स्वसंपादन सुविधा परत दिल्याबद्दल मिसळपाव व्यवस्थापनाला जाहीर धन्यवाद.

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in जनातलं, मनातलं
27 Feb 2011 - 4:38 am

आजच मी माझा नवीन लेख पुन्हा वाचून बघायला म्हणून उघडला तर अहो आश्चर्यम! लेखावर दोन टॅब दिसले. दृश्य आणि संपादन. माझा माझ्या डोळ्यावर विश्वासच बसेना. मी अधीरपणे संपादन टॅब उघडला. मला माझ्या लेखाची एचटीएमेल व्हर्जन दिसली. खात्री करून घेण्यासाठी मी एके ठिकाणी पूर्णविराम टाकला, व पुन्हा प्रकाशित केला. तर काय सांगू तो पूर्णविराम मला आपल्या बिंदूमय अस्तित्वाने संपादन यशस्वी झाल्याची हमी देत होता. माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही.

मिसळपाव व्यवस्थापनाने सदस्यांची इच्छा विचारात घेऊन ही सुविधा परत बहाल केल्याबद्दल व्यवस्थापनातील सर्वांचेच मनापासून जाहीर आभार मानतो. एखादी गोष्ट नसली, किंवा खटकली की तक्रार करणं सोपं असतं. पण एखादी हवी असलेली गोष्ट मिळाली की त्याबद्दल धन्यवाद देणं, आभार मानणं हेही तितक्याच तत्परतेने आणि जोषाने व्हायला हवं. सर्वांना ते करण्याची संधी मिळावी म्हणून हा लेखनप्रपंच.

पुन्हा एकदा धन्यवाद.

हे ठिकाण

प्रतिक्रिया

पंगा's picture

27 Feb 2011 - 6:00 am | पंगा

ही सोय पुन्हा उपलब्ध झाली, हे खरेच चांगले झाले.

लेखनावर प्राथमिक अधिकार (संपादनाचा अथवा प्रकाशनाचा) हा लेखकाचाच असावा, आणि संपादकीय हस्तक्षेप हा केवळ अनुचित लेखन नियंत्रित करण्यापुरताच असावा, हे योग्यच आहे. विशेषतः स्वतःच्या लेखनाचे स्वेच्छेने संपादन करण्यासाठी किंवा वाटल्यास तो अप्रकाशित करण्यासाठी लेखकास संपादनमंडळास तसदी द्यावी लागण्याचे कोणतेही लॉजिकल (मराठी? तार्किक?? तर्कशुद्ध??) कारण नजरेस येत नाही.

या कारणास्तव, झालेला बदल हा स्वागतार्ह आहे. व्यवस्थापनाने ही सुविधा परत उपलब्ध करून देऊन अत्यंत स्तुत्य पाऊल उचलले आहे, याबद्दल अनुमोदन.

Nile's picture

27 Feb 2011 - 6:28 am | Nile

खात्री करून घेण्यासाठी मी एके ठिकाणी पूर्णविराम टाकला, व पुन्हा प्रकाशित केला. तर काय सांगू तो पूर्णविराम मला आपल्या बिंदूमय अस्तित्वाने संपादन यशस्वी झाल्याची हमी देत होता. माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही.

__/\__ हे खास आवडले.

ह्या विषयाला पुर्ण विराम दिल्याबद्दल व्यवस्थापनाचे जाहीर आभार!

अरुण मनोहर's picture

27 Feb 2011 - 6:40 am | अरुण मनोहर

मिपा धन्वंतरींना धन्यवाद. एक ठुसठुसणारी जखम बरी केली. आता सुखाने लिहीता येईल.

नगरीनिरंजन's picture

27 Feb 2011 - 7:46 am | नगरीनिरंजन

मी इथे आल्यापासूनच ही सोय नव्हती त्यामुळे त्याचं एवढं काही वैषम्यही नव्हतं. अजूनही ही सुविधा नाही मिळाली याचे वाईट वाटत नाहीय.

प्रीत-मोहर's picture

27 Feb 2011 - 7:37 am | प्रीत-मोहर

मला कुठे असे टॅब दिसेना ते माझ्या लेखांवर

अरुण मनोहर's picture

27 Feb 2011 - 8:03 am | अरुण मनोहर

दिलेले धन्यवाद वापस मागत आहे.
काय झाले असेल?
खालील शक्यता वाटतात-
-- फक्त व्यवस्थापनाच्या निवडक लोकांना ही सुविधा असेल
-- किंवा तांत्रीक बिघाडामुळे काही काळ ते शक्य होते.

असो, इट वॉज टू गुड टू बी ट्रु एनी वे.

जे नव्हतेच, ते गेल्याचे दु:ख कसले?
पटले नाही, तर सशाचे शिंग शोधत बसा.

नरेशकुमार's picture

27 Feb 2011 - 8:06 am | नरेशकुमार

कायतरी मिश्टेक वाट्टे.
हि सुविधा मला पन मिळाली नाय्ये.

स्वयंसंपादनाची फॅशीलिटी मला काय मिलालेली न्हाय.
बाय मिश्टेक तस्सं काही झालं असन. एवढी मोठी
सोय द्याची म्हणल्यावर सरपंचानी तशी घोशना केली असती ना भावा.

बाबुराव :)

अवलिया's picture

27 Feb 2011 - 8:19 am | अवलिया

ही सुविधा मला पण मिळालेली नाही.

याचाच दुसरा अर्थ घासकडवी हे संपादक आहेत.
छुपे संपादक असे बाहेर येतात बघा !!
किंवा संपादक झाले आहेत... अभिनंदन !! :)

बादशहाने बिरबलाला विचारले की दिल्लीत आंधळे किती? या प्रश्णाचे उत्तर शोधण्यासाठी बिरबल एका गजबजलेल्या चौकात बाज घेउन बसला. त्याने ती विणायला सुरवात केली. येणार जाणारे विचारायला लागले "हे काय करीत आहात आपण?" असे विचारणा-यांचे नाव आंधळ्यांच्या यादीत टाकले आणि आणि "आज आपण बाज विणायला का बसला आहात?" असे विचारणा-यांच्या यादीत टाकले.

;)

राजेश घासकडवी's picture

27 Feb 2011 - 8:59 am | राजेश घासकडवी

मला या लेखावर ते टॅब दिसत नाही. दुसऱ्या लेखावर दिसतात... हे काय आहे तरी काय गौडबंगाल. कदाचित धन्यवाद देण्यात मी घाई केली असावी.

प्रियाली's picture

27 Feb 2011 - 9:02 am | प्रियाली

होतात अशा चुका कधीतरी. :)

राजेश घासकडवी's picture

27 Feb 2011 - 9:08 am | राजेश घासकडवी

क्रिकेट विषयावर लिहिलेल्या लेखांमध्ये ते टॅब दिसताहेत. लोकहो, स्वसंपादन सुविधा फक्त क्रिकेट विभागात लेखन करण्यासाठी आहे. तिचा लुफ्त लुटा.

चूक कोणाची हे आपण नंतर पाहू.

प्रियाली's picture

27 Feb 2011 - 9:11 am | प्रियाली

ग्रेट! यापुढे सर्व लेख, चर्चा, कथा, कविता क्रिकेट विभागात टाकाव्यात. कल्जी मिटली. ;)

प्रीत-मोहर's picture

27 Feb 2011 - 9:14 am | प्रीत-मोहर

हॅहॅहॅ

प्रियाली's picture

27 Feb 2011 - 8:59 am | प्रियाली

सत्ताधार्‍यांवर विनोद निर्मिती करण्याचा क्षीण प्रयत्न. ;) कदाचित या विनोदनिर्मितीला टरकून सत्ताधारी पक्ष तशी सोय देईलही.

राजेश घासकडवी's picture

27 Feb 2011 - 9:15 am | राजेश घासकडवी

छे छे, मी कसला असा अनुशासनविरोधी विनोद करणार? मी आपला 'राजा चांगला आहे, मला टोपी दिली' असं म्हणत होतो. :)

मी आपला 'राजा चांगला आहे, मला टोपी दिली' असं म्हणत होतो.

नाही हो. तुम्ही 'राजा चांगला आहे, त्याने सर्व प्रजेला टोप्या दिल्या' अशी दवंडी पिटलीत. ;)

राजेश घासकडवी's picture

27 Feb 2011 - 9:24 am | राजेश घासकडवी

फक्त त्या घालून क्रिकेटच्या स्टेडियममध्ये बसावं अशी अट दिसते. ती फाईन प्रिंट वाचली नव्हती.

फक्त क्रिकेट या कॅटगरीला from day 1 स्वसंपादन आहे असे माझे प्राथमिक मत झाले आहे

चिंतामणी's picture

27 Feb 2011 - 9:19 am | चिंतामणी

स्वसंपादन सुविधा परत दिल्याबद्दल मिसळपाव व्यवस्थापनाला जाहीर धन्यवाद.

मला या लेखावर ते टॅब दिसत नाही. दुसऱ्या लेखावर दिसतात...

क्रिकेट विषयावर लिहिलेल्या लेखांमध्ये ते टॅब दिसताहेत.

इथे सकाळचे ९ वाजले आहेत. संयुक्त संस्थानात आत्ता किती वाजले आहेत????? :-/

कानडाऊ योगेशु's picture

27 Feb 2011 - 12:11 pm | कानडाऊ योगेशु

मला या लेखावर ते टॅब दिसत नाही. दुसऱ्या लेखावर दिसतात... हे काय आहे तरी काय गौडबंगाल. कदाचित धन्यवाद देण्यात मी घाई केली असावी.

ह्यालाच म्हणत असावेत...
गाढवही गेले आणि ब्रम्हचर्यही.! :)

ह.घ्या.

संदीप चित्रे's picture

27 Feb 2011 - 6:37 pm | संदीप चित्रे

ही सुविधा पुन्हा एकदा उपलब्ध करून दिल्याबद्दलही धन्यवाद !

प्रीत-मोहर's picture

27 Feb 2011 - 6:58 pm | प्रीत-मोहर

ए आता स्वसंपादन खरच दिलय ...मी माझा लेख केला संपादित

पैसा's picture

28 Feb 2011 - 12:33 am | पैसा

मी पण केला! मिपा व्यवस्थापनाला खरंच मनापासून धन्यवाद!

चिंतामणी's picture

28 Feb 2011 - 12:58 am | चिंतामणी

तुझा कुठला धागा तु आत्ता संपादीत केलास?????????

लिंक देणार का?

(हाच पोस्ट "प्रीत-मोहर "सुध्दा लागू आहे. उत्तर द्यावे.)

प्रीत-मोहर's picture

1 Mar 2011 - 9:12 am | प्रीत-मोहर
अवलिया's picture

27 Feb 2011 - 7:08 pm | अवलिया

प्रकाटाआ

निलाकांत धन्यवाद. बर्‍याच दा काही छोट्या छोट्या गोष्टी गडबडीत राहुन जातात अन मग लेख टाकल्यावर त्या स्वतःलाच बोचणी लावत रहातात. मी आत्ताच माझ्या लेखावर हा टॅब पाहिला. मनापासुन धन्यवाद.

मला तर प्रतिसाद पण संपादित करता येताहेत :)

मला तर प्रतिसाद पण संपादित करता येताहे :)

आता करुन दाखव तुझा हा वरचा प्रतिसाद संपादित. ;)

प्रतिसाद संपादित

हे पहाय रे भो , अडी मी प्रतिसाद संपादित केलाय .. मले जिथे वाटल तडीच मी संपादक करणार .. वर्‍ही प्रतिसाद संपादायचा मुड नी माझा ..

- माझी दाढी / खाज्वारे खाज्वा

हे हे हे, संपुर्ण अपेक्षीत प्रतिसाद. :)