शून्याची महती

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जे न देखे रवी...
21 Jun 2008 - 8:05 am

एकदा "दोन" म्हणे "एकाला"
आहेच मी तुझ्या पेक्षा मोठाला
ऐकून हे वाटे "तिनाला"
माहीत नाही का "एक" आणि "दोनाला"
मीच आहे त्यांच्या पेक्षा मोठाला

दोन शिंगी "चार" होता आपल्या घरात
हे संभाषण गेले त्याच्या कानात
ओरडून तो म्हणाला वरच्या आवाजात
ऐकल कारे "एक" "दोन" आणि "तिना"
"पांच" "सहा" "सात" "आठ"आणि मीना
कबूल झालो आहो "नऊना"
तेच आहेत आमच्या पेक्षा मोठे

"शून्य" बिचारा कोपर्यात होता बसून
ऐकून सारे आले त्याला भरभरून
स्वतःशीच म्हणाला
ठाऊक नाही त्यांना माझी किंमत
घेऊन मला शेजारी,जेव्हां
एखादा दाखवील हिम्मत
वृद्धि होईल त्याची कळत नकळत

सूर्य,चन्द्र,तार्यांचा आहे
माझ्या सारखा आकार
पण सांगतात का ते कधी
आमचाच आहे सर्वांवर अधीकार

नको स्वतःची शेखी मिरवूं
चढावर वरचढ असतो छपून
करा बेरीज अथवा गुणाकार
सगळे मिळून त्यामूळे
घ्याल तुम्ही तुमची किंमत वाढवून
लागू नका भागाकार वा
वजाबाकीच्या नादाला
लागेल ग्रहण तुमच्या किंमतीला

"एकाने" केली तक्रार "शून्याकडे"
नाही उपयोग माझा
करताना गुणाकार वा भागाकार
त्यावर
"शून्य" म्हणाला त्याला
करशील तूं वृद्धि बेरीज करताना
नंतर
"शून्य" विचारतो "एकाला"
आहे का माझा उपयोग
बेरीज करताना
खोड मात्र मोडतो मी
गुणाकार करताना

तात्पर्य काय?
म्हणे "शून्य" ईतर आकड्याना
"कमी लेखू नका कुणा
वेळ आली असताना
"शून्यसम"आकडाही
होत्याचे नव्हते
करतो सर्वाना"
श्रीकृष्ण सामंत

कविता

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

21 Jun 2008 - 8:58 am | विसोबा खेचर

शून्याची मजेशीर कविता आवडली! :)

आपला,
(शून्यातला) तात्या.

रामदास's picture

21 Jun 2008 - 9:05 am | रामदास

पहिलं प्रेम कळत नाही .कळून ते टळेल का?
पहिलं मरण टळत नाही , टळून तेही कळेल का?
कळो टळो मरो उरो पहिला लाभ शून्याचा.
माझ्या लेखी मरण तेच प्रेम तेच
(रेग्यांची कविता आहे बहुतेक.)

कौस्तुभ's picture

21 Jun 2008 - 10:31 am | कौस्तुभ

सुंदर !!!

काळा_पहाड's picture

21 Jun 2008 - 2:20 pm | काळा_पहाड

शून्याची कविता आवडली.
काळा पहाड

चतुरंग's picture

22 Jun 2008 - 5:44 am | चतुरंग

शेवटी काय, 'सबका मालिक एक, शून्य'!

चतुरंग

शितल's picture

22 Jun 2008 - 7:40 am | शितल

छान कविता.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Jun 2008 - 9:34 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सामंत साहेब,
शुन्याची कविता मस्त आहे.