जर्मनीतील एक अहिंसक आंदोलन ( सोशल नेटवर्क चे अपत्य )

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture
निनाद मुक्काम प... in कलादालन
18 Mar 2011 - 12:28 am

जर्मनीत २०२२ मध्ये सर्व अणू भट्या बंद करून त्याजागी अपारंपरिक उर्जा स्त्रोत वापरायचे .असे जर्मन सरकारचे धोरण होते .
त्याला मोडता घालत ह्या अणू उर्जेला जीवदान मिळावे असा निर्णय सरकारने घेतला .

मुळात अपारंपरिक उर्जा स्त्रोत जर्मनीत समर्थ पर्याय म्हणून पुढे येत आहेत .ओबामा ह्यांनी स्वतःच्या देशात व जगात ह्या उर्जा स्त्रोतांचा वापर वाढण्यास उत्तेजन देत आहेत .
परिणामी जर्मनीत सरकारच्या निर्णयाविरुद्ध एक संताप निर्माण झाला .आभसी जगतात तो व्यक्तही करून झाला .
आणी ....
जर्मन सरकारच्या निर्णयाविरुद्ध
१४ मार्चला १ लाख हून जास्त लोक जर्मनीत विविध शहरात रस्त्यावर आली .व अहिंसक मार्गाने निदर्शने केली
.व १५ मार्च रोजी सरकारने १७ पैकी ७ अणू प्रकल्प तात्पुरते 3 थांबवण्याचा निर्णय घेतला ३ महिने थांबून सरकार अणू उर्जेच्या वापराबाबत फेरविचार करत आहे .

१४ मार्चला म्युनिक शहरात मी केट ह्या मोर्च्यात होतो .
आमच्या अहिंसक आंदोलना विषयी ज्याचे प्रणेते सोशल नेटवर्किंग आहे

माझा ह्याविषयावर लेख सकाळ मधील पैलतीर मध्ये आला आहे .

विविध पोस्टर व झेंडे घेऊन विविध स्तरातील माणसे एकत्र जमली होती .

शाळेतील गोड जोडपे

चान्सलर मर्केल ह्यांना आमचा संदेश

आमच्या संस्थेचा एक वक्ता

जपानच्या परिस्थितीची जाणीव करून देणारा एक कार्यकर्ता

माझे काम पत्रक वाटणे .व घोषणा देणे इतपतच होते .
मला खूप बोलायचे होते .पण आमच्या मोडक्या तोडक्या जर्मन भाषेमुळे गोची झाली
सध्या भाषा शिकण्याला प्रमुख प्राधान्य .

जमलेला विराट समुदाय

धोरण

प्रतिक्रिया

पुष्करिणी's picture

18 Mar 2011 - 12:58 am | पुष्करिणी

अरे वा, बरेच समविचारी लोकं एकत्र आलेले दिसतायत.

एकदम ४० % प्रकल्पांचं काम थांबवल्यावर आणि अपारंपारिक स्त्रोतांकडून ती भरपाइ होइपर्यंत ( अर्थात १०० % ही भरपाइ होइल अस वाटत नाहीच ) जनतेवरही थोडी बंधन येउ शकतात, त्याची जाणिव इथे उपस्थित असणार्‍यांना आहे का आणि त्या अनुशंगानं दैनंदिन जीवनात कराव्या लागणार्‍या त्यागाची तयारी आहे का ?

म्हणजे मोसमी अन्न्/फळं/भाज्या खाणे, रेड मिटचं कमी सेवन, अन्नाची कमीत कमी नासाडी, गाड्यांचा कमी वापर ( इतकी नामांकित ऑटो इंडस्ट्री असताना ) इ. करण्याची तयारी आहे का? आणि अशी सवय / तयारी करण्याचा काही प्लॅन आहे का तुमच्या ग्रुपचा?

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

18 Mar 2011 - 1:11 am | निनाद मुक्काम प...

मी लेखात उल्लेख केला त्याप्रमाणे ११ % अणू उर्जा तर १६ % अपारंपरिक उर्जा व बाकी इतर
तर टप्याटप्याने अणू उर्जा कमी करत २०२२ मध्ये पूर्ण पणे बंद करणे हा उपाय होता .
ह्यात अपारंपरिक उर्जा स्त्रोत हे टप्या टप्याने वाढवायचे होते
.
मुळात हा प्लान सरकारने विचार करून आखला होता .२०१० मध्ये
व काही महिन्यांपूर्वी

पण अचानक त्यानी आपले धोरण बदलले .
आपल्या वचनावर कायम राहत नाही ह्या बद्दल जनतेत रोष होता .

पवन उर्जेत २र्य क्रमांकावर असलेले आम्ही पहिल्या क्रमांकासाठी निकोप स्पर्धा नक्कीच करू शकतो .
'' केल्याने होत आहे रे आधी........
आपल्या देशात अपारंपरिक उर्जा स्त्रोतास प्रचंड वाव आहे .अणू उर्जेसोबत ह्या उर्जेचा वापर सुरु झाल्यास आपण विजेची टंचाई संपूर्ण देशात निर्धारित लक्ष्या आधी पूर्ण करू .

विंजिनेर's picture

19 Mar 2011 - 3:30 pm | विंजिनेर

पण अचानक त्यानी आपले धोरण बदलले .
आपल्या वचनावर कायम राहत नाही ह्या बद्दल जनतेत रोष होता .

अंमळ गल्लत होतेये का? माझ्या माहिती प्रमाणे मूळ धोरण आधीच्या डाव्या सरकारने आखले होते.
मर्केलबैंचे उजवे आल्यानंतर धोरण बदलले गेले. त्यामुळे मुदलातले सरकार बदलल्यावर धोरणं तरी कशी कायम र्‍हातील ओ?

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

19 Mar 2011 - 4:28 pm | निनाद मुक्काम प...

होय
ते धोरण डाव्यांनी जेव्हा बनवले होते .तेव्हा ह्यावर योग्य विचारविनिमय करून २०२२ पर्यत सर्व अणु
भट्ट्या बंद करणे अर्थात उर्जेचा तुटवडा भासू नये म्हणून पर्यायी हरित उर्जेचा आराखडा मांडला होता .
ह्या उजव्या सरकारने मात्र तडाखा फडकी हा निर्णय घेतला .

ह्याचा अर्थ हरित उर्जेला तिलांजली देणे असा होतो .
अरेवा ही जर्मन कंपनी सिमेन्स चा अणु उर्जेचा स्टेक मोठ्या प्रमाणात विकत घेणार असल्याचे वृत्त आहे .थोडक्यात
उजव्या सरकारच्या ह्या निर्णयामागे मोठे अर्थकारण आहे .म्हणूनच त्याला व्यापक विरोध झाला .
अरेवा कंपनीचा ही बुडीत नसून तिच्या महत्वाकांक्षा वाढत आहेत .

एक उदाहरण
अमेरिकेने व एन एस जी ह्या अण्वस्त्र सज्ज गटांच्या राष्ट्रांनी भारताला उच्च तंत्रन्यान व युरेनियम विक्रीस प्रतिबंध केला होता .
अमेरिकेत अनेक सरकार आलटून पालटून आली पण ३ दशकात ही बंधने उठवल्या गेली नव्हती .
मात्र जेव्हा त्यांचा भारताविरुध्ध भूमिका बदलली तेव्हा पहिले बुश ह्यांनी अण्वस्त्र करारातर्फे पहिले बंधन उठवली .व ओबामा ह्यांनी भारतात आल्यावर अंतराळ व इतर शेत्रातील बंधने उठवली .

आमच्यासारखे अनेक जण सोशल नेटवर्कच्या माध्यमातून एका हाकेवर पहिल्यांदा आले होते. त्यामुळे हा विषय व त्यांचे गांभीर्य समजावून घेत होते.

विंजिनेर's picture

19 Mar 2011 - 7:55 pm | विंजिनेर

ह्या उजव्या सरकारने मात्र तडाखा फडकी हा निर्णय घेतला .

ह्मह्म... तुम्ही कोणत्या बाजूला झुकता ते कळाले :)
एक कुतुहल (निव्वळ कुतूहल बर्का) - भारतात कोणत्या पक्षाला तुम्ही मत द्याल?

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

20 Mar 2011 - 2:42 pm | निनाद मुक्काम प...

आम्ही अनिवासी भारतीय
आमचें जो पक्ष ( बर का ) जो पक्ष व्यवस्थित काळजी घेईन .म्हणजे भारत भूमीत गुंतवणुकीसाठी एक व्यासपीठ उभे करणे .आम्हाला भारतात अनेक धंदे करायला देणे .
आदी .
.
भारतात आल्यावर जर कधी कोणत्याही पक्षाच्या नेत्याशी किंवा इतर सदस्यांशी संबंध आला
व आमचे आर्थिक /सांस्कृतिक / सामाजिक सूर जुळले( येथे वैचारिक सूर हा मुद्दा गौण आहे )
. त्या पक्षाला मते देऊ ( मनमोहन काका अनिवासी भारतीयांना मदतानाचा हक्क देणार आहेत अशी बातमी आहे .)

थोडक्यात काय तर आमचा सध्या कोणत्याही पक्षाला पाठिंबा अथवा विरोध नाही ,
आम्हाला दिव्यत्वाची जेथे प्रचीती येईन तेथे आमचे कर जोडले जातील .

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

19 Mar 2011 - 4:28 pm | निनाद मुक्काम प...

होय
ते धोरण डाव्यांनी जेव्हा बनवले होते .तेव्हा ह्यावर योग्य विचारविनिमय करून २०२२ पर्यत सर्व अणु
भट्ट्या बंद करणे अर्थात उर्जेचा तुटवडा भासू नये म्हणून पर्यायी हरित उर्जेचा आराखडा मांडला होता .
ह्या उजव्या सरकारने मात्र तडाखा फडकी हा निर्णय घेतला .

ह्याचा अर्थ हरित उर्जेला तिलांजली देणे असा होतो .
अरेवा ही जर्मन कंपनी सिमेन्स चा अणु उर्जेचा स्टेक मोठ्या प्रमाणात विकत घेणार असल्याचे वृत्त आहे .थोडक्यात
उजव्या सरकारच्या ह्या निर्णयामागे मोठे अर्थकारण आहे .म्हणूनच त्याला व्यापक विरोध झाला .
अरेवा कंपनीचा ही बुडीत नसून तिच्या महत्वाकांक्षा वाढत आहेत .

एक उदाहरण
अमेरिकेने व एन एस जी ह्या अण्वस्त्र सज्ज गटांच्या राष्ट्रांनी भारताला उच्च तंत्रन्यान व युरेनियम विक्रीस प्रतिबंध केला होता .
अमेरिकेत अनेक सरकार आलटून पालटून आली पण ३ दशकात ही बंधने उठवल्या गेली नव्हती .
मात्र जेव्हा त्यांचा भारताविरुध्ध भूमिका बदलली तेव्हा पहिले बुश ह्यांनी अण्वस्त्र करारातर्फे पहिले बंधन उठवली .व ओबामा ह्यांनी भारतात आल्यावर अंतराळ व इतर शेत्रातील बंधने उठवली .

आमच्यासारखे अनेक जण सोशल नेटवर्कच्या माध्यमातून एका हाकेवर पहिल्यांदा आले होते. त्यामुळे हा विषय व त्यांचे गांभीर्य समजावून घेत होते.

तुमचे आंदोलन १०० % सफल होवो ही इच्छा.

अवआंतर : तुम्ही फोटो टाकले आहेत काय .. माझ्या येथे फक्त '.' दिसत आहेत

विनायक बेलापुरे's picture

18 Mar 2011 - 8:49 am | विनायक बेलापुरे

सध्याच्या काळात अणूउर्जे इतका सोइस्कर पर्याय दिसत नाही.
प्यायला पाणी पुरणार नाही ते जलविद्युत केंद्रात वापरून समुद्राला सोडून देणे परवडणार नाही. फॉसिल फ्युएल्स आता जगभरातून हळूहळू नामशेष होण्याच्या वाटेवर आहेत. वारा,समुद्राच्या लाटा यांच्यावर उर्जा निर्मितीला मर्यादा आहेत.

परंतू अणूउर्जा जरी प्रथम दर्शनी सोईस्कर वाटत असला तरी सर्वात धोकादायक पर्याय आहे तो. अणू विघटन आणि त्यातून तयार होणारे बाय प्रॉडकट्स यांचे हाफ लाइफ पाहिले तरी पुढील हजारो वर्षे हा अणूकचरा सांभाळून ठेवावा लागणार आहे. त्यांचा अन्यक्षेत्रातील (मेडिकल) वापर अत्यंत मर्यादित आहे. किरणोत्सार हा सर्वात मोठा धोका पर्यावरणाला मारक ठरणार आहे.

एक विरोधाभास जाणवतो तो म्हणजे.... जपान मधील अणूभट्टी दुर्घटने नंतर जर्मनी, अमेरिका आदी राष्ट्रे आपापले अणूउर्जा कार्यक्रमांचा फेरविचार, स्थगिती , सुरक्षेबाबत चिंता करत असताना आपले अणूशास्त्रज्ञ मात्र टि.व्ही. चानेल्सला भेटी देवून ,सुरक्षेचा कसलाच धोका नाही ..... ऑल इज वेल .....हे पटविण्यात मश्गूल आहेत. जैतापुर पुढे रेटणे एव्ह्डाच अजेंडा आहे का काय असे वाटते.

ज्या फ्रेंच अरेवाचा हा प्रोजेक्ट आहे त्या फ्रान्स ला अणू कचरयाची विल्हेवाट लावायला किती कष्ट पडले होते, न्यूझिलंड आणि ओशनिया देशांनी त्याचा किती विरोध केला होता हे त्यानिमित्ताने आठवते. फ्रान्स ने सुद्धा स्वतःच्या देशाजवळ अटलांटिक मध्ये नाही बुडवला अणूकचरा .... त्यासाठी लांब , अमेरिकेच्या पलिकडे, पाण्याचे , वारयाचे करंट सोडून थेट पैसिफिक मधे दूर नेउन बुडवायचे ठरविले .

खरे तर अपारंपारिक उर्जेचे स्त्रोत शोधले पाहिजेत.
शोधायला कशाला पाहिजेत ? सूर्य असा एकटाच स्त्रोत आहे जो उर्जेच्या सर्व गरजा पूर्ण करेल.
पण त्यासाठी तंत्रज्ञान विकासाची, आणि मिळविलेली उर्जा अधिक चांगल्या तर्हेने (एफिशिअंटली) साठवण्याचे तंत्रद्यान विकसित व्हायला पाहिजे.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

18 Mar 2011 - 10:45 am | निनाद मुक्काम प...

@जपान मधील अणूभट्टी दुर्घटने नंतर जर्मनी, अमेरिका आदी राष्ट्रे आपापले अणूउर्जा

त्यांच्याकडे समर्थ पर्याय आहेत .ते अपारंपरिक उर्जा स्त्रोत तर वापरू शकतात .पण कोळसा तेल व नैसर्गिक वायू देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे .
आपण इतके दिवस अणुउर्जा अल्प प्रमाणात वापरत होतो .पण सर्व पर्याय वापरून झाले आणी मगच ....
विजेच्या बाबतीत आपण कुपोषित आहोत तर ते अती लठ्ठ
१६ तासाचे भारनियमन दूर करण्यासाठी सध्या अणू उर्जेला पर्याय नाही
.
@प्यायला पाणी पुरणार नाही ते जलविद्युत केंद्रात वापरून समुद्राला सोडून देणे परवडणार नाही.
सहमत

विनायक बेलापुरे's picture

19 Mar 2011 - 2:33 am | विनायक बेलापुरे

निनाद जी
माझे पहिलेच वाक्य होते की सध्याच्या काळात अणूउर्जे इतका सोइस्कर पर्याय दिसत नाही. (पण तो खुप धोकादायक पर्याय आहे. अन्य कोणत्याही उर्जेच्या साधनांपेक्षा धोकादायक. )

आज जपान घडले आहे म्हणून भुकंप आणि सुनामीची चर्चा रंगते आहे. कोणत्याही प्रकल्पात जसा कोंटीजन्सी प्लान असतो तसा अणूप्रकल्पात असणारच यात वाद नाही. परंतु असे सगळे प्लान्स असतानाही "अपघात" होतात, जसा आत्ता सुनामीचा झाला तसा. आणि असा अणूप्रकल्पातील अपघात इतर कोणत्याही प्रकल्पाहून मारक असेल.

अनेक जण म्हणतात आज आपल्याकडचे भारनियमन बंद व्हायला पाहिजे तर अणू उर्जेशिवाय पर्याय नाही.
हाफ लाइफ नुसार पुढची ५०००० वर्शे टिकणार्या अणू कचर्याची विल्हेवाट लावायचा गहन आणि गंभीर प्रश्न असूनही ?

१६ तासाचे भारनियमन संपवायचे आहे ना मग अणूप्रकल्पच घ्या असे म्हणणे म्हणजे दूध अपुरे मिळते आहे ना ? मग जे मिळते आहे ते केमिकल दूध प्या असे म्हणन्या सारखे आहे. (तसेही जराशी कटकट करुन कळत नकळत अधून मधुन का होइना पण तेच केमिकल दूध पितो आहे म्हणा सध्या आपण) . त्यामुळे भारनियमन संपवायला अणूउर्जा हे पटायला जरा अवघड जाते आहे.

जैतापुरचा सध्या प्रश्न गाजतो आहे म्हणून सांगावेसे वाटते की ... जरासे कीटकनाशक भाज्या, फळांवर जास्त आढळले तर माल न स्विकारणारे अमेरिकन-युरोपियन देश, चुकुन किरणोत्सार झाला तर असा किरणोत्सारित माल स्विकारेल का भविष्यात ? सगळेच भवितव्य आपण टांगणीला तर लावून ठेवत नाही आहोत ना ?

त्यातून भारतीय मिडिया आणि एकूणच आपली बातम्या दाबण्याबद्दलची मानसिकता पाहता असा किरणोत्सार झाला तरी दडवून ठेवले जाइल. जपान इतकी पारदर्शिकता मला तरी अजून आढळली नाही. आणि याचा अनुभव आपण कोंबड्यांवरचे रोग, स्वाइण फ्लू , नांदेड भागात सध्या भूगर्भातऊन येत असलेले अगम्य आवाज इ इ या
सर्वांबाबत घेतला आहे. इतर्ही भरपुर उदाहरणे आहे.

नैसर्गिक पाणी, कोळसा, वायु , वारा यांचा वापर नेहमीच मर्यादित राहणार आहे. नैसर्गिक खनिजे तर जोपर्यंत आहेत तोपर्यंतच आहेत.
समुद्राच्या पाण्याचे विघटन करून वीज निर्मिती शक्य आहे पण त्याने पर्यावरणाचा तोल कमालीचा ढलेल.

जोपर्यंत निर्माण केलेली वीज साठवून ठेवता येत नाही (कायमस्वरूपी मोठ्या प्रमाणावर) तोपर्यंत सर्व पर्याय यथातथाच राहणारा आहेत.
"तिकडे" समर्थ पर्याय आहेत आपल्याकडे नाहीत याचे प्रमुख कारण म्हणजे आपल्याकडे जे मुबलक आहे त्याच्यावर आधारित संशोधन करुन आपण प्रक्ल्प उभे करायला हवे होते. जसे की अन्य युरोपियन देशांहून भारतात सुर्यप्रकाश सर्वात मोठा उर्जा स्त्रोत आहे.

पृथ्वीवर येणारी प्रति स्केअर मीटर सौरऊर्जा (फ्लक्स )१७४ पेटावैट (१७४ x १०^१५ watt = १७४ x १० ^ ९ MWatt ) इतकी प्रचंड आहे. भारताची उर्जेची सध्याची गरज १५ टेराWatt म्हणजे १५ x १० ^ १३ watt इतकीच आहे. त्यावरून किती प्रचंड ऊर्जा उपलब्ध आहे तीही विनासायास , प्रदुषण विरहित हे लक्षात येइल. त्यातील ७०% पृथ्वी शोषून घेते तर ३०% इतकी पुन्हा वातावरणात इन्फ्रारेड म्हणून परावर्तित होते.

पण तीच ऊर्जा चिरकाल टिकणारी आणि सर्व गरजा भागवून उरणारी आहे . आज ना उद्या संशोधनानंतर त्रुटी घालवून तीच ऊर्जा जास्त वापरली जाईल. आपले संशोधन जर ही उर्जा वापराच्या दृश्टीने झाले तरच आपली उर्जेची गरज सुरक्षीत दृष्ट्या भागवली जाउ शकेल. भारताच्या दृष्टीने वर्षातील ९-११ महिने मिळणारी सौरशक्तिच सर्व दृष्टीने किफायतशीर पर्याय आहे.

भाऊ,
ठीक आहे पण फोटो कुठ गायब झाले........

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

19 Mar 2011 - 3:58 pm | निनाद मुक्काम प...

मला तर फोटो दिसत आहेत .

अप्पा जोगळेकर's picture

19 Mar 2011 - 4:58 pm | अप्पा जोगळेकर

अपघात होतात म्हणून वाहन चालवणे सोडून द्यायचे हे अजिबात पटत नाही.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

19 Mar 2011 - 8:44 pm | निनाद मुक्काम प...

जर्मनी व इतर युरोपियन देश हे विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले .त्यात अणू उर्जेचा वाटा आहे .मात्र हे करतांना त्यानी जाणीव पूर्वक हरित उर्जेला पाठिंबा दिला .आज जेव्हा जर्मन डाव्या पक्षाने म्हणजे मागील सरकारने अणू उर्जा उर्जा ते हरित उर्जा असा आराखडा ठेवला तेव्हा जगातून त्यांचे कौतुक झाले .
ओबामा ह्यांनी त्यांच्या भाषणात जगात अपारंपरिक उर्जेचा पाठपुरावा केला
.
भारतात पावन उर्जा एकूण उर्जा उत्पादनाच्या २ % कमी आहे .हेच सौर ऊर्जेबाबत आहे .
जेव्हा भारतात हरित उर्जा एक समर्थ पर्याय म्हणून उभा राहीन तेव्हाच अणू उर्जेला आपण खऱ्या अर्थाने विरोध करू .
तो पर्यत आपले अमूल्य परीकींय चलन /तेल /नैसर्गिक वायू / कोळसा ह्यांची खरेदी करण्यात वाया घालवू .

भारत व चीन ज्या वेगाने ह्या ३ गोष्टी वापरत आहे .त्याने जगात ह्या गोष्टींची मागणीमुळे किंमत वाढवली आहे .
त्यामुळे जगभरातून हरित उर्जेसाठी पुढाकार घेतला जात आहे .
कारण पवन व सूर्य ह्यांची उर्जा अक्षय्य आहे .
म्हणूनच आपल्या पूर्वजांनी त्यांना देवतांचा दर्जा दिला .

अप्पा जोगळेकर's picture

20 Mar 2011 - 9:13 am | अप्पा जोगळेकर

अगदी चांगला प्रतिसाद दिलात. अनेक शंकांचे निरसन झाले.

सामान्य लोकांची याबध्द्लची जाणिव / क़ळकळ अन त्यासाठी उठविलेले पाऊल पाहून खुप आनंद झाला.
आपल्याकडे असे जन-आंदोलन कधी होणार ??
तुझे , केट चे, अन तुमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांचे कौतुक :-)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

19 Mar 2011 - 8:47 pm | निनाद मुक्काम प...

माझ्या मिपावरील रशिया नेपाल अश्या लेखात जेव्हा काही महिन्यांपूर्वी मी पुतीन ह्यांच्या भारत दौर्यात त्यानी आपल्या देशात १६ अणुभट्ट्या बांधणार असे कौतुकाने लिहिले होते .त्यातील दोन तमिलनाडू येथे बांधायला सुरवात पण झाली आहे .त्याबद्दल अजून विरोध झाल्याचे माझ्या वाचनात नाही .मुळात तामिळनाडू मधील त्या दोन जागा अजून आपल्याला माहीत नाही आहेत
.
मुळात कोणतही राजकीय पक्षाचा अणू उर्जेला भारतात विरोध नाही आहे .रशियाने विविध दशकात आपल्याला अणू भट्या बांधून दिल्या .त्या सुरळीत पणे उर्जा पुरवत आहेत .
आज जपान एखादी गोष्ट करू शकत नाही ती भारत यशस्वी पणे करू शकते असे आमचे १० फ चे कुलकर्णी सर म्हणाले ते अगदी योग्य आहे .

धन्यवाद आपा
आज जर्मनी स्वताचे उपग्रह नासा किंवा इतर देशांकडून सोडते .पण मागच्या ५ वर्षात भारताच्या इस्त्रो ने जगात सर्वात स्वस्त नी मस्त लघु वजनाचे उपग्रह सोडायला सुरवात केली .अणू जर्मनीसह अनेक देशांनी नो नासा /गो ईस्त्रो चा नारा दिला .

सध्या आपले एक अवकाश उड्डाण अपयशी ठरले पण ते जर यशस्वी झाले( येत्या वर्षात आपण परत जोमाने हीच चाचणी करू )

तर जगातील कोणत्याही प्रकारचे उपग्रह आपण सोडू शकू .
तस्मात मला एक कविता ह्या प्रसंगी आठवते

''लहरों से डर कर नौका पार नहीं होती,
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती.''

विनायक बेलापुरे's picture

20 Mar 2011 - 1:13 am | विनायक बेलापुरे

पुण्यात डॉ. अनिल काकोड्कर यांचे व्याख्यान पुणे मराठी मध्ये आयोजित केले होते. तिथे त्याना बराच विरोध झाला असे ऐकिवात आहे. काकोडकरांनी चेर्नोबिल दुर्घटने मध्ये फक्त ३६ जण म्रुत्यूमुखी पडले असे वक्तव्य केल्यावर बराच गोंधळ झाला. मग विरोधीना ३ प्रश्न विचारण्याची परवानगी देण्यात आली. त्यालाही म्हणे त्याना नीट उत्तरे मिळाली नाहीत.

पुण्याच्या लोकायत या संस्थेने १७ मार्च ला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले होते. त्यांचे म्हणणे
खालील दुव्यावर पहायला मिळेल. इंग्रजी आणि मराठी अश्या दोन्ही भाशांमध्ये त्यांनी निवेदन तयार केले आहे.

http://lokayatpune.wordpress.com/category/lokayat-statement/

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

20 Mar 2011 - 1:47 am | निनाद मुक्काम प...

@काकोडकरांनी चेर्नोबिल दुर्घटने मध्ये फक्त ३६ जण म्रुत्यूमुखी पडले असे वक्तव्य केल्यावर बराच गोंधळ झाला

गंमत म्हणजे पुतीन जेव्हा २०१० मध्ये भारतात आले .तेव्हा ते येण्या आधी ते ह्या दशकातील सर्वात मोठा करार भारताबरोबर करणार होते .ह्या बाबत सविस्तर पणे मी त्यावेळी मिपावर रशिया नेपाल ह्या नावाने लेख लिहून सविस्तर माहिती दिली होती .

त्या कराराचे सविस्तर वर्णन येथे आहे .
थोडक्यात जेव्हा रशियाने २०१० साली भारताला १६ अणु भट्ट्या बांधून देणार असा करार केला .त्यात २ आधीच बांधायला सुरवात झाली होती .
तेव्हा औचित्याचा मुद्दा कोणी उपस्थित केला नाही .?
आज मात्र किती मेले /कोणामुळे मेले ह्यावरून काथ्याकुट आहे .
बर त्या १६ अणु भट्ट्या का बांधत आहेत म्हणून त्या ३ ठिकाणी का बरे स्थानिक लोकांनी विरोध झाला नाही .?
व जगात प्रगत सर्वात प्रगत तंत्रांद्यान असलेल्या फ्रेंच कंपनीविषयी रान का .....?

विनायक बेलापुरे's picture

20 Mar 2011 - 9:15 am | विनायक बेलापुरे

रशिया बरोबरच्या कराराच्यावेळी काय परिस्थिती होती ते तपासावे लागेल.
पण भारतीय राजकीय (आणि मिडिया) वातावरणात नेहमीच रशियाला फेवर्ड पप्पा सारखे वागवले गेले आहे.

स्थानिकांनी विरोध केला नाही की तो यशस्वीपणे दाबला गेला ते पहावे लागेल. जैतापुर सारख्या ठिकाणी सुद्धा एकरी १० लाख घेउन लोक गप्प बसले असते, तर विरोध फारसा झालाच नाही असेच चित्र उभे राहिले असते कदाचित. डाऊ कंपनीलासुद्धा महाराष्ट्रातच का विरोध झाला आधी का नाही झाला याच्या सारखेच आहे ते उत्तर.

शिवाय निनाद जी, तेंव्हा नसेल औचित्याचा मुद्दा उपस्थित झाला पण म्हणून जेंव्हा धोका लक्षात येतो तेंव्हाही विरोध
होउ नये की काय ? निदान त्यामुळे तरी काही बदल होउन अणूभट्ट्यांच्या अधिकाधिक सुरक्षेचा विचार होउ शकतो आणि भविश्यातील होउ घातलेल्या दुर्घटना टळण्यास मदत होउ शकतो. नाहितर ऑल इज वेल दाखवण्याच्या नादात तिकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जाते.

अपघात होतात म्हणून वाहन चालवणे सोडून देत नाहीत तर वाहनात तांत्रिक दृष्ट्या बदल केले पाहिजेत. मुख्य म्हणजे वाहन चालकाच्या मानसिकतेत बदल केले पाहिजेत.

सगळे काही सुरळीत आहे , ऑल इज वेल हे चित्र बदलले तरी खुप फरक पडू शकेल.

विवेकपटाईत's picture

17 Nov 2015 - 6:48 pm | विवेकपटाईत

खरचं काकोडकर अनु उर्जेचे समर्थक आहे, मला तसे वाटत नाही.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

20 Mar 2011 - 11:58 am | निनाद मुक्काम प...

विनायकजी तुमचा मुद्दा पटला. व त्यामागची कळकळ सुद्धा जाणवली .
खुद्द डॉ कलाम ह्यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात ज्यात काकोडकर सुद्धा होते

..संरक्षणमंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व्ही.के.सारस्वत हे उपस्थित होते. या वेळी डॉ.कलाम यांना सन्माननीय डॉक्टरेट पदवी डॉ. काकोडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.तेव्हा सांगितले

'' जुन्या ,नव्या सर्व प्रकारच्या अणू भट्ट्यांची सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तपासणी आवश्यक आहे .
व आपल्याकडे आपत्ती व्यवस्थापनशास्त्रचे पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु केले पाहिजे .

निनाद, सुंदर लेख!
माझ्या मते अणूशक्तीला आज तरी पर्याय दिसत नाहीं. सुरक्षिततेच्या बाबतीत, रेडिएशनच्या बाबतीत येत्या कांहीं वर्षात सुधारण नक्कीच होतील व त्यामुळे अणुशक्तीनिर्मिती जास्त-जास्त सुरक्षित होत जाईल यात शंका नाहीं!
"अपघात होतात म्हणून वाहन चालवायचे नाहीं कां?" हा प्रतिसाद भावला!

आशु जोग's picture

17 Nov 2015 - 9:00 am | आशु जोग

कुठले अपारंपरिक मार्ग आहेत याबद्दलही सांगा ना !