वेडे मन

प्रिया ब's picture
प्रिया ब in जे न देखे रवी...
17 Jun 2011 - 12:14 pm

का नकळत एखाद्यात इतकं गुंतत जातो?
त्या एका कटाक्षासाठी इतकं झुरत राह्तो?
तो मात्र धुंद असतो त्याच्याच विश्वात
तुम्हाला टिचभर जागा नसते त्याच्या जीवनात

का हे अशक्य स्वप्न उराशी मी बाळगले?
खरया परिस्थितीला सामोर जाण अवघड वाटू लागले
हरवलेल्या मनाची मीच समजूत काढत राहिले..
कंठ दाटून आला आणि डोळे पाणावले!!!

चारोळ्या

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

17 Jun 2011 - 12:38 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

छान झाल्यात!

अवांतरः कटाक्ष मधला क्ष लिहण्यासाठी 'X' चा वापर करा. आणि अनुस्वार देण्यासाठी 'M' चा वापर करा.

स्वानन्द's picture

17 Jun 2011 - 2:06 pm | स्वानन्द

छान जमलीय कविता.

जय - गणेश's picture

17 Jun 2011 - 12:49 pm | जय - गणेश

एकदम फालतु

टारझन's picture

17 Jun 2011 - 12:56 pm | टारझन

वा वा वा !! प्रिया जी .. जवाब नही तुम्हारा ... काय कविता लिहीली आहे ... आपण तर फैन झालो तुमचे ..
क्रुपया ह्या गरिबाला कुठेतरी तुमच्या जवळ जागा द्या थोडीशी ...

का नकळत एखाद्यात इतक गुन्तत जातो?
त्या एका कटाक्शासाठी इतक झुरत राह्तो?

पाहिलं तर किती साध्या ओळी .. पाहिलं तर किती गहण अर्थ .. एखाद्यात नकळत गुंतणे .. आणि त्याच्या एका लुक साठी झुरणे .. वा काय मोरपिस फिरवणारी कल्पना आहे ही ...

तो मात्र धुन्द असतो त्याच्याच विश्वात
तुम्हाला टिचभर जागा नसते त्याच्या जीवनात

कोणी तरी म्हंटलंच आहे की "इक्श जब दोनो तरफ होओओओतो मजाआआआ दे ता है .. इश्क जब एक तरफ हो तो सजाआआ देता है .. " [पण ते हिंदीत म्हंटलं होतं . इथे प्रिया ने मात्र मराठी मनाला हात घातलाय .. एकतर्फी प्रेमाविश्काराचं एक आगळं वेगळं रुप इतक्या सोप्या शब्दात समोर आलंय .. वा ..

का हे अशक्य स्वप्न उराशी मी बाळगले?
खरया परिस्थितीला सामोर जाण अवघड वाटू लागले

नविन उतारा सुरू करताना आपल्या मनी बाळगलेली अवास्तव स्वप्न आणि ती पुर्ण होताना दिसत नसल्याने प्रेमिकेच्या मनाची होणारी घालमेल तिला स्वस्त बसु देत नाही .. किती अवघडलीये ती .. जणु ५०० किलोमिटर सडक्या सस्पेन्शन नसलेल्या बाईक वरुन ओबडधोबड रस्त्याने सलग प्रवास केल्यावर कुल्ल्यांची जी अवस्था होती तशी काहीशी अवस्था दिसते .. किती क्रांतीकारी कल्पना आहे ..

हरवलेल्या मनाची मीच समजूत काढत राहिले..
कन्ठ दाटून आला आणि डोळे पाणावले!!!

देयर यु आर .. कवितेचा क्लायमॅक्स असावा तर असा ... कंठ नुसता दाटत नाही .. तर डॉळे पाणावतात .. आणि कविता वाचता वाचता आमच्या सारखे रसिक रुमालाने नव्हे तर टॉवेल ने डोळे पुसुन तो परत परत पिळुन काढतात.
कविता कशी असावी तर अशी असावी ... असे ह्या रडवेल्या भावनि़क प्रसंगी हातोहात नमुद करावेसे वाटते.

शैलेन्द्र's picture

17 Jun 2011 - 2:02 pm | शैलेन्द्र

कंपणीतले प्रोजेक्ट संपले का मुकादम बालंतपणाच्या सुट्टीवर गेला?

प्रचेतस's picture

17 Jun 2011 - 2:04 pm | प्रचेतस

टार्‍याचे हे सुंदर रसग्रहण आणि कवितेच्या शेवटच्या ओळी वाचून आमचेही ड्वाळे पाणावले.

सविता's picture

20 Jun 2011 - 7:04 pm | सविता

अर्या के बाद प्रिया...

के अर्या का नया आयडी प्रिया?

स्पा's picture

17 Jun 2011 - 2:00 pm | स्पा

__/\__

आज म्या धन्य जाहलो

=)) =)) =))

-- तेजा ब

वेताळ's picture

17 Jun 2011 - 5:42 pm | वेताळ

आवडल्या.

आत्मशून्य's picture

18 Jun 2011 - 7:26 am | आत्मशून्य

चालूदे..... मज्या येतेय.

श्रीखंडात घाला हो चारोळ्या... चांगलं लागेल!

बरं... तुम्ही शिल्पा ब च्या बहीण का? (डुप्लिकेट आयडी का असं विचारणार होते..पण जिवाच्या भितीमुळॅ विचारले नाहीये!)

काय हे!! माझी कल्पनाशक्ती इतकी दरिद्री आहे असं का वाटतंय ?

आत्मशून्य's picture

20 Jun 2011 - 10:27 pm | आत्मशून्य

कारन कै प्रश्न्हाना वूत्तरे न्हस्त्यात.

शिल्पा ब's picture

21 Jun 2011 - 1:36 am | शिल्पा ब

ते दिस्तच ए!!

सविता's picture

20 Jun 2011 - 11:47 pm | सविता

सॉरी सर... (आपलं हे..मॅडम).. गलती से मिष्टेक हो गया!

नाना बेरके's picture

20 Jun 2011 - 7:28 pm | नाना बेरके

ह्या चारोळ्या नसून ही आठोळी ( नवीन काव्यप्रकार ) आहे.

सुहास..'s picture

21 Jun 2011 - 10:07 am | सुहास..

डोळे पाणावले!!!

पुकशु !