.... प्रेम कर!!

प्राजु's picture
प्राजु in जे न देखे रवी...
14 Apr 2011 - 8:21 am

आयुष्याच्या हरेक क्षणांवर .. प्रेम कर
अस्तित्वाच्या घनघोर रणावर .. प्रेम कर

नात्यांमध्ये गुरफ़टणार्‍या
ओलाव्याने मोहरणार्‍या
मनाच्या या उधाणपणावर.. प्रेम कर

कळ्या उमलती तू हसतना
स्पर्श छेडती कोमल ताना
देहाच्या प्रत्येक सणावर.. प्रेम कर

नको विचारू गतकालाला
करेन वश मी त्या दैवाला
माझ्यामधल्या याच गुणावर.. प्रेम कर

घाव झेलले जगण्यासाठी
राखेमधुनी उठण्यासाठी
हृदयावरच्या त्याच व्रणावर.. प्रेम कर

नुरतील तेथे काही व्यथा
एक आगळी शांत अवस्था
मुक्ती देणार्‍या सरणावर.. प्रेम कर

अंत नसतो सृजनाला त्या
विलयाच्याही बस्स रेघोट्या
सृष्टीच्या या कणाकणावर .. प्रेम कर

- प्राजु

कविता

प्रतिक्रिया

नगरीनिरंजन's picture

14 Apr 2011 - 8:49 am | नगरीनिरंजन

कविता आवडली.

सगळीच कडवी सुंदर आहेत पण ही दोन खूप आवडली:
कळ्या उमलती तू हसतना
स्पर्श छेडती कोमल ताना
देहाच्या प्रत्येक सणावर.. प्रेम कर

नको विचारू गतकालाला
करेन वश मी त्या दैवाला
माझ्यामधल्या याच गुणावर.. प्रेम कर

लौकीकास साजेशी कविता ..

बाकी कविता वाचुन "आय कर " नावाचे विडंबन सुचते आहे :)

- (नियमीत आय आणि प्रेम 'कर'णारा) टारझन

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

14 Apr 2011 - 10:48 am | मिसळलेला काव्यप्रेमी

प्राजु तै,
अबब!! काय तुफान झालिये!! क्या बात क्या बात!! असे प्रत्येक कडव्याला म्हणत होतो!!
विशेषतः

कळ्या उमलती तू हसतना
स्पर्श छेडती कोमल ताना
देहाच्या प्रत्येक सणावर.. प्रेम कर

नको विचारू गतकालाला
करेन वश मी त्या दैवाला
माझ्यामधल्या याच गुणावर.. प्रेम कर

आणि हा तर कळस आहे:

अंत नसतो सृजनाला त्या
विलयाच्याही बस्स रेघोट्या
सृष्टीच्या या कणाकणावर .. प्रेम कर

तुला खरोखर धन्यवाद कि अशी कविता वाचायला दिलीस तु आम्हाला.
तुला खुप खुप शुभेच्छा!!

मराठमोळा's picture

14 Apr 2011 - 11:23 am | मराठमोळा

मस्त...

खुप दिवसांनी काव्य विभाग उघडला मी. :)

हरिप्रिया_'s picture

14 Apr 2011 - 11:46 am | हरिप्रिया_

मस्त...
खुप खुप आवडली...

मनिष's picture

14 Apr 2011 - 12:08 pm | मनिष

प्राजुतै,

खूप आवडली ही कविता. ही कडवी तर खासच -

घाव झेलले जगण्यासाठी
राखेमधुनी उठण्यासाठी
हृदयावरच्या त्याच व्रणावर.. प्रेम कर

नुरतील तेथे काही व्यथा
एक आगळी शांत अवस्था
मुक्ती देणार्‍या सरणावर.. प्रेम कर

अंत नसतो सृजनाला त्या
विलयाच्याही बस्स रेघोट्या
सृष्टीच्या या कणाकणावर .. प्रेम कर

केशवसुमार's picture

14 Apr 2011 - 12:14 pm | केशवसुमार

प्राजूताई..
कविता आवडली..
(वाचक)केशवसुमार

ढब्बू पैसा's picture

14 Apr 2011 - 12:14 pm | ढब्बू पैसा

प्राजु तै,
चान झलीये कविता. शीर्षक थोडं क्लिशे वाटलं!
पण ...
नुरतील तेथे काही व्यथा
एक आगळी शांत अवस्था
मुक्ती देणार्‍या सरणावर.. प्रेम कर

हे कडवं मस्तच झालंय!!

ज्ञानेश...'s picture

14 Apr 2011 - 12:17 pm | ज्ञानेश...

'प्यार कर' हे डीटीपीएच मधले गाणे आठवले. :) लतादीदींच्या आवाजामुळे लक्षात आहे ते.
कविता आवडेश.

मृत्युन्जय's picture

14 Apr 2011 - 12:21 pm | मृत्युन्जय

घाव झेलले जगण्यासाठी
राखेमधुनी उठण्यासाठी
हृदयावरच्या त्याच व्रणावर.. प्रेम कर

मस्त एकदम

ajay wankhede's picture

14 Apr 2011 - 12:53 pm | ajay wankhede

तुफान्...तुफान्..तुफान...
प्रत्येक कडवं भन्नाट..

नुरतील तेथे काही व्यथा
एक आगळी शांत अवस्था
मुक्ती देणार्‍या सरणावर.. प्रेम कर

निर्वाण पथावरिल वारकरी ....फक्त प्रेम कर.

प्यारे१'s picture

14 Apr 2011 - 1:05 pm | प्यारे१

ब्येष्ट कविता.

संदेश आवडला. आजमावा म्हणतो :)

प्राजक्ता पवार's picture

14 Apr 2011 - 1:28 pm | प्राजक्ता पवार

कविता आवडली .

असुर's picture

14 Apr 2011 - 2:11 pm | असुर

प्राजुतै,
कविता मस्तच, अगदी जमून आलीये!!! :-)

--असुर

गणेशा's picture

14 Apr 2011 - 2:20 pm | गणेशा

आवडली एकदम

देहाच्या प्रत्येक सणावर.. प्रेम कर

अतिषय उच्च आनि नाविण्यपुर्ण ओळ.. खरेच खुपच अर्थ असलेली ओळ.. जास्त आवडली

ही दोन कडवी तर अप्रतिम ...

नुरतील तेथे काही व्यथा
एक आगळी शांत अवस्था
मुक्ती देणार्‍या सरणावर.. प्रेम कर

अंत नसतो सृजनाला त्या
विलयाच्याही बस्स रेघोट्या
सृष्टीच्या या कणाकणावर .. प्रेम कर

-
असेच लिहित रहा .. वाचत आहे...

प्रभो's picture

14 Apr 2011 - 6:56 pm | प्रभो

आवडली.

निशदे's picture

14 Apr 2011 - 7:37 pm | निशदे

एखादे कडवे आवडले असे म्हणणे अशक्य आहे.......खूपच छान लिहिले आहे.........
""नात्यांमध्ये गुरफ़टणार्‍या
ओलाव्याने मोहरणार्‍या
मनाच्या या उधाणपणावर.. प्रेम कर""
""अंत नसतो सृजनाला त्या
विलयाच्याही बस्स रेघोट्या
सृष्टीच्या या कणाकणावर .. प्रेम कर""
अप्रतिम....... :)

प्राजु's picture

14 Apr 2011 - 7:46 pm | प्राजु

सर्वांचे मनापासून आभार. :)

नरेशकुमार's picture

15 Apr 2011 - 9:30 am | नरेशकुमार

कविता आवडली,
.....................................................................................
मि फक्त बायकोवर प्रेम करतो. इतर गोश्टींवर प्रेम करायला वेळ मिळत नाही.
तरी पन पुढे-मागे करुन पाहीन...........प्रयत्न हो... प्रेम करन्याचा.

चित्रा's picture

16 Apr 2011 - 7:24 am | चित्रा

कविता आवडली.

प्रीत-मोहर's picture

16 Apr 2011 - 2:03 pm | प्रीत-मोहर

मस्त कविता प्राजुतै :)

टार्‍या विडंबन टाकलस तरी चालल बरका!!

परिकथेतील राजकुमार's picture

16 Apr 2011 - 2:14 pm | परिकथेतील राजकुमार

मस्त ग तै.
एकदम बढिया.

क्रान्ति's picture

18 Apr 2011 - 7:58 pm | क्रान्ति

अप्रतिम कविता प्राजु! खूप खूप आवडली.

किसन शिंदे's picture

18 Apr 2011 - 9:19 pm | किसन शिंदे

अप्रतिम.....
याशिवाय दुसरा शब्दच सुचू शकत नाही.

पुन्हा एकदा मनापासून आभार. :)