विश्वचषक २०११ भारत वि. पाक दुसरे सेमिफायनल

प्रशांत's picture
प्रशांत in काथ्याकूट
30 Mar 2011 - 10:25 am
गाभा: 

भारत वि. पाक हा सामना बघण्याची उत्सुकता सर्वांना असते त्यात आजचा सामना म्हणजे विश्वचषक २०११ चे दुसरे सेमिफायनल त्यामुळे प्रत्येकाने सामना बघण्यासाठी विषेश तयारी केली असेलच..

आपल्या पंतप्रधानांनी तर हा सामना बघण्यासाठी फारच विषेश तयारी करत त्याच्या खास......... आमंत्रण दिलेले आहे..

तर आजचा सामना बघ्याण्यासाठी तुम्ही काय काय आणि कशी तयारी केली...

सामना चालु झाल्यानंतर सामन्याचे धावते वर्णन आपण आपल्या मिपाच्या खास शैलित करुच..

प्रतिक्रिया

कानडाऊ योगेशु's picture

30 Mar 2011 - 10:53 am | कानडाऊ योगेशु

फेसबुकवर वाचलेला विनोद
डबंग डायलॉग बाय धोनी..
अख्तर आफ्रिदीसे डर नही लगता साब..मुनाफ नेहरा से लगता है! ;)

बाकी सामना पाहायची कसली तयारी न कसले काय?
ऑफिसातच अपडेट पाहत राहायचे!

आत्मशून्य's picture

30 Mar 2011 - 12:09 pm | आत्मशून्य

हॅहॅहॅ

वपाडाव's picture

30 Mar 2011 - 6:28 pm | वपाडाव

२६०/९...
पुर्ण ५० ओव्हर खेळल्याचा हबिमान...
चला आता हगर्‍या बॉलरांच्या हातात आहे सग्ळं..
तेंडुलकर, भज्जी, युवराज अन रैना मिळुन ३५ ओव्हर टाकतील असं वाट्टंय....
काय म्हंता...

दिपक's picture

30 Mar 2011 - 11:00 am | दिपक

प्रशांत's picture

30 Mar 2011 - 11:38 am | प्रशांत

आफ्रिदी: हम सचिन को किसी भी हाल मी संचूरी कि संचूरी नही बनाने देंगे .

शोयब : मगर हम उसे रोकेंगे कैसे ?? वो तो गजब कि फॉर्म मैं हें...?
आफ्रिदी : साले ...!! हम १०० के अंदर आउट हो जायेंगे ना ...!!

नीलकांत's picture

30 Mar 2011 - 11:49 am | नीलकांत

मॅच बघायची आहे म्हणून आधीच झालेला प्रवास आज मॅचच्या वेळेस करणार आहे अशी घोषणा केलीये. म्हणजे कुणाचा मध्ये फोन नको. येथे नागपुर येथे मॅच बघण्यासाठी छत्रपती चौकात एका मित्राच्या फ्लॅटवर सर्व मंडळी जमणार आहेत. एकट्याने मॅच बघण्यात काय मजा ना? :)

मॅच बघता बघता जे जे काही लागणार आहे त्याची तरतुद करणे चालले आहे.

सर्वांसोबत दंगा घालत अशी मॅच बघण्याची मजा काही औरच आहे.

मी सहसा मॅच बघत नाही मात्र अशी लढत न पाहून कसं व्हायचं ना?

- नीलकांत

>>>>एकट्याने मॅच बघण्यात काय मजा ना? Smile
खरं आहे...
मी तर मॅच ऑफिसमधेच बघणार.... फुल टु राडा असतो..

चिंतामणी's picture

30 Mar 2011 - 2:11 pm | चिंतामणी

टॉस जिंकला.

मॅच बघता बघता जे जे काही लागणार आहे त्याची तरतुद करणे चालले आहे.

मस्त. मजा करा. आपण जिंकणार आहोत.

स्पा's picture

30 Mar 2011 - 11:52 am | स्पा

सामना पाहताना घ्यायची काळजी
1) ज्यांना हृदयाचा त्रास आहे किंवा ब्लॉकेज आहेत त्यांना असे सामने पाहताना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्‍यता अधिक असते.
अशा सामन्यांमध्ये थरार टीपेला पोहोचलेला असतो त्या वेळी उत्साह वाढलेला असतो हृदयाचे ठोकेही वाढलेले असतात आणि त्यामुळे हृदयावर ताण येऊ शकतो.
2) भावना अधिक प्रमाणात गुंतलेल्या असल्यामुळे पराभव पचविणे कठीण असते आणि त्यामुळे येणारा स्ट्रेस फार घातक ठरू शकतो.
3) अति मध्यमान, शरीरातील वाढलेले तापमान आणि एकाच ठिकाणी जास्त वेळ बसून राहणेसुद्धा धोकादायक ठरू शकते.
4) सामना पाहत असताना जंक फूड, साखरेचे प्रमाण अधिक असलेल्या पदार्थांचे सेवन करत राहणे हृदयावर परिणामकारक ठरू शकते.

मुंबई - विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेचा फिव्हर चढलेला आहे आणि प्रत्येक जण बुधवारचे भारत-पाकिस्तान हे क्रिकेट युद्ध पाहण्याची तयारी करत आहे. एकत्रितपणे सामना पाहण्यासाठी मोठ्या स्क्रीनचीही तयारी करण्यात आलेली आहे. भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान गिलानी यांनाही हा सामन्याने भुरळ पाडली आहे. अशा हायव्होल्टेज सामन्यात भावना गुंतलेल्या असतात. सामना पाहताना दडपण येत असते आणि त्याचा शरीरावर परिणाम होतो. 2006 मध्ये विश्‍वकरंडक फुटबॉल सामने पाहताना 11 चिनी प्रेक्षकांचा हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाल्याचे वृत्त बीजिंगमधील एका वर्तमानपत्राने प्रसिद्ध केले होते. भावनांवर आवर घालू न शकल्याने मानसिक ताण आला आणि त्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता.

हृदयरोगतज्ज्ञ शल्यचिकित्सक डॉ. रमाकांत पांडा यांनी सांगितले की, जेव्हा एक्‍झाइटमेंट वाढली जाते तेव्हा रक्तदाब वाढला जातो आणि ज्यांना मधुमेह, कॉलेस्ट्रॉल आदींचा त्रास असतो अशांना हृदयरोगाचा झटका येण्याची शक्‍यता असते.

बुधवारचा भारत-पाक सामना पाहताना जर तुमच्या छातीत दुखू लागले किंवा हातातून कळा येऊ लागल्या तर जराही वेळ न घालविता 126126 या क्रमांकावर कॉल करा.

गणपा's picture

30 Mar 2011 - 1:30 pm | गणपा

उत्तम माहिती रे सापवड्या...
(अश्या एका काळ्या घटनेचा साक्षिदार.) गणा

कुळाचा_दीप's picture

31 Mar 2011 - 6:25 am | कुळाचा_दीप

म्हणुनच मी शेवटचे ५ ओव्हार्स राजाराम पुलावर जाऊन उभा होतो..उगाच सहन होत नाही तर पाहाव कशाला ...पण कान मात्र सतत लोकांच्या फटाक्यांकड़े होते !

वपाडाव's picture

31 Mar 2011 - 10:31 am | वपाडाव

बरंय, नाहीतर कुलदीपकाची प्राणज्योत ..........

पण कान मात्र सतत लोकांच्या फटाक्यांकड़े होते !

अन डोळे काय पुलावर चाललेल्या चलचित्रपटाकडॅ (PDA) होते की काय?

कुळाचा_दीप's picture

1 Apr 2011 - 6:29 am | कुळाचा_दीप

PDA आपल्या साठी काय नवीन नाही ...आणि पहायची इच्छा झालीच तर राजाराम पुला पेक्षा उत्तम ठिकाणं आहेत ना :)

आपली टीम आणि मंडळी आणि आजची मॅच आणि फ़िक्सिंग आणि..... ... .. .....

भारताची कुंडली ही मकर लग्नाची असून सप्तमस्थानी रवि , शुक्र , बुध , शनि , चंद्र व प्लूटो असे सहा ग्रह आहेत. दशमात तूळेचा गुरु आहे. सहाव्या स्थानी मंगळ आणि पंचमात राहू व लाभात केतू अशी स्थिती आहे. या कुंडलीशी ३० मार्च २०११ चे ग्रहमान अनुकूल आ...हे. ३० तारखेला धनिष्ठा नक्षत्र असून नक्षत्र असून चंद्र मकर राशीच आहे. भारताचे मकर लग्न आणि रवि , गुरु , मंगळ, हर्षल मीन राशीत असल्याने भारत प्रतिस्पर्ध्याला लोळवेल. मुळ कुंडलीचा दशमेश शुक्र गोचरीचा दशमाच्या लाभात आहे.

आपल्या टीम मधे सचिन, धोनी, झहीर, युवराज सारखे मातब्बर खेळाडू आहेत असा माझा समज होता, जो साफ़ चुकीचा निघाला. वरील सहा ग्रह हे आपले अष्टपैलू आहेत आणि उरलेल्या राशी बॉलर्स. but it seems match is already fixed :) लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधतात ठाऊक होते, मॅचच्याही गाठी स्वर्गात? :D मकर आजची राशी ऑफ़ द मॅच. :)

अमोल केळकर's picture

30 Mar 2011 - 12:46 pm | अमोल केळकर

:)

भारतीय संघास विजयासाठी आणि सचिनला शतकांचे शतक करण्यासाठी हार्दीक शुभेच्छा

अमोल

वपाडाव's picture

30 Mar 2011 - 1:38 pm | वपाडाव

लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधतात ठाऊक होते...

आहे का नाही...
कसा पकडला चोराला...
दिल मे शादी के लड्डु फूटरेले इस्के तो...
पण साला हे वाक्य हर्षदने भेळेत टाकायला पाहिजे होते..

रमताराम's picture

30 Mar 2011 - 4:26 pm | रमताराम

तुम्ही भारताची कुंडली पाहिलीत की बीसीसीआयची?

चिरोटा's picture

30 Mar 2011 - 12:27 pm | चिरोटा

वा वा. अगदी सर्व अंगांनी होणार्‍या सामन्याचा 'अभ्यास' चालू आहे.खालील माहिती हवी आहे-
१)मोहालीचा ईतिहास.
२)मोहालीकरांच्या क्रिकेटवेडाच्या काही कहाण्या.
३)१९५० पासून मोहालीला झालेले सामने.
४)पाक खेळाडू जिथे उतरले आहेत तिकडची सुरक्षा व्यवस्था.
बाकी आम्ही तयार आहोतच-
१२ सोनकेळी/अर्धा किलो बटाटा वेफर्स्/खारे दाणे/धारवाडी पेढे/दर अर्ध्या तासाने चहा/लिंबु सरबत.
दोन्ही गालांवर तिरंगा/India असे लिहिलेली टोपी घालूनच सामना बघायचा आहे.

प्रशांत's picture

30 Mar 2011 - 12:32 pm | प्रशांत

>>>दोन्ही गालांवर तिरंगा/India असे लिहिलेली टोपी घालूनच सामना बघायचा आहे.
तुमचा फटु अपलोड करा.

सुधीर१३७'s picture

30 Mar 2011 - 12:33 pm | सुधीर१३७

>>>>>> टोपी घालूनच सामना बघायचा आहे....>>>>>>

................ कोणाला टोपी घालूनच सामना बघायचा आहे ????? ..... :wink:

चिरोटा's picture

30 Mar 2011 - 12:41 pm | चिरोटा

स्वतालाच की वो.
आय सी सी वाले स्वतःचे खिसे भरणार्,खेळाडू रग्गड पैसा मिळवणार्,जाहिरातबाजी करून कंपन्या नफा मिळवणार.'देशप्रेम' जागवून सरकार लोकांचे लक्ष दुसरीकडे वेधणार.
आपण स्वतःलाच टोपी घालायची अन म्याच बघायची.

टारझन's picture

30 Mar 2011 - 12:49 pm | टारझन

..
चर्चा अश्लिलतेकडे झुकल्या जाते आहे असे वाटते . लवकरंच वर्तन सुधारा :)

- चोती तिन्गी

नरेशकुमार's picture

1 Apr 2011 - 9:05 am | नरेशकुमार

मला नाही वाटले तसे,
तुला कसे काय वाटले ?

१.५ शहाणा's picture

30 Mar 2011 - 2:00 pm | १.५ शहाणा

मी एक खम्बा व भरपुर चकणा आणुन ठेव्ला आहे

निखिल देशपांडे's picture

30 Mar 2011 - 2:05 pm | निखिल देशपांडे

नेहरा खेळणार... का??? का??

चिंतामणी's picture

30 Mar 2011 - 2:17 pm | चिंतामणी

का??

धोनीची मर्जी

एक खम्बा व भरपुर चकणा असे वरती १.५ शहाण्याने लिहीले आहे. त्याची गरज पडणार. ;)

वपाडाव's picture

30 Mar 2011 - 2:06 pm | वपाडाव

बॅटिंग टॉस जिंकला...

आयला नेहराला घेतलाय?

अश्विन कुठेय?

बसवला टेंपोत...
धोण्याच्या...

म्हणजे आज १२ विरुद्ध १० :(

दोन्ही देशांचे पंतप्रधान मैदानावर आले आहेत. ही केवळ मॅच आहे असं वाटतच नाहीये :)

सचीन विरू मैदानावर आलेत. ( दे घुमा के !)

- नीलकांत

चावटमेला's picture

30 Mar 2011 - 2:38 pm | चावटमेला

नही!!!!!!! केहदो कि ये झूठ है :(

ये धत्तड तत्तड धत्तड तत्तड मिटींग कँसल्ड..... आणि मी लगेच आजारी पडलो ;)

नीलकांत's picture

30 Mar 2011 - 2:52 pm | नीलकांत

विरू एका ओव्हर मध्ये ५ चौके?

सचीन सुध्दा दे घुमा के करतोय.

सुंदर मॅच चाललीये.

स्पा's picture

30 Mar 2011 - 3:06 pm | स्पा

सेहवाग ओउट

वपाडाव's picture

30 Mar 2011 - 3:22 pm | वपाडाव

गंभिरला साईडला घ्या रे जरा....

वपाडाव's picture

30 Mar 2011 - 3:27 pm | वपाडाव

तेंडल्या जाण्याच्या मार्गावर....
नाही...... वाचलो....

सखी's picture

30 Mar 2011 - 3:31 pm | सखी

दोन जीवदानं लागोपाठ मिळाली. खरचं आज हार्ट अ‍ॅटक येणार वाटतं :(

निखिल देशपांडे's picture

30 Mar 2011 - 3:29 pm | निखिल देशपांडे

चला पहिल्यांदा रिव्हुव चा फायदा झाला..
सच्या वाचला..
परत एकदा वाचला..

चिंतामणी's picture

30 Mar 2011 - 3:32 pm | चिंतामणी

तेंडुलकर नॉट पुन्हा एकदा आउट.

तिस-या अंपायरचा निर्णय.

ते येड** अकमल उगाच्या उगाच केकाटतय

चिंतामणी's picture

30 Mar 2011 - 3:39 pm | चिंतामणी

सचीनचा कॅच ड्रॉप केला.

निखिल देशपांडे's picture

30 Mar 2011 - 3:39 pm | निखिल देशपांडे

सचिनची कॅच सोडली

नीलकांत's picture

30 Mar 2011 - 3:48 pm | नीलकांत

आज सचीनचा दिवस दिसतोय. दोन वेळा जीवदान आणि कॅच सुध्दा सोडली.
भारताचे शंभर रन होण्याच्या मार्गावर आहेत. ९९ झालेत.

झाले १०२.. शंभर गाठले. तेही बर्‍या स्पीडने.

पाटा खेळपट्टी म्हणावी काय?

पाकिस्तानलाही असाच फायदा होईल काय.

निखिल देशपांडे's picture

30 Mar 2011 - 4:15 pm | निखिल देशपांडे

पाकिस्तानचे स्पीनर पहाता आपल्याला अश्वीन ची कमी जानवणार

चतुरंग's picture

30 Mar 2011 - 4:25 pm | चतुरंग

सचिन प्रेशराईज आहे आणी ४ औट!!!!!

अगगागागागा

युवी आणि कोहली, छान पैकी हागून गेलेले आहेत

मृत्युन्जय's picture

30 Mar 2011 - 4:27 pm | मृत्युन्जय

विराट युवराज गेले. धोनी जाण्याच्या मार्गावर (तो आला आहे हेच त्याच्या जाण्याचे द्योतक आहे). सचिन असाही आउट होण्यासाठी खुप प्रयत्न करतो आहे. मॅच संपली.

स्पा's picture

30 Mar 2011 - 4:29 pm | स्पा

२४० होतील जास्तीत जास्त.....

आणि आज हरामखोर नेहरा आहेच आपल्यात

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Mar 2011 - 4:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

२७५ किंवा ३०० पेक्षा अधिक धावा झाल्या पाहिजेत. धोणीने आज धावा भरपूर धावा केल्या पाहिजेत.
आता मागे फक्त रैना आहे. धोणी चेंडुला नुसतं ढकलून ढकलून किती धावा काढेल कोणास ठाऊक ?

--दिलीप बिरुटे

निखिल देशपांडे's picture

30 Mar 2011 - 4:33 pm | निखिल देशपांडे

भारत पुर्ण ५० ओव्हर बॅटिंग करेल का??

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Mar 2011 - 4:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>भारत पुर्ण ५० ओव्हर बॅटिंग करेल का??
सच्याला अजून दोनतीन जीवदान आणि दोन तीन जीवदान धोणी मिळाले तर पन्नास ओव्हर खेळणे अवघड नाही.;)

-दिलीप बिरुटे

मृत्युन्जय's picture

30 Mar 2011 - 4:47 pm | मृत्युन्जय

सचिनचे ४ झेल सोडले आहेत. एक स्टंपिंग जस्ट मिस झाले. एक एलबी जस्ट मिस आहे. तो नक्की काय करतो आहे? औट होण्यासाठी याहुन अजुन जास्त प्रयत्न कोणी करु शकणार नाही

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Mar 2011 - 4:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भारतीय क्रिडा रसिकांनी देवाला केलेल्या प्रार्थना कामी येत आहेत.:)

-दिलीप बिरुटे

वपाडाव's picture

31 Mar 2011 - 10:32 am | वपाडाव

एका फलकावर झळकलेले वाक्य...
"भगवानने भगवानको बचाया"

धोनीचा फॉर्म पुरता गेला आहे,
नुसता ढकला ढकली, मला तर वाटत त्याने हॉकीत जायला हवं,.......

आज नेहराला घ्यायची चूक त्याला जाम महागात पडणार आहे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Mar 2011 - 4:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>नुसता ढकला ढकली, मला तर वाटत त्याने हॉकीत जायला हवं,.......
हॉकीत कॉर्नर मारायला चांगला खेळाडू आहे. :)

>>>आज नेहराला घ्यायची चूक त्याला जाम महागात पडणार आहे
शेवटच्या ओव्हरीत पंचवीस धावा लागत असल्यावर नेहरा चार ते पाचच चेंडूत
हे आव्हान पूर्ण करण्यास मदत करेल असे वाटते :)

काय सांगावे आज त्याला विकेटा मिळाल्या तर....!

सच्याचे शंभर होतात बॉ.....!

-दिलीप बिरुटे

चिंतामणी's picture

30 Mar 2011 - 5:01 pm | चिंतामणी

अजून सचीन विकेटवर आहे.

डावखुरा's picture

30 Mar 2011 - 4:51 pm | डावखुरा

तु जा मी आलोच...

मागच्या म्याच मध्ये, मुनाफ च्या राहिलेल्या ओवर सचिन ला टाकाव्या लागलेल्य, आज नेहराच्या अजून ४ ५ ओवर ची भर पडेल

साबु's picture

30 Mar 2011 - 4:59 pm | साबु

काळजी नको.... सच्याचे शतक नक्कि होणार.....धोनी... अरे नीट मारे रे ...

नीलकांत's picture

30 Mar 2011 - 5:02 pm | नीलकांत

शेवटच्या ओव्हर्स धाडधाड मारायला कुणीतरी रहा रे बाकी.

सचीनचे शतक नक्की आहे आज. धोनी टिकला पाहीजे. सुरूवातीला अतिशय फटकेबाज खेळ आता संथावला आहे .

- नीलकांत

चतुरंग's picture

30 Mar 2011 - 5:04 pm | चतुरंग

आणि २५-३० आणखीन असते तर्?....असे वाटेल की काय....असे खेळत आहेत
बॉलिंग वर लोड येणार आहे....

नीलकांत's picture

30 Mar 2011 - 5:05 pm | नीलकांत

आता ६व्यांदा सचीन वाचलाय. आज सचीनचा दिवस आहे नक्की :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Mar 2011 - 5:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नै म्हणजे मी खाली लिहिला होता म्हणून म्हणतो. :)

पळा आता. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Mar 2011 - 5:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सोडला बॉ झेल सच्याचा.
अजून दहा ओव्हरीपर्यंत तरी सच्या आणि माहीची जोडी फूटू नये.

-दिलीप बिरुटे

साबु's picture

30 Mar 2011 - 5:08 pm | साबु

फिल्डिन्ग फार महत्वाची असणार आहे,.... catches win matches.... एक हि झेल सुटता कामा नये.

हरिप्रिया_'s picture

30 Mar 2011 - 5:12 pm | हरिप्रिया_

गेला सचिन...
:(

नीलकांत's picture

30 Mar 2011 - 5:13 pm | नीलकांत

च्यायला एवढा लक बाय चान्स सुरू असतांनाही शतक पुरे नाही करता आले. :(

सखी's picture

30 Mar 2011 - 5:13 pm | सखी

छे गेला ८५ वर, आणि त्या आफ्रिदिनेच कॅच घेतला :(

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Mar 2011 - 5:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रैना हैना. बारा ओव्हर शिल्लक आहेत.
आता विकेटा टीकल्या पाहिजेत तेव्हा तिनशे धावा होतील.

१९१/५. ३८.२ षटके.

स्मिता.'s picture

30 Mar 2011 - 5:33 pm | स्मिता.

धोनी पण गेला... भारत पूर्ण ५० ओवर खेळेल की नाही शंका वाटतेय :(

सखी's picture

30 Mar 2011 - 5:34 pm | सखी

खरयं :(

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Mar 2011 - 5:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

च्यायला, या धोणीच्या.

पॉवरप्ले कधी घेणार.
नेहरा फलंदाजीला आल्यावर ?

पॉवरप्ले बागुल बुवा वाटतो त्याला. ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Mar 2011 - 5:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गेला आपला आवाज त्यांच्यापर्यंत
घेतला पॉवरप्ले एकदाचा.

आता जे होईन ते होईन. सहा षटकात कमीत कमी सत्तरची अपेक्षा.

दोनशे सत्तर ऐंशी व्हावा स्कोर.

-दिलीप बिरुटे

सखी's picture

30 Mar 2011 - 5:45 pm | सखी

फायनली घेतला, तुमचं ऐकलं वाटतं धोणीने :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Mar 2011 - 5:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आठ धावा वसूल. पुढील पाच षटकात चाळीस-पन्नास धावा व्हाव्यात.
रैनाने चांगली सुरुवात केली. कमॉन इंडिया.........! :)

-दिलीप बिरुटे

सखी's picture

30 Mar 2011 - 5:59 pm | सखी

तिसरी फोर पण मारीली पण त्या सेहवागसारखे नको व्हायला, तो फोरशिवाय बोलत नव्हता, पण गेला ना लवकर.

गणपा's picture

30 Mar 2011 - 5:39 pm | गणपा

सचिन गेला, संपली मॅच.
धन्यवाद.

हरिप्रिया_'s picture

30 Mar 2011 - 5:42 pm | हरिप्रिया_

अगदि खर...
:(

प्रेशर प्लेइंग इट्स रोल!! मेंटल टफनेसची कसोटी लागणार आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. सगळ्या ओवर्स खेळून काढणे आणि नंतर अशक्य चांगली फील्डिंग आणि बॉलिंग करावी लागणार!!!

अप्रतिम's picture

30 Mar 2011 - 5:47 pm | अप्रतिम

परत एकदा हागले आपले फलंदाज.म्याच गेली हातातुन.

वपाडाव's picture

30 Mar 2011 - 5:49 pm | वपाडाव

रैना तुम्हारी जरुरत है आज अपने वतन को....
(धोनीकी कभी थी क्या?)
आज करके दिखा दो....

चिरोटा's picture

30 Mar 2011 - 5:51 pm | चिरोटा

६ सोनकेळी,पाव किलो वेफर्स संपले.
आता खायची ईच्छा गेली.

मराठे's picture

30 Mar 2011 - 6:01 pm | मराठे

भज्जी गेला..

वपाडाव's picture

30 Mar 2011 - 6:18 pm | वपाडाव

भज्जी भी गया....

२४६/७, ४८ ओवर..
शेवटचे षटक...
४ चेंडु बाकी...
झहीर गेला....
२५६/८..
पुर्ण षटकं तरी खेळा म्हणावं....
नेहराने १ रन काढला...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Mar 2011 - 6:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शेवटच्या चार चेंडूत दहा धावा तरी व्हाव्यात.
आला माझा लाडका फलंदाज. मि.नेहरा. :)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

30 Mar 2011 - 6:19 pm | निनाद मुक्काम प...

झहीर केला आता येणार आमचे
करन अर्जुन.

नेहरा आणी मुनाफ
नेहरा मुनाफ ला म्हणालाय
तयार रहा .
मी हजेरी लावून येतो .( ह्या लोकांमुळे रैनाची उडाली दैना )

वपाडाव's picture

30 Mar 2011 - 6:21 pm | वपाडाव

चला पुर्ण ओवर्स खेळणार...
२ चेंडु...
२५८/८
हाण्ण तिच्या आयला... नेहराच्या आयचा घो....
साला आवट झाला...
मुनाफ येतो आहे....

वपाडाव's picture

30 Mar 2011 - 6:22 pm | वपाडाव

२६०/९, ५० ओव्हर्स ....
पुर्ण खेळल्याचा हबिमान....

मुलूखावेगळी's picture

30 Mar 2011 - 6:27 pm | मुलूखावेगळी

+१

स्मिता.'s picture

30 Mar 2011 - 6:23 pm | स्मिता.

भारताच्या ९ गडी गमावून २६० धावा झाल्या आहेत.

बातम्या दिल्यासारखं वाटलं ;)

चिरोटा's picture

30 Mar 2011 - 6:25 pm | चिरोटा

आपले गोलंदाज आता काय करतात बघुया. प्रभादेवी/दादरचे कोणी आहे का? सिद्धिविनायकाला जरा जावून या,ह्यांच्यातर्फे.

मुलूखावेगळी's picture

30 Mar 2011 - 6:27 pm | मुलूखावेगळी

नेहराचे १० हुकले १ रन नी
:( :( :( : ( आय अ‍ॅम वेरी वेरी अपसेट
आनि सचिनचे १०० :(
लै फ्रेन्डली आनि सौजन्यसप्ताहात मॅच चाल्लिये.
बघु आता काय होते ते.

विकास's picture

30 Mar 2011 - 6:31 pm | विकास

राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम

आधी सांगा तुम्ही मॅच पहाताय की फ५ दाबताय?

विकास's picture

30 Mar 2011 - 6:38 pm | विकास

इच्छा असली तरी बघू शकत नाही कारण हापिसात आहे.... :( त्यामुळे रिमोट कंट्रोल हातात नाही! माझ्याकडून कुठलीही चूक होत नाही आहे. कल्जी नसावी! :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Mar 2011 - 6:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लै भारी. :)

पाकला २४०त गुंडाळोत. आमेन.

यशो माझे बाई २४० नको, थोडं त्याच्या आधी नाही का चालणार, २४० होईपर्यंत आम्ही आमचा जीव कुठं टांगुन ठेवायचा?

यशोधरा's picture

30 Mar 2011 - 7:52 pm | यशोधरा

सखी, मग किती? बरं घे, २३०. :P
लिहिता, लिहिता दुसरा उडाला! ढिंगच्याक ढिंगच्याक!!

येस! ढिंगच्याक ढिंगच्याक!! :)

अग्गं बाब्बो... काय फिक्सिंग केलं होतंस का यशोधरा?

पुष्करिणी's picture

31 Mar 2011 - 2:46 pm | पुष्करिणी

सहीच आहेस यशो, काय परफेक्ट अंदाज . आजपासून तुला पॉल म्हणणार :)

अनामिक आणि पुष्करिणी
अहो यशो २४० म्हणत होती, म्या तिला बार्गेन करुन २३० वर तयार केलं, मला पण ५०% पाहीजे हां :)
आणि यशो ते इरसाल पार्टीचं काहीतरी म्हणत होते, आपल्याला काय पाहीजे ते मिळल, तेव्हा तुझी लिस्ट तयार ठेव गं, माझी झालीच आहे ऑलमोस्ट :)

यशोधरा's picture

31 Mar 2011 - 9:47 pm | यशोधरा

:)

प्रशांत's picture

30 Mar 2011 - 6:37 pm | प्रशांत

वेल डन उमर गुल

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Mar 2011 - 6:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मंडळी सामना आपण जिंकायची शक्यता ३०-७० अशी दिसत आहे. सामन्याचा निकाल धक्कादायक लागण्याची शक्यता ग्रहित धरुन मित्र म्हणत आहेत कुठेतरी 'बसून' सामन्याचा आनंद लूटू. :)

तेव्हा आम्ही आपली रजा घेतो. धन्यवाद......!
:)

-दिलीप बिरुटे

विकास's picture

30 Mar 2011 - 6:39 pm | विकास

आनंद लुटायचा का नाही हे सामना झाल्यावरच आम्ही ठरवणार आहोत... :-)

मनाविरुद्ध निकाल लागला तर आम्ही शिमगा करणार तेव्हा संपादकांनो तयार रहा ;)

पहिल्याच बॉलवर चौका..!! शेवटच्या बॉलवरपण चौका !
एक ओव्हर ८ रन्स.

प्रीत-मोहर's picture

30 Mar 2011 - 6:51 pm | प्रीत-मोहर

आता नेहरा ....वाचव रे देवा!!!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

30 Mar 2011 - 6:52 pm | निनाद मुक्काम प...

आज नेहरा चा दिवस आहे .असे वाटत आहे .
आज तो काहीतरी वेगळे करून दाखवणार .

प्रीत-मोहर's picture

30 Mar 2011 - 6:53 pm | प्रीत-मोहर

आप्के मुह मे घी शक्कर!!!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

30 Mar 2011 - 10:55 pm | निनाद मुक्काम प...

आमची मते बहुतेक वेळा खरी ठरतात .
आता घी घरी नाही आहे पण बटर मे शक्कर मिलाके काम चला लेंगे.
''चक दे इंडिया''

ramjya's picture

30 Mar 2011 - 7:13 pm | ramjya

................

पहिल्या दहा ओव्हर संपायच्या आत एखादी विकेट जायला हवी. थोडं प्रेशर वाढलं की नंतरचे गडगडतील कदाचीत.

प्रीत-मोहर's picture

30 Mar 2011 - 7:25 pm | प्रीत-मोहर

आमेन ....तथास्तु!!!

सखी's picture

30 Mar 2011 - 7:26 pm | सखी

हेच म्हणते.

अरेच्या ऐकले की आपले परत :) कमरान गेला :)

प्रीत-मोहर's picture

30 Mar 2011 - 7:28 pm | प्रीत-मोहर

मी आमेन लिहित असतानाच विकेट पल्डी
झॅक स्टाय्क्स!!!

प्रशांत's picture

30 Mar 2011 - 7:26 pm | प्रशांत

तथास्तु

जे विकेट पाहिजे होती तेच गेली

प्रशांत's picture

30 Mar 2011 - 7:53 pm | प्रशांत

हफिज गेला रे

स्वच्छंदी_मनोज's picture

30 Mar 2011 - 7:54 pm | स्वच्छंदी_मनोज

२ गेले आता ८ बाकी फक्त

इरसाल's picture

30 Mar 2011 - 8:12 pm | इरसाल

आयला रन रेट बरा दाब्लाय......आता युवराज आलाय बघू काय होतेय ते ???????????????

१०० झाल्या.. पुढची विकेट लवकर पडो आता.

सखी's picture

30 Mar 2011 - 8:30 pm | सखी

पडली रे पडली तिसरी विकेट युवीला!!

मराठे's picture

30 Mar 2011 - 8:29 pm | मराठे

शफिक गेला रे !!!!

सखी's picture

30 Mar 2011 - 8:38 pm | सखी

अरे वा! युनिस खान पण गेला - मराठे तुम्ही म्हणताय ते खरं होतयं बरका तिस-या वेळेस :)

विकास's picture

30 Mar 2011 - 8:39 pm | विकास

हे लिहीत असताना:

Pakistan RR 4.07
Last 5 ovs 13/2 RR 2.60
Required RR 6.45
India RR 5.2

प्रियाली's picture

30 Mar 2011 - 8:41 pm | प्रियाली

कित्ती हो अंधश्रद्धाळू तुम्ही, तरी बरं की सच्चूची सेंच्युरी झाली नाही. ;)

चिगो's picture

30 Mar 2011 - 8:40 pm | चिगो

एक दो, एक दो.. पाकिस्तान की ठोंक दो..
पाकडे- ४ डाऊन... १०६/४, २६ ओव्हर्स..

मराठे's picture

30 Mar 2011 - 8:41 pm | मराठे

लै झ्झकाऽऽऽऽस!

प्रीत-मोहर's picture

30 Mar 2011 - 8:45 pm | प्रीत-मोहर

युनीस खान गेला ....ये धत्तड तत्तड!!..ये धत्तड तत्तड!!..ये धत्तड तत्तड!!..ये धत्तड तत्तड!!..ये धत्तड तत्तड!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Mar 2011 - 8:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सामना जिंकतोय अशी शक्यता वाटल्यामुळे पुन्हा हजर झालोय.
लवकर दोन विकेट पाडा बरं. आपापले सर्व कुलदैवत वगैरेंना प्लीज
नवस वगैरे बोला. :)

सालं वर्ल्ड कप नको पण पाकिस्तावर विजय मिळवलाच पाहिजे. :)

-दिलीप बिरुटे

अकमल जायला पाहीजे, आत्ता सिक्स, आणि फोर मारली ना.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Mar 2011 - 8:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आत्ता बाद होईल हो तो. त्याचे काय टेन्शन नाय.
फक्त कोणत्या क्षणी बाद होईल ते पाहात राहू या.

प्रशांत's picture

30 Mar 2011 - 8:58 pm | प्रशांत

युविने १२ रण दिले..

चलता है...

हरभजन ला द्या रे ओव्हर...

प्रशांत's picture

30 Mar 2011 - 9:17 pm | प्रशांत

हरभजन ने घेतली रे घेतली

मराठे's picture

30 Mar 2011 - 8:58 pm | मराठे

वेळच्या वेळी विकेटी पडत गेल्या आणि रन रेट नीट दाबून ठेवला तर जिंकण्याचा चान्स आहे.

इरसाल's picture

30 Mar 2011 - 9:00 pm | इरसाल

बिरुटेसाहेब १०,००,००० % सहमत.वर्ल्ड् कप नको पण पाकिस्तान इथे हरायलाच हवा.

अनामिक's picture

30 Mar 2011 - 9:03 pm | अनामिक

अजून एक विकेट पडू देत!

प्रशांत's picture

30 Mar 2011 - 9:03 pm | प्रशांत

जिंकण्याचा चान्स ७०% आहेत...

त्या नेहराचे १० ओव्हर पुर्ण करा नाहितर शेवटि तो घाण करतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Mar 2011 - 9:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नेहराची षटकं पूर्ण करुन घेतली पाहिजेत.
सहमत आहे.

इरसाल's picture

30 Mar 2011 - 9:04 pm | इरसाल

आवरा रे ह्याला ................................................

आवरा नाही गुंडाळा आणि पाठवा परत.