आज पुन्हा नव्याने केली मी जुन्या गीतांची होळी
आज पुन्हा नव्याने शिवली मी माझी फाटकी झोळी
झालो सज्ज रचाया तुझ्यावर नवीन सुरेल गाणी
उघडली पुरचुंडी अन, काढल्या जुन्या आठवणी
जुनेच सूर जुनेच तराणे ... लिहितो मी शब्द नवे
जुनाच पूर जुनेच बहाणे ... वाहतो मी तुझ्या सवे
मुद्दाम झालो पूर्णपणे रिते ... आता टाकली ती कात
लिहायचो पूर्वी प्रेम गीते ... आता टाकली ती जात
कवितेमधून दिसती आता ... काही उरले ओले क्षण
दिसते तगमग उरातली अन ... दिसते थरथरले मन
फिरून नव्याने विणतो आहे तीच जुनी मी जाळी
आज पुन्हा नव्याने शिवली मी माझी फाटकी झोळी
आज पुन्हा नव्याने केली मी जुन्या गीतांची होळी
प्रतिक्रिया
21 Mar 2011 - 12:43 pm | प्रकाश१११
छान .आवडले
जुनेच सूर जुनेच तराणे ... लिहितो मी शब्द नवे
जुनाच पूर जुनेच बहाणे ... वाहतो मी तुझ्या सवे
पु.ले.शु
21 Mar 2011 - 6:18 pm | कच्ची कैरी
मस्त आहे कविता !साध्या सोप्या शब्दांत मांडणी केलीत हे जास्त आवडले ,अजुन येउ द्या :)
21 Mar 2011 - 11:32 pm | प्रास
विश्वेशजी, दिसणारे मन थरथरले असावे की थरथरते?
..... एक साधीशी चौकशी.
22 Mar 2011 - 12:25 am | गणेशा
कविता छानच
कवितेमधून दिसती आता ... काही उरले ओले क्षण
दिसते तगमग उरातली अन ... दिसते थरथरले मन
बेस्ट