मी हि जन्मा पासून फिरतो आहे
सुखाच्या शोधात
दरया,खोरयात,
झाडांच्या सळसळणारया पानात,
नदीच्या संथ वाहणारया पाण्यात
पण दुक्खः जणू पाठच सोडत नाही,
दरया,खोरयात,
झाडांच्या सळसळणारया पानात,
नदीच्या संथ वाहणारया पाण्यात.
दररोज कित्येक मरण यातना भोगतो
स्वप्नांचे जड ओझे घेऊन
जगण्याची उभारी देणारे
कुणी तरी भेटेल काय ?
दरया,खोरयात,
झाडांच्या सळसळणारया पानात,
नदीच्या संथ वाहणारया पाण्यात.
प्रतिक्रिया
2 May 2011 - 11:32 am | मिसळलेला काव्यप्रेमी
छान वाटली!!
2 May 2011 - 4:56 pm | गणेशा
कवितेमागील आशय छान ...
मात्र
दर्या,खोर्यात,
झाडांच्या सळसळणार्या पानात,
नदीच्या संथ वाहणार्या पाण्यात.
ह्या ओळी खुप रिपिट आल्याने आणि त्यांच्यामध्ये येणार्या मुळ अर्थ सांगणार्या ओळी खुपच कमी असल्याने.. कवीला सांगाव्याश्या वाटणार्या भावना खुप सिमित वाटल्या...
2 May 2011 - 5:27 pm | गणेशा
असाच एक स्वैर प्रयत्न करतो तुमच्या शब्दांपासुन ....
झाडांच्या सळसळणार्या पानात
पिकल्या पानांचा आक्रोष दिसला मज
नाविन्याच्या आनंदात बुडालेली अन
बुडालेल्या आयुष्याच्या रेघोट्या मारलेली पाने
कदाचीत माझ्या सुखाची परिसिमाच ती ...
उधानलेले शौर्य हरवले होते
संथ वाहणार्या पाण्यात
एक करुण भावनेने प्रवासात पिचलेल
एक आयुष्य दिसले मज तेथे..
कदाचीत माझ्या जगण्याची परिसिमाच ती ...
जन्मा पासून फिरतो आहे मी
सुखाच्या शोधात
दर्या,खोरयात,
झाडांच्या सळसळणार्या पानात,
नदीच्या संथ वाहणार्या पाण्यात
पण हे दु:ख जणू पाठच सोडत नाही,
आता वाटते आहे झुगारुन द्यावे हे आयुष्य
पण प्रत्येक पिकल्या दिवसाच्या दु:खात
येणार्या नवचैतन्याच्या पालवीस मी का मुकावे ?
कदाचीत सुख म्हणजे तेच असेल ...
कधी कधी वाटते उंच डोंगरावरुन
दर्या खोर्यात स्वताला झुगारुन द्यावे
पण संथ मनाच्या विचारांना
धैर्याच्या शितल प्रवासाला मी
सुंदर वळन का देवु नये ?
कदाचीत जीवन म्हणजे तेच असेल ...
स्वप्नांच्या किरणांनी
या अंधारल्या आशेला
साथ देणारे नक्की भेटेल मला
पण मला माहीत आहे त्यासाठी
माझे एक पाउल पुढे पडले पाहिजे ...
मला वाटते हीच सुखाची सुरुवात आहे ....
-
3 May 2011 - 10:58 am | नरेशकुमार
लग्नाचा लाडू खावा.
3 May 2011 - 7:42 pm | लिखाळ
ह्म्म..
इतर सर्व भौतिक गोष्टी जसे पाने, पाणी याप्रमाणेच 'सुखाचा शोध' हे भौतीक आहे असे वाटले.
तुम्ही फिरत आहात सुखाच्या शोधात,दरया,खोरयात, झाडांच्या सळसळणारया पानात, इत्यादी.
3 May 2011 - 9:02 pm | स्वानन्द
सहमत.
3 May 2011 - 9:04 pm | स्वानन्द
प्रकाटाआ