गाभा:
भारत वि. पाक हा सामना बघण्याची उत्सुकता सर्वांना असते त्यात आजचा सामना म्हणजे विश्वचषक २०११ चे दुसरे सेमिफायनल त्यामुळे प्रत्येकाने सामना बघण्यासाठी विषेश तयारी केली असेलच..
आपल्या पंतप्रधानांनी तर हा सामना बघण्यासाठी फारच विषेश तयारी करत त्याच्या खास......... आमंत्रण दिलेले आहे..
तर आजचा सामना बघ्याण्यासाठी तुम्ही काय काय आणि कशी तयारी केली...
सामना चालु झाल्यानंतर सामन्याचे धावते वर्णन आपण आपल्या मिपाच्या खास शैलित करुच..
प्रतिक्रिया
30 Mar 2011 - 9:15 pm | सखी
हे पाठवलं त्याला! लगे रहो भज्जी :)
30 Mar 2011 - 9:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मुनाफने भारी टाकली ओव्हर. पण विकेट काढा रे कोणीतरी.
30 Mar 2011 - 9:13 pm | प्रशांत
भारी टाकली ओव्हर तरी चालेल...
30 Mar 2011 - 9:14 pm | अनामिक
विकेट्च पाहिजे... शेवटी अंगावर येतील नाहीतर...
30 Mar 2011 - 9:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
येस्स,,,,,,,,,,,,,,,गेली विकेट.
शाब्बास भज्जी.
30 Mar 2011 - 9:14 pm | इरसाल
अकमल ला आवरा किडक ,महाग पडेल नंतर.
चालला भज्जी काय करतोय वॉव गेलारे ..................
30 Mar 2011 - 9:15 pm | प्रशांत
५ वि विकेट गेली अकमल
30 Mar 2011 - 9:15 pm | मराठे
अकमल आऊट !!!
30 Mar 2011 - 9:15 pm | अनामिक
आउट झालारे!!!!!
धद्दड - तत्तड धद्दड - तत्तड धद्दड - तत्तड धद्दड - तत्तड....
30 Mar 2011 - 9:18 pm | निनाद मुक्काम प...
हरभजन
''सिंग इज किंग''
आफ्रिदी घाबरला
तंबूत लपून बसला .
30 Mar 2011 - 9:17 pm | इरसाल
आता एकच राहिला म्हणावा तसा आफ्रिदी त्याला गुंडाळला कि ममं वर्ल्डकप प्रीत्यर्थ इति म्हणायला मोकळे
30 Mar 2011 - 9:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
साला रज्जाक गेला ना की आपण विजयाच्या जवळ पोहचलोच समजा.
-दिलीप बिरुटे
30 Mar 2011 - 9:23 pm | इरसाल
रज्जाक पूर्वीसारखा राहिला नाही हो साहेब पूर्वी तो आला कि स्क्रीन पूर्ण लाल दाखवायचे सगळ्या देशांना धसका दिला होता
पण आफ्रिदीचा काय नेम नाय साला सुटला तर वळूसारखा आवरणे मुश्कील
30 Mar 2011 - 9:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
रज्जाकही पूर्वीसारखा नाही आणि आफ्रिदीही आज चालणार नाही.
दोघांच्याही विकेटा काढणे गरजेचे. कधी पडणार विकेट ?
30 Mar 2011 - 9:31 pm | मराठे
गेला!
30 Mar 2011 - 9:28 pm | पिवळा डांबिस
काय नुसती गडाबड करतांय रे मुलांनो?
जरा पाकिस्तानचा स्कोअर सांगा ना!
(भारताचा कळला वर...)
30 Mar 2011 - 9:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काका,प्लीज स्कोर कुठे विचारताय.
सामना जिंकायला किती वेळ आहे असे विचारा. ;)
30 Mar 2011 - 9:31 pm | सखी
PAK 150/6 (36.2 Ovs) - RR ८ च्या वर गेलाय त्यांचा :)
30 Mar 2011 - 9:28 pm | स्पा
राझाक्क गेला रे गेला
30 Mar 2011 - 9:29 pm | इरसाल
गेला रे ssssssssssssssssss
साहेब बोललो होतो न
30 Mar 2011 - 9:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
रज्जाक गेला साला.आता आफ्रिदी राहीला. म्याच जिंकतो आपण.
30 Mar 2011 - 9:35 pm | सखी
लगेच पाठवला पाहीजे. मिसबाहला खेळ म्हणावं पाहीजे तेवढं ३९ बॉल मध्ये १६ धावा काढल्यात.
30 Mar 2011 - 9:30 pm | आनंद
रज्जाक गेला ना
30 Mar 2011 - 9:30 pm | इरसाल
१५०/६
30 Mar 2011 - 9:34 pm | पिवळा डांबिस
यापुढे तुमच्या प्रत्येक धाग्याला पॉझिटिव्ह प्रतिसाद आमच्याकडून!!
:)
30 Mar 2011 - 9:31 pm | निनाद मुक्काम प...
मुनाफ और नेहरा
मेरे
करन, अर्जुन ( जियो खिलाडी ....)
30 Mar 2011 - 9:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नेहराच्या किती राहिल्या ओव्हर्स ?
30 Mar 2011 - 9:32 pm | स्पा
मिस्बाह ला पेटी पोचली वाटत
त्याच खेळणं सपशेल खोट वाटतंय
एकदाही तो रन काढण्याचा प्रयत्न करताना दिसलेला नाहीये
30 Mar 2011 - 9:34 pm | इरसाल
पैज लावा आफ्रिदी लाँग ऑफ किंवा लाँग ऑन ला कॅच देणार......................
30 Mar 2011 - 9:34 pm | प्रशांत
आता अफ्रिदीचा नंबर आहे
फटाके तयार ठेवा...
२१० च्या आत ऑल आउट..
30 Mar 2011 - 9:37 pm | इरसाल
सखी आणि यशोधरा ची नजर काढावी लागेल त्यांचा म्हणणं खरं ठरतेय.त्यांना दृष्ट न लागो
दोघींना पार्टी काय पायजेल बोला ................................
30 Mar 2011 - 9:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सखी आणि यशोधरा ची नजर काढावी लागेल त्यांचा म्हणणं खरं ठरतेय.त्यांना दृष्ट न लागो
आफ्रिदीच्या मुसक्या बांधा बरं लवकर.
-दिलीप बिरुटे
30 Mar 2011 - 9:41 pm | सखी
ओके चार मुसक्या फॉर आफ्रिदी टु गो :)
30 Mar 2011 - 9:41 pm | सखी
ओके चार मुसक्या फॉर आफ्रिदी टु गो :)
30 Mar 2011 - 9:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आफ्रिदी गेला. सखी पाय इकडे करा. नमस्कार करतो. :)
-दिलीप बिरुटे
30 Mar 2011 - 9:38 pm | पिवळा डांबिस
प्राडॉज्योतिषी, सामना जिंकायला किती वेळ आहे?
30 Mar 2011 - 9:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कुंड्ल्यांची मांडामांड चालू आहे. ग्रह,तारे,स्थळ,काळावरुन विजय निश्चित आहे.
विजयाच्या मार्गात काही विघ्न आहेत पण मीच सुट्यांमधे मुंबईला सिद्धीविनायकाला
एकविस रुपये कबूल केलेले असल्यामुळे विघ्न दूर होऊन भारतीय प्रमाण वेळेला ठीक रात्री
११:०० वा. विजय निश्चित आहे. त्युसुनामीमुळे पृथ्वी काही अंशात वळली असल्यामुळे
काही अनपेक्षित बदल होऊ शकतात.
च्यायला, या अंफायरांच्या उगाच रक्तदाब वाढवत आहे. :)
30 Mar 2011 - 9:45 pm | मराठे
त्या आफ्रिदीला घ्या रे (जमलं तर हक़ ला पण घ्या)
30 Mar 2011 - 9:49 pm | इरसाल
साहेब बिल्ली नि बोटं वाकडी न्हाय केली राव
पण नेहराचा वाकडा झाला वाटतंय
30 Mar 2011 - 9:49 pm | अनामिक
बरं झालं युवराज च्या १० संपल्या...
30 Mar 2011 - 9:52 pm | इरसाल
जिंकलो तर हि घ्या पार्टी अदुगरच तयारी ठीव्तुया करून
आंतरजालावरून साभार
30 Mar 2011 - 9:55 pm | प्रशांत
अफ्रिदि गेला रे ...
30 Mar 2011 - 9:58 pm | सखी
ये धत्तड तत्तड!!..ये धत्तड तत्तड!!..ये धत्तड तत्तड!!..ये धत्तड तत्तड!!..ये धत्तड तत्तड!!
30 Mar 2011 - 9:58 pm | अनामिक
धत्तड तत्तड!!..ये धत्तड तत्तड!!..ये धत्तड तत्तड!!..ये धत्तड तत्तड!!..ये धत्तड तत्तड!!
30 Mar 2011 - 10:01 pm | आनंदयात्री
आमच्या गविंच्या भाषेत .. हगला अफ्रिदी !!
धत्ताड तत्ताड !!
30 Mar 2011 - 9:56 pm | इरसाल
दिला कि नाय कॅच
30 Mar 2011 - 9:56 pm | विकास
विकेट!
30 Mar 2011 - 9:58 pm | निनाद मुक्काम प...
सच्चू आमचा सामनावीर
30 Mar 2011 - 9:59 pm | प्रशांत
फुलटॉस वर अफ्रिदि आउट...
हे कोणाला जमते काय म्हणुन तर म्हनतात
सिंग इज किंग
30 Mar 2011 - 10:00 pm | मराठे
आफ्रीदी गेला!!!!! आता फक्त मिस्बाह हक!
30 Mar 2011 - 10:03 pm | इरसाल
सखी , यशोधरा अजून एकडाव म्हणा बघू मागचा श्लोक म्हंजी मिस्बाह भी जाईल परत
30 Mar 2011 - 10:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सखी , यशोधरा अजून एकडाव म्हणा बघू मागचा श्लोक म्हंजी मिस्बाह भी जाईल परत
-दिलीप बिरुटे
30 Mar 2011 - 10:05 pm | इरसाल
अरे त्या नेहराला आवरा किती जीवतोड प्रयत्न चाललाय त्याचा वाएड बॉल टाकायचा बरं तो तीकडचापण तसाच भेटला
30 Mar 2011 - 10:07 pm | इरसाल
मला एक शंका येतेय मिस्बाह कदाचित २०-२० ची पुनरावृत्ती साठी खेळत नाहीये न ?
30 Mar 2011 - 10:07 pm | सखी
अहो इरसाल वरी नॉट, मिस्बाह टेस्ट मॅच असल्यासारखा खेळतोय. भज्जी आला परत, बघुया तो उडवतोय का अजुन एक दांडी
30 Mar 2011 - 10:09 pm | अनामिक
मिस्बाहला पाठवा रे परत...
सखी, यशोधरा.... म्हणलाय की नाही श्लोक???
30 Mar 2011 - 10:10 pm | मराठे
हरभजन च्या ओव्हर संपल्या! पावरप्ले साठी ठेवायला पाहिजे होती का एक ओव्हर?
30 Mar 2011 - 10:12 pm | इरसाल
आयला हे लय भारी चाललंय संपल्या ओवर कि जा मध्ये विश्रांतीसाठी
नेहरा काय २० ओवर टाकतोय काय आज ? संपत कश्या नाहीत अजून ?
30 Mar 2011 - 10:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नेहरा चक्क चांगली गोलंदाजी करतोय.
तेही शेवटच्या काही षटकांमधे ?
30 Mar 2011 - 10:14 pm | अनामिक
बिरुटे साहेब... दृष्ट नका लावू नेहराला... आत्ताच तर कुठे टाकतोय बरा....
हे काय... रियाझ आउट!
धत्तड तत्तड!!..ये धत्तड तत्तड!!..ये धत्तड तत्तड!!..ये धत्तड तत्तड!!..ये धत्तड तत्तड!!
30 Mar 2011 - 10:15 pm | सखी
येक पण रन दिली नाही या ओव्हर मध्ये आणि विकेट पण घेतली ना!! म्या सांगितल व्हत वरी नॉट!!
1 Apr 2011 - 12:45 pm | प्रशांत
नेहरा फायनल खेळणार नाहि म्हणे
मग कोणाला घेणार आता?
30 Mar 2011 - 10:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
:)
30 Mar 2011 - 10:15 pm | इरसाल
डागदर सायेब नेहरा भविष्य वाचवायच्या मागं दिसतया
30 Mar 2011 - 10:16 pm | इरसाल
सखी यशोधरा काय यज्ञ लावून बसल्यात काय ?
30 Mar 2011 - 10:17 pm | विकास
पाकच्या दोनशे होयच्या आत येथे दोनशे प्रतिसाद!
30 Mar 2011 - 10:21 pm | मराठे
गुल की दांडी गुल करो!!!!
30 Mar 2011 - 10:24 pm | प्रशांत
उमर गुल ... गुल झाला रे
30 Mar 2011 - 10:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नेहरा, मी काही चूक बोललो असेल तर मला माफ कर रे बाबा. :)
30 Mar 2011 - 10:26 pm | इरसाल
बिरुटे साहेब एकमुखाने एकदा माफी मागून घ्यावी म्हणतोय नेहराची साथ द्याल काय ?
30 Mar 2011 - 10:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नेहरा काही दिवसापासून तुमच्या परफॉर्मन्सवर मी काही चूक बोललो असेल
तर एक डाव माफ कर रे भो.
-दिलीप बिरुटे
(पायाचा अंगठा धरुन वाकलेला )
30 Mar 2011 - 10:31 pm | इरसाल
बिरुटे साहेब लीनतेने भरपूर असा प्रतिसाद मीही येतो अंगठे धरायला
30 Mar 2011 - 10:24 pm | इरसाल
गेलं भैताड
30 Mar 2011 - 10:26 pm | सखी
९ गेले, एकच राहीला.... ये धत्तड...
30 Mar 2011 - 10:32 pm | प्रशांत
नेहरा १० ओव्हर ३३ रण २ छान्...
अभिनंदन हो...
30 Mar 2011 - 10:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
१५ चेंडूत ४२ धावा होणार तर नाही ना ?
-दिलीप बिरुटे
(शंकाग्रस्त)
30 Mar 2011 - 10:33 pm | Pearl
जिंकलो!!!!!!! :-)
(.. सर्वांना in advance;-) शुभेच्छा)
आता फक्त formality बाकी आहे :-)
30 Mar 2011 - 10:36 pm | अनामिक
जहीर खान... ५ वाईड... २ फोर... टोट्ल १४ रन्स इन अ ओव्हर... आर यु किडिंग मी?
30 Mar 2011 - 10:37 pm | इरसाल
पर्ल काय हे
बिरुटे साहेब नसत्या कुशंका नका हो काढू आधीच तो मारायाला लागलाय पेटीत काही पैसे कमी दिसतायेत
30 Mar 2011 - 10:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गोलंदाजावर विश्वास नसल्यामुळे सहा चेंडुत तीस धावा होतील असेही वाटते.:(
पण आता जिंकलो. :)
-दिलीप बिरुटे
30 Mar 2011 - 10:40 pm | यशोधरा
पुढच्या ५ बॉलात जाऊदेत मेला शेवटचा पाक खेळाडू. आमेन.
30 Mar 2011 - 10:41 pm | सखी
आमेन! आलीस गं शेवटच्या ओवरमध्ये
30 Mar 2011 - 10:42 pm | अनामिक
आमेन!
30 Mar 2011 - 10:48 pm | यशोधरा
हायला खरच गेला! आणि जिंकलो!!!!!! यीप्पी!!!
30 Mar 2011 - 10:44 pm | Pearl
२ बोल ३० रन
30 Mar 2011 - 10:43 pm | गणपा
य्य्य्य्ये ढिंगं चॅक ढिंगचॅक ढिंगं चॅक ढिंगचॅक ढिंगं चॅक ढिंगचॅक ढिंगं चॅक ढिंगचॅक ढिंगं चॅक ढिंगचॅक ढिंगं चॅक ढिंगचॅक ढिंगं चॅक ढिंगचॅक ढिंगं चॅक ढिंगचॅक ढिंगं चॅक ढिंगचॅक ढिंगं चॅक ढिंगचॅक ढिंगं चॅक ढिंगचॅक ढिंगं चॅक ढिंगचॅक ढिंगं चॅक ढिंगचॅक ढिंगं चॅक ढिंगचॅक ढिंगं चॅक ढिंगचॅक ढिंगं चॅक ढिंगचॅक ढिंगं चॅक ढिंगचॅक ढिंगं चॅक ढिंगचॅक ढिंगं चॅक ढिंगचॅक ढिंगं चॅक ढिंगचॅक ढिंगं चॅक ढिंगचॅक
30 Mar 2011 - 10:45 pm | सखी
य्य्य्य्ये ऑल डाऊन केलाच शेवटी :) :) :)
30 Mar 2011 - 10:59 pm | पिवळा डांबिस
शाब्बास रं माज्या वाहागांनो!!!!
:)
30 Mar 2011 - 10:44 pm | स्मिता.
ये धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!! :)
30 Mar 2011 - 10:46 pm | इरसाल
आल्या दोघी म्हणजे आपणा नक्की जिंकणार
30 Mar 2011 - 10:46 pm | इरसाल
आल्या दोघी म्हणजे आपणा नक्की जिंकणार
30 Mar 2011 - 10:47 pm | Pearl
जिंकलो!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
30 Mar 2011 - 10:50 pm | मदनबाण
पाकडे हरले !!!
ढिंच्याक ढिंच्याक ढिंग !!! :D
30 Mar 2011 - 10:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काथ्याकूटात सहभागी सर्वांचे आणि वाचकांचेही अभिनंदन.
मजा आली.
-दिलीप बिरुटे
(आनंदाने वेडा झालेला)
30 Mar 2011 - 10:53 pm | सखी
काथ्याकूटात सहभागी सर्वांचे आणि वाचकांचेही अभिनंदन. मजा आली.
-- अगदी हेच म्हणते. त्यासाठी मिपाचे अनेक, अनेक धन्यवाद. दुरदेशी असल्याने याचे महत्व मला जास्तच जाणवतयं आणि मिपाकरांबरोबर सहभागी झाल्याने आनंद अधिक वाढला.
31 Mar 2011 - 9:07 am | निनाद मुक्काम प...
अगदी हेच म्हणते. त्यासाठी मिपाचे अनेक, अनेक धन्यवाद. दुरदेशी असल्याने याचे महत्व मला जास्तच जाणवतयं आणि मिपाकरांबरोबर सहभागी झाल्याने आनंद अधिक वाढला.
+१
30 Mar 2011 - 10:52 pm | विकास
वेलकम टू मुंबई!
31 Mar 2011 - 9:13 am | निनाद मुक्काम प...
शनिवार आमच्या हनुमानाचा
त्यामुळे लंका दहन निश्चित
आमचे येथील तमिळ श्रीलंकन निर्वासित ह्या दिवसाची व क्षणाची मनापासून वाट पहात आहे .
अवांतर
वानखेडेवर महाराष्ट्र व मुंबईतील कोणते राजकीय नेते येण्याची शक्यता आहे ह्या वर कौल पाडण्याचा मनसुबा आहे .
पवार साहेब हा पर्याय त्या कौलात नाही . .कारण ते ह्या खेळा संबंधी संघटनेत मोठ्या पदावर आहेत.
त्या अर्थी त्यांची उपस्थिती आवश्यक व अनिवार्य आहे .
मग इतर मराठ मोळे कोणते राजकीय नेते येऊ शकतात ?
31 Mar 2011 - 11:17 am | नन्दादीप
आपले राज साहेब तर असायलाच हवेत...!!!
अंदर की बात : सच्चू कडे वशिला लावून एक तिकिट मिळवलय त्यांनी...
30 Mar 2011 - 10:52 pm | चिगो
हे धत्तड तत्तड धत्तड तत्तड..... मार डाला..
(येडावलेला) चिगो
30 Mar 2011 - 10:53 pm | पैसा
हे धत्तड धत्तड!
हे धत्तड धत्तड!
30 Mar 2011 - 10:53 pm | प्रशांत
घर जा बेटा पाकिस्तान फायनल जितेंगा तेरा बाप हिंदुस्तान..
30 Mar 2011 - 10:53 pm | चतुरंग
हुश्श जिंक्लो एकदाचे!
30 Mar 2011 - 11:05 pm | वाहीदा
ऐ वतन... ऐ वतन ..हमको तेरी कसम,
तेरी राहोंमें जां(न) तक लुटा जाऎगें !
फुल क्या चिज है ?
तेरे कदमोंमें हम भेट अपने सरोंकी चढा जाऎगें :-)
वर्ड कप हमारा है !
30 Mar 2011 - 11:05 pm | प्रास
जिंकलो.... :-)
30 Mar 2011 - 11:14 pm | मुलूखावेगळी
जिन्कलो
प्राइम मिनिस्टर हो तो पाकिस्तान के गिलानी जैसा ,
जो अपने टीम को खुद ही लेने आया हो ;)
30 Mar 2011 - 11:10 pm | मुलूखावेगळी
नेहराला आज माफी
30 Mar 2011 - 11:12 pm | प्रीत-मोहर
फायनल जिंकल्या गेली आहे :)
ये धत्तड तत्तड!! ये धत्तड तत्तड!! ये धत्तड तत्तड!! ये धत्तड तत्तड!! ये धत्तड तत्तड!! ये धत्तड तत्तड!!
30 Mar 2011 - 11:26 pm | Pearl
सचिनच होणार :-)
30 Mar 2011 - 11:55 pm | प्रशांत
What an excellent example of event management
'Mohali is so close to pak border that
.
.
players can go home by autoriksha
and gilani will drive autoriksha for safty reason
30 Mar 2011 - 11:59 pm | नीलकांत
आज नागपुर रस्त्यावर आलंय...
सदर भाग, बर्डी, रामदास पेठ, सिव्हील लाईन्स सुध्दा ओसंडून वाहतंय नुसतं लोकांनी...
चौका चौकात ढोल ताशे , फटाके , घोषणाबाजी चालू आहे. लोक आपल्या गाड्या काढून रस्त्यावर येत आहेत.
बेहोश होऊन नाचताहेत...
धक धक गो ! इंडीया गो... !
हे....... जिंकलो रे.......!
सिव्हील लाईन एरीयात दिवसा सुध्दा एवढे लोक रस्त्यावर नसतात. :)
आजची मॅच झकास झाली नेहरा सहीत सर्व झकास खेळले. शेवटी आपण जिंकलो हे खरं.
- नीलकांत
31 Mar 2011 - 12:18 am | नगरीनिरंजन
आत्ताच सिंगापूरात पाकिस्तानी पब्लिक समोर "जय हो" वर गणपती डान्स करून आलो आहे आणि इथे ही झुंबड! मजा आ गया! यावर एक सविस्तर वृत्तांत लिहीला जाणे आवश्यक आहे!
31 Mar 2011 - 8:54 am | पप्पुपेजर
क्या बात मी पण तिथेच होतो !!!! लई मजा आलि बोट कि rocks......!!!!!!!
31 Mar 2011 - 12:25 am | प्राजु
मजा आली वाचून... मी सुद्धा सामिल व्हायला हवं होता या इथल्या कॉमेंट्रीमध्ये..
पण मजा आली राव!! जिंकलो!! येस्स!
31 Mar 2011 - 1:49 am | विकास
भारत जिंकतोय का पाकीस्तान या तणावापेक्षा अतिरेक्यांनी जिंकू नये या प्रचंड तणावाखाली राहून कार्यरत असलेल्या सुरक्षा यंत्रणेच देखील या यशस्वी खेळानिमित्त अभिनंदन आणि पुढील कामासाठी शुभेच्छा!
31 Mar 2011 - 3:17 am | धमाल मुलगा
खरंय!
खरं म्हणजे ह्याला 'irony' म्हणायला हवं अशी अवस्था. पण असो. "नाविलाजका दुसरा नाम मो.क.गांधी होता है" असं आमचा एक मित्र म्हणतो.
31 Mar 2011 - 10:54 am | वपाडाव
अगदी +१००
यांच्यामुळे सगळं काही शांततेत पार पडलं....
31 Mar 2011 - 2:53 am | निनाद
मी ही हेच म्हणत होतो की काहीही झाले तरी पाकडे हरावेत. विकास यांच्या प्रमाणेच त्यासाठी मॅच पाहिली नाही! :)
31 Mar 2011 - 2:54 am | धमाल मुलगा
काफरों ने फिर मात दे दी! ;)
य सिलसिला कब खत्म होगा? ;)
माऽऽयला...
दिसभर हापिसात सडलोय..कामानं वझ्यानं गाडाव...नाय नाय..डुक्कार झालोय! क्रिकेट तसा आपल्याला फार आवडत नाय अन कळतपण नाय, पण भारत-पाकिस्तानची म्याच म्हणजे दळभद्री विच्चारजंतांच्या भाषेत 'आम्हा माथेफिरुंची पर्वणी' :)
सालं, घरी पोचयला रोज अर्धा-पाऊणतास लागतो, पण आज तब्बल अडीच तास लागले..अहो लागणारच..भेंडी, रस्त्यात सापडणार्या प्रत्येक ग्यांगसोबत नाचत, गुलाल उधळत्,रंगवत आलोय.
पुण्यात सालं दिवाळी काय, दिवाळीचा बाप साजरा झालाय. वाईट एकच वाटतंय, बाबु गेनु चौकात "आऽऽ देखे जराऽऽ..किस में कितना है दम्म..." वर नाचायला न्हाई मिळालं. :)
साला तो वर्ल्डकप मिळो न मिळो.... अक्करमाश्या पाकड्यांची कचकचून ठासली ह्याचा आनंद त्या कपापेक्षा थोरला आहे आमच्यासाठी...
अवांतरः ऐन शनवारातली येक आरोळी : एक दोन तीन चार, पाकिस्तानची पोरं भिकार..
अतिअवांतरः बाबु गेनु चौकातली "भारताचा कोंबडा, पाकिस्तानची कोंबडी....XXXX...XXXX" ही आरोळी सभ्यतेच्या बुरख्यामुळं लिव्हता येईना...माफी असावी. :D
31 Mar 2011 - 3:04 am | रमताराम
आमी फुल्ल शेकंड इणिंग पूणममदे बसून पायली . सम्दे अनोळखी लोक पन दोस्त झालेले. येकदम मंतरलेली वेळा. सगळे मिळून 'एक वडा दोन पाव... पाकिस्तान xxxx', 'एक वाटाणा कच्चा...., (अश्लील उत्तरार्ध पुरा लिहू शकत नाही, क्षमस्व) 'गणपतीबाप्पा मोरया' , 'जय भवानी जय शिवाजी' वगैरे घोषणा खच्चून ओरडत होतो. सगळे साले एका संध्याकाळपुरते दोस्त झालेले. शेवटची विकेट पडली नि सॉल्लिड कल्ला केला. बाहेर आलो तर सगळीकडे भगवे, तिरंगे झेंडे घेउन पोरे लोक घोषणा देत हिंडत होते. मझा आला यार. बरेच दिसांनी कालिजातला एक दिवस जगल्यासारखा वाटला.
31 Mar 2011 - 3:17 am | धमाल मुलगा
नादच खुळा!
पूनमला काय हवा असेल ह्याची कल्पना आहे राव.
फुल्ल धिंगाणा.कॉम.
31 Mar 2011 - 10:56 am | वपाडाव
धमुराव...
अख्ख्या फर्ग्युसनवर सुरुवातीला कर्फ्यु अन नंतर जल्लोष त्येबी असला की च्यामारी नजर लागावी.. १:३० वाजेस्तोवर फुल्ल दंगा सुरु व्हता....
31 Mar 2011 - 12:13 pm | वाहीदा
काफरों ने फिर मात दे दी!
य सिलसिला कब खत्म होगा?
यह लढाई दो वतन की हो सकती है, दो मजहबोंकी कभी भी नहीं
कृपया , धर्माला मध्ये आणू नये ही विनंती
असो,
जीत की खुशियां हमारे साथ साथ आपको भी मुबारक हो !
North or South.. East or West , India is THE BEST :-)
31 Mar 2011 - 2:14 pm | मृत्युन्जय
you have got a point and that is why I found even this statement to be out of contex
"मज्जा ! आमच्या मुस्लिम मोहल्यात पण खुप फटाके वाजविले "
31 Mar 2011 - 2:30 pm | गवि
+१
अंडरलाईन "पण" पर्यंत वाढवून मृत्युंजयसारखेच म्हणतो.
31 Mar 2011 - 2:47 pm | टारझन
I think all of you above are correct and making the statement that makes the MIPAKARS and INDIAN feel proud . I am proud of you guys . Yesterday we had a situation , but we not only survived but forced a situation back on PAKIs .. It was pleasure to watch Mr PAKISTAN clapping on Indian victory and bad mouth BOO BOO Afridi was left cried .
I congrats all my Indian mates ( not just Hindu or muslim or Sikh or Isaai or else ) on such a great occasion.
~INDIDA
31 Mar 2011 - 3:04 pm | गणपा
टारुशेट भावनांना वाट मोकळी करायला विंग्रजी सोप्पी पडते का ? ;)
असो आमचं विंग्रजी कच्च असल्याने फक्त भापो एवढच म्हणतो. :)
31 Mar 2011 - 4:12 pm | टारझन
Hey dude , you said it . English is such a nice language . Infact you also should start englishing . If you are not good at englsh , join INZAMAM ENGLISH SPOKEN COURSE . or YUSUF MOHOMMAD English Academy. ;)
Belive me , its such a pleasure to write in english :)
31 Mar 2011 - 4:45 pm | वपाडाव
टारोबा..
यांशिवायही एक जागा आहे जिथे अस्खलित एंग्रजी शिक्षणाचे धडे गिरवुन घेण्यात येतात..
"फस गये रे ओबामा" या चित्रपटातील 'त्यागी इंग्लिश स्पिकींग कोर्स १'..... आणी 'त्यागी इंग्लिश स्पिकींग कोर्स २'
इतकी अव्वल (बहुदा) कुणीही शिकवत नसावं...
31 Mar 2011 - 4:30 pm | वाहीदा
माझे टंकण्याचे कष्ट वाचविले :-)
असो, मिटींग मुळे हा प्रतिसाद बघायला वेळ मिळायला नाही असो,
सांगायचा मुद्दा एकच नेहमी जी बोंब होते पाकिस्तान जिंकला की मुस्लिम मोहल्यात फटाकडे वाजिवितात अन भारत जिंकला की दु:खी होतात ही चुकीची समजूत आहे. अन त्यात वरिल मुख्य प्रतिसादास अनुरुप प्रतिसाद दिला होता
म्हणूनच हे लिहीले. माझ्याकडे फोटो असते तर नक्की अपलोड केले असते
आमच्या मुस्लिम मोहल्यात पण खुप फटाके वाजविले
होय अन त्यावर मी कायम आहे .
असो आता जाते मिटींगला, ते जपानी बसले आहेत मिटींग्स ला त्यांना हे सगळे समजवता माझी नोकरी जायची
तसेच पण ते जपानी नेहमी म्हणतात .. You Indian guys are very complicated
बाय आता पळते, परत एकदा धन्स !!
31 Mar 2011 - 4:38 pm | वाहीदा
you have got a point and that is why I found even this statement to be out of contex
I will appreciate if you donot take it at FACE VALUE and in a Superficial way
In fact it has a Strong Deeper meaning if you understand it correctly
chao bye, need to rush back to meeting else I Will have this Victory at the Cost of my Job Guys ..
31 Mar 2011 - 4:53 pm | टारझन
Exactly which statment of mine is out of context ? If you could quote it , it would be easy to explain.
Please be assured that I wont take it on FACE VALUE the way you said it . I am always ready to listen to other's opinion in positive way . It would be nice to discuss on same .
As of now , please have your time and attend the meeting , (ofcourse we don't want to cost your job ) when you are back we can continue
- Want To Talk
1 Apr 2011 - 3:41 pm | रमताराम
१०% रोमन अक्षरांचे 'त्या तिथे पलिकडे' असलेले बंधन इकडेही असावे असा प्रस्ताव संपादक मंडळाला द्यावा असा प्रस्ताव आमच्या विचाराधीन आहे.
31 Mar 2011 - 9:08 am | प्यारे१
वरच्या सगळ्या प्रतिसादांनी मॅचच्या हायलाईटस वुइथ रनिंग कॉमेंट्री पुन्हा बघितल्यासारखे वाटले.
31 Mar 2011 - 10:59 am | चावटमेला
गली गली मे शोर है, मिस्बाह साला चोर है ;)
31 Mar 2011 - 11:44 am | वाहीदा
कुणी तरी वतन-परस्तीची (देशभक्तीची) जुनी गाणी पण लावली
गाणी अन फटाके एकत्र आवाज.. ते पण जोरात ,कोण काय बोलतंय काहीच ऐकायला येत नव्हते नुसता दंगा ! दंगा ! दंगा !
दंगाकरुन रात्री २ वाजता सगळे शांत झाले
पण खुप मज्जा आली :-)
31 Mar 2011 - 2:50 pm | यशोधरा
मला आलेला समस -
All teams whose captains' initials are 'S', are out of World Cup. Strauss, Sammy, Smith, Shakib and Shahid.. So guess who's next??? Sangkara!!!!
आमेन!!! अस्सच होऊ देत रे देवा म्हाराजा!
:D :P
31 Mar 2011 - 3:00 pm | गणपा
=)) लोकं पण काय काय डोक लढवतात.
31 Mar 2011 - 4:17 pm | प्रीत-मोहर
आमेन ...तथास्तु !!!
31 Mar 2011 - 4:47 pm | पुष्करिणी
पॉलनं म्हटलय आता तर होणारच !!!
31 Mar 2011 - 4:56 pm | टारझन
पॉल हे फक्त थत्ते चाचा आहेत ... अरे जोर से बोलो ..
"गली गली मे शोर है .. थत्ते चाचा पॉल है ..
या धत्तड तत्तड् ...
31 Mar 2011 - 5:47 pm | इरसाल
संगकारा आता रावणच तुझा मालक रे बाबा...............यशोधरा बोलली न मग गेलास तू घरी आता.
यशो आता सखी ला पण हेच बोलायला लावून शिक्कामोर्तब करून घ्यावा म्हणतोय मी
1 Apr 2011 - 9:07 am | नरेशकुमार
चला जिन्कलो एकदाचे !
4 Aug 2019 - 9:56 am | यशोधरा
किती आणि कसला कल्ला चालायचा मिपावर कधी काळी! पुमिराना!!
4 Aug 2019 - 7:26 pm | जॉनविक्क
सगळ्याच गोष्टीना फक्त मिपा जबाबदार नाही, वयही मैटर करत असावे :)
4 Aug 2019 - 7:37 pm | यशोधरा
खुसपट तंत्र फक्त महाभारताच्या धाग्यांवर चालेल बरं.
4 Aug 2019 - 10:20 pm | जॉनविक्क
की वयोमानानुसार माणसाच्या प्रवृत्ति बदलत जातात परिणामी तेच सदस्य अजूनही एक्टिव असून देखील आता कल्ला करतीलच ऐसे अजिबात नाही.
हे सोडून आणखी अवांतर योग्य जागी मारण्यात आले आहे हे याद करावे.
4 Aug 2019 - 10:24 pm | यशोधरा
समोरच्याला प्रतिसाद नीट समजत नाहीत वगैरे गृहितके वाचून गंमत वाटते. बाकी पूर्ण दुर्लक्ष करण्यात आले आहे.
4 Aug 2019 - 11:12 pm | जॉनविक्क
क्षमा करा.
6 Aug 2019 - 6:46 pm | विजुभाऊ
मज्जा आली वाचताना. अगदी थेट मेच बघतोय असेच वाटले