धर्मामिटर

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
18 Jun 2011 - 12:19 am

===धर्मामिटर===

जसा असतो थर्मामिटर,तसाच असतो धर्मामिटर॥ध्रु॥

प्रत्येकाची श्रध्दा सुध्दा, प्रत्येकाचा असतो ताप।
परलोकातला जायचा दोर,ईहलोकातला होतो साप॥
सापाला काबुत ठेवण्यासाठी,पाजा दुध दोन दोन लिटर...१...

धर्माच्या दुधाला असतो भाव,बुडवुन खावा श्रद्धेचा पाव।
ईहलोकी भांड जेवढं जड,तेवढाच बसतो आतुन ताव॥
धर्माची लांबी कधी पाच,कधी असते पंधरा मिटर...२...

भारतात धर्माला जातिच फार,प्रत्येक खाते दुसय्रावर खार।
आधी मी तुला मारलं,...तर तू नंतर मला मार॥
जातीची गाडी खिळखिळी करायला,सांगा शोधू कुठला फिटर?...३...

प्रत्येकाच्या जातिचं पाणी, जातं शेवटी समिंदरात।
पण पहिल्यापासुन हऊसेनी भरतात,टाक्या मात्र घराघरात॥
पाण्याचं बाष्प करावयाला,सांगा लाऊ कोणता हिटर?...४...

पराग दिवेकर...........

कविता

प्रतिक्रिया

विदेश's picture

19 Jun 2011 - 5:22 pm | विदेश

भारतात धर्माला जातिच फार,प्रत्येक खाते दुसय्रावर खार।
आधी मी तुला मारलं,...तर तू नंतर मला मार॥
जातीची गाडी खिळखिळी करायला,सांगा शोधू कुठला फिटर?...३...

छान.

फिटर सापडणे अवघड आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

19 Jun 2011 - 8:22 pm | अत्रुप्त आत्मा

तुमचं हे अतीशय अचूक निरिक्षण पटलं...

पिवळा डांबिस's picture

20 Jun 2011 - 5:28 am | पिवळा डांबिस

"म्हणणं तुमचं असेल खरं, पण आमाला ते जमायचं नाय |
जातीच्या भांडणांखेरीज, सत्तेचं लोणी गावत नाय ||
कशाला फुकाचा उपदेश राव, काढा पुढे तुमची स्कुटर...."
:)
(ह. घ्या.)

स्वामी संकेतानंद's picture

3 Nov 2014 - 8:45 am | स्वामी संकेतानंद

खरंय गुरुजी! सध्याच्या उन्मादी काळात तर हे अधिकच तीव्रतेने जाणवते.
चला, धर्मामीटर लावून सध्यांचा 'ताप' किती डिग्री आहे बघा बरं.. :)

खटपट्या's picture

3 Nov 2014 - 9:00 am | खटपट्या

खूप छान !!

प्रचेतस's picture

3 Nov 2014 - 9:24 am | प्रचेतस

अरे वा,
आत्मूगुर्जींची ही कविता माहितच नव्हती.

बोका-ए-आझम's picture

3 Nov 2014 - 11:31 am | बोका-ए-आझम

झकास! धर्मामीटर हे नाव एकदम दिलखेचक वगैरे आहे!

सतिश गावडे's picture

3 Nov 2014 - 6:14 pm | सतिश गावडे

भारीच...

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Nov 2014 - 6:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त !

अवतार's picture

3 Nov 2014 - 7:40 pm | अवतार

लय भारी !

तुमच्या प्रतिभेला दाद द्यायला वापरतो आहे तुमचाच मीटर :)

अत्रुप्त आत्मा's picture

4 Nov 2014 - 9:05 am | अत्रुप्त आत्मा

@तुमच्या प्रतिभेला दाद द्यायला वापरतो आहे तुमचाच मीटर >>> हहा हहा हहा हहा!!!
जय हो अवताराबाबा की! :)

बॅटमॅन's picture

4 Nov 2014 - 12:33 am | बॅटमॅन

वाह!!! शीर्षक एकदम जबराट. कविताही छानच.

चाणक्य's picture

4 Nov 2014 - 7:41 am | चाणक्य

झकास जमलीये कविता गुर्जी

प्रचेतस's picture

4 Nov 2014 - 9:10 am | प्रचेतस

धर्माच्या दुधाला असतो भाव,बुडवुन खावा श्रद्धेचा पाव।
ईहलोकी भांड जेवढं जड,तेवढाच बसतो आतुन ताव॥
धर्माची लांबी कधी पाच,कधी असते पंधरा मिटर...२...

अप्रतिम.
हे कडवे तर खूपच आवडले.

माहितगार's picture

8 Nov 2014 - 9:44 am | माहितगार

कविता आवडली.

धर्माची लांबी हे रुपक नीटसे उमगले नाही.

-अनभिज्ञ माहितगार

अत्रुप्त आत्मा's picture

8 Nov 2014 - 11:15 am | अत्रुप्त आत्मा

@धर्माची लांबी हे रुपक नीटसे उमगले नाही. >>> म्हणजे..जे लोक,धर्मामधे.. स्वतःला हवा असलेला बदल(सुधारणा नव्हे!) हवा तेंव्हा हवा तसा करवून घेतात..(आणि,तो ही धर्माचीच साक्ष काढून!) आणि एरवी मात्र धर्म अपरिवर्तनीय शाश्वत असतो..वगैरे बोलतात.. त्यांच्यासाठी हे रुपक आहे.

म्हणजे एकिकडे एकादशीला सत्यनारायण नको..असं म्हणणारे..तोच स्वतःला करायची इच्छा झाली,की एकादशी म्हणजे पांडुरंग पांडुरंग म्हणजे विष्णू...म्हणजे तोच सत्यनारायण ..असा आ..धार-काढून हवा तसा धर्म लांबवतात..तेच मत उलट लावत एखाद्याचा सत्यनारायण थांबवतात...धर्माची लांबी कमी करतात... :)

कवितानागेश's picture

4 Nov 2014 - 9:20 am | कवितानागेश

धर्मामीटर हा शब्द फारच आवडला. :)

ज्ञानोबाचे पैजार's picture

4 Nov 2014 - 10:35 am | ज्ञानोबाचे पैजार

डुकरांशी कुस्ती खेळल्याने , डुकराला काहीच नसतो पडत फरक,
तसेच काहीसे आहे भांडण, धर्म, भाषा, जात पात, स्वर्ग आणि नरक
त्यांना भांडूदे दोस्ता, मस्त घेउन बसु आपण एक एक क्वार्टर...,

पैजारबुवा,

अस्वस्थामा's picture

4 Nov 2014 - 11:02 am | अस्वस्थामा

मस्त हो गुर्जी.. :)

जेपी's picture

9 Nov 2014 - 6:59 am | जेपी

आवडल.

चौकटराजा's picture

9 Nov 2014 - 7:26 am | चौकटराजा

धर्माचे नाव वापरणर्‍याना मारा कचकून एक खेटर
आम्ही कपडे सांभाळतो , तुम्ही व्हा पुढे दिवेकर !!!