पाकिस्तान फायनला आल्यास शिवसेना वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी उखडून लावेल असा इशारा सेने ने पूर्वी दिलेला आहे
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7513899.cms
या पार्श्वभूमीवर यंदा सेनेची काय भुमीका असेल ?
तसे घडायची शक्यता असल्यास ऐनवेळेस सामना इतरत्र हलवावा लागेल आणि तो मुम्बैचा तोटा असेल तसेच भारतीय क्रीडाक्षेत्राला एक बट्टा लागेल.
हे टाळायचे असेल तर भारत सरकार/ महाराष्ट्र सरकार "बी सी सी आय" या खाजगी संस्थेचासाठी आपले पोलीसबळ वापरेल / निमलश्करी बळ वापरेल की आणखी काही करेल हे आत्ता सांगता येत नाही.
त्या परिस्थीतीत भाजप आणि संघाची भुमीका काय असेल
मुम्बैतील क्रीडारसिकानी कधीच पाकिस्तानी खेळाडूंचा विरोध केलेला नाही . इम्रानखान ,जावेदमियांदाद( तो मुबैकरांचा व्याही असूनदेखील) वासीम अक्रम ,वकारयुनूस यांचे नेहमी स्वतच केलेले आहे.
राजकारण बाजुला ठेवुन सेना यावेळेस पाकिस्तानी खेळाडूंचे स्वागत करेल का?
सेनेने पाकीस्तान टीम असलेलला अंतीम सामना होऊ दिला नाही तर त्याचा निकाल कसा लावला जाईल?
समजा पावसामुळे किम्वा अन्य काही कारणामुळे अंतीम सामना होऊ शकला नाही तर निकाल कसा लावला जातो?
( एकही चेम्डू टाकला गेला नाही अथवा दुसरा संघ ब्यातिम्गच करु शकला नाही तर डकवर्थलुइस नियम लावता येत नाही त्यावेळेस)
वर्ल्ड कप / पाकिस्तान /शिवसेना
गाभा:
प्रतिक्रिया
17 Feb 2011 - 1:06 pm | गणपा
पाकिस्तान नाही पोहोचत फायनलला. काळजी इल्ले. :)
आणि जर का चुकुन माकुन पोहोचलीच तरी सध्या सेनेत तो पुर्वीचा जोर दिसत नाही. परवाचा होऊन गेलेला व्हॅलेंटाईन ह्याच ताज उदाहरण आहे.
सध्या मतदारांना दुखावुन चालणार नाही हे शेवटी त्यांना उमजलय.
17 Feb 2011 - 1:15 pm | मनराव
>>>पाकिस्तान नाही पोहोचत फायनलला. काळजी इल्ले. <<<<
+११११११११११११
17 Feb 2011 - 9:18 pm | तिमा
पीच खणणारे आता मनसे मधे गेलेत. त्यांच्या नवीन साहेबाने आदेश दिला तरच ते जातील खणायला.
17 Feb 2011 - 1:11 pm | मी-सौरभ
तुमची कळकळ बघून ड्वाले पानावले...
17 Feb 2011 - 1:13 pm | मनराव
>>>समजा पावसामुळे किम्वा अन्य काही कारणामुळे अंतीम सामना होऊ शकला नाही तर निकाल कसा लावला जातो? <<<
ठरलेल्या दिवशी सामना झाला नाही तर आणखी एक राखीव दिवस असतो..........
17 Feb 2011 - 1:13 pm | चिरोटा
मुंबईचा तोटा कसा काय सामना रद्द झाला तर?
मुंबईत नाही मग सामना दुसरीकडे घेतला तरी चालेल.पण सामना पायजे.
17 Feb 2011 - 1:17 pm | टारझन
येडी ** पाकिस्तान !! फक्त इतकेच म्हणेन !!
बाकी तुम्ही पाकिस्तानच्या नावाने गळे काढनं बंद करा बघु विजाभाऊ .. नाही तर तुमची रवाणगी विजापुर ला करायला सांगीन पक्षश्रेष्ठींना सांगुन :)
17 Feb 2011 - 1:25 pm | मुलूखावेगळी
विजुभौ विजापुर ला
टारुभौ तारापुर ला
मी आधीच वेगळ्या मुलुखात आहे. ;)
17 Feb 2011 - 2:24 pm | चिरोटा
विजापूरचे आदिलशहा
विजय शहा.
17 Feb 2011 - 1:26 pm | स्पा
अंतिम सामना
श्रीलंका विरुद्ध भारत
17 Feb 2011 - 2:35 pm | चिंतामणी
यांचे नेहमी स्वतच केलेले आहे.
म्हणजे काय केले आहे???
:-/
(कन्फूज्ड) चिंतामणी
17 Feb 2011 - 9:45 pm | निनाद मुक्काम प...
विजू भाऊ
माझ्या माहिती प्रमाणे शिवसेनेने पाकिस्तान व भारताची मालिका (स्वतंत्रपणे ) खेलावण्यास विरोध केला होता .
ह्यात राजकारण वगळता एक गोष्ट अशी ध्यानात येईन कि बहुतेक पाकडे खेळाडू हे विअक्ले गेले असतात .(वेळोवेळी सिद्ध झाले आहे .)
जिंकणे किंवा हरणे ह्यापेक्षा बेटिंग करून पैसा कमविणे हे त्यांचे प्रमुख ध्येय असते .(एका सामन्यावर २००० कोटीचा सट्टा) हे पैसे हवाला तर्फे दहशत वाद्यांना जातात .
इतर प्रगत देशांसारखे व त्यांहून श्रीमंत भारतीय खेळाडू हे गब्बर असतात कारण जाहिरातदार त्यांच्या देशातील बाजारपेठेमुळे त्यांच्या वर ओऐशाची रास ओततात .
कर्म दरिद्री पाकाद्यांकडे ना बाजार पेठ ना जाहिरात दार ना पैसा (त्यामुळे पैसा कमवायला बेटिंग )
तर कुठल्याही जागतिक निम्मिताने जर पाक खेळाडू भारतात आले . तर त्यांना शिवसेनेने विरोध केला नाही .( मागच्या वेळी क्रिकेट मालिकेला वोरोध झाला तेव्हा माझ्या मते हॉकीच्या स्पर्ध्धेसाठी पाक खेळाडू हिंदुस्थानात आले होते .(आय पी एल ला पण आले पहिल्यांदा
तेव्हा विरोध केला नाही .)
17 Feb 2011 - 10:58 pm | देवदत्त
सामन्यांचे वेळापत्रक २/३ महिने आधीच आले होते. तेव्हा दोन महिने काही विषय न काढता आता का काढावा? विश्वचषकासोबतच इतरही काही मसालेदार बातम्यांकरीता आपली वृत्तवाहिनी लोकांनी पहावी ह्याकरीता माध्यमांनी, पक्षांनी मुद्दाम हा विषय काढल्याचे जाणवते. :)
18 Feb 2011 - 1:35 am | चिंतामणी
तुम्ही म.न.से समर्थक आहात काय?
तुम्ही ऑरकुट वर (वेगळ्या नावाने) आहात काय?
कारण हाच विषय अनेक मनसे समर्थकांनी विविध समुहावर याच शब्दात टाकला आहे.
अरेच्या. एक प्रश्ण राहीला. अविनाशकाका भेटले होते का????????? ;)
18 Feb 2011 - 2:04 am | भडकमकर मास्तर
विजुभाऊ सेनेत गेले का?
गेले असतील तर कोणत्या?
18 Feb 2011 - 2:17 am | विकास
या पार्श्वभूमीवर यंदा सेनेची काय भुमीका असेल ?
वास्तवीक प्रश्न उलटा पडला पाहीजे. अशी भुमिका असल्यास ज्यांच्या हातात कायदा आणि सुव्यवस्था राबवण्याची सत्ता आहे, ते सत्ताधारी काय करणार? का नुसती बघ्याची भुमीका घेणार?
त्या परिस्थीतीत भाजप आणि संघाची भुमीका काय असेल
त्यांचा काय संबंध? शिवसेनेमुळे म्हणत असाल तर जेंव्हा मागच्या वेळेस शिवसेनेने विरोध केला होता तेंव्हा त्यांची भुमीका काय होती? (मला माहीत नाही म्हणून हा प्रश्न विचारत आहे.)
राजकारण बाजुला ठेवुन सेना यावेळेस पाकिस्तानी खेळाडूंचे स्वागत करेल का?
सत्ताधार्यांना अडचणीत आणणारे म्हणून राजकारण म्हणत असाल तर सहमत आहे. पण पाकीस्तानला म्हणून विरोध करणे म्हणजे राजकारण म्हणत असाल तर ते पटले नाही.
18 Feb 2011 - 1:40 pm | मदनबाण
ह्मम्म... खोदा खोदीच काय माहित नाय, पण पाकड्यांची चांगली जिरावी हीच इच्छा आहे. ;)
18 Feb 2011 - 3:25 pm | विजुभाऊ
त्या परिस्थीतीत भाजप आणि संघाची भुमीका काय असेल
त्यांचा काय संबंध? शिवसेनेमुळे म्हणत असाल तर जेंव्हा मागच्या वेळेस शिवसेनेने विरोध केला होता तेंव्हा त्यांची भुमीका काय होती? (मला माहीत नाही म्हणून हा प्रश्न विचारत आहे.)
संबन्ध आहे. महाराष्ट्रात भाजप नेहमीच सेनेच्या बाबतीत वेगळी भुमिका घेते आणि त्यांचे हसे होते.
भाजपने मागील वेळेस शिवसेनेला विरोध केला नाही पण जे झाले ते वाइट झाले असा पावित्रा घेतला. संघाने अर्थातच याबाब्त काहीच पावित्रा घेतला नाही.
ह्यात राजकारण वगळता एक गोष्ट अशी ध्यानात येईन कि बहुतेक पाकडे खेळाडू हे विअक्ले गेले असतात .(वेळोवेळी सिद्ध झाले आहे .)
जिंकणे किंवा हरणे ह्यापेक्षा बेटिंग करून पैसा कमविणे हे त्यांचे प्रमुख ध्येय असते .(एका सामन्यावर २००० कोटीचा सट्टा) हे पैसे हवाला तर्फे दहशत वाद्यांना जातात .
इतर प्रगत देशांसारखे व त्यांहून श्रीमंत भारतीय खेळाडू हे गब्बर असतात कारण जाहिरातदार त्यांच्या देशातील बाजारपेठेमुळे त्यांच्या वर ओऐशाची रास ओततात .
कर्म दरिद्री पाकाद्यांकडे ना बाजार पेठ ना जाहिरात दार ना पैसा (त्यामुळे पैसा कमवायला बेटिंग )
हे कशावरून. सगळेच तसले आहेत असे म्हणायचे आहे का तुम्हाला?
भारतीय खेळाडू सगळेच साव होते असे नव्हे. अझरउद्दीन, अजय जाडेजा , नयन मोंगीया ,अजय शर्मा हे भारतीय खेळाडू काही फार साव नाहीत.
इम्रानखान ,वकारयुनूस , वासीम अक्रम यांच्यावर कधी बेटिंगचा आरोप झालेला नाहीय्ये.
बाकी दहशवाद हवाला आणि सट्ट्याचे पैसे दहशतवाद्याना जातात या वगैरे बद्दल फारशी माहिती नाही .तुम्ही त्यावर थोडा प्रकाश टाकावा.
लान्स क्लुसनर हा अफ्रीकेचा खेळाडून बेटिंग मध्ये सापडला . तो काही पाकिस्तानचा नव्हता.
ठाकर्यानी पाक खेळाडूना विरोध केलेला होता कारणत्यावेळेस पाकिस्तानने आशा भोसलेना व्हिसा नाकारला होता् हे एक कारण होते.
बाळासाहेबसुद्धा इम्रानखानसारख्या पाक खेळाडुंच्या जिद्दीचे चाहते असावेत.
19 Feb 2011 - 12:01 am | विकास
महाराष्ट्रात भाजप नेहमीच सेनेच्या बाबतीत वेगळी भुमिका घेते आणि त्यांचे हसे होते. भाजपने मागील वेळेस शिवसेनेला विरोध केला नाही पण जे झाले ते वाइट झाले असा पावित्रा घेतला.
मग परत एकदा हसे करून घेतील. नाहीतर झंडू बाम लावतील. ;)
संघाने अर्थातच याबाब्त काहीच पावित्रा घेतला नाही.
इतकेच म्हणायचे होते. त्यामुळे त्यांचे आत्ता देखील नाव आणायचे काही कारण आहे असे वाटत नाही.
19 Feb 2011 - 12:06 am | विकास
बाकी आता वानखेडे स्टेडीयम हे योग्य "अग्निप्रबंधक यंत्रणा" नसल्याने सुरक्षित नाही असे म्हणले जात आहे. जर हे स्टेडीयम आणि त्याची डागडूजी ही मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) अखत्यारीत आहे. आणि एमसीए ही त्याचे अध्यक्ष मा. श्री. शरदश्चंद्ररावजी पवारांच्या अख्त्यारीत! त्यामुळे आता मुंबईचा तोटा होऊ नये असे वाटत असेल तर, "spawar @ mumbaicricket. com" शी संपर्क करा. ;) कदाचीत शिवसेना पण त्यासाठी मदत करेल!
20 Feb 2011 - 6:50 pm | रमताराम
मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्यात. अशा वेळी सामना रद्द करून लोकांचा रोष ओढवून घेणे परवडणार नाही त्यांना. नेहमीचे नाटक होईल, पवार मोठ्या ठाकरेंना भेटून विनंती करतील नि सगळे आलबेल होईल. मागचा खेळ पुन्हा पहायला मिळेल.
3 Mar 2011 - 2:16 am | चंद्रू
पाकीस्ताण जोशातच दिसतोय. फायणलला ९९ टक्के येणार. तेव्हा आतापासूनच शरद पवारांनी बाळासाहेबांशी बोलनी सुरू करावीत. नायतर कोनपन कायपन उखडेल.
खरं तर शरद पवारांनी बाळासाहेबांसारख्या बुजुर्ग नेत्याच्या इच्छेचा माण राखावा व वाणखेडे स्टेडीयमची फायणल रद्द करावी. यापुर्वी शरद पवारांनी अणेक वेळा बाळासाहेबांची लाज राखली आहे. दोघे एकमेकांचे घनिष्ठ मित्र आहेत.या मैत्रीची बुज राखली जायला हवी. नायतरी १२५०० रुपयांचे टिकीट काडून कोनता शिवसैणीक वा मराटी मानूस मॅच बघणार आहे? तेवा मॅच इते झालीच नाय तर पैसे नायत म्हनून पाहता आली नाय असं दु:ख तरी होनार नाय.