जुने वाडे जमीनदोस्त ..!!

प्रकाश१११'s picture
प्रकाश१११ in जे न देखे रवी...
5 Feb 2011 - 7:53 pm

जुने शहर …!!
खूप शतकापासून ठाण मांडून बसलेले
नदीच्या किनार्या किनार्याला गाव
वसलेले
झाडे वडाची ,पिंपळाची ,लिंबाची
गच्च गर्दीची
घरे कसली...? वाडे ..!
दोन दोन हात भिंतीची
थंडीत उबदार उन्हाळ्यात थंड
अंगावर चादर नि मस्त झोप
वाडे सात्विक . सुशील ,धार्मिक
सडा रांगोळीची
गायत्री मत्रांची ,वेद घोशाची
मस्त गाभुळलेली हवा
खिडक्या लाकडी ,गज लाकडी
बेढब कुरूप पण आपली आपलीशी
किती मुलांनी खिडकीत बसून आभ्यास केले
माहेरवाशिणी खिडकीला डोळे लावून वाट बघत
बसल्या आपल्या पतीची

वाड्यातला चंद्र कोजागिरीला असा फुलायचा
मंगळागौरीला छान झुलायचा
वाडा मस्त बहरून जायचा
झाडाआडचा चंद्र हसायचा

शहर छोटे होते ,शांत होते
रात्र आठच्या पुढे गच्च व्हायची
भोंगां वाजायचा
सगळे चादरीत गुंडाळून हरवून गायब

आतां शहर मोठे झाले
कारखाने आले
पैसा आला
नको नको म्हणता संगत लागली
ईमारती आल्या
वाडे मलूल ,उदास
मग हलकेच वाडा कोसळू लागला
सिमेंटची घरे नि भिंती
मस्त देखण्या मनात भरू लागल्या
खिडक्या उंच नि बेंबी दाखवीत मोहवू लागल्या

आताशी थंडीने घरे गारठून जातात
उन्हाने भट्टी होतात
गरम गरम झळा ह्या शहराला खाऊन टाकू लागल्यात
हळूहळू वाडे ,वाड्यातले देवळे गायब होऊ लागलीत
नऊवारीतली बाई हरवून गेली
जीन्सची प्यांट नि आपरी जर्सी
बेंबी दाखवीत फिरू लागलीय.
वाडे उध्वस्त होत
ईमारती उभ्या आहेत
गावाचे गावपण हरवून जाते आहे .....!!

करुणकविता

प्रतिक्रिया

कच्ची कैरी's picture

5 Feb 2011 - 10:53 pm | कच्ची कैरी

माझ्या गावाची आठवण झाली ,कविता एकदम मस्त!

कविता खुपच छान ..
प्रत्येक गोष्टीचे जीवंत चित्र डोळ्यासमोर तरळून जात आहे .. मस्त

अवांतर :
सुरुवातील माझ्या गावाची आठवण झाली. अजुन हे ते तसेच आहे ,, त्यामुळे छान वाटले.

llपुण्याचे पेशवेll's picture

7 Feb 2011 - 6:24 pm | llपुण्याचे पेशवेll

मस्तं कविता. आवडली.