इथल्या धोरणात हे चालेल ह्या समजुतीने देत आहे. जर आक्षेपार्ह वाटले तर उडवले तरी चालेल -
इंग्लिश-मराठी अनुवादक software साठी हवा आहे. साधारण ४-५ दिवसांचे (रोज ३-४ तास ह्या प्रमाणे) काम आहे. येत्या सोमवारी सुरु केल्यास (७ मार्च), रविवार पर्यंत (१३ मार्च) पुर्ण करणे अपेक्षित आहे. काम वेळेत पुर्ण करणे ही एक महत्वाची अट आहे.
- घरी computer व Internet Connection असावे
- बारहा वापरता आली पाहिजे - http://www.baraha.com/
- अनुवाद करण्याचा अनुभव असल्यास उत्तम, नसला तरी चालेल. पण काम बिनचूक पुर्ण करण्याचा विश्वास असावा.
- रोज काही files पुर्ण करणे अपेक्षित आहे.
- अनुवादक पुण्यातला हवा म्हणजे काम समजावणे सोपे होईल
- काम वेळेत पुर्ण करणे ही एक महत्वाची अट आहे. १३ मार्च पर्यंत काम पुर्ण झाले पाहिजे.
- काम समाधानकारकरित्या पुर्ण केल्यास रु. २००० मोबदला दिला जाईल
अधिक माहितीसाठी मला व्य.नी. करू शकता. धन्यवाद!
प्रतिक्रिया
4 Mar 2011 - 2:43 pm | स्पा
यशवंत एकनाथ ह्या आयडीला संपर्क साधा, ते मदत करू शकतील
4 Mar 2011 - 3:10 pm | परिकथेतील राजकुमार
मन्या मी येऊ का? ;)
असो...
कोण असेल तर फोनवतो रे :) अर्जंट असेल तर सांग म्हणजे कॅफेत एक प्रिंटौट लावुन टाकतो. प्रिंटचे पैसे तू नंतर देशीलच ;)
4 Mar 2011 - 3:22 pm | मनिष
परा, प्रिंटौट लावलास आणि कोणी मिळाला/ली तर तुला एक मस्तानी किंवा मिपा. काय हवे ते! ;-)
एक खुलासा - पुण्याबाहेरची व्यक्ति चालेल, पण ती फोन/चॅट वर उपलब्ध असावी आणि रोज फाइल्स मेल ने मिळाव्यात ही अपेक्षा आहे.
4 Mar 2011 - 3:26 pm | परिकथेतील राजकुमार
ओक्के दादूस :)
4 Mar 2011 - 7:48 pm | केतन अघोर
क्रुपया आपला इ मेल द्यावा. माझा ketanmail@rediffmail.com आहे. मला टेस्ट मेल पाठवा, मग मी माझा नम्बर पाठवतो.
4 Mar 2011 - 10:28 pm | निवेदिता-ताई
मी ही नक्की वेळेत पुर्ण करीन...कसे करायचे एकदा दाखव.
4 Mar 2011 - 10:54 pm | मनिष
कृपया व्यनी ने ई-मेल आयडी कळवा म्हणजे नमुना पाठवता येईल.
5 Mar 2011 - 12:54 pm | चैतन्यकुलकर्णी
संपर्कः shreeseva.it@gmail.com
working in bi-lingual software development from last 6 years.
5 Mar 2011 - 3:36 pm | आनंद
मलाही मझ्या मशीन च्या instruction manual चा हिंदीत अनुवाद करुन हवा आहे.
साधारण ३० पानांच आहे. वेळेचा काही प्रोब्लेम नाही, सवडीन २ ते ३ आठवड्यात केला तरी चालेल,
मोबदला मनिष म्हणतात त्या प्रमाणात देउ.
त्याच प्रमाणे माझ्या कंपनी च्या वेबसाइटच गुगल रेटींग सुधारुन हव आहे, त्या बाबत कोणी मदत करु शकत असेल (अर्थात मोबद्ल्या सहीत) तरी संपर्क साधावा.