गाभा:
मला कृपया सांगा..
३१ मार्च च्या मध्यरात्रीपासून भारत लंका फायनल बद्दलचा sms अख्ख्या भारतात फिरला, तो एकाही मिपाकराला मिळाला नाही काय ? मला आज संध्याकाळी मित्राने त्याच्या mobile वर १ एप्रिल ला आलेला तो sms दाखवला. नंतर आता रात्री माझ्या मुंबईत रहाणार्या मुलीने तिला काल सकाळी तोच sms आला होता अस सांगितल. त्या sms मधल ९५ टक्के prediction खर निघालेल आहे. वाद होणार असेल आणि भावना दुखावणार असतील तर कृपया हा धागा लगेच उडवून टाकावा ही विनंती.
प्रतिक्रिया
4 Apr 2011 - 2:58 am | इनोबा म्हणे
मला ही काही मित्रांकडून तो एसएमएस आल्याचं कळलं. खासकरुन श्रीलंका पहिली बॅटींग करणार(टॉस ही दोनदा घेण्यात आला, यामुळे संशय जास्त बळावला), '२७० ते २७३'च्या आसपास धावा करणार', आणि 'सेहवाग पहिल्या ओव्हरमधेच आऊट होणार' हे जास्त शॉकींग वाटलं.
पण त्यातलं, तेंडूलकर सेंच्युरीच्या आसपास धावा करणार(९५ ते ९८) हे प्रिडीक्शन मात्र चुकलं. सर्वात महत्वाचं म्हणजे श्रीलंका जिंकणार हे प्रिडीक्शनही चुकलं. काही लोकांच्या मते सट्ट्यांचं गणित चुकवण्यासाठी आधीच फिक्स झालेल्या मॅचचं चुकीचं प्रिडीक्शन मुद्दाम पसरवण्यात आलं असावं.
मला तरी वाटते, की एप्रिल फुल म्हणून पाठवलेला एसएमएस योगायोगाने काही बाबतीत खरा ठरला. आणि लोकांनी त्याच गोष्टीला उचलून धरले.
खरं काय खोटं काय, माहित नाही. खरं नसेल तर बरंच आहे.
तो एसएमएस असा होता.
'SL (Sri Lanka) will bat first. SL will make 270-273 runs. Sehwag will be out in first over (he has already been paid Rs.23 crore in UBS-Swiss bank). Sachin will be 95-98 out. SL will win by just 1 run, for which Rs.251 crore paid to India.'
4 Apr 2011 - 4:16 am | असुर
इनोबा ठांकू!! हा नक्कीच 'एप्रिल फूल'चा प्रकार असणार, कारण हा मेसेज म्हणजे निव्वळ बकवास आहे!!
या मेसेजमधल्या प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण केलं तर कळून येईल की हे सगळे प्रेडिक्शन्स करायला फार कष्ट नाहीत!! कसं ते सांगतो -
SL (Sri Lanka) will bat first.
धोनीच्या टॉस जिंकण्याच्या सुरस आणि रम्य कथा पाहता संगाकारा टॉस जिंकून जाईल हे कुणीही सांगितलं असतं! पाकिस्तानविरुद्ध धोनी टॉस कसा काय जिंकला याचं आश्चर्य वाटावं अशी परिस्थिती आहे. त्यामुळे श्रीलंकेच्या टॉस जिंकण्याबद्दल बोलण्यात अर्थच नाही!
SL will make 270-273 runs.
या विश्वचषक स्पर्धेत आपण ज्या सुमार गोलंदाजीचं प्रदर्शन सुरुवातीपासूनच केल आहे ते पाहता श्रीलंका २७५ पर्यंत मजल गाठेल हे खरंतर कमीतकमी धावसंख्येचं भाकित कसं करावं याचं आदर्श उदाहरण आहे. श्रीलंकेचे फलंदाज ज्या फॉर्ममध्ये होते, ते पाहता त्यांनी ३०० गाठणं तर सहाजिकच होतं त्यामुळे अगदीच वेळ आलीच तर किमान २७५ कुठेच जात नाहीत हे या प्रेडिक्शनमागचं लॉजिक!!
Sehwag will be out in first over (he has already been paid Rs.23 crore in UBS-Swiss bank).
वीरेंद्र सेहवाग आणि लसित मलिंगा या काँबिनेशनचं परफेक्ट भाकित आहे हे.
सेहवागला ऑफ स्टंप बाहेरचे बॉल 'पॉईंट' आणि 'बॅकवर्ड गली' च्या डोक्यावरुन प्रेक्षकात मारायची विलक्षण हौस आहे. या आतातायी शॉट्सपायी तो अनेकदा स्लीपमध्ये किंवा थर्डमॅनला कॅच देऊन आऊट झालाय. तसंच ऑफ आणि मिडल स्टंपवरचे बॉल 'अॅक्रॉस द लाईन' मारायची त्याची खोडदेखील जगप्रसिद्ध आहेच.
लसित मलिंगा लोकांना तीन (ठळक) प्रकारे आऊट करण्यासाठी फेमस आहेच.
एक म्हणजे त्याचा जीवघेणा यॉर्कर, त्यापासून वाचायला बॅटचा कमीतकमी बॅकलिफ्ट आणि रिफ्लेक्स अॅक्शनचं हँड-आय को-ऑर्डीनेशन हवं!
दुसरी पद्धत म्हणजे आखूड टप्प्याचे मिडल स्टंपवर जाणारे फास्ट बॉल्स. टिपिकल एल्.बी.डब्ल्यु.!!!
आणि तिसरा म्हणजे हलक्या स्विंगचा बाहेर जाणारा बॉल. हलकासा स्विंग जो नेहेमीच्या बॉलसारखाच वाटून बॅट्समन कव्हर क्षेत्रात खेळायला जातो आणि मागे एक सोपा कॅच. (उदा. काल सचिनची विकेट अशीच गेली.)
आता मलिंगा आणि सेहवाग दोघंही जण समोरासमोर खेळणार, यात मलिंगाचं पारडं जड आहे कारण त्याची अचूक बॉल टाकायची कंसिस्टन्सी!! त्यामुळे सेहवाग त्याच्या बॉलिंगवर चचणार हे प्रेडिक्ट करणंसुद्धा सहाजिकच होतं!
Sachin will be 95-98 out.
हे वाक्य वाचून अतिशय वाईट वाटलं! जो मनुष्य गेली २०-२१ वर्ष जीव तोडून खेळतोय, त्यालादेखील या सट्ट्याच्या खेळात ओढलेला पाहून खरंच वाईट वाटलं! किमान सचिनला तरी सोडा की रे!!! आणि काल तो आउट झाल्यावर त्याच्या चेहर्यावर जे भाव होते ना, ते आणायला अगदी कसलेला अभिनेताही कमी पडला असता. त्यामुळे या वाक्यालाच शेकडो शिव्या!
SL will win by just 1 run, for which Rs.251 crore paid to India.'
रिझल्ट काय लागला ते आपण पाहतो आहोतच. त्यामुळे या वाक्याचा फोलपणा अजून वेगळा सांगायला नकोच!
खरंतर इनोबाचा वरील प्रतिसाद आल्यावर मी हे सगळं रामायण लिहायची विशेष गरज नव्हती , पन ते सचिनबद्दलचं वाक्य वाचून डोक्यात सणकच गेली! मग भले तो अगदी एप्रिल फूल करायचा मेसेज असेल..
--असुर
4 Apr 2011 - 5:21 am | गणपा
तु एवढा पोटतिडकीने बोलतोयस पण अश्या सुर्याजीच्या वंशजांना अनुल्लेखानेच मारलेलं बर रे असुरा.
जरा काही बरं झालेल पहावत नाही काहिंना.
बर हरले असते तर परत त्या बद्दलही ढोल बडवायला पुढे आले असते.
असो..
4 Apr 2011 - 6:43 am | रेवती
असूर म्हणतोय तसच असावं असं मानायला आवडेल.
4 Apr 2011 - 12:05 pm | सुधीर१३७
+१ ..................... सहमत..................
असले sms पाठविणार्यांच्या xxx xxx xxx ........................
4 Apr 2011 - 11:17 am | सुहास..
तो एसएमएस वाचल्यावर लगेच फाट्यावर मारण्यात आला होता .
धन्यवाद ..
बाकी आता (टॅक्सलेस ) बक्षीसांची खैरात आणि स्वताची पे-स्लिप पाहुन मात्र त्रास होतो आहे
4 Apr 2011 - 12:06 pm | सुधीर१३७
इनो घ्या.......................... जळजळ थांबवा..................... :wink:
ह. घ्या. ....
4 Apr 2011 - 2:37 pm | रमताराम
मुळात म्याचेस पूर्णांशाने फिक्स करता येतात असे म्हणणे हे असे म्हणणार्याच्या डोक्याचा आतील आवश्यक इंद्रिय गायब असल्याचे लक्षण आहे असे आम्ही मानतो. त्यामुळे 'कॉन्स्पिरसी थियरी' आवडणार्यांच्या मूर्खपणाचा वापर करून आपले उखळ पांढरे करून घेणार्या टेलिकॉम कंपन्यांना मदत करण्याचा आम्ही चुकूनसुद्धा प्रयत्न करीत नाही. धन्यवाद.
5 Apr 2011 - 7:14 pm | गणेशा
हे सगळॅ खोटेच आहे ..
आणि सचिन च्या रन्स.. मॅच चा रिझल्ट येव्ह्डे चुकीचे लागुनही आपण ९५ % बओबर कसे म्हनुन शकतो ? यावरुन कदाचीत आपण ही तसेच समजतो आहे की मॅच फिक्स आहे.
असो .
सचिन हा खराखुरा जंटलमन आहे.. आणि मुद्दामुन काहीच करत नाहि ..
बर्र ..
मला एक कळत नाहि टॉस हा आधीच कसा फिक्स करता येतो ..
5 Apr 2011 - 7:41 pm | सखी
असुर तुमची सविस्तर प्रतिक्रिया वाचुन बरे वाटले. काही वर्षांपूर्वी जेव्हा प्रथमच मॅच फिक्सिंगचे स्कॅन्डल उघडकीस आले तेव्हापासुन काही लोक ताकसुद्धा फुंकुन पीत असणार, पण यामध्ये सचिनसारख्या लोकांवर अन्याय होतो आहे हे त्यांना कसे कळणार.
गणेशा - मला एक कळत नाहि टॉस हा आधीच कसा फिक्स करता येतो ..
- हा, हा, हा - हे मस्तच. तुमची रास कन्या आहे का हो? :)