'टाईम' ने म्हणे झाशीच्या राणीचा बहुमान केलाय! ही लिन्क पाहा
http://www.time.com/time/specials/packages/article/0,28804,2084354_20843...
'बॅड-अॅस' वाईव्ह्स मधे एन्ट्री, रूपर्ट मर्डॉक ची बायको, टायगर वूड्स च्या रागात त्याच्या गाडीची तोडफोड करणारी बायको या लिस्ट मधे झाशीची राणी म्हणजे सन्मान! (पेलिनबाईही आहेत त्यात, पण या लिस्ट मधे त्यांचे असणे चुकीचे नाही. अध्यक्षपदाला लायक बायकांच्या लिस्टमधे आल्या तर प्रॉब्लेम आहे :)
मुळातच ही लिस्ट म्हणजे फार अभ्यास वगैरे करून बनवलेली जगातील महान कर्तृत्ववान स्त्रियांची लिस्ट नव्हे. इशान थरूर (बहुधा शशी थरूर यांचे कोणीतरी आहेत) यांनी काही नावे त्यात दिल्याने एक भारतीय एन्ट्री आली असावी एवढेच. पण ती स्पेन ची राणी, झाशीची राणी, कदाचित क्लीओपात्रा या नावात बाकी काही टुकार नावे मिक्स केलेली आहेत.
ही लिस्ट गमतीने बनवल्यासारखी वाटते. 'बॅड-अॅस' शब्दाचा वापरही अमेरिकेत साधारण तसाच केला जातो. आश्चर्य वाटते ते आपल्याकडच्या बर्याच बातम्यांमधे हा जणू मोठा सन्मान असल्यासारखे वातावरण निर्माण केले आहे त्याचे.
आणि याचेही की 'तो' शब्द वापरून झाशीच्या राणीचा, भारताचा, स्त्रियांचा, आपल्या संस्कृतीचा अपमान केला म्हणून निदर्शने, टाईम वर बंदी घालायची मागणी वगैरे अजून आली नाही. बरेच स्फोटक मटेरियल आहे त्या विशेषणात :)
परदेशी मासिके, लोकांची वक्तव्ये यातील उल्लेखांना अवास्तव महत्त्व दिले जाते त्यामुळे हे होत असावे.
प्रतिक्रिया
25 Jul 2011 - 11:40 am | चिरोटा
होईल होईल. सावकाश होतील निदर्शने. धर्म ,जात, पोटजात कुठली झाशीच्या राणीची? निदर्शने करायची की नाहीत हे राजकिय पक्ष त्यावरुन ठरवतात्.माझ्यामते महाराष्टातल्या आणि मध्य प्रदेशातल्या राजकिय पक्षांना राडा करायची संधी आहे.
25 Jul 2011 - 11:45 am | सुनील
माझ्यामते महाराष्टातल्या आणि मध्य प्रदेशातल्या राजकिय पक्षांना राडा करायची संधी आहे
झांशी सांप्रत उत्तर प्रदेशात येते.
25 Jul 2011 - 12:38 pm | माझीही शॅम्पेन
झाशीची राणी ही ब्राम्हण असल्याने (तसा माझा समाज आहे ) कोणीही पेटून वैगरे उठणार नाही !!
बाकी एवी-तेवी सगळ्याना इथे सर्व जण षन्ड जाहीर झाल्याने फार काही होईल अस वाटत नाही (हे उगाचच) :)
25 Jul 2011 - 12:42 pm | मनराव
>>>टाईम' ने म्हणे झाशीच्या राणीचा बहुमान केलाय!<<<
'टा़ईम'ला टाईमपास करायला अजुन काही मिळालं नसेल............
>>परदेशी मासिके, लोकांची वक्तव्ये यातील उल्लेखांना अवास्तव महत्त्व दिले जाते<<<
+१११
25 Jul 2011 - 12:53 pm | नरेशकुमार
मेनबत्त्या लावुन घेउन फिरुन काही करता येइल काय ?
25 Jul 2011 - 12:54 pm | रणजित चितळे
आपण दिलेल्या लिंक वर गेलो तर पेज टेकन आऊट ऑफ धिस साइट असे येत आहे.
25 Jul 2011 - 1:48 pm | अविनाशकुलकर्णी
राणे वर लिहिणे टाईम्स्ला भुषणावह आहे
25 Jul 2011 - 7:10 pm | राजेश घासकडवी
http://www.time.com/time/specials/packages/article/0,28804,2084354_20843...
त्या शब्दाचा अर्थ झाशीच्या राणीला 'झुंजार' 'ठोशास ठोसा देणारी' या पद्धतीने लागू पडू शकतो. सनसनाटीकरणापायी हा शब्द वापरला गेला असावा. त्यामागच हेतू हिणवणे हा नसून गौरव करण्याचाच आहे. मात्र टाइम जर असल्या थिल्लर गोष्टी करत असेल तर आपल्या महाराष्ट्र टाइम्स ला कशाला बोल लावावेत? 'टाइम्स, दे आर अ चेंजिंग' असंच म्हणावं.
शब्दांची धार वापरून बोथट होणं हेही काही नवीन नाही. एके काळी मराठीत 'मस्त' हा शब्द कुलीन घरच्या मुलीबाळींच्या तोंडी शोभून दिसत नसे. आता काय परिस्थिती आहे? ती धार जात असताना काही वेळा शब्द टोचतात इतकंच.
बाकी असल्या याद्यांना फारसा काही अर्थ नसतो. कशाला उगाच आपल्या डोक्याला शॉट लावून घ्यायचा.
25 Jul 2011 - 9:36 pm | बहुगुणी
टाईम मधलं ही 'निवड' करणार्यांमध्ये झाशीच्या राणीचं नाव शशी थरूर यांचा पुत्र न्यू यॉर्क स्थित इशान थरूर याने सुचवलं आहे असं दिसतं. (त्यानेच या यादीत स्पेन च्या राणीचं आणि क्लिओपात्राचं नावही सुचवलं आहे.) भारतीयाने ही यादी तयार करण्यात भाग घेतला नसता तर राणी लक्ष्मीबाईचं नाव आलं असतं की नाही याची शंका आहे.
(एक अंमळ गमतीची गोष्ट म्हणजे याच यादीत ६व्या क्रमांकावर एलेन डिजेनेरसचं आणि तिची समलिंगी पार्टनर पॉर्टिआ डि रॉसी या दोघींचं (!) नाव आहे.)
या असल्या याद्यांना फाट्यावर मारणं हेच उत्तम.
25 Jul 2011 - 9:56 pm | प्रियाली
या यादीत
या बायकांची नावे का विसरला इशान?
बाकी, क्लिओ मार्कच्या मागे उभी राहिली की मार्क क्लिओच्या मागे उभा होता हा प्रश्न इशानला पडला नाही. :)
अशा फालतू लेखांना फार महत्त्व देण्याची गरज दिसत नाही. असो.
25 Jul 2011 - 11:25 pm | बिपिन कार्यकर्ते
अगदी सहमत आहे.
प्रियालीताईंनी आता एक फर्मास भयकथा लिहून ती इशानला पोष्टाने पाठवावी जेणेकरून ती वाचल्यावर तो घाबरून जाईल, असे सुचवतो.
26 Jul 2011 - 4:21 am | विकास
अमेरीकन अधुनिक शब्दकोशात (अर्बन डिक्शनरीत) या शब्दाचे अर्थ विशेष करून नंबर २ चा बघण्यासारखा आहे. त्या व्यतिरीक्त विक्शनरीत जरा सभ्यतेने तो अर्थ सांगितलेला आहे.
बाकी असल्या टॉप टेनकडे दुर्लक्ष करणे हे वर अनेकांनी म्हणलेले आहेच त्याच्याशी सहमत.
26 Jul 2011 - 7:42 am | फारएन्ड
टाईमने जी लिस्ट बनवली त्यावर टीका करण्याचा उद्देश नव्हता. तो लिस्ट बनवणार्यांचा चॉईस आहे. फक्त अशा लिस्ट मधे नाव आले म्हणजे काहीतरी मोठे रेकग्निशन मिळाल्याच्या थाटात कालच्या आणि परवाच्या पेपर्समधे बातम्या आल्या त्या डोक्यात गेल्यामुळे हे लिहीले :)
26 Jul 2011 - 12:58 pm | श्रावण मोडक
पेपरातील बातम्या डोक्यात जाऊ देऊ नका. डोकं बिघडतं अशानं. ;)
26 Jul 2011 - 5:29 pm | विनायक बेलापुरे
यादी कर्त्याला चुकीची दिली असावी. झाशीच्या राणीला महत्व देणे हा 'इकडच्या-तिकडच्या ' युरेशियान्सची मिलीभगत आहे. ;)
27 Jul 2011 - 6:48 pm | अविनाशकुलकर्णी
27 Jul 2011 - 6:50 pm | अविनाशकुलकर्णी
मुन्नी..शिला..जिलेबि बाई