सुख

स्पा's picture
स्पा in जनातलं, मनातलं
5 May 2011 - 9:16 am

आज सकाळी ७.४७ ला नेहमीच्या खटारा लोकल ऐवजी , नवी कोरी निळी लोकल , लाजत मुरडत येताना बघून तमाम ठाकुर्ली वासीयांच्या काळजाचा ठोकाच चुकला, आम्ही मंत्रमुग्ध होऊन तिच्याकडेच बघत होतो, काय तो थाट. काय ती अदा अहाहा
सगळं पब्लिक आज एक दम शिस्तीत आत शिरलं, आमचा ग्रुप आधीच आतमध्ये बसून टवाळक्या करत होताच, चायला कसाऱ्याच्या चाळीतून एकदम मलबार हिल च्या बंगल्यात गेल्यासारखं वाटल,

बसायला गुबगुबीत गाद्या, मोठ्या मोठ्या खिडक्या, प्रचंड वेगाचे पंखे :)
जुन्या लोकल मध्ये फ्यान एक इंच हलतील तर शप्पथ, एकाने कंगवा घालून फिरवण्याचा प्रयत्न केला, तर एक पात हल्ल ते वर्षभराची साठलेली धूळ त्याच्या मस्तकावर अर्पण करूनच, तेंव्हापासून सगळ्यांनी फ्यान हा विषय बंद केलेला ,
आज मात्र ह्या जीवघेण्या लोडशेडिंग मधून मुक्त झालो फिदीफिदी

लेडीज आणि जेन्ट्स फर्स्ट क्लास च्या डब्यात जुन्या लोकल मध्ये पार्टिशन असायची, त्यामुळे पलीकडच काही दिसायचं नाही ;) नवीन लोकल मध्ये चक्क स्टील चे रॉड टाकल्याने बर्याच जणांचा प्रवास सुखकर झाला होता :D
आणि काय तो स्पीड .. वा वा आज ट्रेन कांजूर ला १५ च्या ऐवजी फक्त ५ मिन्तच लेट झाली :D
.
.
.
.
.

साला खरय सुख मानलं तर कशातही मानता येत, आणि नाही तर कशातही नाही .. अगदी स्वर्गातही :)

सुख या गोष्टीला विशिष्ट अशी व्याख्या नाही, ती व्यक्तीसापेक्ष बदलते,
प्रत्येक वेळी सुख हे पैशातच विकत घ्यायला हव असं नाही.

तुमच्याही सुखाच्या छोट्या छोट्या (किंवा मोठ्या मोठ्या) कल्पना असतील , स्वप्नं असतील, इथे मांडा :)
म्हणजे सुख कशाकशात असू शकतं, हे कळेल , आयुष्य अजून सुंदर होईल :)

मुक्तक

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

5 May 2011 - 9:38 am | प्रचेतस

स्पावड्या, सुरेख मुक्तक मांडलेस रे. आमच्या पुण्यात अश्या गुबगुबित खुर्च्यांच्या लोकल ट्रेन कधी येणार कुणास ठाउक. त्यामुळे त्या सुखापासून सध्यातरी वंचितच.
बाकी एखाद्या गडावर किंवा एखाद्या अनवट जागी मध्यरात्री मित्रांबरोबर गप्पा मारणे व चांदण्याचा आनंद लुटत राहणे यात आम्हास अवर्णनीय सुख मिळते. किंवा एखाद्या सह्याद्रीच्या कड्यावर उभे राहून खालची पाताळावेरी दरी निरखण्यातही आमचे सुख सामावलेले आहे.

स्पंदना's picture

5 May 2011 - 9:47 am | स्पंदना

स्पाउ सुख असच छोट्या छोट्या रोजच्या गोष्टीत असत. फार शोधा शोध करायची गरज नसते. बस जाणिवा जरा तिक्ष्ण कराव्या लागतात एव्हढच.

छान लिहिलय स्पा ! आवडया!

किसन शिंदे's picture

5 May 2011 - 10:23 am | किसन शिंदे

ऑफिसमधून बरोबर ५ च्या ठोक्याला बाहेर पडायला मिळणं....याच्यासारखं दुसरं सुख नाही.:D

पण साला असं सुख आमच्या वाट्याला कधी कधीच येतं.;)

गवि's picture

5 May 2011 - 10:27 am | गवि

जगातील सर्वोत्तम सुखे फुकट मिळतात.

इति पु.लं. (दुसरे कोण..!?)

मस्त लिहिलंस रे स्पावड्या...

कंबर मोडेपर्यंत काम करून रात्री घरी आल्यावर गादीला पाठ टेकते तो क्षण !! अहाहा सुख सुख!

लेख मस्तंच!

विकाल's picture

5 May 2011 - 11:25 am | विकाल

सुख जवापाडे ही असू शकतं.....!!!

स्पाचा अस्सा सुंदर लेख वाचायला मिळणं म्ह्णजे पण सुखच की....!!!

कवितानागेश's picture

5 May 2011 - 1:45 pm | कवितानागेश

मलापण आवडते निळी लोकल! :)
चढल्यावर कळतच नाही, इथे बसू, की तिथे बसू? तितक्यात सगळ्या जागा संपतात. ;)
मग शांतपणे दाराशी भाजीवालीजवळ उभे राहायचे आणी उभ्या उभ्या उरलेली झोप पूर्ण करायची.
....................................
हेच ते सुख,... ...कधीही, कुठेही गाढ झोप लागणे आणि योग्य स्टेशनला जाग येणे!

अन्या दातार's picture

5 May 2011 - 2:21 pm | अन्या दातार

shevatacha paper samplyavar unhatun ghari alyavar je 2 ghaas potat jatat te pan ek mothe sukh!

समुद्राकाठच्या, नदीकाठच्या वाळूत किंवा घाटावर शांत बसून राहावं, हे करत असताना मोबाईलची रेंज गेलेली असावी.

परिकथेतील राजकुमार's picture

5 May 2011 - 3:30 pm | परिकथेतील राजकुमार

वाह रे स्पावड्या :)

झकास लिहिले आहेस. साला तू माणसात आलास हेच आमच्यासाठी सुख आहे बघ.

सहज's picture

5 May 2011 - 4:04 pm | सहज
प्रदीप's picture

5 May 2011 - 7:24 pm | प्रदीप

.

नरेशकुमार's picture

5 May 2011 - 4:55 pm | नरेशकुमार

शनवार रैवार भायेर फिरायाला जातो ते दिवस. बर्याचदा सिन्हगडला गेलो होतो, आनि सगळा भारत फिरलो. कोकनात गेलो कि खुप सुख असते. मित्रांना भेटायला,
Transformer 3 - Dark of the Moon लवकरच रिलिज होनार आहे. तो आल कि मित्रांबरोबर मारनार आहे. ते एक सुख असते.
एक मस्त ईग्लिश सिनेमा मित्रांसोबत बघत असतो तर कधि कधि हिंदि सिनेमा बायको बरोबर बघत असतो. ते पन सुख आहे. outdoor ला जायला आवडते.
घरात कामात मदत करायला पन आवडते.
लहान मुलांशि खेळायला आनि मिपा वाचयला आनि प्रतिसाद द्यायला आवडते.
घरात इंटरनेट घेतल्यापासुन खुप मज्जा येते.
YOUTUBE facebook खुप छान आहे.
pahile orkut वापरायचो
पन आत facebook वापरतो.
मिपा कधि कधि उघडत नाही तेव्हा दुक्ख होते. पन उघडल्यावर सुख मिळते.
तुझा पोस्ट वाचुन सुख मिळाले.

मुक्तक खूप आवडलं.
माझ्या मुलीबरोबर रमत गमत लांब फेरफटका घेणं आणि तिनी मला आणि मी तिला खूप हसवणं, मनातील गूज सांगणं , मधेच एखादं रॉबीनचं बाळ दिसणं यापुढे जगातील सर्वं सुखं तुच्छ!!!

पुष्करिणी's picture

5 May 2011 - 6:04 pm | पुष्करिणी

खूप उन पडलय बाहेर आणि आसपास काहीही नाहीये ऑफिसच्या. पण आत्ताच म्यानेजरनं खूपसारं आइसक्रीम आणून दिलं सगळ्यांना..मज्जा :)

मेघवेडा's picture

5 May 2011 - 8:13 pm | मेघवेडा

खूप झोप येतेय आणि काम करण्याचा वीट आलाय हापिसात. पण आत्ताच कलिगनं गरमगरम चहाचा कप आणून पुढ्यात ठेवला.. :)

रेवती's picture

5 May 2011 - 6:28 pm | रेवती

छान लिहिलयस.

धमाल मुलगा's picture

5 May 2011 - 6:36 pm | धमाल मुलगा

मस्त रे आपट्या :)
'मर्फी'ज' लॉ बोलायला लागला की काय? :D

'मर्फी'ज' लॉ बोलायला लागला की काय?

बहुतेक :D

बरेचदा सुखामागे धावता धावता आपण छोटे छोटे आनंदाचे क्षण गमावून बसतो. (सोर्स, अगणित लेखक आणि सिनेमे:उदा: बावर्ची)

आनंद आणि सुख ह्यामधला फरक काय?
नविन गाडी, घर हे सुख आहे? की जुन्या सायकलवरून आपल्या लहानग्यांवरोबर भूर जाण्यात आहे?
महागड्या हॉटेलांत जाउन जेवण्यात आहे? की घरच्या आईच्या / बायकोच्या हातच्या साध्या पोळी भाजीत आहे?

सहज's picture

6 May 2011 - 5:49 am | सहज

नविन गाडी, घर याची तुलना आपल्या लहानग्यांबरोबर भूर जाण्यात ???

>महागड्या हॉटेलांत जाउन जेवण्यात आहे? की घरच्या आईच्या / बायकोच्या हातच्या साध्या पोळी भाजीत आहे?
नाही आयतं जेवायला मिळण्यात (फक्त खाणार्‍याला)सुख आहे त्यात वाद नाहीच पण आई आणी /किंवा बायको यांना महागड्या (महागडया पेक्षा उत्तम जेवण मिळते तिथे)हॉटेलात घेउन जाउन जेवण्यात सुख (सर्वांसाठी) नाही??

असुर's picture

5 May 2011 - 6:53 pm | असुर

भारतात जाण्यासाठी सुट्टी एका फटक्यात अ‍ॅप्रूव्ह होते, तिकिटं स्वस्त असतात, विमान प्रवास आरामात होतो तेव्हा असं वाटतं की सुख सुख ते हेच..
पण त्याहूनही भारी वाटतं जेव्हा अरबी समुद्रावरुन मुंबईचा किनारा दिसतो... एकदम वनवास संपवून घरी आल्यासारखं वाटायला लागतं! :-)

--असुर

आनंदयात्री's picture

5 May 2011 - 9:18 pm | आनंदयात्री

छान, लिहलस स्पा.

अवांतरः टारझनच्या प्रतिसादाची वाट पहातोय.

गप्प रहायचे ठरवले आहे ,
पण परवदिगार , शैतानेइब्लिस, मसिहा , कुरानेशरिक श्रिमान आणंदयात्री यांचे सुख जर आमच्या प्रतिसादात सामावले असेल तर .. :)

आमचे सुख सामावले आहे मोकळ्या वावरात शांतपणे हलके होण्यात आहे . कोणी काहीही म्हणो . तेवढा काळ आम्ही सगळे सुख दुखं , चिंता , जबाबदार्‍या , डेडलाईन्स , इतकंच काय जवळचे लोकंही विस्मृतीत जातात. तेंव्हा मी स्वतःसाठी जगतो म्हणुन मी तेंव्हा जगातला सर्वांत सुखी माणुस असतो . परसात आमच्या शरीराची आमच्या आत्म्याशी भेट होते ते सुसंवाद साधतात . शक्यतो मी गात नाही .. पण यमनाच्या सुरात "जुदा हो के भी ... तु मुझ मे कही बाकी है .. " , " अगर तुम आ जाओ .. जमाना छोड देंगे हम .. " इत्यादी गाणी आपसुक निघतात . आम्ही आमच्या आत्म्याशी पुन्हःश्च संवाद साधु शकलो म्हणुन आणंदयात्री यांचा मी ऋणी आहे .
( जमतंय का जमतंय ? )

टिप : प्रतिक्रिया चोर स्पा यांचे नाव प्रतिसादातुन वजा करण्यात आल्याची णाँद घ्यावी .
- परसी बाबा

स्पा's picture

6 May 2011 - 8:23 pm | स्पा

__/\__

चिगो's picture

7 May 2011 - 7:41 pm | चिगो

फॉक्कन् सुखावलो की टार्‍याचा प्रतिसाद वाचून.. :D

स्पा, मस्त लेख रे..

पोळी तव्यावर फुगली जाम आनंद होतो. आणि ती फुगलेली पोळी तशीच लेकाच्या पानात घातल्या.. "यूऽऽऽ हूऽऽऽ!!" असा तो आनंदाने ओरडला की माझा आनंद द्वीगुणीत होतो. मानलं तर सुखच सुख आहे.. नाहीतर वाळवंट आहे.

दैत्य's picture

6 May 2011 - 1:32 am | दैत्य

असुराशी पूर्ण सहमत!

सुट्टीसाठी पुण्यात आलो असताना 'सवाई गंधर्व' चालू असतं, वर्षानुवर्षांची तपस्या असलेले कलाकार संगीत सादर करताना ऐकून आणि मन संगीतात हरवून जातं ते सुख....

नरेशकुमार's picture

6 May 2011 - 5:02 am | नरेशकुमार

असुराशी दैत्य सहमत. चालायचंच.
लायटलि घ्या.