दिनांक ५ मार्च २०११ रोजी सायन मीन राशीत १४ अंश ०० मि वर अमावस्येची चंद्र-सूर्य युती होत असून ही अमावस्या मंगळाशी सात अंशात युती करते. ही युती फार तीव्र म्हणता येणार नाही. पण गोचर मंगळाचा गोचर प्लुटोशी लाभ योग होत असल्याने अडकून पडलेली कामे मार्गी लावायला जी ऊर्जा लागते ती या अमावस्यामुळे बर्याच जणाना मिळू शकेल.
पण काही जणाना गोचर शनीशी अमावस्येने केलेल्या quincunx (मला याचे मराठी नाव माहित नाही) या योगामुळे काही जणाना अमावस्या त्रासदायक ठरायची शक्यता आहे
अधिक वाचण्यासाठी येथे भेट द्या - http://rajeev-upadhye.blogspot.com
प्रतिक्रिया
23 Feb 2011 - 4:45 pm | नितिन थत्ते
>>पण गोचर मंगळाचा गोचर प्लुटोशी लाभ योग होत असल्याने अडकून पडलेली कामे मार्गी लावायला जी ऊर्जा लागते ती या अमावस्यामुळे बर्याच जणाना मिळू शकेल.
'तिकडे' दिलेल्या यादीत फक्त त्रासदायक वाल्याच जल्मतारखा आहेत.
23 Feb 2011 - 4:49 pm | युयुत्सु
अडलेल्यांना अगोदर सावध करायचे हे आमचे धोरण आहे.
23 Feb 2011 - 4:51 pm | आत्मशून्य
प्रेडीक्शन करू शकता काय ?
अथवा लगेच हे पूढील वाक्य
यातऊन जातकाने नक्की काय अभीप्रेत धरायचे ? मूळात आपण करत असलेल्या प्रेडीक्शनचा मला काही वीशेष ऊपयोग होएल की हे फक्त ज्ञान म्हणून नजरेखालून जावे (म्हणजे नळी फूंकली सोनारे...... असं काही) अशी अपेक्षा आहे ?
23 Feb 2011 - 5:05 pm | गवि
अरे मित्रा आत्मशून्या, सर्वसाधारणपणे सर्वमान्य होईल असे बोलणे ही एक कला आहेच मुळी.
काही उदाहरणे:
-तुम्ही फणसासारखे आहात.. वरुन कठोर , आतून मऊ.
-या महिन्यात ऊन पावसाचे योग्य संतुलन साधले जाईल.
-तुम्ही केलेल्या कष्टांची त्या प्रमाणात हवी त्या लोकांकडून दखल घेतली जात नसावी असं वाटतं..
-कामात अडचणी निर्माण होतील पण चिकाटीने तुम्ही तरुन जाल..
...
इ.इ.इ..
कृपया ज्योतिषशास्त्राशीच फक्त याचा संबंध आहे असे समजू नये. (हे ही एक त्यातलेच वाक्य समजले तरी चालेल !! :) )
23 Feb 2011 - 5:27 pm | युयुत्सु
ज्या जन्मतारखाना अमावस्या त्रास द्यायची शक्यता आहे त्यांचे गणित करणे हे तुम्हाला प्रेडिक्शन वाटत नाही का?
23 Feb 2011 - 5:37 pm | गवि
हो.. त्याच्या प्रोसेसविषयी शंका नाही..(म्हणजे जसे पूर्वापार सांगितले गेलेय तदनुसार तुम्ही ते तपासून निकष लावून वर्तवलेत यात शंका नाही..म्हणूनच थोतांड वगैरे मी कधीच म्हणत नाही..कोणीच म्हणून नये..) ...पण नेमके काय ते न सांगणे हे प्रेडिक्शनच्या शास्त्रात कॉमन आहे असं तुम्हाला वाटत नाही का?