आणखी काही महत्वाचे
अभ्यासातील एकाग्रता महत्वाची.
माणसातील माणुसकी महत्वाची.
मुंग्या मधली शिस्त महत्वाची
मधमाशांची चिकाटी महत्वाची
मंदिरातील पावित्र्य महत्वाचे
स्र्त्रीचे चारित्र्य महत्वाचे
घराच घरपण महत्वाचे
मायबापाचे आशीर्वाद महत्वाचे
नारायणाचे रोजचे उगवणे महत्वाचे
चंद्राची शीतलता महत्वाची
भजन रंगणे महत्वाचे
साखरेची गोडी महत्वाची
फलातली रसाळता महत्वाची
ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी महत्वाची.
तुकारामाची गाथा महत्वाची
प्रतिक्रिया
27 Feb 2011 - 9:21 pm | निवेदिता-ताई
अतिशय सुंदर...
27 Feb 2011 - 10:03 pm | नगरीनिरंजन
बाकी ठीक पण फक्त स्त्रीचे चारित्र्य महत्त्वाचे?
28 Feb 2011 - 10:19 am | Pearl
+१
27 Feb 2011 - 11:15 pm | टारझन
स्वच्छतागृहात पाणी महत्वाचे ..
28 Feb 2011 - 2:59 am | देव बप्पा
इथे पेपरा शिवाय पर्याय नाही...कशी सांगू आमची व्यथा.....
(आम्ही ब्रिटीशांच्या देशात...त्यांच्याच क्लब(बार) मधे जाऊन इंडियन टीम ला सपोर्ट करतो ...
केवढी आमची हिंमत..)
27 Feb 2011 - 11:35 pm | निनाद मुक्काम प...
@स्र्त्रीचे चारित्र्य महत्वाचे
आणी पुरुषाचे ?
त्यांना काय वळू म्हणून आलं दुनियेत मुशाफीरगीरी करायचा मुख्य परवाना मिळाला आहे का ?
असे लेख मेल्स वर भरपूर येतात .(कधी वाचतो तर तर कधी नाही )
अशी आदर्शवादाने ओथंबलेली गद्य वजा पद्य फक्त वाचायला बरी वाटतात .