मुस्लीम बांधव रोजे ठेवतात, त्या दिवसात त्यांच्या वर वेगवेगळी बंधने असतात व ते ती पाळतात.
क्रिश्चन बांधव लेत ठेवतात, त्या दिवसात त्यांच्या वर वेगळेगळी बंधने असतात व ते ती पाळतात.
ते आपल्या दृष्टीकोनातून तरी सुद्धा COOL व MODERN राहातात व आपण हिंदू बांधवही त्यांच्या ह्या परंपरेचा आदरपुर्वक स्विकार करतो.
आपल्यातली किती तरुण, बाल ह्यांना चातुर्मास काय आहे हे माहीत आहे व ते ठेवतात.
चातुर्मास हे एक उत्तम इच्छा शक्ती वाढवायचे साधन आहे.
ते एक उत्तम पोट साफ व करायचे साधन आहे.
ते एक उत्तम स्वतःला शिस्त लावायचे साधन आहे.
ते एक उत्तम व्यक्तिगत आढावा घेण्याचे साधन आहे.
तरी सुद्धा आपल्याला आपल्याच परंपरा पाळायची लाज शरम वाटते असे का. चातुर्मास ठेवणारा मागासलेला, देव देव करणारा व टोकाला जाऊन कोणी रुढिवादी व जातीवादी अशीत्यांवर टिकाही होते. जो चातुर्मास न करणे हे COOL व MODERN असण्याचे एक खुण आहे असे का वाटावे आपल्या तरुणांना.
कॉन्व्हेंट शाळेत शिकणारी मुले बाकीच्या इंग्लिश शाळेतल्यांची चेष्टा करतात. इंग्लिश शाळेत शिकणारी मुले मराठी शाळेतल्यांची चेष्टा करतात, तशीच चेष्टा जे चातुर्मास करत नाहीत ते चातुर्मास करणा-यांवर करतात.
प्रत्येक जिवनशैलीत असे काही प्रघात हळू हळू तयार होतात. त्यात कमीपणा व लाज वाटून घ्यायचे काही कारण नाही. जे सोपे आहे, स्वच्छ आहे व परिस्थीतीजन्य आहे ते आपले मानावे. जे देश काल पात्राला अनुसरून आहे ते आपले मानायला काही हरकत नाही. पुर्वीच्या सगळ्या परंपरा व रुढी वाईट नाहीत.
चातुर्मास स्वतःच्या व्यक्ती विकासासाठी एक उत्तम साधन आहे असे माझे मत आहे. आपल्याला काय वाटते.
http://rashtravrat.blogspot.com
http://bolghevda.blogspot.com
प्रतिक्रिया
23 Mar 2011 - 1:57 pm | प्रचेतस
उत्तम हा शब्द 'साधन' च्या आधी लागला पाहिजे असे नाही वाटत? तो चुकीचा ठिकाणी लागून अर्थाचा अनर्थ होतोय असे वाटतेय.
अवांतरः उत्तम वरून एक जुना श्लोक आठवला. उत्तमे ढमढमेची..........
23 Mar 2011 - 2:06 pm | रणजित चितळे
येथे मला संपादन करता येत नाही
वाचणा-यानीच
चातुर्मास हे एक उत्तम इच्छा शक्ती वाढवायचे साधन आहे.
ते एक पोट साफ करायचे उत्तम साधन आहे.
ते एक स्वतःला शिस्त लावायचे उत्तम साधन आहे.
ते एक व्यक्तिगत आढावा घेण्याचे उत्तम साधन आहे.
असे वाचावे
धन्यवाद
23 Mar 2011 - 2:02 pm | स्पा
ते एक उत्तम पोट साफ व करायचे साधन आहे.
हा व कशाला आलाय मध्ये ?
म्हणजे पोट साफ होण्याचे, आणि "अजून" काही करण्याचे साधन आहे, असा अर्थ आहे का याचा ?
कृपया तेवढं संपादित करा
23 Mar 2011 - 2:40 pm | चिरोटा
माझ्यामते सध्या उलटे घडत आहे. एकादशी/रोजे वगैरे पाळणे अलिकडे कूलपणाचे लक्षण समजले जाते.असो.
चातुर्मासात काय खायचे किंवा काय नाही ते कृपया लिहावे.
23 Mar 2011 - 2:58 pm | नितिन थत्ते
>>ते आपल्या दृष्टीकोनातून तरी सुद्धा COOL व MODERN राहातात व आपण हिंदू बांधवही त्यांच्या ह्या परंपरेचा आदरपुर्वक स्विकार करतो.
रोजे पाळणार्यांना मॉडर्न आणि कूल कोण समजते? माझ्या पाहण्यात तरी अजून कोणी अशी रोजे पाळणार्याला कूल आणि मॉडर्न समजणारी व्यक्ती आलेली नाही.
आदरपूर्वक स्वीकार केला जातो हे ठीक आहे.
बाकी.....
उपास केव्हाही केला तरी चांगले असते. त्याचा अतिरेक होऊ नयेच. विशेषत: आठवड्यात ३-४ दिवस उपास करू नये.
अवांतर : योगप्रभूंचा धागा येऊन गेल्यावर लगेच हा धागा?
23 Mar 2011 - 6:56 pm | रणजित चितळे
नाही हा शुद्ध योगायोग आहे.
आता वाचणार आहे योगप्रभूंचा धागा. आपला प्रतिसाद वाचल्यावर.
23 Mar 2011 - 4:35 pm | प्रशु
पुर्ण धागा हा कुल आणि अनकुल ह्यावर आहे. नावा वरुन मला वाटलं कि चातुर्मासा बद्द्ल माहिती असेल, चितळे साहेब क्रुपया चातुर्मास कसा कधी कोणत्या पद्धतीने पाळावा हे जरुर लिहा...
23 Mar 2011 - 5:25 pm | शुचि
लेख आवडला.
पण जे लोक चातुर्मास पाळणार्यांवर टीका करतात त्यांना योग्य टीकाणी मारण्यात यावे. मुख्य बरेच लोक चातुर्मास पाळत नाहीत कारण जाचक बंधने - मांसाहार वर्ज्य (एवढच मला माहीत आहे) आणि काही उपास तापास. मला स्वतःला उपास अजीबात जमत नाही. पण ज्यांना जमतो त्यांच्याबद्दल आदर वाटतो.
23 Mar 2011 - 8:01 pm | निनाद मुक्काम प...
मला स्वतःला उपास अजीबात जमत नाही. पण ज्यांना जमतो त्यांच्याबद्दल आदर वाटतो.
+१
निर्जळी एकादशी असू दे
नाहीतर रोजे
धन्य आहेत ती माणसे जे हे पाळतात .
आम्ही पडलो पोटाचे नी जिभेचे गुलाम
23 Mar 2011 - 8:09 pm | प्राजु
यात कुल असणे वा नसणे याचा काहीही संबंध नाहीये..
जे लोक चातुर्मास पाळतात, उपास करतात त्यांच्याबद्दल आदर वाटतो. आपणही करावं असंही वाटतं पण जमत नाही.. असो..
बाकी चालुदे!
23 Mar 2011 - 10:10 pm | पिंगू
रोजे करणारा कूल आहे. हे विधान अगदी हास्यास्पद वाटले. बाकी चातुर्मास पाळणे मला तरी आवडते आणि मी तो आवर्जून पाळतो. हे सांगण्यात मला तरी विशेष काही वाटत नाही.
- (सटीसमाशी चातुर्मासी) पिंगू
23 Mar 2011 - 11:40 pm | पिवळा डांबिस
उपास केला की माणूस कूल आणि मॉडर्न होतो हे लॉजिक काही पटलं नाही.
रोजा करणार्यांचा आदर केला जातो कारण ते दिवसभर निर्जळी रहातात. चातुर्मास करणारे जर दिवसभर निर्जळी राहिले तर त्यांचाही आदर होईल. :)
किंबहुना जुन्या काळी काही लोक जेंव्हा वेगवेगळ्या कारणानिमित्त निर्जळी उपास करायचे तेंव्हा त्यांचा आदर होतच असे. आदर होण्यासाठी त्याग/ बंधनेही तशीच असावी लागतात असं मला वाटतं...
तशीच चेष्टा जे चातुर्मास करत नाहीत ते चातुर्मास करणा-यांवर करतात.
चातुर्मास (किंवा कोणतेही व्रत) हे अत्यंत वैयक्तिक असावे. त्याची दुसर्याजवळ वाच्यता करण्याची गरज नसावी. जर ती वाच्यता केली नसेल तर दुसर्याना कळण्याचा आणि त्यांनी चेष्टा करण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही....
मला वाटतं की जेंव्हा व्रताची जाहिरात होते आणि वर नमूद केल्यामुळे त्यामुळे हे होतं, ते होतं असे क्लेम केले जातात तेंव्हा लोकांच्या चेष्टेला कारण मिळतं....
तरी सुद्धा आपल्याला आपल्याच परंपरा पाळायची लाज शरम वाटते असे का.
सत्य हे आहे की चातुर्मास पाळणे अखिल मराठी हिंदू समाजाची परंपरा नाही, कधीच नव्हती. मराठी हिंदू समाजातील काही विशिष्ट वर्गांची ती परंपरा असू शकेल. त्यामुळे चातुर्मास न पाळणार्यांना समस्त हिंदू बांधवांना आपल्या परंपरांची शरम वाटते हे विधान आधारशून्य आहे...
असो..
(स्वगतः गंभीर प्रतिसाद दिल्यामुळे आता या डांबिसाचा आयडी तर डिलीट होणार नाही ना?:))
24 Mar 2011 - 1:35 am | पक्या
चातुर्मास ठेवतात?
ठेवत नाही पाळतात .
24 Mar 2011 - 11:04 am | निनाद
आषाढी शुक्ल एकादशी (म्हणजेच देवशयनी एकादशी) ते कार्तिक शुक्ल एकादशी (म्हणजेच प्रबोधिनी एकादशी) या चार महिन्यांच्या काळास चातुर्मास म्हणतात. हा पावसाळ्याचा काळ असतो.
रणजित यांचा स्व-नियमनाचा मुद्दा चांगला आहे. पण चातुर्मासच का कायमच तो मुद्दा लागू आहे असे वाटते.
संपूर्ण चातुर्मास असे वि.के.फडके लिखित पुस्तक आहे त्यात अधिक माहिती मिळावी.
आपला चातुर्मास असेही एक पुस्तक पुस्तकविश्ववर पाहिले आहे.
सोलापूर येथील शाहू पाटोळे यांनी मटामध्ये लिहिलेला एक उत्तम लेख वाचनात आला होता तो देत आहे.
मराठी विकीवर त्रोटक माहिती येथे.
कथा वाचायची असल्यास हे पाहा.
24 Mar 2011 - 1:36 pm | परिकथेतील राजकुमार
आता हे सगळे ( पोट साफ, स्वतः शिस्त, व्यक्तिगत आढावा) फक्त चातुर्मास पाळल्यानेच होऊ शकते का? ह्यासाठी कोणतेही दिवस निवडता येतीलच की. मुळात ह्यासर्वांबरोबरच 'अधिक काही' मिळावे ह्या इच्छेने अनेकदा उपवास ठेवला जातो. मग ते 'अधिक काही' म्हणजे चांगला नवरा, बायको, नोकरी, प्रमोशन इ. इ. असते. माझ्यासारख्या लायकीपेक्षा जरा जास्तीत देवाची कृपा प्राप्त झाल्याने देवाला असले चातुर्मास वगैरे करुन अधिक त्रास का द्यावा ? मला न मागताच खुप काही मिळाले आहे. मग शिस्त, आढावा वगैरेंसाठी मी इतर दिवस निवडु शकतोच की.
बाकी ह्या सर्वांची टिंगल का होते हे पिडांकाकांनी सुंदर शब्दात सांगीतलेच आहे.
24 Mar 2011 - 1:42 pm | नारयन लेले
व्रत हे स्वत: साठीच करावयाचे आसते व त्या मुळे त्याची जहीरात करु नये हेच चा॑गले. शिवाय मनापासुन व्रत केल्याने शरिराला व मनाला आन॑द ही मीळतो. हे आनुभवाने सा॑गणारे आहेत.
विनित
24 Mar 2011 - 2:14 pm | रणजित चितळे
प्रतिसाद सगळे पटणारे आहेत.
माझ्या मते जाहिरात कोणी मुद्दामून करत नाही, पण सोशल इंटरएक्शनस् होत राहतात माणसाच्या व हे कळतेच. मी लोकांचा ह्या कडे बघण्याचा दृष्टीकोन नमूद केला येथे.