साखरांबा

रेवती's picture
रेवती in पाककृती
23 Mar 2011 - 10:24 pm

साहित्य: एक मोठी कडक कैरी, साखर, केशर, वेलचीपूड, दोन पातेली, त्यावर बसेल असे झाकण, मोठा चमचा, किसणी, चाळणी.
कृती: पातेल्यात अर्धा तांब्या पाणी उकळण्यास ठेवावे. कैरीची साले काढून किसून घ्यावी अथवा साले न काढता मोठ्या फोडी करून किसणीवर पालथ्या ठेवून किसाव्यात.कीस वाटीने मोजून घ्यावा.
कैरीच्या आंबटपणानुसार साखरेचे प्रमाण बदलते. कैरी आंबट नसल्यास एकास एक प्रमाण अथवा सव्वापट, दुप्पट किंवा जास्त साखर घ्यावी. पाण्याला आधण आल्यानंतर पातेल्यावर चाळणी ठेवून कैरीचा कीस पसरावा.
झाकण ठेवून वाफ द्यावी. एका कैरीच्या किसासाठी ८ मिनिटे वाफ द्यावी लागली. खूप वाफवल्यास चोथा होइल.
वाफवलेला कीस ताटात पसरून गार होवू द्यावा.
आता दुसर्‍या पातेल्यात मोजलेली साखर व साखरेच्या निम्मे पाणी पाकासाठी ठेवावे. तीन तारी पाक झाल्यानंतर गार झालेला कीस त्यात घालावा. मध्यम आचेवर चमच्याने ढवळत रहावे. केशरपूड व वेलची पूड घालावी.
पातळ झालेला पाक पुन्हा तीनतारीच्या जवळ गेला की आच बंद करावी. गार झाल्यानंतर साखरांबा अजून घट्ट होणार आहे हे लक्षात असू द्यावे. पूर्ण गार झाल्यानंतर साखरांबा बरणीत भरून ठेवावा.

sakharamba 003
टीपा: १.कैरी किसण्यासाठी जाड किसणी वापरावी. माझ्याकडे तशी नसल्याने कीस बराच बारीक झाला.
२. कैरी अतिशय आंबट असल्यास कीस पिळून घेऊन मग चाळणीवर पसरावा.
३. साखरांबा गार झाल्यानंतर भरून ठेवायची बरणी आधीच अगदी स्वच्छ धुवून, उन्हात वाळवून ठेवावी म्हणजे वर्षभर साखरांबा टिकेल.
४. साखरांबा करण्यासाठी जड बुडाचे पातेले घ्यावे म्हणजे तळाला जळून त्याचा वास साखरांब्याला लागणार नाही.

प्रतिक्रिया

प्रसन्न केसकर's picture

23 Mar 2011 - 10:31 pm | प्रसन्न केसकर

साखरांबा, गुळांबा आणि कच्च्या कैर्‍यांची चटणी या माझ्या उन्हाळ्यातल्या आवडत्या रेसिप्या.

टारझन's picture

24 Mar 2011 - 12:08 am | टारझन

साखरांबा, गुळांबा आणि कच्च्या कैर्‍यांची चटणी या माझ्या उन्हाळ्यातल्या आवडत्या रेसिप्या

आयला ... मला मात्र साखरांबा गुळांबा आवडतो .. कच्च्या कैर्‍या नको :) लै बोर असतात :)

बाकी रेवती .. फोटो इतका टेंप्टिंग आहे .. की तोंड पाणावले .. लपल्पपपपपप

कच्ची कैरी's picture

24 Mar 2011 - 10:10 am | कच्ची कैरी

कोल्ह्याला द्रा़क्ष आंबटच लागणार ना !रांझण बोरकर
बाकी रेवतीताई पाकृ एकदम मस्त हं !तोंडात त्सुनामीच उठली ,तस कैरीच्या प्रत्येक पदार्थाने माझ्या तोंडाला पाणीच सुटते :)...
मस्त एकदम मस्त

टारझन's picture

24 Mar 2011 - 10:28 am | टारझन

रेवती , थोडसं पॅकिंग करुन कुरियर कर हो :) बाकी हल्ली सुकलेले मनुके पण स्वतःला द्राक्ष समजतात .. =))

- (फ्रुटप्लेट खाणारा) कोल्हा

निवेदिता-ताई's picture

25 Mar 2011 - 10:30 pm | निवेदिता-ताई

:)

पैसा's picture

23 Mar 2011 - 10:41 pm | पैसा

छान चकाकी आलीय. असाच गुळांबा पण करतात त्यात लवंगा घालतात थोड्या. त्याचा रंग पण खास येतो. जरा काळसर.

(तू असे पाकृ चे धागे काढत बसलीस तर आम्ही तुझ्या धाग्यावर शतक कसं ठोकणार?)

रेवती's picture

24 Mar 2011 - 8:41 am | रेवती

येइल गो! तसाही धागा येइल.;)

पैसा's picture

24 Mar 2011 - 8:57 am | पैसा

तिकडे हिरव्या देशात तुला कोणत्या प्रकारचे आंबे मिळतात?

जात माहित नाही पण मॅरेथॉन नाव लिहिलेल्या बॉक्समध्ये येतात. मेक्सिकन आंबे असतात म्हणे! हापूससारखा स्वाद नसतो पण चव बरी असते. इंडीयन ग्रोसरीवाला बुवा हापूसचे किती आंबे कोणाला हवेत त्या ऑर्डरी घेतो. सिझनला भारतातून एकदा म्हणे हापूस येतो. नंतर तो वाटला जातो. फळ फार मोठं नसतं. एकदा फक्त नाव न नोंदवता उरले म्हणून चार हापूस मिळाले पण चव चांगली होती.

पैसा's picture

24 Mar 2011 - 9:09 am | पैसा

तसा हापूस हल्ली आम्हाला पण दुर्मिळ झालाय. हापूसच्या पिकलेल्या आंब्यांचा साखरांबा एकदम राजेशाही होतो. पण हल्ली उत्तम प्रतीची फळं सगळी निर्यात होतात. आणि आम्हाला राहिलेला गाळ मिळतो..

दिपाली पाटिल's picture

24 Mar 2011 - 9:53 am | दिपाली पाटिल

ही उत्तम प्रतीची फळं आणि धान्य कुणाला निर्यात करतात कोण जाणे, इकडे तरी बेस्ट असं काही दिसत नाही...

रेवती's picture

24 Mar 2011 - 10:08 am | रेवती

अगदी हेच म्हणते.

बराचसा उत्तम माल मध्यपुर्वेत (अरबराष्ट्रांत) जातो म्हणे.

कुंदन's picture

25 Mar 2011 - 4:25 am | कुंदन

विकांताला शोधुन कळवतो.

विकास's picture

25 Mar 2011 - 4:27 am | विकास

प्रयत्ने वाळूचे कण रगडीता साखरांबाही मिळे...असे काही असते का? :-)

धन्यवाद कुंदनसेठ... दोन डझन पुरतील मला. पत्ता व्यनी केला आहे.

कुंदन's picture

25 Mar 2011 - 12:44 pm | कुंदन

लायनीत ये रे नायल्या.
तुला साल्या काही शिस्त च नाही, पुणेकर बघ कसे लायनीते येतायत.

उत्तम माल विकांताला शोधुन कळवतो.

आम्हाला परवडेल अशा दरात बघा... अन हो, आठवडाभर तरी पुरायला हवा...

रेवतीजींना आनंदाचे उमाळे फुटत असावेत...
शतकपूर्ती झाल्याचा आनंद अमेरिकेच्या गगनातुन भारतापर्यंत डोकावतोय...

विकास's picture

25 Mar 2011 - 1:49 am | विकास

एकदम मस्त दिसतोय!

असाच गुळांबा पण करतात त्यात लवंगा घालतात थोड्या. त्याचा रंग पण खास येतो. जरा काळसर.

हे काय माहीत नाय! फक्त खाता येतो. फक्त प्रतिसाद वर आणण्यासाठी मधेच येथे आलो :-)

(कधी जेवायला बोलावताहेत याची वाट बघतोय ;) )

जरूर या! शेजारच्या गावात राहणार्‍यांनी अर्धातास आधी कल्पना दिली तरी चालेल.

असुर's picture

23 Mar 2011 - 10:44 pm | असुर

रेवतीकाकू,
मस्तच बरं का!
साखरांबा म्हणजे आमचा एकदम आवडताच की!
लहानपणी आम्ही सगळी वांदरं आजोळी जमलो की फार्फार दंगा करायचो! आजीकडे आम्हाला गप्प करायचा एक फार नामी उपाय होता. साखरांबा आणि पोळीचे रोल!!! ताटभर (आणि पोटभर) असे रोल आले की लोक आधी खाण्यात गुंग व्हायचे मग झोपण्यात! :-) चौफेर शांतता!!!

--असुर

कुंदन's picture

23 Mar 2011 - 10:44 pm | कुंदन

मस्तच ...

टोंडाला बदाबदा पाणी सुटले.
या साखरांब्या बरोबर इनोचाही फोटू हवा होता.

अविनाशकुलकर्णी's picture

23 Mar 2011 - 11:18 pm | अविनाशकुलकर्णी

साखरांबा वा गुळांबा कै~या किसुन वा फोडी करुन करतात..
फोडिचा जास्त आवडतो..आई करायची.
पण सौ..किसुन करते..
हल्ली किसुनच करतात..काय कारण असावे?

अन्या दातार's picture

24 Mar 2011 - 12:56 pm | अन्या दातार

हल्ली 'किस'चे प्रमाण भलतेच वाढलंय बघा!
त्याचाच परिणाम असावा कदाचित........... ;)

रमताराम's picture

25 Mar 2011 - 1:54 pm | रमताराम

आई नि सौ यांच्यात हा फरक असणारच की. बायकूला कैरीच्या जागी तुम्ही दिसत असणार...;)

गणपा's picture

23 Mar 2011 - 11:20 pm | गणपा

शाळेच्या डब्याची आठवण झाली गो.
चपाती आणि मुरांबा/साखरांबा/गुळांबा हा ठरलेला मेन्यु. :)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

24 Mar 2011 - 3:08 am | निनाद मुक्काम प...

हेच म्हणतो मी

माझा आवडता मुरांबा. शाळेत असताना डब्यात मुरांबा असणे म्हणजे पर्वणीच असायची. नुसता मुरांबा किंवा पोळीला लावून खायला आवडतो.

- पिंगू

मदनबाण's picture

24 Mar 2011 - 9:30 pm | मदनबाण

सहमत...
अगदी हेच म्हणायचे होते मला, पण टंकायचे राहुन गेले !!! ;)

(कैरी लोणचे प्रेमी) ;)

हा साखरांबा साजूक तूप घालून पोळीला लावून खाणे, ही लहानपणीची गंमत होती. शाळेतून आल्यावर काहीतरी खाऊन मैदानावर खेळायला पळण्याची घाई असे. मुरांबा/साखरांबा पोळी हे झटपट खाद्य होते.

आता काही नवे छान पदार्थही साठवणीला असतात. उन्हाळ्यात स्ट्रॉबेरी, हापूस आंबा, अननस आणि फणस यांच्या फोडी आम्ही पाकात मुरवतो. त्याला काही काळानंतर इतका मनमोहक वास सुटतो की बस्स. पुन्हा बाजारातील जॅमपेक्षा ही पाकातील फळे चवीला मस्त लागतात.

जुनी आठवण जागी केलीत हो. धन्यवाद.

मृगनयनी's picture

25 Mar 2011 - 4:04 pm | मृगनयनी

+१ सहमत! योगप्रभूंशी....

____________

बाकी साखरांब्याची पाकृ. आणि फोटो... दोन्ही मस्तच! :)

____________

बाकी उन्हाळ्याच्या सीझनमध्ये आमरसाचे जाड थर उन्हात गच्चीवर वाळवून घरी बनवलेली आम्बटगोड "आम्ब्याची पोळी" खरंच लाजवाब! :)
आजकाल (किन्वा कदाचित पूर्वापार) या पोळ्या' विकतही मिळतात... हा भाग अलहिदा... पण आपण आपल्या हाताने पसरवलेल्या आमरसपोळी'ची चव जास्त आनन्द देते!!!

:)

पक्या's picture

23 Mar 2011 - 11:49 pm | पक्या

मस्त रेसिपी. फोटोही छान.

पुष्करिणी's picture

24 Mar 2011 - 12:38 am | पुष्करिणी

मस्त मस्त मस्त...
लग्गेच खावासा वाटतोय !!

sneharani's picture

25 Mar 2011 - 1:01 pm | sneharani

मस्त!!
अन् फोटोही अगदीच मस्त!

प्राजु's picture

24 Mar 2011 - 1:12 am | प्राजु

आहा!! मस्तच!! मी साखरआंबा फक्त छान पिकलेल्या आंब्यांचाच केला आहे. कैरीचा नाही केला कधी. माझी आई करते.
मी करून बघेन आता.

वपाडाव's picture

25 Mar 2011 - 10:07 am | वपाडाव

या सर्व उपद्व्यापाला साखर थोड्या जास्त प्रमाणात लागते. आणी थोड्या पिवळ्सर असलेल्या गोड कैर्‍या असाव्यात.
या कडक असतात साधारणत: , अन किसता किसता जीव जातो..
(लहान असताना आईला मदत करणारा)

इंटरनेटस्नेही's picture

24 Mar 2011 - 1:38 am | इंटरनेटस्नेही

मस्त मस्त मस्त...जुण्या आठवणी जाग्या झाल्या, टोन्डाला पाणी सुटले!
-
(णॉस्टॅलॅजिक) इंट्या.

चित्रा's picture

24 Mar 2011 - 4:01 am | चित्रा

फोटो आवडला :)

सानिकास्वप्निल's picture

24 Mar 2011 - 4:26 am | सानिकास्वप्निल

मस्तच मुंराबा,साखरांबा, गुळांबा सगळेच आवडते प्रकार.
बालपणीचे दिवस आठवले :)

मुरांबा आणि साखरांबा ह्यात काय फरक आहे सांगाल का?

शेखर's picture

24 Mar 2011 - 7:56 am | शेखर

मुरांबा हा आवळ्याचा असतो तर साखरंबा कैरीचा असतो.

योगप्रभू's picture

25 Mar 2011 - 12:09 am | योगप्रभू

आवळा किसून पाकात साठवतात तो मोरावळा.
मिठाच्या पाण्यातील आवळ्याचा कीस उन्हात वाळवला, की ती आवळकाठी
आख्खा आवळा पाकात मुरवून सुकवला की होतो आवळीपेठा
शेंदेलोण-पादेलोण घालून आवळ्याच्या फोडी वाळवल्या, की होते आवळा सुपारी

पिकलेला हापूस आंब्याच्या फोडी घट्ट पाकात मुरवल्या की होतो मुरांबा
कैरीचा कीस साखरेच्या पाकात घालून केलेला तो साखरांबा
पाक गुळाचा वापरला तर होतो गुळांबा
आंब्याचा रस आटवून खव्याइतपत ओलसर गोळा होतो त्याला म्हणतात साठं
आंबरस ताटात थापून होते ती आंबापोळी
घट्ट आंबरस डबाबंद केलेला असतो त्याला म्हणतात आंबागर (मँगो पल्प)

दुबारा मत पूछना :)
(गंमतीने म्हणतोय हो. रागाऊ नका)

गणपा's picture

25 Mar 2011 - 12:16 am | गणपा

एक राहिलं
पन्ह ;)

निवेदिता-ताई's picture

25 Mar 2011 - 8:14 am | निवेदिता-ताई

पन्ह................अहाहा...

रेवती...आता पन्ह्याचीही कॄती येवुदे.

रेवती's picture

25 Mar 2011 - 4:42 pm | रेवती

ही घे पन्ह्याची पाकृ!
http://www.misalpav.com/node/7150

मुरांबे हे निरनिराळ्या फळांचे अथवा फळभाज्यांचे करता येतात.
उदा. अननस, फणस, पेरू,स्ट्रॉबेरी,आवळा, बीटरूट, गाजर. टिकण्याचे कालावधी कमीजास्त असू शकतात.
साखरांबा हा सहसा कैरी किंवा पिकलेल्या आंब्याचा करतात.
अधिक पाकृसाठी दुवा http://www.misalpav.com/node/8242. याला जाहिरातबाजी असे म्हणतात.;)

आहाहा... लगेच जिभेवर चव तरळुन गेली !!! :)

(हापुस प्रेमी) ;)

प्रीत-मोहर's picture

24 Mar 2011 - 7:36 am | प्रीत-मोहर

आईकड फर्माईश केल्या गेली आहे :)

मस्त ग

कालपासुन हेच हादडतो आहे घरी, कांदा कैरीची चटणी, कच्चं तेल आणि गरम गरम पोळ्या, मग नंतर एक चमचा गुळांबा. वाह काय छान झोप लागते आफिसात. मस्त कामं बाज्रला राहतात आणि मग संध्याकाळी शिव्या खाव्या लागतात्त.

असो, आई कसं करते माहित नाही पणं असंच करत असावी, अशी दाट शंका आहे.

रेवती's picture

24 Mar 2011 - 8:40 am | रेवती

सर्व प्रतिसादकांचे आभार!
माझ्या मनातील पाशवी शक्ती अजून काही प्रतिसादांची भूक बाळगून आहे.;)

नंदन's picture

24 Mar 2011 - 8:47 am | नंदन

वा,वा, गुळांबा/साखरांबा/मेथांबा किंवा मोठ्या फोडी घालून केलेला कायरस/मुरांबा/छुंदा हे सगळे अतिशय आवडीचे प्रकार. वरच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे मधल्या सुटीतलं खाणं म्हणून किंवा विशेष आवडती भाजी नसेल तर तोंडीलावणं म्हणून मारलेले आडवे हात आठवून अं. ह. झालो :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Mar 2011 - 10:10 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

आवडती भाजी नसेल तर कशीतरी आपल्या वाट्याची भाजी आधी गिळून टाकायची आणि मग गुळांबा, साखरांबा, कायरस किंवा सुधारसाबरोबर जेवण येंजॉय करायचे याच्या आठवणीनेच ... वाढलेलं वजन आठवलं!

यशोधरा's picture

24 Mar 2011 - 8:51 am | यशोधरा

शमव तुझी भूक रेवती. हा घे अजून एक प्रतिसाद. ;)
मस्त!

सखी's picture

24 Mar 2011 - 5:30 pm | सखी

शमव तुझी भूक रेवती. हा घे अजून एक प्रतिसाद.

फोटो एकदम क्लास आलाय, आता माझी भूक कोण भागवणार? तरी पार्सलची वाट पहाते :)

डावखुरा's picture

24 Mar 2011 - 8:52 am | डावखुरा

अतिसुंदर

रामदास's picture

24 Mar 2011 - 9:53 am | रामदास

हे कसे शक्य आहे ? शिल्लक राहील्यास बरणीत भरणे हे योग्य होईल.
('हा मेल्यांनो !! उष्टेमाष्टे हात नको हां बरणीत 'हे जुने वाक्य आठवले.)
पण या पाक कृतीने बर्‍याच जुन्या आठवणी जागृत केल्या. पण गेले ते दिवस . माझ्या सुनेकडे एक कुकर आणि एक छोटी कढई येव्हढीच इन्वेंट्री आहे. दोन पातेली, त्यावर बसेल असे झाकण, मोठा चमचा, किसणी, चाळणी.

ही फार मोठी यादी आहे.
एक उपप्रश्न : दालचीनी (तुकडे) वापरावी का ?
एक आठवण : जड बुडाचे पातेले. माझाच लेख मला आठवला.
रेसेपी वेळेवर आली. पण मोठ्ठ्ठ्या फोडींचा साखरंबा कुठेय ?

रेवती's picture

24 Mar 2011 - 10:20 am | रेवती

http://www.misalpav.com/node/8242 पुन्हा झायरात ;) करते.
कुकरची शिट्टी काढून मग कीस वाफवता येइल. कुकरात पाणी घालून पाण्याशी अजिबात संबंध येणार नाही असा पातेल्यात किंवा कुकरच्या भांड्यात कीस वाफवता येइल. कुकरचे स्वत:चे झाकण असतेच.
दालचिनीचा मसालेदार सुगंध जो गोड पदार्थांना शोभेल असाच असतो. या पाकृत मात्र वेलदोडे आणि केशर छान वाटते. गुळांब्याला थोडा उग्र सुगंध चालू शकतो म्हणून लवंगा घालतात. त्यात दालचिनी वापरून पहायला हवी.

दिपाली पाटिल's picture

24 Mar 2011 - 9:57 am | दिपाली पाटिल

अजून एक प्रतिसाद,
नेहमीप्रमाणे पाकृ मस्तच
इकडच्या कैर्‍या आंबट नसतात नं, त्याने साखरआंब्याच्या चवीत काही फरक पडतो कां?

आंबट कैर्‍यांचा साखरांबा जास्त चांगला लागतो. पण आपल्याला इलाज नाही तेंव्हा एकास एक प्रमाणात साखर घ्यावी. ही कैरी मात्र बरी आंबट निघाली. मी एकास दुप्पट प्रमाणात साखर वापरलीये. आंबट कैरीचा स्वाद चांगला वाटतो.

दिपाली पाटिल's picture

24 Mar 2011 - 9:57 am | दिपाली पाटिल

अजून एक प्रतिसाद,
नेहमीप्रमाणे पाकृ मस्तच
इकडच्या कैर्‍या आंबट नसतात नं, त्याने साखरआंब्याच्या चवीत काही फरक पडतो कां?

इरसाल's picture

24 Mar 2011 - 10:10 am | इरसाल

घरात बनव्लेला आहे. चल्ला खावुया

सुहास..'s picture

24 Mar 2011 - 11:47 am | सुहास..

छान !!

छोटे मुंह बडी बातां : तरी म्हणल रंगाकाकांना पुष्पगुच्छ पाठविण्याची प्रेरणा कुठुन येते ;)

स्पंदना's picture

24 Mar 2011 - 12:13 pm | स्पंदना

ओ पाशवी बाई पिशवी भरली का नाही ?

कॅलरी कॅलरी म्हणता म्हणता साखरांबा खाते काय?

अजिबात खाउ नको सारा इकडे पाठव. काय. तसा बरा दिसतोय म्हणुन म्हणते.

आहे ना मी पुरे पुर पाशवी?

माझ्या मनातील पाशवी शक्ती अजून काही प्रतिसादांची भूक बाळगून आहे.
खी खी खी... ;) पाशवी शक्तीच्या इच्छेचा आदर करुन हा प्रतिसाद टायपतो...;)

(छुंदा प्रेमी) ;)

लवंगी's picture

24 Mar 2011 - 1:41 pm | लवंगी

जबरी दिसतोय.. करे पर्यत धीर कसा धरावा आता?

परिकथेतील राजकुमार's picture

24 Mar 2011 - 1:57 pm | परिकथेतील राजकुमार

झक्कास..

एकदम लालच आहा लपलप...

साखरांब्याला 'हिरवा' रंग नसल्याने हिरमोड झाला ;) परंतु काही 'हिरव्या' प्रतिसादांनी उणिव भरुन काढली.

कवितानागेश's picture

24 Mar 2011 - 2:45 pm | कवितानागेश

मस्तच.
पण ही पाककृती अण्डे न घालता कशी करायची हे मला सांगाल का रेवतीताई?
;)

अगं तेच तर! निवेदिता ताई आणि मृणालिनी यांनी विचारल्यामुळे पाकृ चढवली आणि यांचा काय पत्ता?:)
निवेदिता ताई आल्यावर लगेच बिनअंड्याच्या साखरांब्याची पाकृ देते.;)

निवेदिता-ताई's picture

24 Mar 2011 - 8:27 pm | निवेदिता-ताई

आले ग...... मला वास आला साखरांब्याचा.........एकदम झक्कास....

आणी साखरांबा करत असताना वास कित्ती छान येतो ना घरभर....व्वा....:)

गवि's picture

24 Mar 2011 - 4:30 pm | गवि

वा..

इंटरनेटस्नेही's picture

24 Mar 2011 - 5:14 pm | इंटरनेटस्नेही

मातोश्रींकडे मागणी नोंदविण्यात आली आहे!
खरंच खुप मस्त पाकृ आहे.
-
(साखरांबास्नेही) इंट्या.

प्राजक्ता पवार's picture

24 Mar 2011 - 5:29 pm | प्राजक्ता पवार

एकदम झक्कास पाकृ आहे :)

इथपर्यंत प्रतिसाद दिलेल्या सर्वांचे आभार!
आता ज्यांच्या लेखाला मी प्रतिसाद दिलेत त्यांचा सहभाग इथे अपेक्षित आहे हे नमूद करते.;)
चला तर मंडळी, एखाद्या पाकृलाही आपण जंगी प्रतिसाद देवू शकतो हे सिद्ध करा!;)
हीच संधी! हीच वेळ!! हाच धागा!!!

अनामिक's picture

24 Mar 2011 - 6:19 pm | अनामिक

छ्या! इथे सामुहिक धन्यवाद देण्यापेक्षा प्रत्येकाला प्रतिसाद देऊन धन्यवाद द्यायचा. प्रतिसादाचा आकडा हा हा म्हणता वाढला असता ;)

रेवती's picture

24 Mar 2011 - 6:22 pm | रेवती

आहे आहे आहे. तुमच्या मागल्यावेळचा सल्ला अजून ध्यानात आहे.;)
इडलीच्या पाकृला झालेल्या चुका
१. विकांताला धागा टाकणे.
२. भारतातल्या रात्री (लोक कंटाळलेले असताना) धागा चढवणे.
३. प्रत्येकाला शेपरेटली गाठून आभारप्रदर्शन न करणे.

टारझन's picture

24 Mar 2011 - 6:31 pm | टारझन

१. पुणे मुंबई वर धागा न टाकणे
२. स्त्री-पुरुष मुक्ती वर धागा नं टाकणे
३. मराठी - अमराठी लोकांवर धागा नं टाकणे
४. संस्कृती रक्षनावर धागा ण टाकणे
इत्यादी करणे .. १०० हिरावून घेत आल्यात

५. रसग्रहण करणे.
काय टारोबा, हे कसं बर विसरलास?

चिंतामणी's picture

25 Mar 2011 - 12:30 am | चिंतामणी

धागा टाकला की लाळेरे पुरवणे. ;)

स्मिता.'s picture

24 Mar 2011 - 6:51 pm | स्मिता.

रेवतीताई, साखरांबा/मुरांबा तर मस्तच दिसतोय.
मी असे अवघड आंइ जास्त काळ टिकणारे पदार्थ बनवण्याची रिस्क कधीच घेत नाही. बहुदा फसतात :(

तुमचा मुरांबा पिवळा दिसतोय, माझी आई पण साखर घालूनच करते पण त्याला जरा ब्राऊनीश शेड येते.

मी माझा सहभाग नोंदवला बरं का... तेवढीच भर ;)

---------------------------------------------------
मला अक्षरांचा रंग का बदलता येत नाही??

इंटरनेटस्नेही's picture

24 Mar 2011 - 9:58 pm | इंटरनेटस्नेही

तुमचा मुरांबा पिवळा दिसतोय, माझी आई पण साखर घालूनच करते पण त्याला जरा ब्राऊनीश शेड येते.

>>अधिक काळ गरम गेल्या मुळे/पाणी कमी पडल्यामुळे/रेग्युलर साखर न वापल्यामुळे अशी ब्राऊनिश शेड आल्या असावी. जाणकारांकरवी अधिक प्रकाश टाकल्या जावा.

-
(बल्ल्वाचार्य) इंट्या.

स्मिता.'s picture

25 Mar 2011 - 7:04 pm | स्मिता.

अरे वा इंट्या! तुम्हाला तर बरीच माहिती दिसते... छुपे बल्लवाचार्यच आहात तुम्ही. माहितीबद्दल धन्यवाद!

कैरीचा कीस कोणत्या रंगाचा आहे त्यावरही रंग अवलंबून असतो.
काही कैर्‍यांचे गर किंचित पिवळसर असतात त्यामुळे रंग बदलतो.
कोणत्या धातूच्या पातेल्यात साखरांबा केला जातो तेही पहायला हवे.
पूर्वी कल्हईच्या पातेल्यातच मुरांबा करत असत.
लोखंडी कढईत मुरांबा केल्याचा अनुभव मला नाही.
कैरीचा कीस वाफवताना स्टीलच्या पातेल्यातले पाणी १० मिनिटात काळे झाले होते.
आधी वाटले कि यातलेच पाकाला वापरू पण रंग जाण्याच्या भीतीने वापरले नाही.

इंटरनेटस्नेही's picture

25 Mar 2011 - 12:51 am | इंटरनेटस्नेही

ओके धन्यवाद, रेवती ताई. :)

अजुन एक शंका, खायचा रंग वापरणे कितपत अ‍ॅडव्हायजेबल आहे? बाजारात मिळण्यार्‍या साखरंबा आणि मुरांब्या मध्ये तो टाकलेला असतो का?
-
(शंकेखोर) इंट्या.

रेवती's picture

25 Mar 2011 - 4:22 am | रेवती

मी तरी रंग वापरला नाही. तुम्हीही वापरू नये असे वाटते आहे. बाजारच्या पदार्थांना देखणेपणा आणावा लागतो म्हणून काहीजण वापरत असतीलही.

गणपा's picture

25 Mar 2011 - 4:33 am | गणपा

तुम्हीही वापरू नये असे वाटते आहे.

रेवतीशी सहमत.
(रंगामुळे (रंगाशेट नव्हे, खायचा रंग म्हणतोय मी. ;) ) सपाटुन मार खाल्लेला)- गणा

९८*
*नाबाद ;)

स्मिता.'s picture

25 Mar 2011 - 7:08 pm | स्मिता.

मला वाटतं कैरीच्या गराचा पिवळसर रंग आणि पातेले यामुळेच फरक पडत असावा. कारण आमच्या घरात नेहमीचीच साखर वापरली जाते.

विशाखा राऊत's picture

24 Mar 2011 - 8:14 pm | विशाखा राऊत

एकदम झक्कास पाकृ आहे..

निवेदिता-ताई's picture

24 Mar 2011 - 10:33 pm | निवेदिता-ताई

आणी त्यात लवंग घातल्यास ,जरा ब्राऊनीश शेड येते.
पण असाच साखरांबा मस्त लागतो..!!!!!