संजीव कपूर छाप पांढरा पास्ता (दोन-तीन जणांसाठी)
साहित्य
मॅकरोनी पास्ता (पाव किलो ते तीनशे ग्राम)
पास्त्याचे विविध प्रकार इथे आहेत... http://www.archimedes-lab.org/pastashape.html
चीज ... कुठलेही चीज पण तीन मोठे चमचे द्रव स्वरूपात (हे असलेले चांगले) किंवा एक्-दीड इंचाचे दोन क्युब्स किंवा सात ते आठ चौकोनी सपाट पेपर चीज.
दूध (चार ते पाच वाटी)
बटर (दोन मोठे चमचे)
मोठा कांदा अर्धा
मोठा टोमेटो अर्धा
एक हिरवी मिरची किंवा अर्धी शिमला मिरची (हिरवी मिरची खास भारतिय टच म्हणून)
इटालियन पार्स्ली किंवा कोथिंबीर (गरजेनुसार)
एक मोठी लसूण पाकळी किंवा दोन छोट्या पाकळ्या
मोहरीची पाऊडर किंवा एक छोटा चमचा छोटी मोहरी.
मीठ (चवीपुरता)
तेल (एक चमचा)
कृती
आधी पास्ता पाण्यात शिजवून घ्यावा. त्यासाठी अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा तेल आणि पास्ता बुडून वर एक नख पाणी राहिल इतकी खात्री करून घ्या. मध्यम गॅसवर झाकण लावून शिजवून घ्यावा. पास्ता शिजलाय हे समजण्यासाठी जेव्हा पास्ताच्या नळ्या शिजून आकाराने मोठ्या होतात आणि खाताना मोदकाच्या उकडीइतका मऊसूत लागतात तेच पास्ता शिजून आल्याचे लक्षण आहे. साधारणत: आठ ते दहा मिनिटं मध्यम गॅसवर उकळत्या पाण्यात शिजवला की पास्ता नीट शिजतो.
आता पास्ता वेगळ्या भांड्यात गाळून घ्यावा आणि थंड पाण्यात पुन्हा धुवावा. शिजवताना पास्ताचं पाणी गाळून घेतलेलं फेकून देऊ नका. पांढरा सॉस करताना तेच वापरायचे आहे.
आता कांदा, टोमेटो कापून मिस्करच्या मोठ्या भांड्यात टाका. मिरचीतल्या बिया काढून ती कोथींबिरीसह बारीक कापून त्यात टाका आणि एक वाटी पास्ताचं काढून घेतलेलं पाणी टाकून मिक्सरमध्ये नीट एकजीव करून घ्या.
आता मध्यम गॅसवर न चिकटणार्या (नॉन स्टी़क) भांड्यात बटर आणि अर्धा चम्चा तेल घ्या आणि त्यात कांदा टोमॅटोचं मिश्रण टाका. एक छोटा चमचा राई पाऊडर आणी बारीक किसलेला लसूण वरून टाकून दोन मिनीटं शिजवा.
त्यात दूध आणि एक वाटी पास्त्याचं पाणी टाका आणि मग चीज टाका आणि चीज विरघळेपर्यंत ढवळा. झाकण न लावता उकळू द्या. जर चीज जास्त असेल तर हे मिश्रण लवकरच उकळू लागेल आणि उतू जाऊ लागेल. तेव्हा गॅस कमी करावा किंवा थोडे आणखी पास्ताचे पाणी टाकावे. हा सॉस आटून त्याच्या आधीच्या प्रमाणाने पाऊण होईल तेव्हा ह्यात पास्ता टाकावा. जर जास्त आटला असेल तर गरजेनुसार आणखी पास्ताचे पाणी टाकावे.
पास्ता पुन्हा पाच ते सात मिनिटं मंद गॅसवर झाकण लावून ह्या सॉस मध्ये शिजवावा आणि गरमागरम सर्व्ह करावा. चवीनुसार मीठ पास्ता सॉस करताना किंवा झाल्यावर टाकू शकता.
इंग्रजीतले नाव - पास्ता विथ व्हाईट सॉस.
टीप.
१. ह्याच व्हाईट सॉसमध्ये अर्धा शिजलेला भात नीट शिजवून घेतला की त्याचं इटालियन राईस असे नामकरण होते.
२. मांसाहारी टच द्यायचा असेल तर पास्ता, स्कीन असलेल्या चिकनसोबत शिजवून घ्यावा आणि त्या चिकनचे तुकडे आणी पास्ताचं चिकन युक्त पाणी सॉस करताना वापरावे. चिकन नसेल तर मॅगीच्या चिकन क्युबस पण चालतील. अर्धा क्युब पास्ता शिजवताना वापरा आणि अर्धा सॉस मध्ये.
यम्मी ...
:)
वरील सर्व फोटो आंतरजालावरून घेण्यात आलेले आहेत ह्याची कृपया नोंद करावी.
प्रतिक्रिया
30 Mar 2011 - 5:58 pm | विंजिनेर
पास्त्यात राई? भलतेच प्रयोगशील दिसता आहात. माझा पास ;)
बाबौ!! तुम्हाला बेकमेल सॉस करायचा असेल तर अंमळ बेसिक्स शिकून घ्या पण असा पाकृ.चा खून पाडू नका. अल्फ्रेडो करायाचा असेल तरीही तोच सल्ला.
पुढच्या पाकृ. ला शुभेच्छा!
30 Mar 2011 - 7:15 pm | विनीत संखे
अहो भाउ खून आहे की लज्जतदार हे खाल्ल्यावरच कळेल. स्वतः बनवून आणि इतरांना खायला घालूनच आणि त्यांची दाद मिळवून केलेली आहे.
ट्राईड अॅण्ड टेस्टेड.
त्यावर संजीव कपूरने शिक्का मारलेली रेसेपी आहे ही.
:)
30 Mar 2011 - 11:06 pm | पिवळा डांबिस
त्यावर संजीव कपूरने शिक्का मारलेली रेसेपी आहे ही.
त्याने राई आणि कोथिंबीर पास्त्यात वापरली असेल तर तो येक अन्नाडी आहे असा निष्कर्ष निघतो!!!
च्यायला, संजीव कपूर झाला म्हणून काय झालं?
विंजिनेरसायबांशी सहमत!!!
:)
30 Mar 2011 - 11:30 pm | विनीत संखे
खरंच येक अन्नाडी असेल, पण कमीतकमी कढीपत्ता तरी नाहीये. ;)
पण इटालियन पार्स्लीला सगळ्यात चांगला पर्याय म्हणून भारतीय कोथींबीरच आहे राव, हे तर तुम्हाला मान्य करावेच लागेल.
पुन्हा एकदा पूर्वग्रह बाजूला ठेवून करून खाऊन तर बघा... डीश चाटून खाल...
:)
31 Mar 2011 - 12:32 pm | महेश काळे
एक्कच नंबर....
30 Mar 2011 - 8:27 pm | रेवती
सगळे फोटू तुम्ही काढलेले आहेत काय?
तसे असल्यास ठिक, अन्यथा आभाराचा उल्लेख असावा.
पाकृ मोहरी सोडता चांगली वाटतिये.
माझा पुढचा प्रयत्न चांगला पास्टा विथ पेस्टो असणार आहे.
30 Mar 2011 - 8:35 pm | विनीत संखे
रेवती ताई अहो मलाही हेच वाटलेलं पण मोहरीने कमाल केली... खरंच. जर मोहरी जात नसेल तर राई पावडर वापरा पण ट्राय कराच.
:)
30 Mar 2011 - 8:39 pm | रेवती
राई पावडर वापरा पण ट्राय कराच.
ओक्के!
पण फोटूंचं काय?:)
30 Mar 2011 - 8:50 pm | विनीत संखे
दोन्ही त्या वेबसाईट वरूनच घेतले आहेत ज्याची मी लिंक दिलीय.
30 Mar 2011 - 11:01 pm | सूड
पाकृ छानै. पण मोहरीचं काय कळेना झालंय राव.
मीठ-मोहर ( फोडणीला आला धूर) ;)
31 Mar 2011 - 8:03 am | विनीत संखे
इटालियन जेवणात मोहरीचा वापर केला जातो ते चीजची चव अधोरेखित करण्यासाठी.
31 Mar 2011 - 12:23 pm | स्पा
पाकृ छानै. पण मोहरीचं काय कळेना झालंय राव
असेच म्हणतो
मीठ मोहोर (नजर काढली जाऊन दूर )
31 Mar 2011 - 12:19 am | प्राजु
व्हाईट सॉस असा करतात?? कुछ तो गफलत है क्या?
यात थोड ऑल पर्पज फ्लॉर /कॉर्न स्टार्च लागतं . म्हणजे मी तसा करते. असा नाही पाहिला कधी करून.
31 Mar 2011 - 7:55 am | विनीत संखे
तुमच्या उत्तरासाठी खाली पक्याचा प्रतिसाद पहा...
:)
31 Mar 2011 - 12:58 am | सानिकास्वप्निल
मी पण मैदा /कॉर्न स्टार्च घालून व्हाईट सॉस करते
31 Mar 2011 - 7:52 am | विनीत संखे
तुमच्या उत्तरासाठी खाली पक्याचा प्रतिसाद पहा...
:)
31 Mar 2011 - 5:52 am | पक्या
पास्त्यातले स्टार्च पास्ता शिजवताना त्या पाण्यात उतरतात. शिवाय चीज , कांदा पेस्ट ही आहेच त्यात . त्यामुळे वेगळे पीठ वापरून पांढरा सॉस करायची गरज नसावी.
रेसिपी छान वाटतीये. मोहरी पावडर वापरल्यास स्वाद नक्कीच वेगळा येईल असे वाटते. पास्त्यात पार्सली असते त्यामुळे भारतात कोथिंबीर वापरावी लागेल.
रेसिपी ट्राय करून पहायला हवी.
31 Mar 2011 - 7:57 am | विनीत संखे
धन्यवाद ... निदान एक तरी )माझ्या पाककॄतीवर विश्वास ठेवणारा निघाला... :)
31 Mar 2011 - 9:45 am | गवि
जर पिझ्झा हट पंजाबी पिझा आणते, मॅकडॉनाल्ड जर पनीर बर्गर आणते तर पास्ता मधे मोहरी मिरची ट्राय केली म्हणून कुठे बिघडलं.
प्रयोग करत राहिलंच पाहिजे. पास्ता वगैरे जनरली बेचव असलेल्या पदार्थांना आवडीने खाऊन मग आपली "टेस्ट डेव्हलप झाली" असं म्हणण्यापेक्षा आपला आवडता तडका त्याला कसा लावता येईल हे पाहणं स्वागतार्ह आहे. मान्य आहे की काही गोष्टी एकमेकांसोबत "जात" नाहीत. पण प्रयोग करणार्याला असं म्हणून चालत नाही.
प्रयोग म्हणून नव्हे पण एक सोय म्हणून मी त्या मॅक्रोनी शिजवून त्याला वरुन आपली हिंग हळद मोहरीची (बटाटा काचर्या फेम) फोडणी देऊन ते कित्येकदा खात असतो. मॅक्रोनी उपमा म्हणावं हवं तर्..पास्ता शब्द नको तर.
लगे रहो.
मात्र स्वतः बनवत असलेल्या कृतींचे अस्सल फोटो दिले तर फार चांगले. जालावरच्या फोटोत जे दिसतंय ते तुम्ही स्वतः बनवलेलं नाहीये ही जाणीव त्या पाकृमधली मजा घालवू शकते.
31 Mar 2011 - 10:15 pm | पिवळा डांबिस
पास्ता मधे मोहरी ...ट्राय केली म्हणून कुठे बिघडलं.
बिघडत काहीच नाही, फक्त त्या पदार्थाच्या कुळाशीलाची काशी होते.....
पुलंनी पूर्वी म्हटल्याप्रमाणे, "बाईने मानेवर केस बॉबकट करून नाकात नथ घातली तर बिघडत काहीच नाही, फक्त ते बघवत नाही, इतकंच!"
:)
मॅक्रोनी उपमा म्हणावं हवं तर्..
हां, हे सगळ्यात बेष्ट! मग त्या फोडणीत थोडी उडदाची डाळही घालता येईल!!
चान चान, च्यामारी, हून जाऊं द्या!!
:)
पास्ता वगैरे जनरली बेचव असलेल्या पदार्थांना...
अय्योय्यो!! पिझ्झा-पास्ता-रिझोतो-लझान्या वगैरे इटालियन खाद्यपदार्थ बेचव असते तर आणखी काय पाहिजे होतं? निदान आमचं वजन किमान ५० पौंडाने कमी दिसलं असतं महाराजा!!!!
;)
1 Apr 2011 - 10:46 am | विनीत संखे
अहो डांबिस साहेब,
ह्यात प्रयोगशीलता काहीच नाही. इटालियन जेवणात राई वापरली जातेच. चीजची चव अधोरेखित करण्यासाठी. शिवाय कोथींबीर ही इटालियन पार्स्लीला चांगला पर्याय आहे. फोटोमध्ये पाहिलत तर तुम्हाला काळी मोहोरी दिसेलच. हा फोटो भारतिय वेबसाईटवरचा नाही.
ही एक पूर्णपणे मूळ स्वरूपातली डिश आहे. ह्यात काहीही प्रयोग केलेल नाहीत.
ष्टांप!
5 Apr 2011 - 9:44 pm | पंगा
प्रयोगशीलता वगैरे सगळे ठीक आहे, कशातही काहीही घालून नवनवीन प्रयोग करून बघायला हरकत काहीच नाही, त्यातून काही नवे चांगले निर्माण झाले तर (शक्यतो त्याला नवे नाव देऊन) उत्तमच आहे, पण...
एवढे तरी म्हणू नका राव!
हे म्हणजे, 'न्यूट्रि-नगेट' हा कोंबडीला चांगला पर्याय आहे म्हणण्यासारखे झाले. कोंबडी ती कोंबडी, आणि न्यूट्रि-नगेट ते न्यूट्रि-नगेट.
किंवा सोयाप्रोटीनचे शाकाहारी हॉटडॉग, बर्गरप्याटी वगैरे मिळतात, दिसायलाही हुबेहूब तस्सेच दिसतात, पण चवीत काहीही संबंध नसतो, फक्त 'हॉटडॉग', 'बर्गर' खाल्ल्याचे मनाचे समाधान, तसलाच प्रकार.
'साधारणतः तशी दिसते' यापलीकडे कोथिंबीर आणि पार्स्ली यांच्यात काहीही साम्य नाही. चवीत तर नाहीच नाही.
बाकी एकदा पार्ल्यात 'मेक्सिकन'च्या नावाखाली पनीर घातलेले काहीतरी असंबद्ध आणि एकदा पुण्यात नूडल्स घातलेले मिनेस्ट्रोनी सूप खाल्लेले आहे, तेव्हा या जगात कोण कशात काय घालून त्याला काय म्हणेल ते सांगवत नाही, यावर पूर्ण विश्वास आहे.
ती तरला दलालही असले काही ना काही अघोरी प्रकार करत असतेच, असे पुसटसे आठवते.
'इंडियन चायनीज़' हा प्रकार (अमेरिकेतही) सुप्रसिद्ध आहेच. (तसे 'चिनी भोजन' या नावाखाली जगात वेगवेगळ्या ठिकाणी जे काही मिळते, ती त्या जेवणाची स्थानिक मॉडिफाइड आवृत्तीच असते, असे वाटते.) पण कमीतकमी (निदान अमेरिकेत तरी) त्याला 'भारतीय पद्धतीचे चिनी जेवण' असे मार्केट केले जाते, हेही नसे थोडके.
तुम्ही तसे करा हवे तर. 'आमच्या पद्धतीचे इतालियन' म्हणा. मग काहीही हरकत नाही. (आम्हीही अधूनमधून पारंपरिक देऋब्रा पद्धतीने वाट्टेल त्यात वाट्टेल त्या ऐवजी वाट्टेल ते घालून कायकाय बनवून पहात असतोच की. आमच्या चवीला पटल्याशी कारण. बाकीचे जग गेले तेल लावत. डोक्याला.)
5 Apr 2011 - 9:34 pm | पंगा
शब्दाशब्दाशी सहमत आहे. (वजनासकट.) :)
6 Apr 2011 - 12:39 am | पंगा
का बरे, काका?
अळूवडीत करंदी घातली, तर बिघडत काहीच नाही, पण पदार्थाचे कुळशील बदलते*, असेही कोणास वाटू शकते. अळूवडी किंवा करंदी यांपैकी कशाचेही वावडे नसतानासुद्धा. पण म्हणून दुसर्या कोणाला जर तसे वाटत नसेल, तर त्याने असे काही करूच नये काय?
(* 'काशी होते' हे कोणी ठरवावे?)
आमच्या दक्षिणेत (तुम्हाला माहीत असेलच) ब्लॅक-आइड-पीची (महाराष्ट्रातल्या चवळीच्या उसळीच्या बर्यापैकी जवळ जाणारी) उसळ बनवतात. फक्त त्यात डुकराचे बारीकबारीक तुकडेसुद्धा घालतात. (बर्याच पालेभाज्यांतसुद्धा घालतात. किंबहुना कशात घालत नाहीत हा संशोधनाचा विषय आहे.) आता आम्हा भटांच्या परंपरेत चवळीच्या उसळीत डुकराचे तुकडे घालणे बसत नसल्याने आम्हाला (डुकराचे वावडे नसले, तरी) हे चमत्कारिक वाटते खरे. नव्हे, अगदी पदार्थाचे कुळशीलही बदलल्यासारखे वाटते. दाक्षिणात्यांना नाही तसे वाटत तर त्याबद्दल काही बोलणारे आम्ही कोण? कशाचे कुळशील कोणते ते आम्ही काय म्हणून ठरवावे?
ते चिनी लोक डंपलिंगे बनवतात. त्यांना 'उकडीच्या मोदकांत डुकरे घातल्याने पदार्थाचे कुळशील बदलते' म्हणून आम्ही सुनवावे काय?
शेवटी पदार्थाचे कुळशील वगैरे हे सर्व सापेक्ष नसते काय? ज्याच्यात्याच्या set ideasमधून (मराठी शब्द सुचला नाही; क्षमस्व.) घट्ट रुतून बसलेले?
याचा अर्थ एवढाच, की पु.लं.ना बॉबकट करून नाकात नथ घातलेली बाई बघण्याची सवय नव्हती. बाकी काही नाही. (त्यांच्या काळात नसतील करत कदाचित. त्यांचा प्रश्न.)
(अवांतर: बाकी पु.लं.ची वाक्ये ही ब्रह्मवाक्ये मानण्याची पद्धत नेमकी कधीपासून रूढ झाली? नाही म्हणजे, त्यांना त्यांची मते असू शकतात, प्रत्येकाप्रमाणेच त्यांनाही तो अधिकार आहे, वगैरे वगैरे सर्व मान्य आहे. पण म्हणजे बाकीच्यांनीही त्यांना ताबडतोब 'की जय' म्हणायला सरसावलेच पाहिजे काय? बर्याच ठिकाणी तर ते काहीच्याकाहीच मते मांडून गेलेले आहेत. केळ्याच्या शिक्रणीचे तर त्यांना फेटिश असावे बहुधा. ठिकठिकाणी ओढूनताणून केळ्याच्या शिक्रणीवर - आणि त्या अनुषंगाने अनेकदा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे केळ्याच्या शिक्रणीशी supposedly निगडित असलेल्या एका समाजावर, पण ते जाऊ द्या - उतरलेले आहेत. आणि काहीही मते मांडलेली आहेत. काहीही मताचे एक उदाहरणच द्यायचे झाले, तर 'केळ्याची शिक्रण ही आयत्या वेळी उपटलेल्या पाहुण्याची बोळवाबोळव आहे' म्हणे. आता कदाचित पु.ल. वाढले त्या वातावरणात किंवा परिसरात केळ्याची शिक्रण ही आयत्या वेळी उपटलेल्या पाहुण्यांच्या बोळवाबोळवीकरिता वापरली जात असू शकेलही - मला कल्पना नाही, परंतु वाढीच्या संस्कारक्षम वयात मनुष्य आपल्या आजूबाजूला जे पाहतो त्यावरून अनेकदा त्याची घट्ट मते बनतात आणि ती आयुष्यभर टिकतात, म्हणून ही अटकळ - पण म्हणून ही पद्धत सार्वत्रिक आहे या निष्कर्षावर उडी का मारावी? उदाहरणच द्यायचे झाले, तर आम्ही ज्या पुणे ४११ ०३० विभागात वाढलो, त्या विभागात आयत्या वेळी उपटलेल्या पाहुण्याची बोळवाबोळव केळ्याच्या शिक्रणीने होत नाही - 'जेवूनच आला असाल?' या प्रश्नाने होते - हे कधीकाळी पुण्यात वास्तव्य केलेल्या पु.लं. ना आम्ही सांगण्याची गरज असावी काय?
तर अशा या पु.लं.ची वाक्ये, केवळ 'ते पु.ल. होते' एवढ्याच कारणास्तव आपोआप ग्राह्य का धरली जावीत? पु.लं.नी ही वाक्ये लिहिली - rather, he got away with them - याबद्दल तक्रार नाही. त्यांच्या मनात आले ते त्यांनी लिहिले. त्यांना त्यांचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहेच. प्रश्न हा आहे, की ही वाक्ये जशीच्या तशी स्वीकारताना आणि जिकडेतिकडे दाखले म्हणून उद्धृत करताना आणि दाखले म्हणून स्वीकारताना बाकीच्यांची - यात आम्हीही आलोच - विचारशक्ती नेमकी कोठे केळ्याची शिक्रण खायला जाते? विचारवंतांची परंपरा असलेला महाराष्ट्र स्वतंत्र विचार करण्याची आपली क्षमता गमावून बसला आहे काय? केळ्यात फॉस्फरस असते हे लक्षात घेता हे आश्चर्यकारक आणि खेदजनक आहे. इत्यलम्.)
31 Mar 2011 - 12:07 pm | कच्ची कैरी
गविंशी पूर्णपणे सहमत !मीनक्की ट्राय करुन बघेल :)
31 Mar 2011 - 12:37 pm | परिकथेतील राजकुमार
आता फक्त काव्य आणि कलादालन राहीले आहे :)
31 Mar 2011 - 12:40 pm | गवि
असू द्या हो पराशेठ.
व्यासंग दांडगा असलेला काही वाईट आहे का?
"प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू आहे" असं स.त. कुडचेडकरांनी "केतकी पिवळी पडली" मधे म्हटलंय की नाही..
:)
31 Mar 2011 - 12:42 pm | विंजिनेर
हेच वाक्य पाचव्या खोलीत बसून मोठ्याने म्हटलं तर कसं वाटेल याचा विचार करतोय :)
31 Mar 2011 - 12:48 pm | वपाडाव
=))=))=))=))
ठॉ ठॉ ठॉ ठॉ
हे पर्या अन विंजीनेरच्या प्रतिसादांना
31 Mar 2011 - 12:48 pm | परिकथेतील राजकुमार
31 Mar 2011 - 12:53 pm | सूड
>>हेच वाक्य पाचव्या खोलीत बसून मोठ्याने म्हटलं तर कसं वाटेल याचा विचार करतोय
पाचव्या खोलीत बसून संकल्प करताना म्हणावं बहुधा. ;)
31 Mar 2011 - 3:39 pm | ५० फक्त
तो संकल्प ''पास्ता विथ व्हाईट सॉस.'' खाउन मग करायचा का आधी , हे सांगण्याची क्रुपा करावी.
31 Mar 2011 - 3:50 pm | सूड
आता ते ज्याचं त्यानं ठरवावं !! पास्ता ठीकै पण......असो.
31 Mar 2011 - 12:56 pm | गवि
जबरा..
काय कल्पना आहे..
हहपुवा...
:)
31 Mar 2011 - 1:50 pm | सूड
पाचव्या खोलीत आणि काय होणार !! :D
5 Apr 2011 - 11:09 am | चिगो
अयोय्यो.."फॉक्ककन" फुटलो की हो विंजिनेर...
31 Mar 2011 - 12:43 pm | गणपा
ही & ही प्रदिसाद. ;)
31 Mar 2011 - 12:53 pm | विनीत संखे
"आता लिहिणारच नाही जा!" असं म्हणून रागावून बसणे किती संयुक्तिक ह्याचा विचार करतोय.
31 Mar 2011 - 7:19 pm | रेवती
असं रागावून गेलात तर सुगरणींच्या तुलनेत आधीच कमी असलेली बल्लवांची संख्या कमी होइल.;)
1 Apr 2011 - 10:35 am | विनीत संखे
ठिक आहे ... मिसळपावची बॉयज पावर स्त्रीशक्तीइतकी सशक्त हवी... हे मीही मान्य करतो.
:)
31 Mar 2011 - 1:11 pm | विनायक प्रभू
मोहरी बरोबर थोडासा पावभाजी मसाला पण टाकावा.
लय भारी चव.
31 Mar 2011 - 3:28 pm | ५० फक्त
''मोहरी बरोबर थोडासा पावभाजी मसाला पण टाकावा.'' - म्हणजे पक्कं सोनिया गांधीनी नववारी नेसल्यासारखं वाटेल.
अवांतर - काल मॅचला त्या ड्रिंकच्या गाडित का बसुन होत्या?
पावभाजी मसाला चालेल तर, मटण मसाल्यानं काय घोडं मारलंय का मग,
असो, वारज्यात तुम्हाला जि-याची फोडणि दिलेल्या हक्का नुडल्स खायला मिळतील, आम्ही त्यांना अक्का नुडल्स म्हणतो.
, हा पण अजिनोमोटो घालुन अंडाभुर्जी फार मस्त होते आणि मॅगी मसाला घालुन, बटाट्याची काचरा भाजी.
तसंच, बडिशेप हा नॉन व्हेज मसाल्याचा अविभाज्य घटक्,पण तेच चार दाणे जर परतुन करंज्याच्या सारणात घातले ना तर लई भारी लागतं.
31 Mar 2011 - 3:40 pm | गवि
अशा फ्युजन पदार्थांवर एक नवीन धागाच हवा.
माझ्याकडून काही:
सोया चिल्ली.. धुळ्यात हा पदार्थ पाहिला. सोयाबीन वडी (शिजवलेले चंक्स किंवा गोळे) यांचा चायनीज अवतार. फार फेमस दिसला आणि लागतोही छान.
आईस्क्रीम मांचुरियन (आईसक्रीम पकोडा). बडोद्यात एके ठिकाणी पाहिला. बाहेरुन चरचरीत गरम आणि आत थंडगार आईसक्रीम. बडोदास्थित मेम्बरांनी अधिक काही सांगावे.
मिरचीचे तिखटसर आईसक्रीम. टेम्प्टेशन, राम मारुती रोड, ठाणे.
पोहे शिरा मिक्सचर.. करी रोड स्टेशनच्या पुलाखाली ठेला.
बटाटावडा, त्यावर पोहे आणि त्यावर तर्री .. धुळे.. अनेक गाड्यांवर.
डोसे तर कधीच चायनीज झाले आहेत. पावभाजी डोसा वगैरे अगदी कॉमन.
आणि कोणाला असले माहीत आहे का?
31 Mar 2011 - 5:52 pm | सखी
आईस्क्रीम पकोडा/वडा याची पाकृ स्वाती राजेशनी मागे दिली होती. चवीची गॅरंटी नाही, आपल्या जबाबदारीवर करणे :) . http://www.misalpav.com/node/9475
मी नुकतेच पान(विडा)-आईस्क्रीम खाल्ले, पानात जे घटक असतात ते व्हनिला आईस्क्रीम मध्ये घालुन परत फ्रिज केले होते, ते एकदम सही लागत होतं.
ही पद्धत येऊन बरेच दिवस झाले असावेत. गरम भारतीय गोड पदार्थ जसे गुलाबजाम, गाजर हलवाबरोबर कोणतेही आईस्क्रीम मस्त लागते.
विनित पास्ताची पाकृ आवडली, गविंनी दिलेले पाकृंचे उदाहरण आणि फोटोचे कारणही पटले.
31 Mar 2011 - 7:24 pm | यशोधरा
करुन पाहीन. चव चांगलीच येईल असे वाटते.
3 Apr 2011 - 8:57 pm | क्राईममास्तर गोगो
मोगॅम्बो खूष हुआ!
7 Apr 2011 - 10:17 pm | मनिम्याऊ
करुन बघितली ही पाककृती.. आवडली...अधिक लज्जत येण्यासाठी टोमाटो केचप घालुन बघा...
9 Apr 2011 - 3:35 pm | विनीत संखे
:-)