परवा, माळ्यावरची पुस्तके काढतांना
धुळमाखली डायरी,२० वर्षापुर्वीची..
अचानक खजिना हाती
लागल्यासारखी सापडली
तशी लेखणी तर
तुला बहाल केली होती
डायरी फक्त माझी होती
कव्हर सुंदर आहे म्हणत म्हणत
अवघी डायरी तुच जिंकुन घेतलीस
...मी मात्र शाई..शाई वेचत राहिले!
डायरी माझी, लेखणी माझी,
माझा तु, माझं ..माझं ..सर्वकाही
तसं काही विशेष मागितलं नव्हतं मी
तुझ्याकडे, भावनांशिवाय!
वाटलं होतं तु भावनांनी रंगवशील!
...तुझ्या भावना लाख महाग
असतील रे
पण माझ्या शब्दांनी
एवढे स्वस्त व्हायला नको होते!
प्रतिक्रिया
25 May 2011 - 12:36 pm | टारझन
आहाहा ! काय सुंदर आहे मुक्तक .. कविता अगदी हृदयातुन शब्दांना वाट करुन दिल्यामुळे इतकी फ्लॉलेस झालिये की आर्या१२३ जी ... जवाब नहि तुम्हाला ..
कोणतं कडवं निवडु ,... न कोणतं सोडु ?
सगळी कविताच आवडलीये ..
एकदम साधा क्षण, पण ह्या क्षणाला तुम्ही अगदी चार ओळींत चक्क प्रत्यक्ष उभं केलंत. .
आणि शेवटचं कडवं तर एकदम वास्तवाचं दर्शन घडवणारा.. अशी वन टु वन कंपॅरिझन केवळ आपणच करु जाणोत !
एक्सलंट कविता .. अजुन येऊ द्या
25 May 2011 - 12:41 pm | गवि
सुंदर रसग्रहण.
:)
25 May 2011 - 4:30 pm | स्पा
टारु
26 May 2011 - 2:23 am | अरुण मनोहर
प्रतिक्रिया दिली नसती तर अन्याय झाला असता.
26 May 2011 - 4:59 am | नरेशकुमार
कोनावर ?
28 May 2011 - 6:30 am | गोगोल
कोणावर.
31 May 2011 - 11:32 pm | मेघवेडा
''कण्व्हर्स' इज ऑल्सो ट्रू या 'ण्याया'नुसार 'कोनावर' हेच बरोबर आहे. :)
25 May 2011 - 9:09 pm | मीली
..तुझ्या भावना लाख महाग
असतील रे
पण माझ्या शब्दांनी
एवढे स्वस्त व्हायला नको होते!
छानच लिहिले आहेस ग!
25 May 2011 - 9:24 pm | आनंदयात्री
छान आहे कविता. शिर्षक पण आवडले.
25 May 2011 - 9:27 pm | प्राजु
सुंदर!! :)
25 May 2011 - 10:09 pm | ajay wankhede
झक्कास मुक्तक्..खुपच आवडलं
प्रतिक्रिया दिली नसती तर अन्याय झाला असता.
---------------------------------------------------------------------------------
25 May 2011 - 11:52 pm | रामदास
असेच म्हणतो.
26 May 2011 - 3:09 am | धनंजय
छान.
शेवटल्या कडव्यातल्या सौद्यातली खोट फारच जिव्हारी लागल्यासारखी वाटते.
26 May 2011 - 11:31 am | प्यारे१
असेच म्हणतो.
म्हणूनच आपल्याला जी आवडते त्यापेक्षा आपण जिला आवडतो त्या व्यक्तिवर प्रेम करावे असे म्हणतात. ;)
26 May 2011 - 8:55 am | पंगा
कसे दिले?
26 May 2011 - 9:43 am | नरेशकुमार
कोनत्या मापाने पाहीजे ?
मंजे लीटर, किलो की मीटर.
.
.
लाट का माल, लाट का माल. सेल सेल सेल सेल, भव्य दिव्य सेल.
आता शब्द स्वस्त झाले म्हनल्यावर आता एका लेखावर एक फ्री मिळेल, नाही का !
26 May 2011 - 9:35 am | मदनबाण
सुंदर... :) आवडेश. :)
26 May 2011 - 12:12 pm | अमोल केळकर
मस्त :)
अमोल केळकर
26 May 2011 - 1:57 pm | गणेशा
ओळ अतिशय छान ..
कविता आनखिन खोल येवुद्या ..
लिहित रहा... वाचत आहे
26 May 2011 - 2:17 pm | स्वानन्द
आवडली.
30 May 2011 - 1:15 am | राघव
तशी पूर्ण कविताच नॉस्टॅल्जिक करतेय पण शेवटाचं कडवं आरपार छेदून जातंय!
छान रचना. खूप आवडली.
राघव
31 May 2011 - 2:44 pm | नन्दादीप
सुंदर.....
>>...तुझ्या भावना लाख महाग
असतील रे
पण माझ्या शब्दांनी
एवढे स्वस्त व्हायला नको होते!>>
हे खासच आवडले....
7 Jul 2017 - 2:11 am | सत्यजित...
तुझ्या भावना लाख महाग
असतील रे
पण माझ्या शब्दांनी
एवढे स्वस्त व्हायला नको होते!
क्या ब्बात है!
7 Jul 2017 - 4:05 am | वीणा३
खूपच छान, शेवटच्या ओळी अतिशय सुरेख आहेत