रीने काही विशिष्ठ प्रकारचे कपडे घातल्याने तिला पुरषी अत्याचाराला बळी पडावे लागले तर ह्यात दोष त्या पुरषाचाच आहे , त्याच्यात विकृती आहे हे एव्हाना तुला समजले असेल तर वर प्रियालींनी म्हटल्याप्रमाणे 'पुरूषांच्या पोटाच्या वर, वर म्हणजे बर्‍याच वर, विचार करण्यासाठी डोकं नावाचा एक भाग असतो' तो तुला आहे असे समजण्यास वाव आहे.

आत्मशून्य's picture

19 Aug 2011 - 4:42 am | आत्मशून्य

एखाद्या स्त्रीने काही विशिष्ठ प्रकारचे कपडे घातल्याने तिला पुरषी अत्याचाराला बळी पडावे लागले तर ह्यात दोष त्या पुरषाचाच आहे ,

हे मी फार आधीच मान्य केलेले वाचलेले दिसत नाही वाटतं ? बाकी तरीही मला डोकं नाही असं आपलं मत असेल तर मी त्याचा अत्यंत विनम्रतेने स्विकार करतो.

अवांतर :- किंबहूना स्त्रीने काही विशिष्ठ प्रकारचे कपडे घातलेले असो अथवा नसो जर तिला शारीरीक अत्याचाराला बळी पडावं लागलं तर दोष त्या पुरषाचाच आहे अस माझं याक्षणीही मत आहे. व ते बदलायची शक्यता फार धूसर आहे.

आशु जोग's picture

20 Aug 2011 - 1:49 am | आशु जोग

चालू द्या जोरात

नर्मदेतला गोटा's picture

20 Aug 2011 - 9:58 am | नर्मदेतला गोटा

रेवती काकू आणि प्रियाली काकी

माझे आभार माना

आजकाल पूर्वीसारखी युद्धे लढाया नाही होत मंग आम्हाला झाशीच्या रान्या कशा बघायला भेटनार

पन यानिमित्त्याने त्या बघायला भेटल्या, तुम्हाला लढाला चानस भेटला

बाकी चालू द्या, अन्याव अजाबात खपवून घ्याचा नाही

मेरी झांसी नही दूंगी !