मी?
एक मासा.
नुकताच जन्मास आलेला
आताच पोहायला शिकलेला
खोल पाण्यास भीत नसलो तरी
अजुन शिरत नाही मी सहसा
मोठे मासेच नसतात तिथं फक्त
आप्-आपले काटे लावून बसतात
तिथं मासेमार ही !
पण,
राहवत नाही मला
खोल सागराचा मोह
आवरत नाही मला...
मग जातो तोल मनाचा
अन घेतो दीर्ध श्वास मी
मारतो मग एक मोठी उडी
आणि...
क्षणांत सर्वं कसं गार-गार, आणिक शांत
हरवून जातो मग त्या निळ्या पाण्यांत मी
सागर तळी,
मोती शिंपल्यात...
वाटत नाही मग काट्यांची भिती
अन मोठ्या माश्यांची ही
काटे नसतातच मुळी माझ्या साठी
मी छोटा आहे ना अजुन
जातो निघून दोन फासांच्या मधून
शिवाय, पकडून मला उपयोग तसा नाही
मेहनतच जास्त - भाव काही नाही!
होते धडक मोठ्या माश्यांशी कधी
स्पर्श काट्यास नकळत होते कधी
पण धडपडत नाही मी
अन अडकत नाही मी
पकडले तर जायचेच आहे-
आज्-न-उद्या
म्हणून का पोहायचेच नाही कधी?
इतरांचे पोहणे अखेर
खोलावर
बघायचे तरी किती?
मला साधा मासा व्हायचे आहे
- देवमासा नाही
मला माझ्या सारखे पोहायचे आहे
- कुणा सारखे नाही
अन मला साधे पोहायचे आहे..इतरांसोबत
-पाण्यातले खेळ शिकायचे नाही
जग पाहायचे आहे मला- जग जिंकायचे नाही!
.
.
.
मी,..
एक मासा
भिजलेला
सागरातच वसलेला
माश्यांच्याच वस्तीत
थोडसं अंगात भिनलेला
अल्हड
वेळ कमी असलेला
काट्यांस लपलेला
किनारी लागण्याच्या आधी
घेतो आहे भिजून...
पाण्यात
मी, एक मासा!
प्रतिक्रिया
20 Apr 2011 - 2:16 am | पाषाणभेद
माशा अल्ला माशा अल्ला!
"मला साधा मासा व्हायचे आहे
- देवमासा नाही
मला माझ्या सारखे पोहायचे आहे
- कुणा सारखे नाही"
हे आवडले. छोटा असूनही त्याच्या विचारांचा आवाका मोठा आहे.
अवांतर: काही ठिकाणी 'मास्यांची' असे झाले आहे ते 'माश्यांची' करावे. (shyaa + Shift M).
20 Apr 2011 - 2:28 am | निनाव
>>>माशा अल्ला माशा अल्ला!
-- हे केवळ आणिक केवळ पाभे ह्यांनाच सुचू शकते..!!! भन्नाटच. :) :)
पाभे: तुमच्या 'भन्नाट सुंदर' प्रतिसादांवर प्रतिसाद द्यायला शब्द नाहीत :) जबरा!!!
आणिक हो, सुचना दिल्या बद्दल आभारी आहे. करेक्शन केलेली आहे :).
20 Apr 2011 - 5:05 am | प्रकाश१११
निनाव -निराळीच परंतु छान जमलीय.
20 Apr 2011 - 5:09 am | नरेशकुमार
तु एक मासा, मी एक ससा.
एका हाव्रट मानसाला माझा ससा नेहमी खावा-खावासा वाटतो. दुश्ट कोनिकडचा.
20 Apr 2011 - 9:01 am | निनाव
नरेश जी: :)
माश्या बद्द्ल आत्मीयता आणिक प्रेम दाखविल्या बद्दल आभारी आहे.
आ. निनाव.
20 Apr 2011 - 10:46 am | मिसळलेला काव्यप्रेमी
मस्त रे!!
20 Apr 2011 - 10:53 am | मराठमोळा
अरे वा..
जागुताईंना छोट्या साध्या मास्यांची पाकॄ टाकण्याची सुपारी दिली पाहिजे आता. :)
20 Apr 2011 - 10:09 pm | गणेशा
मासा आवडला ..
माणुस .. माणसाचे मन आणि मासा मस्तच वाटले सारे ...
तुम्ही पोहत रहा .. समुद्र आपोआप तुम्हाला विराट अनुभव देत राहिन ...
---
अवांतर : बाकी हा मासा माझ्या तावडीतुन सुटलाच होता...