कविता सुचली ही बातमी वाचून.
क्रोमियम प्लेटेड ढग
उंदराला सोडून धरतीवर,
गेला नभात संगणेशक
पीसीची कटकट कशाला,
मेघातून गर्जणार निर्देषक
दर तीन वर्षांनी व्हायचा
घरचा संगणेशक म्हातारा
लडखडती चाल बघून
सगळ्यांचा चढायचा पारा
मुन्नी नाचतांना हटकून
संगणेशक व्हायचा जॅम
आतातरी नविन आणा,
आम्ही व्हायचो बदनाम
अचानक येऊन कोठूनसे
उंडारायचे व्हायरस
त्यांचा ताप उतरवतांना
अंगारात बुडायचा शांतरस
मेंदू आपलाच वापरायचा
सोडा संगणकी प्रघात
रहाणार बृहस्पति आता
क्रोमच्या रंगीत मेघात
किचकट कामे सारी मेघात
भले खालचा मजला मंद
सुक्ष्म नरम विंडो गेटस
म्युझीयममधे होतील बंद
गुगलबाबा म्हणे क्रोम आला,
हलतील सुत्रे सारी मेघातून
आजोबा म्हणले तो तर कधीचाच
नाचवतोय कळसुत्री भावल्या अंबरात बसून!
प्रतिक्रिया
13 May 2011 - 12:38 pm | नरेशकुमार
छान छान ! कविता अगदी ढगात नेउन पोहोचवली आहे.
13 May 2011 - 7:15 pm | पिंगू
फस्स्कन हसू आलं कविता वाचून..
- पिंगू
13 May 2011 - 7:15 pm | पिंगू
फस्स्कन हसू आलं कविता वाचून..
- पिंगू
14 May 2011 - 2:52 am | पाषाणभेद
एकदम मस्त. नविन युगाची कवीता आहे अगदी.
14 May 2011 - 5:44 am | आत्मशून्य
.
14 May 2011 - 9:40 pm | नगरीनिरंजन
हा हा, गमतीदार! शेवटचा ट्विस्ट छान.