"हजारो वर्षापुर्वी आपण झुंडीत राहात होतो. काही झुंडीत सशक्तांनी अशक्तांना आधार देणे काटेकोरपणे सांभाळले जायचे. आमच्यात हा नियम आजही पाळला जातो."
तो बोलत होता.
मी ऐकत होतो.
जे काही थोडेसे 'मी' पण होते ते पेटलेल्या कापराप्रमाणे वितळत होते.
ना सु:ख ना दु:ख सिर्फ मैं
'मी' पण नसलेला मैं
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
निलकांत ची आतुरतेने वाट बघत होतो.
त्याच्या धाडसी निर्णयाबद्दल त्याचे खुप कौतुक करायचे होते.
आणि इतक्यात तो आला.
बरोबर दोन पोर पण होती.
निलकांतसाठी राखुन ठेवलेला वेळ खातो की काय असा प्रश्न उभा राहीला.
काहीही न बोलता त्याने मार्क शीट्स हातावर ठेवल्या.
मार्क बघुन मी म्हणालो, "मुंबई, बहुदा जेजे."
पोरांनी लगेच हाय फाय केले.
पाया पडली.
"चला चार लाख वाचले" तो
का रे बाबा. काही आर्थिक अड्चण आहे का. मला सांग मी बघतो.
तो हसला.
त्याने पोरांना बाहेर पिटाळले.
"तुमच्यावरचे आहे का कोणी हे मिसळ्पाववरचे आर्टीकल मी वाचले सर. आमच्यात १२ वर्षावरच्या मुलांना गल्यावर बसवुन धंद्याचे बाळकडु पाजले जाते.
मेडीकल, इंजिनियरींग ला भिकेचे डोहाळे समजतात आमच्यातले बुजुर्ग्.पण काळ बदलतोय. आम्हाला पण बदलायला पाहीजे. तुमच्या भाषेत सांगायचे झाले तर 'हॉर्सेस फॉर कोर्सेस'. ह्या पोरांनी आमच्या पुर्ण ज्ञातीला विचार बदल करायला भाग पाडले आहे. तुम्ही ह्या वर्षी कधी येणार. हजारचा हॉल बुक करतो. आमच्या ज्ञातीच्या सर्व पोरांना पालकासकट बोलावतो. करु ३ तासाचा कार्यक्रम. सत्कार पण करतील. नाही म्हणु नका"
बघु. पण तु हसलास कशाला?
"वाचतोय मी ३ वर्ष तुमचे लेखन. ही साईट पण एक झुंडच ना. कितीजणांनी तुम्हाला बोलवल तुमच्यातल्यासाठी. मी सहा वेळेला बोलवल. हा लेख ११०० जणांनी वाचला. किती नावे मिळाली तुम्हाला तुमच्यातली आतापर्यंत. ह्यातली कितीजण सशक्त आहेत. आमच्यात पण वाद असतात, पोकळ सुचना असतात, कडाक्याची भांडणे असतात, वन अप मन शिप असते. पण आमच्यातल्या अशक्तांना आधार द्यायचे मुळ कर्तव्य ह्या सर्व कारणानी कधीच मागे पडत नाही. शेवटी कम्युनिटी सर्वायवल चा प्रश्न आहे. सर्व वाचतो मी. इतर साईट पण वाचतो. माईंड सेट समजतो. धंद्याच्या सेटींग ला बरे असते. म्हणुनच गेल्या ३ वर्षात आठ नविन दुकाने टाकली सर. तुमचा विश्वास बसणार नाही.ह्या पोरांचा रिझल्ट लागताच मी नेट वर्किंग केले. ३ तासात ह्या मुलांच्या पोस्ट ग्रॅड पर्यंतचे पैसे गोळा झाले. येत्या सहा महीन्यात ह्या दोघांच्या हॉस्पिटल साठी प्लॉट बुकींग चे प्रपोजल टाकणार आहे. आणि ते होइल सुद्धा. ह्या क्षेत्रात नायक बनायचे ठरवले आहे मी. तुमच्यात हे होत नाही असे म्हणत नाही. पण प्रदेशातील असुन सुद्धा कृती त कमी पडतात. आपल्याच प्रदेशात आपणच पाहुणे होत आहोत हे माहीत असुन सुद्धा. आम्ही उपरे. पण कुणी गावातला होतकरु तरुण इथे धंदा करतो म्हणाला तर सर्व भेदभाव विसरुन त्याला दुकान थाटुन द्यायला एकत्र येतो. काय बिशाद आहे की तो दिलेले पैसे बुडवेल? एखाद दुसरे बुडवतात सुद्धा. पण म्हणुन त्याची चर्चा करुन कार्य थांबत नाही. उद्या फोन करतो. तुम्हाला किती नावे मिळाली ते सांगा. एखाद दुसरे मिळाले तरी नशीब समजा. तुम्हीच सांगा. नसतील का? नक्कीच आहेत. पण पुढाकार घ्यायला वेळ आहे का? तुमच्यातले तुमचा फुकट वापर करतात की नाही ते मला माहीत नाही.
पण मी नक्की करुन घेणार.
प्रतिक्रिया
16 Jun 2011 - 2:15 pm | मस्त कलंदर
काही समजलं, काही डोक्यावरून गेलं. यालाच क्रिप्टिक की कायसेसे म्हणत असावेत.
एक प्रश्नः हा लेख 'जे न देखे रवी' मध्ये का प्रकाशित केलाय?
16 Jun 2011 - 2:49 pm | चिंतामणी
असेच म्हणतो.
16 Jun 2011 - 4:13 pm | टारझन
असेच म्हंणजे नक्की कसे ? काईण्डली एलॅबोरेट ...
- वेरीफनी
बाकी कविता वाचली , नेहमीप्रमाणे भयंकर लिहीली आहे मास्तरांनी :) पण मास्तरांना प्रोत्साहन आहेच.
आधुन मधुन जुळ्या चिंबोर्या लिहीत चला .. वाचकांच्या तब्बेतीला बर्या असतात ;)
- जुळ्या लिंबोण्या
16 Jun 2011 - 2:54 pm | टारझन
एक वेगळीच कविता ,, धड्या सारखी लिहीलीये ..
16 Jun 2011 - 3:54 pm | रेवती
नीलकांत म्हणजे मिपाचा नीलकांत तुमच्याकडे दोन चांगले मार्कवाली मुलं घेऊन आला हे समजले.
कितीजणांनी तुम्हाला बोलवल तुमच्यातल्यासाठी
इथपासून पुढे फारसे समजले नाही.
16 Jun 2011 - 4:05 pm | परिकथेतील राजकुमार
गुर्जी द्या सोडून :)
झोपलेल्याला उठवता येते, झोपेचे सोंग घेतलेल्याला नाही.
आम्ही आपले अभिव्यक्तिस्वातंत्र्य, कॉकटेल्स, शिणिमे, जात-पात ह्यावर दंगा करण्यात मग्न आहोत. उगा आमच्या डॉक्याला शॉट लावु नका.
16 Jun 2011 - 5:57 pm | नगरीनिरंजन
सिन्सिअरली (माझ्याबाबतीत तरी) असेच आहे.
16 Jun 2011 - 4:36 pm | विनायक प्रभू
@ रेवती तो म्हणजे निलकांत नव्हे.
ज्या ज्ञातील शिक्षणाला फारसे महत्व नाही तीथे शिक्षण क्षेत्रात धडपडणारा एक कार्यकर्ता.
@ परा
ओक्के
16 Jun 2011 - 10:28 pm | रेवती
अच्छा!
हा नीलकांत 'तो नसल्याने डोक्यातला गोंधळ संपला आणि सगळी ष्टोरी लक्षात आली.
16 Jun 2011 - 5:52 pm | शेखर
एकदम पटले...
16 Jun 2011 - 9:20 pm | शैलेन्द्र
खुप छान विषय काढलात गुरुजी...
थोडाफार व्यवसाय मीही केला लहाण्पणापासुन, म्हणुन तुम्ही जे मांडलय ते खुप जवळुन पाहीलय..
५-६% वार्षिक व्याजाने कर्ज मिळत धंद्यासाठी...
धंदा टाकला की हक्काचे गिर्हाइक असतात सगळे समाजातले लोक..
कोणत्याही अडचणीत सगळे जातवाले समाज म्हणुन एकत्र येतात.. आणी तेही सगळे हेवेदावे शाबुत ठेवुन..
वरपासुन खालपर्यंत संबधांचे जाळे तयार असते.. नव्या मुलाने फक्त इमाने इतबारे उपयोग करुन घ्यायचा.
अगदी सामान्य वकुबाचे व सामान्य बुध्धीचे मुलही यामुले सहज यशस्वी होतात..
या सगळ्या व्यवस्थेचे अनेक दोषही आहेत पण त्याबद्दल नंतर कधीतरी..
16 Jun 2011 - 9:43 pm | अलख निरंजन
मास्तर तुम्हाला काय सांगायचे आहे ते नेमके लिहा ना.. तुम्ही कुणाला मदत केल्याचे अॅकनॉलेज करायचे आहे की मिपाकरांकडून मदतीची अपेक्षा आहे ते थेट मांडा. उगाच नाडी वाल्यांसारखे शेंडा बुडखा नसलेले हे लेखन करुन काय साध्य होते? हा लेख पूर्ण वाचल्यावर शेवटी "हे सर म्हणजे हैयो हैयेयो" असे येणार की काय असे वाटले.
त्यापेक्षा तुम्ही चालवलेल्या कार्याची व्यवस्थित माहिती द्या. त्याचा लोकांना कसा फायदा करुन घेता येइल हे सांगा. तुम्हाला मदतीची अपेक्षा असल्यास एखादा नॉन प्रॉफिट ट्रस्ट सुरु करा. ज्यांना मदत करायची इच्छा आहे त्यांनी काय पैसे तुमच्या बॅंक अकाउंटला ट्रान्सफर करणे अपेक्षीत आहे का? उगीच हे सो कॉल्ड क्रिप्टिक लिहून तुमचा आणि आमची वेळ कृपया वाया घालवू नका.
16 Jun 2011 - 10:20 pm | शैलेन्द्र
दादा, इतकही दुर्बोध नाही हो.. मलासुद्धा कळलं म्हणजे बघा..
लेखाचे सुरवातीचे दोन तिन वाक्य निट वाचलेत की विचारांची दिशा कळते..
"त्यापेक्षा तुम्ही चालवलेल्या कार्याची व्यवस्थित माहिती द्या. त्याचा लोकांना कसा फायदा करुन घेता येइल हे सांगा. तुम्हाला मदतीची अपेक्षा असल्यास एखादा नॉन प्रॉफिट ट्रस्ट सुरु करा. ज्यांना मदत करायची इच्छा आहे त्यांनी काय पैसे तुमच्या बॅंक अकाउंटला ट्रान्सफर करणे अपेक्षीत आहे का?"
गोम इथेच तर आहे.. मास्तर आपले असुनही आपण आपला "बाणा" दाखवतोय.. आणि इतर कुणितरी त्यांचा पुर्ण उपयोग करुन घेतयं..
"तुम्हाला किती नावे मिळाली ते सांगा. एखाद दुसरे मिळाले तरी नशीब समजा. तुम्हीच सांगा. नसतील का? नक्कीच आहेत. पण पुढाकार घ्यायला वेळ आहे का? तुमच्यातले तुमचा फुकट वापर करतात की नाही ते मला माहीत नाही.
पण मी नक्की करुन घेणार.""
हीच तर खंत आहे..
"उगीच हे सो कॉल्ड क्रिप्टिक लिहून तुमचा आणि आमची वेळ कृपया वाया घालवू नका."
मास्तरांनी आमंत्रण दिलेल नसाव असं वाटतय..
16 Jun 2011 - 9:44 pm | अलख निरंजन
मास्तर तुम्हाला काय सांगायचे आहे ते नेमके लिहा ना.. तुम्ही कुणाला मदत केल्याचे अॅकनॉलेज करायचे आहे की मिपाकरांकडून मदतीची अपेक्षा आहे ते थेट मांडा. उगाच नाडी वाल्यांसारखे शेंडा बुडखा नसलेले हे लेखन करुन काय साध्य होते? हा लेख पूर्ण वाचल्यावर शेवटी "हे सर म्हणजे हैयो हैयेयो" असे येणार की काय असे वाटले.
त्यापेक्षा तुम्ही चालवलेल्या कार्याची व्यवस्थित माहिती द्या. त्याचा लोकांना कसा फायदा करुन घेता येइल हे सांगा. तुम्हाला मदतीची अपेक्षा असल्यास एखादा नॉन प्रॉफिट ट्रस्ट सुरु करा. ज्यांना मदत करायची इच्छा आहे त्यांनी काय पैसे तुमच्या बॅंक अकाउंटला ट्रान्सफर करणे अपेक्षीत आहे का? उगीच हे सो कॉल्ड क्रिप्टिक लिहून तुमचा आणि आमची वेळ कृपया वाया घालवू नका.
17 Jun 2011 - 6:13 am | विनायक प्रभू
परा चा आहे का कोणी वाचा अनि शेट.
बघा होतो आहे का खुलासा?