आंबेजोगाई देवळा शेजारील लेण्या

सुकामेवा's picture
सुकामेवा in कलादालन
8 Feb 2011 - 1:34 am

खूप दिवस माहूर च्या देवीच्या दर्शनासाठी जायचे ठरवले होते, मी मित्राला विचारले आणि २७ जानेवारीला सकाळी निघायचे ठरवले.
जाता जाता आंबेजोगाईला दर्शनासाठी थांबलो होतो, तेव्हां मित्र म्हणाला देवाशेजारी चांगल्या लेण्या आहेत त्या बघायच्या असतील तर जाऊयात फ़क़्त तिथे जायचा रस्ता थोडा घाणीतून पार करावा लागतो.
आम्ही हो म्हणाल्यावर त्यांनी वाट दाखवली मग आम्ही अडथळ्यांची शर्यत पार करून लेण्यांपाशी पोहचलो.

तिथे लेण्यांम्ध्ये स्वछ्ता तर अप्रतिमच होती.
त्यातीलच काही काढलेली छायाचित्रे सर्व मिपा परिवारातील मित्रांकारिता.
एक छोटी लेणी रस्त्याच्या बाजुलाच आहे त्यातला हत्तीचे छायाचित्र

नंतर एक ओढा आणि नाल्याच मिश्रण आसलेला पाण्याचे व गावातले पोट साफ करायचे ठिकाण पार करुन दुसरया लेणीपाशी पोहचलो

एकुण चार हत्ती या लेणीमध्ये आहेत, पहीले दोन हत्ती पुर्वेकडे तोंड करुन उभे आहेत.

बाकिच्या दोन हत्तींपैकी एक हत्ती दक्षिणे कडे तोंड करून तर एक उत्तरेकडे तोंड करून उभा आहे.

खालील छायाचित्रातील हत्तीचे बाकीच्या हत्तींच्या मानाने कमी नुकसान झालेले आहे.

सुरेख नक्षीकाम आहे हत्तीवर

वरुन काढलेले छायाचित्र

त्याच लेणी मधील भग्न अवस्थेतला नंदी

या नंदीवरुन तरी असे वाटते आहे की हे शंकराचे मंदिर असावे

आजुन छायाचित्रे या दुव्यावर

संस्कृती

प्रतिक्रिया

सुनील's picture

8 Feb 2011 - 2:46 am | सुनील

सुरेख!

अवांतर - लेणी ह्या शब्दाचे अनेकवचन लेणी असेच होते, असे वाटते.

ह्या लेण्यां मागची आख्यायिका अशी काहिशी आहे:

शकंर रुसलेल्या पार्वती ला घेउन जायला वरात घेवुन आले. पण ती ( योगेश्वरी) लग्न करायला काहि तयार होइना आणि रागावुन तिने शाप दिला व सर्व वरात हि दगडात रुपांतरीत झाली. ती योगेश्वरी म्हणजे अंबाजोगाई.

छान आख्यायिका सांगीतलीत वडिल. या धाग्यावर म्हटले आहे की पार्वतीला पहाटेपूर्वी विवाह करावयाचा होता अन्यथा सर्व वर्‍हाडी (वराकडचे बर का ;) ) पाषाण होतील असा तिने शाप दिला. आणि तसेच झाले

फुलटाइम सिनीयर मिपा अ‍ॅनलिस्ट अ‍ॅन्ड सुपर गुगलर ...
माझी विकेट घेतली शुन्यावर.

हि माहिती खात्रीलायक नसली तर आमचे "स्पेशल" अ‍ॅनालिस्ट पुराणातुन काहितरी नक्की शोधुन काढतील.
तात्पुरता पॅवेलीयन मधे.

नाही मी का ही माहीती शोधून काढली कारण॑ पार्वतीला , शंकरांशी विवाह करायचा नाही ऐकल्यावर लै ब्येक्कार खेद मनात दाटून र्‍यायला ना भाऊ!! मग काय गरज ही शोधाची जननी!!! ;)

चित्रा's picture

8 Feb 2011 - 2:56 am | चित्रा

फोटोंबद्दल धन्यवाद.
फोटोतील पाय कोणाचे आहेत, काही कळले का?

दगड फार मजबूत नसावा.

भास्कर केन्डे's picture

8 Feb 2011 - 3:14 am | भास्कर केन्डे

सुंदर चित्रे दिल्याबद्दल धन्यवाद! तुम्ही पुढे एक-दीड किमीवरच्या मुकुंदराज समाधीला जाऊन आलात का? तो परिसर सुंदर आहे. काही चित्रे असल्यास चिटकवा इथे.

औरंग्याने इतर अनेक सांस्कृतीक ठेव्यांबरोबरच सुंदर लेण्यांची सुद्धा भरपूर तोडफोड केली. काही तळमळीच्या लोकांमुळे हा ठेवा अजूनपर्यंत तग धरुन आहे. पण सरकारी हेळसांड... काय बोलावे. हा ठेवा पुढील पिढीपर्यंत टिकून रहावा ही सदिच्छा.

केन्डे साहेब
धडाडिचे तरुण नेते व भाजप-मनसे आघाडि चे प्रणेते.. श्री गोपिनाथराव जी मुंडे हे अंबेजोगाइचेच आहेत ना ?

मुलूखावेगळी's picture

8 Feb 2011 - 10:38 am | मुलूखावेगळी

मुंडे रेणापुर चे आहेत
आनि प्रमोद महाजन अंबाजोगाइचे

प्रीत-मोहर's picture

8 Feb 2011 - 7:43 am | प्रीत-मोहर

हो मुकुंद्राज समाधि मस्त आहे ....शांत वाटत तिथे :)

स्पा's picture

8 Feb 2011 - 8:53 am | स्पा
धनंजय's picture

8 Feb 2011 - 3:39 am | धनंजय

चित्रांकरिता धन्यवाद.

लेण्यांच्या शैलीवरून ती ८ व्या/ ९व्या शतकातील राष्ट्रकूटकालीन हिंदू लेणी असावीत असे वाटते. पुण्यातील पाताळेश्वर लेण्यांशी या लेण्यांचे बरेच साम्य आहे असेही दिसतेय. त्यामुळे कदाचित एकाच राजवटीत ह्या लेण्या खोदल्या गेल्या असतील.

कच्ची कैरी's picture

8 Feb 2011 - 11:00 am | कच्ची कैरी

वा लेण्या बघुन खूपच छान वाटले !

अवलिया's picture

8 Feb 2011 - 11:10 am | अवलिया

मस्त !!

मुंडे रेणापुर चे माजी आमदार होते...रेणापुर 'लातुर 'जिल्ह्यात आहे...परळी चा बराच भाग 'रेणापुर' मतदार सन्घात होता...आता परळी नवीन विधान्सभा मतदारसन्घ आहे....'पन्कजा पालवे' सध्या आमदार आहे....मुंडे यान्चे गाव 'नाथ्रा' आहे ( परळी - तेलगाव मार्गावर आहे) ............मुकुन्दराज मराठी चे आद्यकवी होते....'विवेकसिन्धु' हा त्यान्चा ग्रन्थ आहे

मुलूखावेगळी's picture

8 Feb 2011 - 2:44 pm | मुलूखावेगळी

छान आहेत लेण्या
मी इथे लहानपणी गेलेली
पन माझ्याकडे फोटो वगेरे नव्हते

पन माझ्याकडे फोटो वगेरे नव्हते

काकुंना कदाचीत कॅमेरा अभिप्रेत असावे.

काकुंना कदाचीत कॅमेरा अभिप्रेत असावे.

मुलूखावेगळी's picture

8 Feb 2011 - 4:09 pm | मुलूखावेगळी

हातातील कामे सोडुन मदतीला धावुन आल्याबद्दल
धन्यवाद
आनि त्याना अनुमोदन दिल्याबद्दल स्पायोजीचे पन आभार

गणेशा's picture

8 Feb 2011 - 3:49 pm | गणेशा

मस्त

परिकथेतील राजकुमार's picture

8 Feb 2011 - 3:56 pm | परिकथेतील राजकुमार

लेण्यांचे फोटो आवडले.

मात्र त्या हत्तीवर AH सारखी आपली नावे कोरुन / लिहुन स्वतःच्या अक्कलेचे प्रदर्शन करणार्‍यांचा संताप आला.