बदल्ला आहे काळ..

प्रिया ब's picture
प्रिया ब in जे न देखे रवी...
16 Jun 2011 - 11:35 am

"हेल्लो मन्या.. कसा आहेस? बर्याच दिवसात झाला नाही रे आपला call...."
"विसरलीस बघ ....long weekend आई.. पाहिला D.C, NY, Niagara fall.."
"आम्हाला तुझी आठवण येते... जमेल का रे यायला इकडे?"
"लगेचच जमणं अवघड दिसतंय, महिन्या अखेर पर्यंत चा तर तू विचारच सोड..
तुला नाही गं कळणार आई इथे खूप असतो कामाचा load"

"बाकी तुमची तब्बेत ठीक ना? कळव मला जर पैसे वगैरे लागणार असतील"
"पैसे नकोत रे बाळा.. हवा आहे तुझा फक्त थोडासा वेळ... तो जर तू देऊ शकशील.."
"मला देखील यावंसं वाटतं गं.. पण गेलोय पार कामात बुडून...
"आई तू मला हव ते माग.. तेवढा माझा वेळ सोडून..."

"काय सांगू तुला!! Competition खूप जास्ती आहे...We have to keep up with the pace...
तुमच्या काळात नव्ह्तं गं इतकं.. बाबा was never in that rat race..
तुमची स्वप्न जिथे सम्प्तात तिथे आमची सुरु होतात
काळ फार बदल्ला आहे.. क्षणभर विश्रांती घेतली तरी शंभर लोक पुडे जातात."

"BMW घ्यायची की Mercedes छान .. ह्या असतात breakfast च्या चर्चा
East coast चांगलं की West ला व्हायच settle, कुठे असतो कमी खर्च?
आई बाबा... खर सांगू? खूप दमलोय मी देखील.. सार्खा कसला ना कसला घेऊन ध्यास
कधी हो मला देखील घेता येईल चिंता विरहित मोकळा श्वास?"

कविता

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

16 Jun 2011 - 12:48 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

छान!!

खुपंच मनस्वी कविता आहे . मला अगदी माझीच आठवण झाली .. प्रत्येकाला स्वतःच्या अंतरंगात डोकवायला भाग पाडणारी ही आगळी वेगळी कविता काव्यक्षेत्रात एक मैलाचा दगड ठरावी असे ह्या सेंटीमेंटल क्षणी णमुद करावेसे वाटते.

हळुवार पणे गुंफलेल्या भावना खुप प्रभावी पणे मांडल्या आहेस प्रिया . बाकी जमलं तर ऑडी घ्या. .. असे जाता जाता नमुद करतो .

- प्रता प

परिकथेतील राजकुमार's picture

16 Jun 2011 - 1:36 pm | परिकथेतील राजकुमार

Ohhh My God !!

किती Herat Touching Poem आहे ही.

Keep It Up.

पुढच्या Poem साठी खुप खुप Wishes.

जय - गणेश's picture

16 Jun 2011 - 1:40 pm | जय - गणेश

एकदम फालतु

आत्मशून्य's picture

17 Jun 2011 - 4:41 am | आत्मशून्य

चार चांद धारण करू शकेल असं काव्य..... मंत्रमूग्ध करून सोडलं क्षणभर....

शिल्पा ब's picture

17 Jun 2011 - 5:22 am | शिल्पा ब

अग्गोबाई!!

पिवळा डांबिस's picture

17 Jun 2011 - 10:15 am | पिवळा डांबिस

किती पोटतिडीकीने लिहिलंय त्यांनी!!!
तुम्हाला मेलं काळीजच नाही!!!!
;(
बाकी शिल्पा ब च्या जोडीला प्रिया ब आलेल्या बघून ड्वॉळे पानावले!!!!
काट्याने काटा निघावा तर तो असा!!!!!
:)

बाकी प्रियाताई,
इस्ट कोस्ट वर रहाणं चांगलं की वेस्ट कोस्टवर हो? आणि मग मिडवेष्टातल्यांचं काय?

शिल्पा ब's picture

17 Jun 2011 - 11:03 am | शिल्पा ब

अर्र्र्र...म्हणजे आता आम्ही काटा का? आँ!!

टारझन's picture

17 Jun 2011 - 11:07 am | टारझन

काँटा लगा ... चिकिटाऊट ... आह्..आआह.... कमॉन यु फॉर्डी पीपल .. आह आह !

- रुदाली बिडीवाला

दैत्य's picture

17 Jun 2011 - 5:22 am | दैत्य

प्रिया ब,
मला आवडली कविता....

जे लोक अमेरिकेच्या यु.एस. मध्ये आहेत त्यांना समजेल नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे ते!...

कविता उत्तमच आहे. पण असले खूप खूप वाचनात येत असते आणि तोच एक प्रश्न येतो,अरे एवढे गहिवर येतात तर जाता कशाला?

कशाला मर्सिडिजच्या आणि वेस्ट कोस्टच्या चर्चा करता,जर दडपण होतंय तर?

अक्कलहुषारीने जाता ना?

समजा चुकून गेलात तर इतका त्रास सोसून राह्ता कशाला?

कर्जबिर्ज असले तर तेवढे फेडून निघा ना.

Please think honestly, खरं तर तुम्ही समृद्धीसाठी गेलात ना?,

आता रहा ना मजेत.

This is not for you personally but for the mentality behind all such US settled desi sentimental poems.

आत्मशून्य's picture

17 Jun 2011 - 7:49 am | आत्मशून्य

अहो गवी, ते त्यांचा त्रास सांगत आहेत असा काही समज कवीता वाचून करून घेतलात की काय?

तोच एक प्रश्न येतो,अरे एवढे गहिवर येतात तर जाता कशाला?

गविसाहेब, परदेशात गेलेले सर्वजण तिन्ही त्रिकाळ गहिवरतच असतात असं का वाटतं ब्वा तुम्हाला? कधीतरी आईबापांना मुलांची आठवण येऊन गहिवरून येवू नये की काय?

कधीतरी आईबापांना मुलांची आठवण येऊन गहिवरून येवू नये की काय?

क्या बात.. दैत्यजी. पोस्ट आणि माझा प्रतिसाद वाचा..

तुम्हाला माहीत आहे मी नेमकं काय म्हणतोय आणि कोणाच्या गहिवराविषयी बोलतोय.. तो आईबापांच्या बाजूचा गहिवर नक्कीच उल्लेखलेला नाहीये मी..

परदेशातल्या सर्वांवरच उठसूट छद्मी ताशेरे ओढण्याचा कसलाच उद्देश नाही आणि तसा दिसतही नाहीये..कारण तसं काही कारणच नाही.

.परदेशात गेलेले सर्वजण तिन्ही त्रिकाळ गहिवरतच असतात असं का वाटतं ब्वा तुम्हाला?

हे तर सर्वात भन्नाट.. यातला शब्दन शब्द तुमचा आहे. "सर्वजण" , "तिन्ही त्रिकाळ" हे सर्व जनरलायझेशन कुठेशी दिसलं? या एका कवितेवर आणि अशाच इतर कवितांचा संदर्भ घेऊन फक्त या पोस्टबाबत प्रतिक्रिया आहे.

गवि, तुम्हीसुदद्धा गैरसमज करून घेऊ नका..... उगाच वाक्यावाक्यावर चिरफाड करण्याचा माझा हेतू नाही....माझ्या म्हणण्याचा उद्देश हाच होता की, कोणाला अस 'गहिवर' वगैरे येत असेल आणि ती भावना कितीही वेळा इतरांनी मांडून झाली असेल तरीही invalid होत नाही....(...for the lack of better word) ....

तुमच्याच शब्दांत,Please think honestly....
ही खालची वाक्यं कोणाला तरी छद्मी वाटू शकतात...

कशाला मर्सिडिजच्या आणि वेस्ट कोस्टच्या चर्चा करता,जर दडपण होतंय तर?
अक्कलहुषारीने जाता ना?
समजा चुकून गेलात तर इतका त्रास सोसून राह्ता कशाला?

नगरीनिरंजन's picture

18 Jun 2011 - 6:54 am | नगरीनिरंजन

मर्मावर बोट!
आजकाल फ्याशनच आहे तशी. मध्यंतरी मित्र आता कट्ट्यावर भेटत नाहीत, सगळे फेसबुकवरून फक्त बोलतात वगैरे रडणारी कविता फेसबुकावरच टाकली होती कोणी तरी. बहुतेकांचा नॉस्टेल्जिया म्हणजे आत्ताचं वाईट आणि तेव्हाचं किती चांगलं असा असतो. शुद्ध स्मरणरंजन करणारे फार कमी असतात.

परिकथेतील राजकुमार's picture

18 Jun 2011 - 12:27 pm | परिकथेतील राजकुमार

आमच्या एका हिरव्या मित्रानी मध्ये स्कॉच ढोसता ढोसता चेपु वरती 'मिसिंग स्वारगेट टि स्टॉल' असा स्टेटस टाकला होता. मग त्याला झकास 'पंचारती' ओवाळल्यावर तो गप्प झाला.

नरेशकुमार's picture

17 Jun 2011 - 7:57 am | नरेशकुमार

ऑनसायीट ला लाँग टर्म जायचे नाही.
सहा सहा महिन्याच्या ट्रिपा मारायच्या.
पैसे बचत, घर-दार सांभाळून, हिडने फिरने सगळे होते.
कविता ठिक आहे. असे अदुगर लई वाच्लेलं आहे.

मराठी_माणूस's picture

17 Jun 2011 - 10:26 am | मराठी_माणूस

स्वतःच्या पायावर धोंडा पाडुन घेउन मग हा हु करत बसायचे

वेताळ's picture

17 Jun 2011 - 11:21 am | वेताळ

भारतियाच्या मनातील स्पंदने कवियत्रीने अगदी समर्पक शब्दात मांडली आहेत्.अमेरिकेत गेल्यानंतर होणारी ससेहोलपट,तटंपुज्यापगारात हे करु का ते करु अशी होणारी होलपट अगदी व्यवस्थित दाखवली आहे. ही कविता आधुनिक मराठीत एक मैलाचा दगड ठरेल.अश्याच कविता पुढेही वाचण्यास देव आम्हाला शक्ती देवो.

सोम्यागोम्या's picture

17 Jun 2011 - 7:50 pm | सोम्यागोम्या

सुंदर कविता. अनिवासिंच्या भावना छान मांडल्या आहेत. बदल्ला मधले डबल ल काळ खरोखरच बदलला आहे हे अधोरेखित करते. कवितेतील सोड आणि load च्या यमकांनी एकाच भाषेच्या मर्यादित छायेत न राहता नव कविंना भाषेचे सीमोल्लंघन करुन असंख्य यमकांची कवाडे उघडी करुन दिली आहेत. चर्चा व खर्च हे यमक मनाला विशेष आवडून गेले. लिहीत रहा. पु.क.शु.

@दैत्य ...
विषय खूप मोठा आहे.बरेच स्पष्टीकरण देता येईल पण सध्या वादासाठी वाद असा गैरसमज होण्यापेक्षा थांबतो.

प्राथमिकता माफ़ी मागण्याला आहे. त्यांची माफ़ी,ज्यांना काही वाक्ये बोचली असतील.संदर्भ सोडून वाचू नये ही विनंती.