दोष होता केला मी तो चुकून

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जे न देखे रवी...
30 Jun 2008 - 11:36 am

(अनुवादीत. कवी-तस्लिम फझली)

विसरू कसा तुला
नसे मी तेव्हडा गैरविश्वासू
तक्रार कशी करू आता
असली तरी नाहीस देत भासू

होतो गेलो मी समजून
भेटीतून गेलो प्रीत मिळवून
एक तुझ्या शिवाय दुःखातून
नाही गेलो काहीही मिळवून

नाजूक मनाला गेलीस तू तोडून
सहज गतीने गेलीस तू खेळून
दोष होता केला मी तो चुकून
काय मिळवू मी दुषण तुला देवून

देशिल का तुझे दुखणे मला
मिळेल शांती सर्वदा त्यातून
कमनशिब माझे असे समजून
जाईन मी एकदाचे तुला विसरून

श्रीकृष्ण सामंत

कविता

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

30 Jun 2008 - 11:51 am | मदनबाण

नाजूक मनाला गेलीस तू तोडून
सहज गतीने गेलीस तू खेळून
दोष होता केला मी तो चुकून
काय मिळवू मी दुषण तुला देवून

व्वा.. हे मस्तच.

मदनबाण.....

श्रीकृष्ण सामंत's picture

30 Jun 2008 - 8:18 pm | श्रीकृष्ण सामंत

आपल्याला कविता आवडली हे वाचून बरं वाटलं
आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

फटू's picture

30 Jun 2008 - 12:41 pm | फटू

विसरू कसा तुला
नसे मी तेव्हडा गैरविश्वासू
तक्रार कशी करू आता
असली तरी नाहीस देत भासू

ही कविता बिलकुल सहज वाटत नाही हो... यमक जुळवण्यासाठी तुम्हाला खुप मोठी कसरत करावी लागली आहे हे लगेच लक्षात येतं... असो, स्पष्ट बोलल्याचा राग नसावा...

आपलाच,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

श्रीकृष्ण सामंत's picture

30 Jun 2008 - 8:16 pm | श्रीकृष्ण सामंत

नमस्कार सतीश गावडेजी,
स्पष्ट बोलण्यावर रागावून कसं चालेल.त्यातूनच वाचाकाची असली नाडी कळू शकते ना!
खरं सागू,मुळ कवितेचा आशय चुकून सुद्धा बदलू नये,
ते पाप आपल्या हातून होवू नये म्हणून कधीकधी यमकावर कोलांट्या उड्ड्या द्दाव्या लागतात.आणि जख्खड उर्दू शब्द अनेक अर्थ देवून जातात.अशावेळी यमक,आशय आणि कवितेची सुंदरता टिकवून ठेवण्यासाठी कधी कधी सुंदरतेला बळी द्दावं लागतं.
आपल्या सारख्या सुंदरतेच्या चोखंदळाना नाराज करावं लागतं.
शेवटी काय निर्मितीच वरचढ असते.त्याला मी तरी काय करूं?
"आयीझ बीहोल्ड धी ब्युटी"
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com