देऊ नको मला तू नावे अनोळखी
का रोज मी स्वतःला व्हावे अनोळखी?
मी त्यागिले सुखाने सन्मित्र सोयरे
मागून सावली का धावे अनोळखी?
गर्दीत ओळखीचे कित्येक चेहरे
त्यातून नेमका का भावे 'अनोळखी'?
या रोजच्याच वाटा मी चालतो तरी
वाटेत लागणारी गावे अनोळखी
वैशाख तापलेला वणवा उरी जळे
ओठात गीत ओले यावे अनोळखी
- स्वानंद
http://amrutsanchay.blogspot.com
प्रतिक्रिया
14 May 2011 - 12:50 am | प्राजु
वाह!! सुरेख!
14 May 2011 - 6:27 pm | नगरीनिरंजन
सुरेख गज़ल!
14 May 2011 - 6:28 pm | नगरीनिरंजन
सुरेख गज़ल!
14 May 2011 - 10:09 pm | राघव
छान लिहिलेस! :)
राघव
7 Jul 2017 - 2:44 am | सत्यजित...
>>>गर्दीत ओळखीचे कित्येक चेहरे
त्यातून नेमका का भावे 'अनोळखी'?
या रोजच्याच वाटा मी चालतो तरी
वाटेत लागणारी गावे अनोळखी>>>सुंदर शेर!