माझा काटेकोरांटीची फुलं हा कथासंग्रह नवता प्रकाशन या अग्रगण्य प्रकाशन संस्थेतर्फे पुढच्या महीन्यात प्रकाशीत होणार आहे. या कथासंग्रहातील कथा मिसळपाव वर गेल्या काही वर्षात आपण वाचल्या आहेतच. पुस्तकाचं मुखपृष्ठ बनवताना मुखपृष्ठकार किती मेहनत घेतात, त्याच्या मागे त्यांच्या काय संकल्पना असतात याचं दर्शन वाचकांना घडवण्यासाठी नवताच्यावतीने "काटेकोरांटीची फुलं" या कथासंग्रहासाठी बनवण्यात आलेली सर्व मुखपृष्ठ डिझाईन्स खास मिसळपावच्या सदस्यांना पहायला मिळणार आहेत. या मुखपृष्ठांमध्ये मिसळपावच्या वाचकांना जे डिझाईन सर्वाधिक भावेल तेच
डिझाईन पुस्तकाचं मुखपृष्ठ म्हणून वापरण्यात येईल. याशिवाय वाचकांच्या काही सूचना असल्यास त्यांचं स्वागतच आहे.मुखपृष्ठकार श्री. अतुल परांजपे यांनी बनवलेल्या मुखपृष्ठाच्या वेगळेपणाचा अंदाज रसिकांना नक्कीच येईल.
मिपाच्या सर्व सदस्यांनी हे नमुने बघून सूचना कराव्या .काही त्रुटी असतील तर त्या निदर्शनास आणून द्याव्यात.
पुस्तकाविषयी
नाव- काटेकोरांची फुलं
लेखक- रामदास
प्रकाशक- नवता
पृष्ठ संख्या- सुमारे १००
छापील किंमत -१२० रुपये
धन्यवाद.
प्रतिक्रिया
23 May 2011 - 12:07 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अभिनंदन.
पुढच्या महिन्यात नक्की कधी? जूनच्या पहिल्या आठवड्यात प्रत मिळणं शक्य आहे काय?
23 May 2011 - 12:12 pm | नगरीनिरंजन
हार्दिक अभिनंदन! आपले असे अनेक कथासंग्रह प्रसिद्ध होवोत आणि त्या सगळ्या कथा आम्हाला वाचायला मिळोत ही सदिच्छा!
मुखपृष्ठाची सगळीच डिझाईन्स आकर्षक असली तरी मला चौथे सगळ्यात जास्त आवडले.
(फक्त फूलं ऐवजी फुलं असावं).
23 May 2011 - 2:37 pm | स्वानन्द
चौथे आवडले.
23 May 2011 - 5:29 pm | सखी
चौथे आवडले.
मनापासुन अभिनंदन, पुस्तक संग्रही ठेवायला नक्कीच आवडेल.
24 May 2011 - 12:22 am | मी-सौरभ
काका अभिनंदन
४ क्रमांकाच डिझाईन मस्त वाटतय.
24 May 2011 - 4:35 pm | सन्जोप राव
असेच म्हणतो
23 May 2011 - 12:13 pm | निवेदिता-ताई
अभिनंदन...अभिनंदन...
चार नंबरचे मुखपृष्ठ योग्य आहे ...असे माझे मत आहे..
अजुन जाणकारांची मते घ्याच!!!!!!
23 May 2011 - 12:26 pm | टारझन
चार नंबरचे चित्र छान वाटते , तसेच त्या हायफन चं काय काम ? रामदास ल्ह्यावे नुसते :)
23 May 2011 - 6:55 pm | प्रभो
चार नंबरचे चित्र छान वाटते ...
रामदासकाका, अभिनंदन!!!
23 May 2011 - 12:24 pm | श्रावण मोडक
२ किंवा ३.
मुद्रितशोधन झालेलं नाहीये.
निमित्त आहे म्हणून विचारतो - अपुऱ्या कथांचे काय? कधी पूर्ण होणार आहेत त्या? लवकर करा.
23 May 2011 - 12:32 pm | विसुनाना
कथासंग्रह सुप्रसिद्ध व्हावा ही शुभेच्छा. मी नक्कीच संग्रहात ठेवीन.
वरून चौथे मुखपृष्ठ आवडले.
मुखपृष्ठाबाबत काही शंका (लेखकाने त्यांचा विचार केलेला असल्यास त्या बाजूला साराव्यात. योग्य वाटल्यास विचार व्हावा.)
१. फूलं हा शब्द बरोबर आहे की फुलं हा शब्द?
२. ~रामदास अथवा -रामदास असे न लिहीता केवळ 'रामदास' असे का लिहीले नाही?
23 May 2011 - 12:19 pm | सुहास..
अभिनंदन रामदास काका !!
चारी नापसंत !! कॅची वाटत नाही :( (अर्थात हे वैयक्तीक मत )
23 May 2011 - 12:33 pm | सहज
चारी नापसंत !!
23 May 2011 - 12:21 pm | मुलूखावेगळी
अभिनंदन
कविता जर जास्त करुण असतील तर ४ घ्या.
किन्वा २ छान आहे.
23 May 2011 - 1:44 pm | सोत्रि
कथासंग्रहात फक्त कथाच असतात असा माझा समज होता? कविताही असतात काय?
23 May 2011 - 2:05 pm | मुलूखावेगळी
मी कविता संग्रह वाचले. :(
23 May 2011 - 12:45 pm | विलासराव
मला ३ व ४ आवडले.
अभिनंदन...!!!!!!!!!!!!
23 May 2011 - 12:46 pm | विजुभाऊ
क्रमांक ४
23 May 2011 - 12:46 pm | अमोल केळकर
शेवटचे मुखपृष्ठ आवडले
अभिनंदन
अमोल केळकर
( एक प्रेमळ सुचना --शक्यतो प्रकाशन बुधाच्या नक्षत्रावर करा, म्हणजे पुढे अनेक वेळा असा योग येईल )
23 May 2011 - 12:49 pm | खादाड अमिता
अभिनंदन !!
आपण ३ नंबर ला मत देणार.
23 May 2011 - 12:57 pm | अमोल खरे
माझेही तेच मत. ३ नंबर.........तुमच्या कथेत थोडा करुणपणा असतो. ब्लॅक बॅकग्राऊंड जास्त चांगली दिसेल.
23 May 2011 - 5:58 pm | माझीही शॅम्पेन
+२
४ साठी उगाच काटे-कोरान्टी म्हटल की कांपौंडची तर कशाला पाहिजे !
३ - संपूर्ण काळ्या बॅकग्राउंड वर पिवळी फूल छान वाटतात आहे !!!
अवांतर - मुखप्रुस्ठ कसाही असेल तरी आतल्या कविता छान हव्यात !!! (शुभेच्छा)
23 May 2011 - 6:08 pm | मुलूखावेगळी
हे वाचले नाहीस काय?
कविता म्हनु नकोस. पुन्हा १ दा टपली मिळेल ना.
23 May 2011 - 12:59 pm | RUPALI POYEKAR
जास्तीची मेजॉरीटी --------------- नंबर ४ फोटो
23 May 2011 - 1:20 pm | दत्ता काळे
तिसरे आवडले.
23 May 2011 - 1:25 pm | मृत्युन्जय
मला तरी दुसरे आवडले. मुखपृष्ठ शक्यतो उजळ रंगाचे करा. काळा रंग आणि काट्यांचे चित्र शक्यतो टाळाच. तुमची काटेकोरांटीची फुले अप्रतिम कथा आवडली होतीच. त्या कथेच्या अनुषंगाने उजळ रंगच उठुन दिसेच. शेवटचे चित्र तर शक्यतो टाळाच.
23 May 2011 - 1:26 pm | वपाडाव
४ पैकी मत द्यायचे आहे म्हणुन चौथे...
अन्यथा विशेष वाटत नाही...
अशीच अनेक पुस्तके प्रकाशित होवोत...
हीच सदिच्छा / ई. प्रा.
23 May 2011 - 1:31 pm | प्रचेतस
३ रे ला मत दिले आहे.
23 May 2011 - 1:52 pm | सोत्रि
सर्वप्रथम रामदासजी अभिनंदन.
क्रमांक 1 वर जर क्रमांक 4 चे काटेरी झाड/झुडूप आले तर ते मुखपृष्ठ मला आवडेल.
बाकी कथासंग्रहाच्या प्रकाशनाच्या प्रतीक्षेत...
- सोकाजी
23 May 2011 - 10:54 pm | मितभाषी
पहिले चित्र कॅची आहे. फक्त त्यात बॅकग्राऊंडला काटेरी झुडुप टाकता आले तर बघा.
माझ्या आवडत्या लेखकांपैकी श्री रामदास यांच्या कथा मिपावर नेहमीच वाचत आलो आहे. हा कथासंग्रह नक्कीच विकत घेणार.
23 May 2011 - 1:54 pm | सख्या
तिसरे आवडले
23 May 2011 - 1:55 pm | चिगो
सर्वप्रथम आपले मनःपुर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा... आपल्याला साहीत्यक्षेत्रात अमाप यश लाभो ही देवापाशी प्रार्थना...
आता मुखपृष्ठाबद्दल..
पहीलं थोडं गिचमिड वाटतंय, आणि रंगही डोळ्यात जाणारा, जास्त ब्राईट आहे.
दुसरं चांगलं आहे पण काटेकोरांटीचा रंग पकडलेला नाही..
तिसरं मला सगळ्यात जास्त आवडलं.. कारण रंग जवळपास त्या फुलांसारखाच आहे, आणि उठूनही दिसतोय..
(फुलांच्या डिझाईनच्या जस्ट मागे असलेला थेंब कशासाठी? काटेकोरांटीच्या फुलात, देठात अगदी छोटासा मधाचा थेंब असतो म्हणुन तर नव्हे? )
चौथंही छान आहे..
.... माझं मत मात्र ३ नंबरला...
23 May 2011 - 2:05 pm | खुसपट
अभिनंदन !! प्रकाशन केव्हा आहे? त्याला हजर राहण्यास आवडेल.आपले लिखाण वाचणे हा एक सुखद अनुभव असतो.पुस्तक आल्यावर वाचणारच.
खुसपट(राव)
23 May 2011 - 2:45 pm | विश्वनाथ मेहेंदळे
मला चौथे नाही आवडले. त्यात थोडीशी गूढ छटा वाटली. मतकरींच्या "गहिरे पाणी" ची आठवण झाली.
उरलेल्या तिघांत दुसरे सर्वात जास्त आवडले.
23 May 2011 - 3:32 pm | गणेशा
मुखपृष्ट डिझाईन्स दिसत नाहियेत मला..
अभिनंदन
23 May 2011 - 6:19 pm | वपाडाव
ह्ये एका दमात वाचले अन धारातिर्थी पडलो....
डोळ्यांच्या दवाखान्यात जाउन या एकदा...
23 May 2011 - 3:43 pm | नारयन लेले
मनःपुर्वक अभिनंदन !
आशीच तुमची पुस्तके प्रकाशित होओत हिच मनोकामना.
माझ्या मते दुसरे आथवा चौथे आवडले, तसेच "फूले ऐवजी फुले आसावे"
विनित
23 May 2011 - 3:48 pm | प्रभाकर पेठकर
श्री. रामदास ह्यांचे हार्दीक अभिनंदन. प्रकाशन समारंभ कधी आणि कुठे आहे?
मुखपृष्ठ क्रमांक ४ आवडले. मात्र त्यावरील चित्रनक्षी मुखपृष्ठाच्या उजव्या बाजूस (बाकी ३ मुखपृष्ठ नक्षींप्रमाणे) जास्त चांगली वाटेल असे वाटते. धन्यवाद.
23 May 2011 - 4:34 pm | प्रकाश घाटपांडे
क्रमांक ४ चे मुखपृष्ठ आवडले.
23 May 2011 - 5:13 pm | सुवर्णमयी
रामदास,
तुमचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीला मनःपूर्वक शुभेच्छा.
( २, ४ मुखपृष्ट आवडले.)
सोनाली
23 May 2011 - 5:53 pm | नरेशकुमार
मला एक पुस्तक फ्री देनार असाल तरच सांगतो.
.
.
मिपावाल्यांना काय डिस्काउंट वगेरे काय हाय का ?
23 May 2011 - 6:19 pm | वपाडाव
असल्या लोकांना १२०/- ऐवजी १३०/- पुस्तक देण्यात यावे अशी विनंती...
23 May 2011 - 6:26 pm | नरेशकुमार
घोर अप्मान !
लवकरच स्क्रु.... आपलं स्कोर सेटल केल्या जाईल
II मीळे त्रुप्ती खाउन भात वरन, करील जो शिकरन दुध आनि केळांचे II
23 May 2011 - 7:07 pm | विश्वनाथ मेहेंदळे
धमकीआझम झालात आजकाल. छान छान.
पण जरा सांभाळून, कुणाकडे कुणाच्या कुंडल्या असतील ते सांगता येत नाही.
वपाडावशी अंशत: सहमत आहे. (१३० नाही कमीत कमी २४० करावे.)
23 May 2011 - 7:17 pm | नरेशकुमार
प्रेमात सगळं काही माफ असतं ना वो काका.
प्रेमाने काय धमक्या पन द्यायच्या नाय का आमी.
दोन चार घटका येने हसने खेळने यापलीकडे आमचा काय हो गुन्हा ?
24 May 2011 - 2:11 pm | विश्वनाथ मेहेंदळे
>>प्रेमात सगळं काही माफ असतं ना वो काका.प्रेमाने काय धमक्या पन द्यायच्या नाय का आमी.
द्या ना. एक सोडून दहा द्या. मी कुठे आक्षेप घेतला?
>>दोन चार घटका येने हसने खेळने यापलीकडे आमचा काय हो गुन्हा ?
छे छे, मी कुठे म्हटले तुम्ही गुन्हा केलात म्हणून? मी फक्त एक शक्यता लक्षात आणून दिली ;-)
असो, अवांतर होते आहे. बाकी बोलायचे असेल तर खव/व्यनी आहेतच.
23 May 2011 - 7:10 pm | प्रास
आधी हार्दिक अभिनंदन!
कथासंग्रह नक्कीच 'विकत' घेऊन वाचेन. ;-)
बाकी मुखपृष्ठाबद्दल......
१. वरती म्हण्टल्याप्रमाणे नांव- 'काटेकोरांटीची फुलं' घ्यावं.
२. नावात कोराण्टी आणि मुखपृष्ठात कोराण्टीची फुलं कुठेच नाहीत, बहुत नाइन्साफी हय, काका! तेव्हा बॅकग्राऊण्डला का असेना कोराण्टीची फुलं घ्या. ही फुलं छोटीशी असतात पण दिसायला फारच सुंदर असतात
कोराण्टीच्या तीन जातींच्या फुलांच्या छायाचित्रांचे गूगल सर्चचे दुवे -
अ. पिवळी कोराण्टी (पीत सैरेयक)
http://www.google.co.in/search?q=barleria+prionitis&hl=en&prmd=ivns&tbm=...
आ. नीळी कोराण्टी (नील सैरेयक)
http://www.google.co.in/search?q=barleria+strigosa&hl=en&prmd=ivns&tbm=i...
इ. लाल (नीळसरपणाकडेच झुकणारी, जांभळी दिसणारी) कोराण्टी (रक्त सैरेयक)
http://www.google.co.in/search?q=barleria+cristata&hl=en&prmd=ivns&tbm=i...
हार्दिक शुभेच्छांसह,
आपला फ्यान :-)
23 May 2011 - 8:25 pm | प्रास
काय आहे,
मुखपृष्ठकार ते बनवण्यासाठी नक्कीच (ढोर) मेहनत घेत असेल पण काटेकोरांटी वनस्पती मूळ कशी दिसते हे बघण्याचा त्याने शून्य अभ्यास केलाय असं वाटल्यामुळे मी हा दुसरा प्रतिसाद देत आहे. अभ्यासाशिवाय केलेली गद्धे-मजुरी मूर्खपणा आहे असं मला वाटतं. कलेला अभ्यास हवाच!
कोरांटी किंवा सैरेयक हे एक क्षुप अर्थात झुडुप आहे. या नावाच्या कथासंग्रहाच्या मुखपृष्ठावर ४थ्या डिझाईनमध्ये बॅकग्राऊण्डला जे दिसतंय तो चक्क वृक्ष आहे. कितीही आवडलं तरी ते डिझाईन ठेवणं हे 'कल्पना-दारीद्र्य' याशिवाय 'अकलेचे दिवाळे' या दोन्ही विभागात जाईल आणि पर्यायाने या सगळ्याचा अंगुलिनिर्देश तुमच्यावरच येईल.
तसं होऊ नये म्हणून हा प्रतिसाद-प्रपंच. तेव्हा नवे डिझाईन बनवायला द्या असं आग्रही मागणं आहे.
बाकी इतर माहितीसाठी खरडवही खुली आहेच.
तुमचा फ्यान :-)
23 May 2011 - 8:16 pm | तिमा
प्रथमतः अभिनंदन.
'प्रास' यांच्याशी सहमत. या चारांतले कुठलेच डिझाईन घेऊ नका.
23 May 2011 - 8:18 pm | शाहरुख
अभिनंदन !!
23 May 2011 - 8:18 pm | आनंदयात्री
अभिनंदन काका.
23 May 2011 - 8:21 pm | धनंजय
हार्दिक अभिनंदन, ४ला मत
23 May 2011 - 8:21 pm | विकास
अभिनंदन!
मला चौथे आवडले. पुस्तक विकत घेऊन वाचेन! :-)
23 May 2011 - 8:24 pm | रेवती
अभिनंदन रामदास!
दुसरे मुखपृष्ठ कथेचा वाचकाच्या मनाला होणारा त्रास कमी करते.......तेच बरे असे वाटते.
पहिले व तिसरे नाही आवडले.
चौथे मात्र कथेशी साधर्म्य दाखवणारे आहे. त्रासदायकही आहे.
फुले उजवीकडे न्यावी लागतील काय?
डावीकडची फुले पटत नाहीत.
23 May 2011 - 8:39 pm | चतुरंग
कोणतेच फारसे भावले नाही. परंतु त्यातल्यात्यात तिसरं ठीक आहे.
बदल -
१ - पुस्तकाचं नाव असं हवं - काटेकोरांटीची फुलं - 'फु' र्हस्व हवा.
२ - काटेकोरांटी ही वेल नसून झुडूप आहे त्यामुळे फुलांची देठं सरळ ठेवावीत व लांबीला आता आहेत त्याच्या ७५ टक्के ठेवावीत.
३ - एका ओळीत बरी वाटत नाही जरा खालीवर असावीत फुलं.
४ - लेखकाच्या नावाआधी रेघ नसावी फक्त 'रामदास'
५ - आणि लेखकाचे नाव हे शीर्षकाच्या नावाखाली उजव्याबाजूस फुलं या शब्दाखाली यावे.
६ - पुस्तकाचे आणि लेखकाचे नाव या दोन्हीवर शीर्षकरेषा नसतील तर कसे दिसेल?
पूर्णतः वेगळे मुखपृष्ठ शक्य असेल तर वरती प्रास यांनी म्हटल्याप्रमाणे पिवळ्या काटेकोरांटीचा आभास होईल अशा प्रकारे फुलं काढता आली तर उत्तम. त्यावेळी मोठी फिकट फुलं ब्याकग्राउंडला ठेवून पुस्तकाचे आणि लेखकाचे नाव त्यावर मोठे येईल असे बघता आले तर चांगले दिसेल असे वाटते.
-चतुरंग
23 May 2011 - 9:48 pm | पैसा
अगदी हेच म्हणते.
चित्रांबद्दल बोलायचं तर फक्त एवढीच चित्रं निवडायला उपलब्ध आहेत का? तर त्यातलं चौथं.
24 May 2011 - 1:14 am | चित्रा
चतुरंग यांच्या सुचवण्यांना +१.
रामदासांचे अभिनंदन.
28 May 2011 - 6:31 am | गोगोल
सुचना
30 May 2011 - 8:57 pm | स्वाती दिनेश
प्रथमतः कथासंग्रहाकरता अभिनंदन!
प्रकाशन समारंभ केव्हा आहे? पुस्तक तर नक्कीच घेणार आणि तुम्हाला भेटून त्यावर तुमची सही सुध्दा घेणार!
चतुरंगच्या सुचवण्या आवडल्या.
मात्र अक्षरांवर शीर्ष रेषा हवी असे वाटते.
स्वाती
23 May 2011 - 9:11 pm | निमिष ध.
प्रथमतः अभिनंदन रामदास काका !
मुखपृष्ठाबद्दल प्रास यांचा प्रतिसाद बरोबर वाटतो. पण जर ४ पैकी १ निवडायचे असेल तर क्रमांक ३.
चौथे एखाद्या गूढ कथासंग्रहाला उत्तम असेल.
23 May 2011 - 9:26 pm | देवदत्त
अभिनंदन..
मुखपृष्ठ क्रमांक ४ :)
23 May 2011 - 9:49 pm | कौशी
माझ्यामते
३ रे मुखपृष्ठ बरे वाटते..
23 May 2011 - 9:55 pm | पिंगू
रामदासकाका अभिनंदन..
मुखपृष्ठासाठी चित्र कुठलेही निवडा. आपल्याला तर आतील मालाशी मतलब आहे.
- पिंगू
23 May 2011 - 9:58 pm | ५० फक्त
अभिनंदन काका आणि प्रास यांच्याशी सहमत, माझे लग्नानंतरचे मखमली दिवस बायको बरोबर घराच्या मागं काटेकोरांटीची फुलं वेचुनच सुरु व्हायचे.
23 May 2011 - 10:41 pm | गोगोल
खूप मोठी अॅचिव्हमेंट!!
बाकी चौथे मुखपृष्ठ त्यातल्या त्यात बरे वाटते. त्यात अजून काहीतरी आशादायी सिंबॉल नाही का इन्क्लुड करता येणार?
23 May 2011 - 10:48 pm | लिखाळ
वा !
छान बातमी.
३रे चित्र आवडले. फुले मधला फु र्हस्व असावा.
कथासंग्रह वाचण्यास उत्सुक आहे :)
अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा !!
25 May 2011 - 4:54 am | प्राजु
हेच म्हणते.
खूप खूप अभिनंदन!
मला ४ थे आवडले.
23 May 2011 - 11:14 pm | राजेश घासकडवी
चौथं चित्र आवडलं, पण त्यातला प्रत्यक्ष फोटो थोडा प्रोसेस केला तर बरं होईल. म्हणजे आत्ता तो पूर्णपणे धूसर केलेला आहे. त्याऐवजी वरच्या भागात अधिक प्रकाशमान व हळुहळू खाली येईल तसा अंधारमय करत गेलं तर परिणाम चांगला होईल असं वाटतं. संग्रहाचं व लेखकाचं नाव त्यायोगे जवळपास पूर्ण काळ्या पार्श्वभूमीवर येईल व उठून दिसेल.
तसंच फोटोमध्ये एक पांढऱ्या आकाशाचा वलयसदृश आकार तयार झालेला आहे. तो आवडला. तो थोडा वर उचलता आला, तर पिवळी फुलं, कथासंग्रहाचं नाव, व लेखकाचं नाव यांना चांगला फ्रेम करेल.
सर्वच मुखपृष्ठांवर नाव लिहिण्याची पद्धत छापील वाटते, पिवळ्या फुलांच्या मुक्तहस्त शैलीशेजारी थोडी खटकते. हाताने लिहिलं तर उत्तम.
23 May 2011 - 11:30 pm | विदेश
चौथे चित्र जास्त भावते.
"काटेकोरांटीची फूलं " अशुद्ध ; " काटेकोरांटीची फुलं " असे पाहिजे.
कथासंग्रह प्रकाशनासाठी मनापासून शुभेच्छा.
अभिनंदन .
23 May 2011 - 11:37 pm | पिवळा डांबिस
ही तर फारच चांगली बातमी दिलीत!!!
खूप आनंद आणि अभिमान वाटला...
मुखपृष्ठाबद्दल म्हणाल तर या चारांमध्ये मला ४थं आवडलं...
काटे दिसताहेत त्यात, फुलं रंगाने आणि आकाराने कोरांटीसारखी करता येतात का ते बघा विचारून चित्रकाराला...
तसंच फोटोमध्ये एक पांढऱ्या आकाशाचा वलयसदृश आकार तयार झालेला आहे. तो आवडला. तो थोडा वर उचलता आला, तर पिवळी फुलं, कथासंग्रहाचं नाव, व लेखकाचं नाव यांना चांगला फ्रेम करेल.
गुर्जींशी सहमत.
पुनश्च अभिनंदन!
24 May 2011 - 12:05 am | कवितानागेश
चौथे चित्र चांगले वाटतंय.
पण त्यात पिवळ्याच्या जागी पांढरा रंग घेतला, आणि लालच्या जागी जरा फिकट पिवळा रंग घेतला तर चांगले दिसेल, असे मला आपले उगीचच वाटतंय!
- पट्टेरी माउ :)
24 May 2011 - 12:22 am | पाषाणभेद
काका, आपल्या येथेच एकसे बढकर एक कलाकार असतांना तुम्ही दुसरीकडचे डिझायीन कसे पास करत आहात? प्रास याने/हिने म्हटल्याप्रमाणे विचार करावा हि विनंती.
आपल्या अपत्याचे अन आपले अभिनंदन!
24 May 2011 - 2:08 am | नि३
अभिनंदन....
एकही आवडले नाही पण त्यातल्या त्यात ४ थे बरे वाटले....
24 May 2011 - 11:11 am | विनायक प्रभू
कुठलेही आवडले नाही.
पुस्तकातल्या वजनाला पेलणारे दुसरे काही तरी.
24 May 2011 - 11:11 am | विनायक प्रभू
कुठलेही आवडले नाही.
पुस्तकातल्या वजनाला पेलणारे दुसरे काही तरी.
24 May 2011 - 11:32 am | टुकुल
पुस्तक नक्की विकत घेवुन वाचेन, माझ मत ४ नंबर ला.
--टुकुल
24 May 2011 - 2:37 pm | आनंद
कुठलेही आवडले नाही.
एकाच डिझाइन च्या साड्या मध्ये ४ कलर दाखवल्या सारखे वाटतेय.
24 May 2011 - 4:45 pm | बिपिन कार्यकर्ते
चतुरंग आणि राजेश घासकडवी यांच्याशी सहमत!
24 May 2011 - 6:07 pm | स्मिता.
प्रथम रामदास काकांचे मनःपूर्वक अभिनंदन!
तसे तर एकही मुखपृष्ठ फारसे भावले नाही. पण या चार मधील तिसरे बरे वाटतेय.
बाकी चतुरंग भाऊजींच्या आणि प्रासच्या सुचनांचा विचार करून पुन्हा २-३ डिझाईन्स बनवून बघायला हरकत नाही.
25 May 2011 - 3:44 pm | आत्मशून्य
सर्वात वरचं म्हणजेच पहिलं मुखपृष्ठ त्यातल्यात्यात योग्य वाटतय, कारण जेव्हां कागदावर प्रींट होइल व काही काळ जाऊन जूनं होइल तेव्हां सूध्दा त्यातील रंग व डीजाइनच्या साधेपणामूळे त्याची आकर्षकता टीकून राहील असे वाटते. बाकी कथा जर डार्क शेड असणार्या जास्त असतील, म्हणजे दूखी: वा थोड्या वैचीत्र राखणार्या तर शेवटचे डीजाइन सूट होइल. फक्त ती जी पीवळी फूले आहेत ती काढून टाकावीत, म्हणजेच काटेरी झाडाचे चीत्र व त्यावर कवीतासंग्रहाचे व आपले नाव जसं व जीथं आहे तसच ठेवावे.
25 May 2011 - 2:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पुस्तकाची वाट पाहतोय. लंबर एक आणि लंबर चारचे मुखपृष्ठ भारी आहे.
-दिलीप बिरुटे
25 May 2011 - 11:42 pm | रामदास
आपण सर्वांनी भरभरून प्रतिक्रिया लिहील्यात त्या वाचून पुस्तक प्रकाशनापेक्षा जास्त आनंद झाला. मी -माझे प्रकाशक आणि अतुल परांजपे आपल्या सगळयांचे आभारी आहोत. सर्व सूचनांचे एकत्रीकरण करून हवे तसे बदल करण्याचे प्रयत्न चालू आहेत. पुस्तक जून अखेरीस प्रसिध्द व्हावे असा संकल्प आहे. वीस जुलाईला शिकागो येथे बृहन महाराष्ट्र मंडळाच्या अधीवेशनात माझी आणखी एक प्रकाशक मित्र श्री.हेमंत रायकर यांचा मराठी पुस्तकांचा स्टॉल असणार आहे. तेथे काही प्रती विक्रीस उपलब्ध असतील. पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम कधी असेल ते अजून ठरले नाही. मागणी असल्यास मिपासदस्यांना पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था प्रकाशकांनी केली आहे.
पुन्हा एकदा सर्व सदस्यांचे आभार!
26 May 2011 - 11:14 am | विसुनाना
-निश्चितच हवी!
पुस्तकाच्या प्रतीवर आपली स्वाक्षरी असावी अशीही अपेक्षा नोंदवून ठेवतो.
26 May 2011 - 1:36 pm | बिपिन कार्यकर्ते
एक कळत नाहिये... हा कथासंग्रह आहे हे स्पष्ट लिहून सुद्धा बर्याच लोकांनी कवितासंग्रह असं का लिहिलं आहे?
26 May 2011 - 2:15 pm | गवि
रामदासकाका, मी म्हणत होतो त्याची निशाणी इथे दिसतेय.
बर्याच लोकांना कवितासंग्रह वाटतोय.
26 May 2011 - 2:00 pm | ऋषिकेश
हाफिसातून मुखपृष्ट दिसत नाहिये.. तेमत नंतर देतो
तुर्तास प्रकाशनाबद्द्ल अभिनंदन! :)
28 Sep 2011 - 1:55 pm | साबु
कुणाला माहिती आहे?
23 Jan 2021 - 9:12 am | NAKSHATRA
खूप आनंद आणि अभिमान वाटला...