अंतर

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जे न देखे रवी...
25 Feb 2011 - 12:58 pm

तुझ्या माझ्यातील अंतर........
तसे बर्हीगोल भिंगाच्या आरशातील प्रतिबिंबासारखे.....
कितीही दुरावले....... तरी...... जवळ भासणारे..........
.................
अंतरे वाईट नसतातच...............
अंतरांची कारणे मात्र वाईट असू शकतात..........
..............
भरभरून कोसळ्णारा पाऊस........
एक न टाळता आलेली रणरणती दुपार....................
जीवाला घोर लावणारी कातरवेळ.....................
ह्रदयाच्या अंतापर्यंत पोहचणारी उत्तररात्र.....................
अन्.......... या सगळ्यांना गोळा करून...........
भारलेल्या डोळ्यात दाटणारी पहाट..................
.......................
बहुदा हि एवढी कारणे पुरेशी असतात.....................
अंतरांना वाईट ठरवायला..................

|- परीकथेतील राजा -|
(१०/१२/२०१०)

मुक्तक

प्रतिक्रिया

ते डॉट डॉट आवडले .. परंतु मधे मधे जे शब्द घातलेत ना तुम्ही .. ते एकदमंच चिवड्यातल्या खौट शेंगदाण्यांपरमाणे आहेत बघा :) पुढच्या टायमाला तेवढे काढता आले तर बघा .. बाकी कविता फक्कड ! :)

- मुंबापुरीतील ख्वाजा

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

25 Feb 2011 - 1:54 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

व्वा..... कळली की कविता तुम्हाला........

सुहास..'s picture

25 Feb 2011 - 1:38 pm | सुहास..

व्वा खुपच छान खवीटा

पुर्ण वाचलीस काय ? भाड्या , पार्टी पाहिजे .. प्रतिसाद द्यायला जिवंत राहिलास ना ?!!! हॅप्पी बड्डे !!

जल्ला, रात्र , दुपार, पहाट, अंतर....

कायच कल्ला नाय

गणेशा काका, आणि प्रकाश काकांना नक्की आवडेल पण ;)

-- चित्रपटकथेतील रांझ्हा

स्पायल्या,
मेल्या तुला समज नाय अजून! मधल्या प्रत्येक डॉटला एक अक्षर टाक आणि वाचून पहा. क्रिप्टीक आहे सॉळ्ळीट!!
टार्‍या म्हणतोय ना, ते खरंय!! इतक्या क्रिप्टीक कवितेत मध्येच शब्द लिहीलेत.. श्या!!!

--असुर

जागु's picture

25 Feb 2011 - 1:45 pm | जागु

कविता चांगली आहे.

सुहास..'s picture

25 Feb 2011 - 4:54 pm | सुहास..

कविता चांगली आहे. >>>

कविता खरोखरच चांगली होती हो जागु ताई, गेली बिचारी मागच्या वर्षी (कोणाचा तरी हात धरुन ;) )

अवांतर : बरंच लेट झालं फेफरात याला. (कविता प्रकरण)
हामाला वाटलं आतापस्तुर बोभाटा झाला असंल.... ;-)

कच्ची कैरी's picture

25 Feb 2011 - 2:06 pm | कच्ची कैरी

>>अंतरे वाईट नसतातच...............
अंतरांची कारणे मात्र वाईट असू शकतात
अंतराची कारणे वाईट असु शकतात हे समजु शकते पण अंतरे वाईट नसतात असे कसे?

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

25 Feb 2011 - 3:06 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

कारणाशिवाय अंतरे निर्माण होत नाहीत. म्हणुन कारण वाईट अंतर नाही

लवंगी's picture

25 Feb 2011 - 2:15 pm | लवंगी

.....................

लवंगी's picture

25 Feb 2011 - 2:14 pm | लवंगी

अंतर कस छान्छान .............. वापरुन कल्पकतेने दाखवलय... परा हूशार आहेस हो...

पैसा's picture

25 Feb 2011 - 11:27 pm | पैसा

पुन्हा तेच! परा म्हटलं की आलं कन्फुजन.....

विजुभाऊ's picture

25 Feb 2011 - 3:04 pm | विजुभाऊ

तसे बर्हीगोल भिंगाच्या आरशातील प्रतिबिंबासारखे.....
कितीही दुरावले....... तरी...... जवळ भासणारे..........

एक गडबड झाली आहे.
तुम्हाला नक्की भिम्ग म्हणायचे आहे की आरसा.
बहीर्गोल भिंगातुन दिसणारी वस्तु काही अंतरापर्यन्त मोठी ( एन्लार्ज्ड) दिसते पण त्यानन्तर उलटी आणि छोटी दिसते . भिंगातुन प्रतिमा मिळते प्रतिबिंब नाही.ही खरी प्रतिमा असते.
बहीर्गोल आरशातुन प्रतिमा मिळत नाही पण प्रतिबिंब दिसू शकते. ते वास्तवात असते त्यापेक्षा दूर अम्तरावर दिसते. लहान दिसते. ( उदा बाईकचा ओरीजनल आरसा.
बाकी कविता लिहिण्याच्या प्रयत्नाबद्दल स्वागत. पु ले शु

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

25 Feb 2011 - 3:10 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

तसे बर्हीगोल भिंगाच्या आरशातील प्रतिबिंबासारखे.....
असे नसुन
तसे बर्हीगोल आरशातील प्रतिबिंबासारखे.....
असे म्हणायचे होते.

चुक दाखवुन दिल्याबद्द्ल शतशः आभारी आहे.

प्रकाश१११'s picture

25 Feb 2011 - 4:31 pm | प्रकाश१११

परीकथेतील राजा -
भरभरून कोसळ्णारा पाऊस........
एक न टाळता आलेली रणरणती दुपार....................
जीवाला घोर लावणारी कातरवेळ.....................
ह्रदयाच्या अंतापर्यंत पोहचणारी उत्तररात्र.....................
अन्.......... या सगळ्यांना गोळा करून...........
भारलेल्या डोळ्यात दाटणारी पहाट.................
हे सगळे मस्त वाटले.पु.ले.शु.

आत्मशून्य's picture

25 Feb 2011 - 9:22 pm | आत्मशून्य

म्हणून त्याजागी स्वतःच्या मनाचे शब्द घातले आन कविता एकदम फक्कड वाटली

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

28 Feb 2011 - 11:51 am | मिसळलेला काव्यप्रेमी

सर्व genuine प्रतिसादांबद्द्ल धन्यवाद!!