आज फाल्गुन वद्य तृतीया.
महाराजांची ३८१ वी जयंती.
या अलौकिक व्यक्तिमत्वाला समस्त मिपाकरांतर्फे आमचा मानाचा मुजरा.
पवित्र जन्मस्थळ
जीवधन
रतनगड
सुधागड
हडसर
वासोट्याचा नागेश्वर
राजमाचीवरून
सिंहगड
बुलंद, बळकट, बेलाग. पारतंत्र्यातून मुक्त झालेला पहिला भाग्यवान किल्ले तोरणा
जावळीच्या रानातला मकरंदगड
घनगड
घनगडावरून दिसणारा तैलबैला
बळकट रोहिडा
लांबलचक पट्टा उर्फ विश्रामगड
बेलाग माहुली
पहिली राजधानी-राजगड
यांसम हाच-दुर्गदुर्गेश्वर रायगड
नतमस्तक
प्रतिक्रिया
22 Mar 2011 - 10:32 am | प्रशु
श्री शिव चरणी मानाचा मुजरा..
वल्ली खुपच छान छायाचित्रे. तुम्ही स्वतः काढली आहेत का?
22 Mar 2011 - 10:35 am | प्रचेतस
सर्व छायाचित्रे माझीच आहेत. रतनगडाचे एक छायाचित्र फक्त मामेभावाने काढलेले आहे.
22 Mar 2011 - 10:41 am | मृगनयनी
वल्ली!... वरील छायाचित्रे खूपच छान आहेत! :)
क्षत्रियकुलावतंस गोब्राह्मणप्रतिपालक बहुजनोद्धारक प्रौढप्रतापपुरन्दर छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा! :)
22 Mar 2011 - 10:47 am | हरिप्रिया_
सगळेच फोटो मस्त...
आणि फोटो पाहता पाहताच स्फुरण चढले...
शिवरायांना मानाचा मुजरा आमच्याकडूनही..
22 Mar 2011 - 10:56 am | स्पा
वल्या
सगळेच फोटू एकदम कडक ....
मस्तच आहेत यार...
जियो
महाराजांना दुसर्यांदा ह्याप्पी बड्डे !!!!
22 Mar 2011 - 10:56 am | प.पु.
आमचापण त्रिवार मुजरा
22 Mar 2011 - 10:57 am | मनीषा
सुरेख छायाचित्रे ...!
शिवछ्त्रपतिंना विनम्र अभिवादन !!
या भूमंडळाचे ठायी | धर्मरक्षी ऐसा नाही |
महाराष्ट्र धर्म राहीला कांही | तुम्हा कारणें ||
22 Mar 2011 - 12:12 pm | नन्दादीप
छायाचित्रे अप्रतिम...!!!
हर हर महादेव.....!!! कालच "संभाजी" वाचून पूर्ण केल, पुर्णपणे शिवकाळात वावरतोय अजून.....
शिवाजी महराज की जय...!!!
22 Mar 2011 - 2:33 pm | मॅक
पहीला छत्रपतींना...........
दुसरा तुमच्या फोटोग्रफीला......
तिसरा तुम्हाला ............
मानाचा मुजरा...
22 Mar 2011 - 3:06 pm | विनायक बेलापुरे
जोहार !
वल्ली धन्यवाद.
22 Mar 2011 - 3:15 pm | परिकथेतील राजकुमार
ज ब र द स्त !
22 Mar 2011 - 3:27 pm | Nile
कड्यावर उभा असलेल्या मनुष्याचे सिल्युएट चित्र फार आवडले.
22 Mar 2011 - 3:28 pm | गणपा
काय शिंची कटकट आहे....
एक तर स्वतः पायाला भिंगरी लावल्या गत दर्याखोर्यांत फिरतात. फिरतात तर फिरुदे पण वर इकडे येउन असे उत्तम फोटू टाकुन आमची जळवतात.
विमुक्तासारखं किल्लेदार,जातीवंत भटका,योगेश२४,५० फक्त, वल्ली आदी लोकांना ही एखाद्या कोठडीत डांबुन ठेवाव वा नाना सोबत अज्ञात्वासासतरी धाडुन द्याव असा प्रस्ताव मांडत आहे.
22 Mar 2011 - 3:36 pm | VINODBANKHELE
अलौकिक व्यक्तिमत्वाचे अलौकिक स्मरण.......................
22 Mar 2011 - 4:08 pm | स्वच्छंदी_मनोज
हायला... घनगडाला वरती जायला शिडी केव्हा बसवली?
वल्लीसाहेब मस्तच छायाचित्रे.. खुप खुप आठवणी जाग्या केल्यात...तुम्हीही माझ्या आवडिच्या जातकुळिचे निघालात.
यात पुरंदर, सिंधुदुर्गचे फोटो असायला हवे होते असे वाटुन गेले.... हरकत नाही. भाग दोन म्हणुन अजुन काही किल्ल्यांचे फोटो टाका.
22 Mar 2011 - 4:13 pm | प्रचेतस
घनगडाला साधारण ७/८ महिन्यापुर्वीच शिडी बसवलीये.
पुरंदरला गेलो होतो तेव्हा डीजीकॅम नव्हता. सिंधुदुर्गाचे दर्शन घ्यायला जायचे आहे अजून.
तो योग लवकरच येवो अशी प्रार्थना करतोय महाराजांपाशी.
24 Mar 2011 - 1:23 pm | जातीवंत भटका
मस्तच !!
सगळे फोटो अप्रतिम !!!
शिवरायांस आम्हा पामराचा मानाचा मुजरा ....
श्रीशिवरायाचा जयकार
सह्याद्रीवर घुमतो अजून
तुझ्या शौर्याचा हुंकार ...
श्वासाश्वासातून निघतो
श्रीशिवरायाचा जयकार ...
म्लेंच्छांनी घातले घाव
घाव मातृभूमी वरी ..
परदास्याच्या अंधःकारातून
पेटला स्वातंत्र्याचा रवी ...
घेऊनी रामदासी मंत्र
गर्जला हा नृसिंह असा ...
दुमदूमला आसमंत सारा
थरथरल्या दाही दिशा ...
मावळे मराठे मर्द
झुंजले अर्पुनी प्राण ...
रोवले छातीत मोघलांच्या
तेजस्वी भगवे निशाण ...
तासिले कडे अभेद्य
घडविले दुर्ग बेलाग ...
सळसळती मनगटे मराठी
अन् समशेर ओकते आग ...
हिंदवी स्वराज्याचा ज्यानी
थाटला संसार साजरा ...
त्या जाणत्या राजांस करितो
मानाचा त्रिवार मुजरा ...
--- वेडा कवी - अमोल (जातीवंत भटका ...)
24 Mar 2011 - 1:39 pm | ज्ञानराम
शिवछत्रपतींना मानाचा मुजरा....
फोटो जबरदस्त आलेत.......
24 Mar 2011 - 2:40 pm | वपाडाव
हा धागा कसाकाय सुटला होता कोण जाणे....
पण एकंच बोल्तो...
अव्वल
27 Mar 2011 - 2:41 pm | प्रास
मनापासून नमोनमः!
27 Mar 2011 - 3:56 pm | अप्पा जोगळेकर
बुलंद बेलाग बळकट.वा. फोटोसुद्धा अगदी तसेच.
28 Mar 2011 - 4:21 pm | गणेशा
शिवछत्रपतींना मानाचा मुजरा....
फोटो जबरदस्त
28 Mar 2011 - 7:21 pm | बिपिन कार्यकर्ते
मुजरा!