(अनुवादीत.कवी-एस.एच.बिहारी)
हा चंद्रमुखी चेहरा
केसाचा रंग सुनेहरा
हे नीळसर नीळसर डोळे
हे लक्षण असे वेगळे
तारिफ करू का त्याची
कलाकृती ही ज्याची
कथा पुराणी तुझी
जाते ऐकवीली सदाची
तुला पाहूनी मानिले
योग्य असे जे ऐकले
ते मुरडत मुरडत चालणे
ते जादू टोणा करणे
शतदा मी संभाळणे
मन काबूत नसणे
तारिफ करू का त्याची
कलाकृती ही ज्याची
लाली सकाळच्या किरणाची
रंगीत शोभा गालावरची
संध्याकालीन अंधाराची
जणू छाया केसाची
तू तूडूंब नदी पाण्याची
दुधाळलेल्या फेसाची
मजा असे डुबण्याची
तारिफ करू का त्याची
कलाकृती ही ज्याची
मी शोधीत असे मंदीर
मंदीर माझ्या समोर
दूर कर हा पडदा
निघू दे हा अंधार
हे लाडीक लाडीक वागणे
करिते पुरे दिवाणे
भरून पाहूदे मला
तो मस्त तुझा चेहरा
तारिफ करू का त्याची
कलाकृती ही ज्याची
श्रीकृष्ण सामंत
प्रतिक्रिया
27 Jun 2008 - 10:31 am | कौस्तुभ
मस्तच आहे कवीता!
27 Jun 2008 - 10:36 am | धमाल बाळ
तारीफ करु क्या उसकी
जिसने तुम्ही बनाया
ये चांदसा रौशन चेहेरा
जुल्फोंका रंग सुनहरा
ये झील सी नीली आंखे
कोई राज है इनमे गहरा
तारीफ करु क्या उसकी
जिसने तुम्ही बनाया:)
27 Jun 2008 - 7:46 pm | श्रीकृष्ण सामंत
अगदी बरोबर
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
28 Jun 2008 - 8:43 am | विसोबा खेचर
उगाच मराठीकरण करून चांगल्या चांगल्या हिंदी गाण्यांची पार वाट लावणारे आमचे गोळेकाका अठवले! :)
सामंतसाहेब, प्रामाणिक मत! राग नसावा...
बाकी चालू द्या... :)
आपला,
(हिंदी) तात्या.
28 Jun 2008 - 11:00 am | श्रीकृष्ण सामंत
हिंदी तात्याको सलाम,
"पसंत अपनी अपनी ख्याल अपना अपना"
कविता ऐसिच होनी चाहिये
ऐसा अपने कवितापर बंधन
होना नही मांगता
कविता ऐसि नहीच होनी चाहिये
ऐसा भी अपने कवितापर बंधन
होना नही मांगता
जब अपना दील करता है लिखनेको
हम लिखते जाते है
आखिर ये तो खुदा की देन है
कविता फूटपट्टीसे मापनेको नही आता
कविता किसीको "शापनेको" नही आता
कविता चमचम चांदी जैसी
हरी हरी फांदी जैसी
अपनी कविता अपुनच लिखनी चाहिये
अपनी कवितापे अपुनच प्रेम करना चाहिये
(हिंदीत अनुवाद. कवी-अनामिक मराठी)
आपल्या प्रामाणिक मताचा मी मनापासून आदर करतो.शे शंभर लोकानी कविता खूप आवडली म्हणूनही अन्य ठिकाणावरून पण कळवलं आहे.
शेवटी काय "पसंत अपनी अपनी ख्याल अपना अपना"
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
28 Jun 2008 - 11:54 am | विसोबा खेचर
शे शंभर लोकानी कविता खूप आवडली म्हणूनही अन्य ठिकाणावरून पण कळवलं आहे.
मीही त्या शे-शंभर लोकांचा आदर करतो...
शेवटी काय "पसंत अपनी अपनी ख्याल अपना अपना"
अगदी खरे! मला स्वत:ला मात्र एका चांगल्या, लोकांच्या तोंडी असलेल्या गाण्याचा असा अन्य भाषेत केलेला अनुवाद रुचत नाही. मूळ चाल ज्या भाषेला लावली असेल त्याच भाषेत ते गाणं गुणगुणायला मजा येते. त्या त्या भाषेतल्या त्या त्या शब्दांनीच ती चाल अधिकाधिक रुजत असते/रुजलेली असते. त्या चालीत अन्य भाषेतले शब्द वाचताना, गुणगुणताना दाताखाली खडा आल्यासारखे वाटते, दुसर्याच्या ताजला कुणी आपली वीट जोडली आहे असे वाटते.
गीतरामायणाचेदेखील असेच झाले. मूळ मराठीतल्या गीत रामायणाचे नंतर अनेक भाषांतून भाषांतर झाले परंतु ती कोणतीच गाणी रुजली नाहीत! त्याचे कारणही बहुदा हेच असावे...!
मूळ भाषा मराठी असो, हिंदी असो, वा इतर कुठलीही असो, उदाहरणच द्यायचं झालं तर,
क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसांचा,
पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा!
या ओळी अन्य भाषेत कुणीही कितीही उत्तमरित्या भाषांतरीत केल्या तरी त्या चालीत ऐकायला रुचणार नाहीत, किंवा
पर्दा नही जब कोई खुदासे,
बंदो से पर्दा करना क्या?
या ओळी अन्य भाषेत कुणीही कितीही उत्तमरित्या भाषांतरीत केल्या तरी त्या चालीत ऐकायला रुचणार नाहीत! निदान मला तरी नाहीत. मला ते हास्यास्पदच वाटेल...
स्वरांमुळे शब्दांना झळाळी येते परंतु नंतर ते शब्द त्या स्वरात इतके छान मुरतात की पुढे पुढे त्या शब्दांमुळेही मूळ स्वर अधिकाधिक तेजस्वी बनत जातात. असं हे शब्द-स्वरांचं अद्वैत! शब्दस्वरांच्या त्या ताजला कुणी स्वत:ची नवी वीट लावू नये असे मला वाटते!
असो, मला गीतसंगीताची फारशी समज नाही. आपले काव्य आवडणार्या त्या शेशंभर लोकांइतकी तर नक्कीच नाही! :)
तरीही वरील सर्व ही माझी वैयक्तिक मतं आहेत आणि माझ्यापुरती ठाम आहेत!
कळावे, लोभ असावा. पुढील लेखनाकरता शुभेच्छा!
तात्या.
29 Jun 2008 - 11:24 am | श्रीकृष्ण सामंत
तात्याराव नमस्कार,
अभ्यासू वृत्तिने आपण केलेल्या विधानांची मी कदर करतो.
आपल्या मताचा आदर ठेवून मला जमेल तसं आपल्या सर्वांना आनंद देण्याचा मी माझ्या लेखनातून प्रयत्न करीन
आपल्या शुभेच्छा बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com