कालाय तस्मै नम:

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जे न देखे रवी...
19 Jun 2008 - 1:28 am

सकाळ म्हणाली दुपारला
ही संध्याकाळ,
रोज कुजबुजत असते काळोखाशी
ऐकून हे,
दुपार सांगे तिला (सकाळला)
घेऊन तूं पण जाशी की
पहाटेला रोज फिरायला
अन,
देई निरोप तुला ती (पहाट)
लगेच,पाहुनी सूर्याला

ऐकूनी त्यांचा संवाद
दिवस म्हणे रात्रीला
दोष असे हा सूर्याचा
करी तो
उदय अन अस्थ दिवसाचा

ऐकून हे,
रात्र सांगे दिवसाला
दोश नको देऊं तूं सूर्याला
दोष असे हा पृथ्वीचा
गर,गर फिरुनी सूर्याभोवती
जन्म दिला तिने ह्या सर्वांना

पाणावल्या डोळ्याने
म्हणे पृथ्वी सूर्याला
भलेपणाचे "दिवस"संपले
जन्म देऊनी ह्या सर्वांना
अन
मिळे दोष आपल्या दोघांना

स्तिथप्रद्न्य तो सूर्यनारायण
समजावी त्या माउलीला
आठवशी त्या सुभाषीताला
कालाय तस्मै नम:
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)

कविता

प्रतिक्रिया

अरुण मनोहर's picture

19 Jun 2008 - 7:38 am | अरुण मनोहर

कल्पना छान आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Jun 2008 - 8:04 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडली कविता !!!

अनिल हटेला's picture

19 Jun 2008 - 12:15 pm | अनिल हटेला

लय भारी!!!

वेगळी कल्पना !!

वैशाली हसमनीस's picture

19 Jun 2008 - 12:57 pm | वैशाली हसमनीस

कल्पना आवडली पण थोडे शब्द नीट हवेत.उदा.स्थितप्रज्ञ.धन्यवाद

वैशाली हसमनीस's picture

19 Jun 2008 - 12:57 pm | वैशाली हसमनीस

कल्पना आवडली पण थोडे शब्द नीट हवेत.उदा.स्थितप्रज्ञ.धन्यवाद

श्रीकृष्ण सामंत's picture

20 Jun 2008 - 12:14 am | श्रीकृष्ण सामंत

एडिट कसं करायचं ते सांगाल का?मला मराठीत इथला एडिटला पर्यायी शब्द माहित नाही म्हणून विचारतो.
आपण चूक दाखविलीत त्याबद्दल आभार.
सामंत

विसोबा खेचर's picture

20 Jun 2008 - 12:24 am | विसोबा खेचर

सामंत साहेब,

मिसळपाववर मनपासून स्वागत. छान लिहिलं आहे.

आपल्याला जो भाग संपादित (एडिट) करायचा आहे तो किंवा संपूर्ण कविता आपल्या मनासारखी पुन्हा एकदा संपादित करून मला पोष्टकार्डाने पाठवा म्हणजे आपण जशी पाठवाल तशीच्या तशी मी पुनर्प्रकाशित करेन...

तात्या.

श्रीकृष्ण सामंत's picture

20 Jun 2008 - 1:16 am | श्रीकृष्ण सामंत

आपल्या प्रशंसने बद्दल आभार.
आपल्या मदतीती साठी पण मनापासू आभार.
मला संपादन हा शब्द माझ्या शोधण्यात मिळाला नाही.
माझ्या मुळचा लेख आणून त्याचं संपादन कसं करायचं
ही माहिती मला पुढच्या दृष्टीने फायद्याची होईल
तेव्हा ते कसं करायचं ते मार्गदर्शन झाल्यास आभारी होईन.
मी ह्या साईटवर नविन असल्याने थोडा उताविळ आहे एव्हडेच
सामंत

धनंजय's picture

20 Jun 2008 - 1:04 am | धनंजय

आणि (कंसांचा) कल्पक वापर. पहिले कडवे त्यामुळे जास्त आवडले.

चतुरंग's picture

20 Jun 2008 - 1:45 am | चतुरंग

सामंत साहेब, रचना आवडली! :)

चतुरंग

श्रीकृष्ण सामंत's picture

20 Jun 2008 - 2:50 am | श्रीकृष्ण सामंत

प्रशंसे बद्दल आपल्या सर्वांचे आभार.
आपल्या सर्वांच्या प्रशंसेमुळे माझ्या प्रेरणेला उत येतो.आणि माझी जबाबदारी पण वाढते.
परंतु आपल्याला आनंदी करायला मी नक्कीच प्रयत्न करीन.
सामंत

कौस्तुभ's picture

20 Jun 2008 - 9:15 am | कौस्तुभ

वाह काय कल्पना आहे ,मस्तच.....

श्रीकृष्ण सामंत's picture

24 Jun 2008 - 12:23 am | श्रीकृष्ण सामंत

सर्वांचे आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com