कोण येथे गुरुवर्य ?

गणेशा's picture
गणेशा in जे न देखे रवी...
23 Mar 2011 - 8:59 pm

कोण येथे गुरुवर्य ?
खितपत पडले शौर्य
अहिंसेचे पुतळे मानतो
मौनात दडले क्रौर्य

झाकोळला स्पष्ट अंधार
मुखवट्यात गळले धैर्य
स्त्रीत्वाची ताकद जाणतो
खुऱाड्यात लुटले कौमार्य

घुंगूरपाण्यात डुबले नेत्र
कळले कोणास सूरगांभिर्य
दगडात ईश्वर जाणतो
देवत्व शोधतो सूर्य

भावनांचा गच्च बाजार
मनात हरवले माधुर्य
वैराग्यात निरपेक्षता मानतो
अहंकारातून घडते कार्य

---- शब्दमेघ

रौद्ररसकविता

प्रतिक्रिया

प्रकाश१११'s picture

23 Mar 2011 - 10:17 pm | प्रकाश१११

गणेशा -निव्वळ अप्रतिम

झाकोळला स्पष्ट अंधार
मुखवट्यात गळले धैर्य
स्त्रीत्वाची ताकद जाणतो
खुऱाड्यात लुटले कौमार्य

हे खूपच छान ,नि मस्त सूर लागले

काका धन्यवाद ..
रिप्लाय या कारणासाठी की खरे तर हे कडवे सर्वात शेवटी या कवितेत आले ...
तसे मला पहिले कडवे बरे वाटत होते .. नंतर आपोआप सुचलेल्या या कडव्यामुळे मात्र कविता छान जमली असेच वाटले होते ..

ज्ञानराम's picture

24 Mar 2011 - 1:42 pm | ज्ञानराम

अप्रतिम जमली आहे कवीता...

भावनांचा गच्च बाजार
मनात हरवले माधुर्य
वैराग्यात निरपेक्षता मानतो
अहंकारातून घडते कार्य

आवडले

कच्ची कैरी's picture

24 Mar 2011 - 3:43 pm | कच्ची कैरी

गणेशा मी तुमच्या कवितेची फॅन झाले आहे प्रत्येक शब्दन शब्द कवितेच्या माळेत असा गुंफला आहे कि वाचतच र्रहावेसे वाटत आहे .मस्त :)

हरिप्रिया_'s picture

24 Mar 2011 - 5:08 pm | हरिप्रिया_

कविता आवडली...

मृत्युन्जय's picture

24 Mar 2011 - 5:13 pm | मृत्युन्जय

सुंदर आहे रे.

आत्मशून्य's picture

25 Mar 2011 - 4:02 am | आत्मशून्य

.

स्पंदना's picture

25 Mar 2011 - 7:16 am | स्पंदना

गणेशा अतिशय सुन्दर अन गेय !!

मानल बुवा!!

मनपुर्वक आभार सर्व वाचकांचे ...