प्रीतीचा वर्षाव ...

ajay wankhede's picture
ajay wankhede in जे न देखे रवी...
26 Apr 2011 - 12:10 am

प्रीतीचा वर्षाव
प्रिये तू देऊ नकोस डोळयात अश्रूंना स्थान
कारण
अश्रू प्रीतीचा झरा आटवतो.
प्रिये तू येऊ देऊ नकोस गालावर रक्त चंदन राग
कारण
राग प्रीतीचा झरा आटवतो.
प्रिये तू करू नकोस ओठांवरून मद मत्सर तीक्ष्ण बाणांचा वर्षाव
कारण
मद मत्सर प्रीतीचा झरा आटवतो.
प्रिये तू फक्त ऐवढेच कर.....
तू हळुवारपणे केसांना मोकळे सोड ,
पाणीदार पापण्यांना हलकेच वर खाली कर ,
गोड गुलाबी गालांवर पारिजात फुलू दे ,
ओठांवरील रक्तिम लव हलकेच थरथरू दे,
नि या जगावर प्रीतीचा वर्षाव कर .
प्रिये फक्त तू ऐवढेच कर...

कविता

प्रतिक्रिया

नक्की कसा रंग होईल याचा विचार करतो आहे.

रक्तिम लव फेशलची ताबडतोब आवश्यकता आहे असे तर कविला सुचवायचे नाही ना ?

नि या जगावर प्रीतीचा वर्षाव कर .ही कविता बहुतेक लेडी चॅटर्लीज लव्हरच्या नायीकेवर लिहीली असावी.

वरील सर्व वाक्ये हलकेच न घेणे.
झालंच तर ऐव्हढे ऐव्हढे म्हणजे कैव्हढे याचा पण विचार व्हावा.

ajay wankhede's picture

30 Apr 2011 - 9:16 am | ajay wankhede

-स्वामि राम दास राव धन्यवाद, आपण गुरु आहात .
स्त्री जातीला निसर्ग ता च सौंदर्याचे जे वरदान मिळालेल आहे,
त्या कडे कवी या नात्यानं डोळस पणे बघावं हा माझा हेतु.
''रक्तिम लव ''ओठांवरिल diamond किनार ''हे मला अभिप्रेत आहे.
आपण कुठला विचार केला...कळ्वावे.

अजय,

खूपच सुंदर कविता..मला खूप आवडली. मस्त लिहिले आहेस. सुंदरच. शब्दांची थोडी फेर फार करून बघितली.. आणिक मस्तच वाटली कविता. असेच छान येउदे अजुन.

(अवांतरः संदेश बघ. काही सुझाव लिहिले आहेत.)

- निनाव.

"रक्त चंदन राग"

व्वा नविनच शब्द मी पाहिला.. खुप आवडला ...
या शब्दांची चोरी करावीशी वाटत आहे [:)]