कोल्हापुरी मिसळ

जासुश's picture
जासुश in पाककृती
13 Jun 2011 - 1:50 pm

पा कृ बनवण्याची पद्धत चकली ब्लॉग वर दिल्या प्रमाणेच केली आहे ..ती पुन्हा इथे कॉपी करून दिली आहे.
फक्त ह्या मिसळ मधे मी बटाटे घातले नाहीत..व सगळे खडे मसाले तेलात परतल्यावर त्यात कांदे,खोबरे व टोमॅटो परतून नंतर बारीक पेस्ट करून तेलावर पुन्हा परतली आहे.

ही आहे लिंक
http://chakali.blogspot.com/2008/01/kolhapuri-misal.html

१ वाटी मटकी
१ बटाटा
तळण्यासाठी तेल
१ कांदा
१ टोमॅटो
गरम मसाला
फरसाण
पोहे कुरमुर्याचा चिवडा
कोथिंबीर
लिंबू
ब्रेडचे स्लाईस
कट बनवण्यासाठी साहित्य :
३-४ लसूण पाकळ्या
१ इंच आले
२-३ मिरी
१ लहान काडी दालचिनी
२-३ लवंगा
१ तमालपत्र
१ चमचा जिरेपूड
१ चमचा धनेपूड
अर्धी वाटी खवलेला ओला नारळ
१ मध्यम कांदा
२ मध्यम टोमॅटो
४-५ लहान चमचे लाल तिखट
फोडणीसाठी तेल
आमसुल किंवा चिंच
मीठ

कृती:
१) मटकी १०-१२ तास कोमट पाण्यात भिजत घालावे. त्यात जर कडक मटकी आणि खडे असतील तर ते काढून टाकावे. सुती कपड्यात बांधून मोड काढावेत.
२) मटकीला मोड आले कि कट बनवून घ्यावा. त्याचवेळी मटकी कूकरमध्ये २ शिट्ट्या करून शिजवून घ्यावी.
३) कट बनवण्यासाठी लसूण पाकळ्या, आले, मिर्या, दालचिनी, लवंगा, तमालपत्र, जिरेपूड,धनेपूड मिक्सरवर जेवढे बारीक होईल तेवढे बारीक करून घ्यावे.
४) कढईत ४-५ चमचे तेल गरम करावे. त्यात मिक्सरमधून काढलेला मसाला घालून खमंग परतावा. मसाल्याचा छान गंध सुटला कि त्यात १ कांद्याच्या आणि २ टोमॅटोच्या मोठ्या फोडी घालून परतत रहावे. सर्वात शेवटी खवलेला नारळ घालून परतावा. मिश्रणाला तेल सुटले आणि कांदा शिजला कि गॅस बंद करून बाजूला काढून थंड करावे. मिश्रण थंड झाले कि त्यात १ भांडे पाणी घालून मिक्सरवर पातळ पेस्ट करून घ्यावी.
५) नंतर मटकीची उसळ बनवून घ्यावी. पातेल्यात २-३ चमचे तेल गरम करावे. त्यात मोहोरी, हिंग, हळद घालून शिजवलेली मटकी घालावी. थोडे पाणी घालावे, १-२ चमचा गरम मसाला घालावा. बारीक गॅसवर उसळ उकळत असताना दुसर्या गॅसवर लहान कढईत अगदी थोडे बटाट्याचे तुकडे तळण्यापुरते तेल गरम करावे (साधारण अर्धी वाटी). (बटाटे तळल्यावर ७-८ चमचे तेल उरले कि त्यातच कट बनवता येतो.)
६) १ बटाटा सोलून त्याचे लहान चौकोनी तुकडे करावे, आणि मध्यम आचेवर बटाटे व्यवस्थित तळून घ्यावे, कच्चे राहू देऊ नये. तळलेले बटाट्याचे तुकडे उसळीत टाकावेत. चवीपुरते मिठ घालावे.
७) लहान कढई खालचा गॅस बारीक करून उरलेल्या तेलात हळद, हिंग, ४-५ चमचे लाल तिखट घालून तयार केलेली मसाल्याची पातळ पेस्ट घालावी. मीठ घालावे. आंबटपणासाठी २-३ आमसुल किंवा थोडा चिंचेचा कोळ घालावा. आवश्यकतेनुसार पाणी घालून १ उकळी काढावी.
८) उसळ आणि कट तयार झाला कि कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्यावा.
९) नंतर डिशमध्ये १ डाव उसळ घालावी. त्यावर १ पळी कट घालावा. त्यावर चिवडा, फरसाण, कांदा, टोमॅटो घालावे. लिंबू पिळून तयार मिसळ स्लाईस ब्रेडबरोबर खावी.

टीप:
१) ओला नारळ उपलब्ध नसेल किसलेला सुका नारळसुद्धा वापरू शकतो.
२) ज्यांना तळलेले बटाटे नको असतील त्यांनी शिजवलेले बटाटे घातले तरी चालते. तळलेले बटाटे उसळीत फुटत नाहीत, शिजलेले बटाटे मिसळीत फुटून मिसळ घट्ट होऊ शकते.

प्रतिक्रिया

किसन शिंदे's picture

13 Jun 2011 - 2:20 pm | किसन शिंदे

या कोल्हापुरी मिसळीचे अनेकोनेक धन्यवाद ज्यामुळे मला मिसळ्पाव सारखं सुरेख संस्थळ मिळालं.

अवांतर : कोल्हापुरी मिसळीवर स्वाती राजेश यांची एक पाकक्रुती आधीच आलेली आहे.

स्वैर परी's picture

13 Jun 2011 - 2:21 pm | स्वैर परी

लईच झाक झालीये! :)
अवांतर : मिसळपाव बनवण्याची पाकृ शोधता शोधता आम्ही भरकटत या संकेतस्थळावर आलो आणि इथलेच होउन गेलो! :)

मालोजीराव's picture

13 Jun 2011 - 2:26 pm | मालोजीराव

+१
आम्हीपण !

स्वरालि's picture

13 Jun 2011 - 8:34 pm | स्वरालि

मी पण....भरकटत आले आणी इकडचीच झालेय.....

निवेदिता-ताई's picture

13 Jun 2011 - 10:36 pm | निवेदिता-ताई

मी ही........

बाकी मिसळ झकास झालेली दिसतिये...एक घास खाल्ला की ठसकाच लागला पाहिजे!!!!

मृत्युन्जय's picture

13 Jun 2011 - 2:23 pm | मृत्युन्जय

तर्री कातिल आहे.

वाहीदा's picture

13 Jun 2011 - 2:34 pm | वाहीदा

आता नाव सार्थक झाले !
मिसळ ही कोल्हापुरी ची असावी, तिखट , झणझणीत ! तोंडातून जाळ आला पाहीजे.
असो..फोटो पाहून लोकांच्या तोंडातून लाळ येईल हे नक्की

टारझन's picture

13 Jun 2011 - 2:35 pm | टारझन

पावसाळ्यात मिसळ खाऊ नये शक्यतो . अन्यथा वारंवार पाककृती करावी लागते.

- कापुश

अत्रुप्त आत्मा's picture

13 Jun 2011 - 5:39 pm | अत्रुप्त आत्मा

कोल्हापुरी ग्रेटच...पण खास तर्रीचा मजा अनुभवायचा असेल तर,पुण्यात मंगला थेटर बाहेर २ गाड्या लागतात...त्यातल्या टोपीवाल्याकाका कडची लई कडक असती...आमी जशे हित,तशेच तिथ बी असतो...

सानिकास्वप्निल's picture

13 Jun 2011 - 9:16 pm | सानिकास्वप्निल

एकदम झण्झणीत दिसतेय...मस्तच :)
ठाण्याच्या मामलेदार मिसळीची आठवण झाली बघा :)

स्वाती२'s picture

13 Jun 2011 - 10:18 pm | स्वाती२

तर्री एकदम मस्त!

कोल्हापुरवाले's picture

6 Dec 2012 - 5:17 pm | कोल्हापुरवाले

तर्री नहि ओ !!
मिसळ आणि त्याचा "कट" म्हणत्यात कोल्हापुरात

आत्मशून्य's picture

13 Jun 2011 - 10:35 pm | आत्मशून्य

.

कर्वे रोडला सीड इन्फोटेकच्या हापिसाबाहेर हेमंतकडे जाम भारी असते मिसळ, कधी आणि कोण कोण येताय बोला.
@ पराग, कधि जायचं मंगला समोर बोला.
कॉलिंग चिंतामणी काका, तुम्ही वैद्यांकडं घेउन जाणार होता आम्हाला. काय झालं ओ त्याचं ?

अत्रुप्त आत्मा's picture

14 Jun 2011 - 9:09 am | अत्रुप्त आत्मा

तुम्ही म्हणाल तेंव्हा...फक्त सकाळी ९च्या आत जाण्यात खरी मजा असते...

अभिज्ञ's picture

14 Jun 2011 - 2:31 am | अभिज्ञ

मिसळ खावी ती ठाण्यात मामलेदाराकडेच.
बाकी सगळ्या मिसळ बकवास असतात.

अभिज्ञ.

अतुल पाटील's picture

14 Jun 2011 - 7:43 pm | अतुल पाटील

आयला सहिच... कोल्हापुरातल दिस आटिवल की हो. फडतरे, चोरगे, राजा भाउ, सोलन्कि, रात्री ११ वाजेचे शिवाजी चौकातले म्हशी वाले सगळ सगळ आटिवल. लय भारी राव.

ह भ प's picture

6 Dec 2012 - 4:50 pm | ह भ प

मला ही रेसिपी कशी मिळेल बरं..
मिपाकरहो.. मय मदद माँग रहां हुं..
लिंका डकवा ना पलीज..

तोडाल पानी सुट्ल!! :

शिद's picture

6 Dec 2012 - 6:21 pm | शिद

आजचं ठाण्यात मामलेदार मध्ये मिसळ चापून आलोय...त्यावर मस्त थंडगार २ पेले ताक...आहाहाहा...!!!

ह भ प's picture

7 Dec 2012 - 10:07 am | ह भ प

मी आज सकाळी सकाळी माझ्यासारख्या आणखी चार जणांना घेउन 'काटा किर्र'ला मिसळ चेपुन आलोय.. सोबत मठ्ठा.. वॉऊ..

अविनाशकुलकर्णी's picture

7 Dec 2012 - 11:17 am | अविनाशकुलकर्णी

मिसळ खाल्ली कि तमोगुण वाढतो का?
असे वाचनात आले

विश्वनाथ मेहेंदळे's picture

8 Dec 2012 - 1:38 pm | विश्वनाथ मेहेंदळे

रिकामा वेळ बराच आहे तुमच्या कडे, असले काहीतरी वाचायला आणि मग इथे येऊन काड्या सारायला.

ज्यांचा तमोगुण वाढतो त्यांनी 'मिसळपाव' च्या वाटेला न गेलेले बरे !