गोला... टिंग..टिंग्... टिंग्...टिंग...टिंग्.. .टिंग्....टिंग.

जागु's picture
जागु in कलादालन
29 Jun 2011 - 1:03 pm

पावसाच्या लपाछुपीमुळे वातावरण तसे अजुन गरमच आहे. त्या वातावरणात हे गोळ्याच थंड नेत्रसुख.

१) ही आहे गोळा बनवण्याची मशीन (ती तर सगळ्यांनाच माहीत असते तरीही फोटो टाकतेय).

२) बघा बर्फ लावलाय. धिर धरा.

३) गोळ्याचा साचा म्हणजे आपले काचेचे ग्लास.

४) प्लेन गोळा तयार आहे लिंबु आणि मिठ लावुन.

५) कोणता रंग घ्यायचा ?

६) लाले लाल आम्ही उचलणार.

७) गोळ्यातूनही आमची देशभक्ती जागृत होताना दिसते. वाटल ना थंड ?

छायाचित्रण

प्रतिक्रिया

नरेशकुमार's picture

29 Jun 2011 - 1:17 pm | नरेशकुमार

आनि मग लगेचच मलेरिया, स्वाईन फ्लू हजर.

मराठी_माणूस's picture

29 Jun 2011 - 1:19 pm | मराठी_माणूस

छान छायाचित्रे .

वा..... तोंडाला पाणी सुटले. :)

पप्पु अंकल's picture

29 Jun 2011 - 2:35 pm | पप्पु अंकल

क्षणभर अस वाट्ल कि तो लाल लाल गोळ्यामागचा हात माझाच आहे आणि मी आता.......आता........ गोळा उचलेन

पप्पु अंकल's picture

29 Jun 2011 - 2:35 pm | पप्पु अंकल

क्षणभर अस वाट्ल कि तो लाल लाल गोळ्यामागचा हात माझाच आहे आणि मी आता.......आता........ गोळा उचलेन

किसन शिंदे's picture

29 Jun 2011 - 2:41 pm | किसन शिंदे

गोलाssss!... टिंग..टिंग्... टिंग्...टिंग...टिंग्.. .टिंग्....टिंग.

गोलाssss!... टिंग..टिंग्... टिंग्...टिंग...टिंग्.. .टिंग्....टिंग.

गोळेवाल्या भय्याची गाडी बाहेर कुठेतरी आलेली होती. हाक ऐकली आणी लगेचच हॉफ प्यँटच्या खिशातलं खुप संभाळून ठेवलेलं एक रुपयाचं नाणं तपासुन पाहिलं. हाताला लागलेलं ते नाणं मुठीत दाबुन धरुन तसाच धावत सुटलो, गोळेवाला निघून जाईल म्हणून.

"एक रुपयका गोला देना भय्या, वो कालाखट्टा वाला" शर्टाच्या बाहीने नाकाला आलेला शेंबुड पुसत हातातले एक रुपयाचे नाणे त्या भय्यासमोर धरत मी बोललो.:)

एका हाताने मशीनीचा दांडा जोर-जोरात फिरवत दुसरा हात त्याने जिथुन बर्फाचा पांढराशुभ्र चुरा खाली पडतो तिथे पकडला...हातात पडलेला बर्फ एका छोट्याश्या ग्लासात त्याने दाबुन बसवला आणी त्यावर एक काडी खोचली...दोन्ही हातांनी तो ग्लास चोळून नंतर अलगद तो बर्फाचा गोळा बाहेर काढला...गाडीच्या पुढच्या भागात असलेल्या रॅकमधुन त्याने कालाखट्टाची बॉटल त्या गोळ्यावर उपडी केली...आणी तो गोळा माझ्या हातात टेकवला.
अतिशय आनंदाने तो बर्फाचा गोळा हातात घेवून मी त्याचा स्वाद घेवु लागलोच होतो तेवढ्यात पाठीमागुन खांद्यावर कुणीतरी हात ठेवला, वळून मागे पाहतोय तो नुकतेच क्रिकेट खेळून आलेले आमचे थोरले बंधुराज आमच्या पाठी उभे होते.
"काळ्या, तु जर बर्फाचा गोळा खाल्लास ना तर मी घरी आईला जावून सांगणार" चुघल्या करण्याच्या तयारीत असलेला मोठा भाऊ रागाने मला म्हणाला.

"तुला माहीत नाही का? या गोळ्यात किडे असतात ते" त्यानं आपलं तत्वज्ञान पाजळलं.

"ह्या, कायपण बोलतो तु दाद्या, ह्याच्यात किडे असतात तर मग मला का दिसत नाहीत?"

"गोळ्यावर मीठ टाकला ना मग त्याच्यावर ते किडे वळवळतांना दिसतात, घरी चल दाखवतो तुला" भाऊराया मला घाबरायचा प्रयत्न करत होता आणी मी त्याला दाद देत नव्हतो.

मी ऐकत नाहीये हे पाहून माझ्या दंडाला पकडून तो जबरदस्तीने मला घराकडे खेचत नेवु लागला तसा मोठमोठ्याने रडत मी त्याच्या हाताला हिसके देत पळण्याचा प्रयत्न करु लागलो.त्या खेचाखेचीत आणी रडारडीत माझ्या हातातला प्राणप्रिय बर्फाचा गोळा खाली पडला :( मग मात्र मोठ्ठ्याने गळा काढत तिथेच जमिनीवर मी बसकन मांडली.

याचा राग म्हणुन पुढचे दहा दिवस त्या दाद्याशी कट्टीच घेतली. :)

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

29 Jun 2011 - 2:46 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

किसनराव, काय प्रतिसाद आहे मस्त!!
:)

किसन किती लहानपण लपलय ह्या गोळ्यामध्ये !

मदनबाण's picture

30 Jun 2011 - 8:14 am | मदनबाण

आहाहा... :)