त्रिवेणी या गुलजारजीनी निर्माण केलेल्या नविन काव्यप्रकाराबद्दल (आता तसा जुना झाला आहे!) खुप वाचले. लिहायचा मोह झाला.
ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी थोडीशी माहीती:
तीन ओळी असतात. तिसरी ओळ ही पहील्या दोन ओळींना पुढे नेणारी किंवा कमालीचा विरोधाभास असणारी आणि ती वाचल्यानंतरच खरा दोन ओळींच्या मागे दडलेला अर्थ उमगावा अशी असते.
१.
आधी येतो पाऊस..
मग तुझी आठवण..
.
.
.
अंती शिल्लक राहतो तो मृदगंधच...
२.
तू, मि, पाऊस.. सगळेच वेडे..
दाटून आले कि बरसतो..
.
.
.
या वर्षी दुष्काळ फार लांबलाय...
३.
तुझी माझी भेट जणू..
ओढाळ लाटेवर चांदण्याचा स्पर्श..
.
.
.
लाटा अन् चांदणे दोन्ही स्पर्शातीत....
४.
पौर्णिमेच्या रात्री चंद्रचिंब तू..
मि मात्र पूर्ण गोंधळलेला..
.
.
.
धरती अन् नभ यातील फरक शोधतोय...
५.
डोळ्यातील 'हो'कार अन् ओठातील 'न'कार..
दोघेही असे काही भांडतात..
.
.
.
जणू काय जुळ्यांचे दुखणे...
६.
तुझी स्वप्ने अशी ओळीने ऊभी असतात..
मि झोपत नाही.. तरी वाट पाहत राहतात..
.
.
.
बहुदा त्यांनाही आता सवय झाली आहे.. जागरणाची..
७.
एक शांत सरोवर अन् त्यात उगवतीचा सुर्य..
हं.. किती शांत वाटतय आता..
.
.
.
अगं थांब इतक्यात मिटू नकोस ते डोळे...
८.
लाटांवर लाटा किनार्याशी..
सागर नाहीच दोषी..
.
.
.
माझ्याच पायाचे बहुदा दगड झालेत....
|- परीकथेतील राजा -|
(१५/०९/२०१०)
प्रतिक्रिया
2 Mar 2011 - 12:50 pm | प्रकाश१११
खूप छान प्रयत्न.मित्रा लिहित रहा. पु.ले.शु.
2 Mar 2011 - 1:06 pm | गणेशा
साध्या साध्या वाटणारा हा प्रकार अवघड असतो ..
या प्रकाराला हायकु बोलतात कदाचीत असे वाटते .
तुम्ही लिहिलेले सर्व आवडले ..
विरोधाभासातुन परिस्तीथी सुंदर वर्तविलेली आहे ..
लिहित रहा .. वाचत आहे
2 Mar 2011 - 1:18 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
हायकू वेगळे असते. उदाहरण मिळाल्यास जरूर पाठविन आपल्याला.....
2 Mar 2011 - 1:15 pm | टारझन
पहिलेच दोन्ही प्रतिसाद कविश्रेष्ठांचे आल्यावर आम्ही कवितेचे अफजुलखान काय बोलणार? =)
-त्रीदेव
कविता से शादी करुंगा
2 Mar 2011 - 1:49 pm | गणेशा
कसला कवीश्रेष्ठ .. हितं शब्द आठवायची मारामार .. जुण्याच देतो मध्ये आधे ..
थोडेशे मनोगत :
सगळ्याच जणांनी लेख ..कथा .. कविता लिहिल्या तर प्रतिसाद कोण देणार ते ही मनापासुन वाचुन .. म्हणुन मी कवी या संकल्पनेत न बसता वाचक यात बसतो बाबा ..
निदान चांगले लिहिता येत नसले तर चांगला प्रतिसाद देवुन लिहिणार्याला प्रोत्साहन देने पाहिजेच ..
विशेष करुन कविता कडे कोणीच लक्ष देत नाहि जास्त ..
बाकी कविता शी लग्न करणार या विनोदी वाक्यावरुन ही .. कविता आणि तीच्या बापाचे म्हणने मांडावे असे वाटते ... पण जमल्यास ...
3 Mar 2011 - 10:36 pm | राघव
सगळ्याच त्रिवेण्या आवडल्यात.
एखादी वेगळी काढून खास तारीफ केली तर बाकींवर अन्याय होईल!
येऊ देत अजून खूप खूप!! :)
राघव
3 Mar 2011 - 11:01 pm | अविनाशकुलकर्णी
छान
4 Mar 2011 - 12:28 am | बेसनलाडू
त्रिवेणी आवडल्या.
आणखी येऊदेत.
(त्रिवेणीप्रेमी)बेसनलाडू
4 Mar 2011 - 1:17 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
नक्की प्रयत्न करीन...
4 Mar 2011 - 1:59 pm | नगरीनिरंजन
मस्त!
त्रिवेणी वाचताना स्मित प्रकटले
आणि डोळ्यात वेदना उमटली
.
.
.
.
ओठ माझे फाटलेत थंडीने.... ;-)
4 Mar 2011 - 2:03 pm | विजुभाऊ
तू, मि, पाऊस.. सगळेच वेडे..
दाटून आले कि बरसतो..
.
.
.
या वर्षी दुष्काळ फार लांबलाय...
आवडले रे
4 Mar 2011 - 2:07 pm | विजुभाऊ
तू जोरात धावतेस..
मी जोरात धावतो...
.....
....
....
आमी बास.... दम लागला
........घुसळलेला विजुभाऊ