फाळणीला सावरकर जबाबदार?

अवलिया's picture
अवलिया in काथ्याकूट
28 Jan 2011 - 6:24 pm
गाभा: 

'द्विराष्ट्र संकल्पना सर्वप्रथम सावरकर यांनी मांडली होती. त्यानंतर महम्मद अली जीना यांनी ती उचलून धरली आणि त्यामुळेच पुढे भारताची फाळणी झाली'

असे वक्तव्य नुकतेच जेष्ट कॉग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केले आहे. अधिक माहीती- इथे वाचा

मिपावर अनेक इतिहास तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांनी याबाबत नक्की काय ते सांगावे.

फाळणीचा गुन्हेगार नक्की कोण ?

प्रतिक्रिया

रणजित चितळे's picture

28 Jan 2011 - 6:35 pm | रणजित चितळे

लवकरच पाकिस्तान दिग्विजय साहेबांना पाकिस्तानचे निगरिकत्व प्रदान करणार आहे असे दिसत आहे

जोशी 'ले''s picture

28 Jan 2011 - 6:53 pm | जोशी 'ले'

नादान ए पाकिस्तान तरी दय़ा ओ ऑ.

मूकवाचक's picture

29 Jan 2011 - 3:39 am | मूकवाचक

नासूर-ए-हिंदुस्थान आहेतच ते.

नन्दादीप's picture

28 Jan 2011 - 6:35 pm | नन्दादीप

हे "जेष्ट कॉग्रेस नेते दिग्विजय सिंह" कोण बरे....

त्यांनी आता अस जाहीर वक्तव्य केलय म्हणजे नक्कीच जास्त अभ्यास केला असणार त्यांनी. माझ्या वाचनात तरी असे कुठे आले नाही.

स्वगत : यांचा लंबर घेयाला होवा. कंच्या पुस्तकात भेटल हे समद त्येंना ईचारायला नको?????

टारझन's picture

28 Jan 2011 - 6:38 pm | टारझन

कोण नाना का ?

आहो आधी स्वतःचे विचार तरी ल्ह्यायचे !! असे पुरुषमुक्तीवाले चावल्यासारखे काय करता ? :)

अवलिया's picture

28 Jan 2011 - 6:45 pm | अवलिया

मी इतिहास तज्ज्ञ नाही. त्यामुळे श्री दिग्विजय सिंह यांचे विधान चूक की बरोबर हे ठामपणाने सांगू शकत नाही. अशा स्थितीत काहीही भाष्य करुन लिहिणे म्हणजे वादाला निमंत्रण. नकोच ते. त्यापेक्षा इतिहास तज्ज्ञ सांगतील हे विधान चूक की बरोबर. आपण मान डोलवावी त्यांच्या म्हणण्याला. काही शंका असतील तर विचारु त्यांचे उत्तर आल्यावर. कसे?

शाहरुख's picture

28 Jan 2011 - 10:23 pm | शाहरुख

मी इतिहास तज्ज्ञ नाही.

फाळणीचा गुन्हेगार नक्की कोण ?

नानाजी, स्वतः तज्ञ नसताना थोरामोठ्यांनी घेतलेल्या निर्णयाला गुन्हा म्हणताय ?

(काड्याघालू) शाहरुख

नन्दादीप's picture

28 Jan 2011 - 6:42 pm | नन्दादीप

>>असे पुरुषमुक्तीवाले चावल्यासारखे काय करता ?
म्हणजे नाना पुरुष मुक्ती वाले नाहीत????

नाही ते सध्या तरी मुक्त पुरुष आहेत.

बाकी चर्चेच्या प्रस्ताव बद्दल म्हणाल तर माझा इतिहास कच्चा आहे.
तज्ञ मंडळींचे प्रतिसाद वाचुन ज्ञानाचे चार कण वेचीन म्हणतो.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

28 Jan 2011 - 6:51 pm | निनाद मुक्काम प...

पाकिस्तानात अनेक स्वयंघोषित विद्वान फाळणी चे म्हणजे पाकिस्तान निर्मितीचे श्रेय कवी इक्बाल ला देतात .(तू नळीवर हि भाषणे आहेत )
सारे जहासे ..
सारखी देशभक्तीपर कविता लिहिणारा हा कवी पुढे कट्टर पंथीय झाला झाला ( त्यांनी सांगितलेली कारणे हि राजकीय संत व त्यांच्या अनुयायांची गटबाजी हि होती ) व त्याने सर्वप्रथम पाकिस्तानचा उल्लेख केला .व त्यावेळच्या सुशिक्षित मुस्लीम नेते जिना ह्यांना मुस्लीम समुदायाचे नेतृत्व करायची विनंती केली .कारण जी विजन वासातील जिना ह्यांनी स्वीकारली .
बाकी दिग्गी राजा ह्यांचे जाहीर अभिनंदन
देश घोटाळ्यात अडकला आहे .अश्यावेळी प्रजासत्ताकच्या दिनी सामान्य जनतेने निराशेचा सूर लावला आहे .मिपा वरील काही लेख व त्याला प्रतिक्रिया हे त्याचेच उदाहरण आहे .
अश्यावेळी लोकांचे लक्ष सावरकर नावाकडे केंद्रित करून त्यांनी सरकारवरील ताण (सुप्रीम कोर्टाने काळ्या पैशावरून दिलेला दट्ट्या ) सैल होईल अशी त्यांची आशा आहे .
ह्या निम्मिताने भारतातील कानाकोपर्यातील नवीन पिढीला (१० ते १६ वर्ष ) सावरकर हे नाव मग त्या निम्मित्याने बर्याच गोष्टी कळून येतील .
फाळणीचे गुन्हेगार कोण ? ह्या जुन्या कढीला उत येईन .
राजकीय संतावर अप्रत्यक्ष आसूड ओढले जातील .
यु पी मधील विधान सभेच्या निवडणुकीसाठी अशीच मोर्चे बांधणी झालेली पाहून मायावती जाम खुश होणार .
विजयाची खात्री होईन अजून चांगले डझन भर स्वताचे पुतळे बनविण्याची आगाऊ ऑर्डर नोंदवणार .
मला मात्र प्रश्न पडतो ''.ह्या देशात घोटाळे होतात ह्या नवीन असे काहीच नाही'' .
पण ते जास्त प्रमाणात होतात ह्याचे दुख मानावे कि ते जास्त प्रमाणात अलीकडे उघडकीस येतात /नेत्याची पदे जातात म्हणून आनंद मानायचा .?
ह्या पुढे अजून काहीही लिहायला मन होत नाही .त्यामुळे हा ह्या वृत्तावरील पहिली व शेवटची प्रतिक्रिया

चिरोटा's picture

28 Jan 2011 - 7:06 pm | चिरोटा

मसाला कोणी किती प्रमाणात टाकलाय हे पाहण्यासाठी विविध वृत्तपत्रांच्या बातम्या बघितल्या.
१)इंडियन एक्स्प्रेस-http://www.indianexpress.com/news/Two-nation-theory-was-Savarkar-s--not-... सावरकरांनी द्विराष्ट्रवादाची संकल्पना प्रथम मांडली एवढेच म्हंटले आहे.फाळणी वगैरे काही म्हंटलेले नाही.
२)हिंदुस्तान टाइम्स-http://www.hindustantimes.com/Digvijay-blasts-Hindu-Right-gets-Left-supp...
द्विराष्ट्रवादाच्या संकल्पनेमुळे फाळणी झाली असे हिंदुस्तान टाइम्स म्हणतो.फाळणी सावरकरांमुळे झाली असे दिग्विजय म्हंटल्याचे हिं.टा. म्हणत नाही. अर्थात हेडलाईनीत मसाला आहेच-Digvijay blasts Hindu Right, gets Left support
३)TOI-http://timesofindia.indiatimes.com/india/Digvijay-Singh-blames-Savarkar-... येथेही फाळणीचा उल्लेख नाही.
अर्थात जाणून बुजुन अशी विधाने करायची आणि खळबळ उडवून आपणास समाजातून किती पाठिंबा मिळतो तो पहायचे ही सत्ताधार्‍यांची जुनी स्टाईल असते.दिग्विजय त्यास अपवाद नाहीत.

नितिन थत्ते's picture

28 Jan 2011 - 7:09 pm | नितिन थत्ते

सावरकरांनी द्विराष्ट्रवादाचा (हिंदू आणि मुसलमान ही दोन वेगळी राष्ट्रे असल्याचा) सिद्धांत मांडला हे खरेच आहे.

पण ते फाळणीस जबाबदार होते ही नाही हे सांगता येत नाही.

राजेश घासकडवी's picture

28 Jan 2011 - 10:11 pm | राजेश घासकडवी

द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडल्यामुळे एखाद्याला फाळणीला जबाबदार धरणं म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडल्यामुळे झाडावरून सफरचंद खाली पडण्यास न्यूटनला जबाबदार धरण्यासारखं आहे.

मुळात जर ती खरोखरच दोन वेगवेगळी राष्ट्र असतील तर फाळणी हा शब्दप्रयोग चुकीचा ठरू शकतो. इंग्रजांनी आपल्या साम्राज्याच्या सोयीसाठी ती 'चुकीची जोडणी' केली होती असंही म्हणता येईल बहुधा.

असो. माझा इतिहासाचा अभ्यास काही फारसा चांगला नाही. तेव्हा यापेक्षा अधिक लिहिण्याची कुवत नाही.

मुळात जर ती खरोखरच दोन वेगवेगळी राष्ट्र असतील तर फाळणी हा शब्दप्रयोग चुकीचा ठरू शकतो. इंग्रजांनी आपल्या साम्राज्याच्या सोयीसाठी ती 'चुकीची जोडणी' केली होती असंही म्हणता येईल बहुधा.

तसाच विचार करायला गेले तर 'दोन(च) वेगवेगळी राष्ट्रे' हा दृष्टिकोन हे (सावरकरांच्या काय किंवा जीनांच्या काय) अतिशय उदात्त विचारसरणीचे द्योतक आहे असे म्हणावे लागेल.

तसेच पाहायला गेले, तर हिंदुस्थानातील प्रत्येक जात/पोटजात, प्रत्येक भाषिक आणि त्याअंतर्गत प्रत्येक बोलीभाषेशी निगडित गट, फार कशाला, पुणे(कर) आणि मुंबई(कर) किंवा शाकाहारी, मांसाहारी, मत्स्याहारी, अंडाहारी, नरभक्षक (बहुधा अल्पसंख्याक गट) वगैरे हीसुद्धा वेगवेगळी राष्ट्रे आहेत, असेही लक्षात येईल. त्या हिशेबाने एकट्या महाराष्ट्रात शेकडो आणि हिंदुस्थानात सहस्रावधी राष्ट्रे मोजता येतील. (त्यातही पुन्हा पुण्यात सदाशिव-नारायण-शनवार, डेक्कन जिमखाना, सहकारनगर यांसारखी किंवा मुंबईत गिरगाव, दादर, विलेपार्ले, झालेच तर वांद्रे, किंवा पश्चिम रेल्वेवरील उपनगरे, मध्य रेल्वेवरील उपनगरे यांसारखी उपराष्ट्रे आहेतच.)

अडचण अशी आहे, की ही सर्व राष्ट्रे एकच भूभाग व्यापतात, आणि त्या भूभागाअंतर्गत अनेकदा त्यांच्या भौगोलिक सीमा धूसर आणि (बर्‍याच परिस्थितींत) त्यांचे भौगोलिक प्रदेश एकमेकांवर कुरघोडी करणारे / समाईक आहेत. (ब्रिटिशांनी 'जोडणी केली' म्हणजे नेमके काय केले?)

आता अनेकदा या सहस्रावधी 'राष्ट्रां'चे एकमेकांशी पटत नाही. पण म्हणून त्यांना भौगोलिकतः वेगळे केलेच पाहिजे का? ('फाळणी' म्हणजे तरी नेमके काय? भौगोलिक प्रदेश वेगळे करणेच ना? नाहीतर मनांची फाळणी म्हणायला मुळात मनांची एकजूट होतीच कधी?) परस्परतिरस्काराच्या मजबूत बांधणीतून* अनेक राष्ट्रांचा एक भक्कम देश** उभा राहू शकत नाही का?

(अतिअवांतरः तसेच पाहायला गेले, तर कुटुंबासही द्विराष्ट्रवाद लागू करता येईल. बाकी चालू द्या.)

* 'पादा तरीही नांदा' तत्त्वावर.
** (सध्याच्या भारताप्रमाणे.)

विकास's picture

29 Jan 2011 - 6:19 pm | विकास

सावरकरांनी द्विराष्ट्रवादाचा (हिंदू आणि मुसलमान ही दोन वेगळी राष्ट्रे असल्याचा) सिद्धांत मांडला हे खरेच आहे.

सावरकरांनी द्विराज्य अथवा द्विदेश वाद मांडला नव्हता.

वास्तवीक या संदर्भात अधिक माहीतीपूर्ण चर्चा होऊ शकते. कारण वरचे श्री. थत्त्यांचे विधान जितके बरोबर आहे तितकेच त्यातील "द्विराष्ट्र" संदर्भात - "राष्ट्र" म्हणजे नक्की काय हे समजणे देखील महत्वाचे आहे. जसे धर्म या शब्दाचे अर्थ बदलतात तसेच राष्ट्र या शब्दाचे देखील आहे. इंग्रजीत देखील राष्टाला समांतर "नेशन" हा शब्द आहे. त्याचा देखील विचार केला तर अगदी विकीमधे देखील काय दिसते? :

Nation has different meanings in different contexts. In worldwide diplomacy, nation can mean country or sovereign state.[1] The United Nations, for instance, speaks of how it was founded after the Second World War with “51 countries” and currently has “192 member states”.[2] Nation may more broadly refer to a community of people who share a common territory and government—but who are not necessarily a sovereign state; and who often share a common language, race, descent, and/or history, such as the “Palestinian nation.” The word nation can more specifically refer to a tribe of North American Indians, such as the Cherokee Nation.[1]

हे सावरकरांच्या बाजूने लिहीण्यासाठी अथवा विरुद्ध लिहीणार्‍यांच्या/लिहीतल असे वाटणार्‍यांच्या विरुद्ध वादासाठी म्हणून म्हणत नसून जर इतिहासाचे खरेच/पक्षातित आणि विचारसरणीतित विश्लेषण करायचे असेल तर हे मुद्दे देखील विचारात घेणे योग्य ठरेल.

आणि त्या अर्थाने केवळ द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला म्हणजे फाळणी मागितली अथवा तसा विचार मांडला म्हणता येणार नाही असे वाटते.

नितिन थत्ते's picture

29 Jan 2011 - 6:34 pm | नितिन थत्ते

सहमत आहे.

सावरकर फाळणीला जबाबदार होते असे म्हणता येईल की नाही माहिती नाही असे आधीच्या प्रतिसादात लिहिलेच आहे.

अविनाशकुलकर्णी's picture

28 Jan 2011 - 7:39 pm | अविनाशकुलकर्णी

आता देश एकसंध ठेवणे हे आव्हान आहे व ते राहुल गांधि सक्षम पणे पेलवतील यात तिळमात्र शंका नाही..

jaydip.kulkarni's picture

28 Jan 2011 - 8:51 pm | jaydip.kulkarni

स्वतः जीना देखील फाळणी साठी सुरुवातीला अनुकूल नव्हते , १९१६ च्या सुमारास राष्ट्रासभा व मुस्लीम लीग यांना टिळक व जीना यांनी एकत्र आणले होते व संपूर्ण हिंदुस्तान च्या लढ्यासाठी प्रेरित केले होते , दुर्दैवाने नंतर टिळक राहिले नाहीत ( बहुतेक १९२० ) व गांधी नावाचा नवीन नेता देशाला मिळाला ( मी गांधीवादी वा विरोधी नाही , त्यांच्या काही गोष्टी पटतात पण बहुतेक पटत नाहीत ) त्या काळात जीनांचे राजकीय वर्चस्व कमी झाले व गांधीनी पण कधी प्रयत्न केला नाही त्यांना बरोबर घ्यायचा ( फाळणी ची शक्यता दिसू लागल्यावर काही प्रमाणात केला , पण तो पर्यंत उशीर झाला होता ) ज्या मुळे वेगळ्या मुस्लीम राष्ट्राची कल्पना जीनांनी उचलून धरली , मौलाना आझाद ह्या एकमेव व्यक्तीने अखेर पर्यंत फाळणी ला विरोध केला होता .....
सावरकरांनी संपूर्ण हिंदू राष्ट्र हि कल्पना मांडली होती , पण त्या मध्ये इतर धर्मियांना पण स्थान होते , स्वातंत्र्य पूर्व काळात काही मुस्लीम वर्ग ब्रिटीश विरोधी होता तो वेगळ्या कारणासाठी ( बहुतेक ब्रिटीश इस्लाम चे सर्वोच्च धर्मगुरू खलिफा यांच्या विरुद्ध लढत होते , त्या साठी .. ) सावरकरांचा फक्त अशा मुस्लिमांना विरोध होता , जे मुस्लीम लोक देशप्रेमाने भारावून प्रयत्न करत होते त्यांना सावरकरांनी कधीच विरोध केल्याचे ऐकले नाही ....
कॉंग्रेस ने पद्धतशीर पणे त्यांना मुस्लीम विरोधी प्रतिमा दिली आहे ...

वाटाड्या...'s picture

28 Jan 2011 - 8:51 pm | वाटाड्या...

आधी या विषयावर चर्चा करा की फाळणी झाली ते वरदान का शाप? त्यातुन येणार्‍या उत्तरावर ठरेल की कोणाला त्यासाठी जबाबदार ठरवायचं की धन्यवाद द्यायचे ते.....

- (फाळणीचा १५००० फुट उंचीवरुन विचार करणारा) वाटाड्या...

उमराणी सरकार's picture

29 Jan 2011 - 10:50 am | उमराणी सरकार

या सोबतच पाकीस्तानची पुन्हा फाळणी व्हायला जबाबदार कोण याची सुध्दा चर्चा होवू द्या.

विकास's picture

28 Jan 2011 - 8:59 pm | विकास

सध्याची पाकीस्तानाची (आणि वेगळ्या अर्थाने पण बांग्लादेशाची) अवस्था पाहीली तर "फाळणीचे श्रेय कुणाला द्यावे?" असा प्रश्न पडायला हवा. ;)

आमोद शिंदे's picture

29 Jan 2011 - 1:59 am | आमोद शिंदे

म्हणजे फाळणी झाली ते चांगलेच झाले का? ;)
--
मेरे पास फेसबूक, ट्विटर, ऑर्कूट, मिसळपाव, और काम धंदा भी है!

पैसा's picture

29 Jan 2011 - 11:12 am | पैसा

पाकिस्तान हा सगळ्या जगाचा रोग आहे म्हणून लोक बोंबलून र्‍हायलेत ते उगाच का?

दीपक साळुंके's picture

29 Jan 2011 - 11:34 am | दीपक साळुंके

"फाळणीचे श्रेय कुणाला द्यावे?"

फाळणीकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे.

'फाळणी झाली हे चांगले झाले' अशी जर भूमिका असेल, तर ते श्रेय खुशाल सावरकरांना द्यावे. (आणि श्रेय लाटण्याचाच मामला असेल, तर "फॉर गुड मेझर" त्याबरोबर संघाचेही नाव खुशाल जोडून द्यावे.)

'फाळणी झाली हे वाईट झाले' अशी जर भूमिका असेल, तर मात्र फाळणीचे श्रेय मोहम्मद अली जीना यांना द्यावे. (वाटल्यास बरोबर मोहनदास करमचंद गांधी यांचे नावही 'विभागून पारितोषिकविजेते' म्हणून (उगाचच) जोडून द्यावे.)

मात्र एक छोटीशी अडचण आहे. 'फाळणी झाली हे चांगले झाले' म्हणून तिचे श्रेय सावरकरांच्या नावावर घ्यायचे असेल, तर मग सावरकरांचीच तथाकथित 'आसिंधुसिंधुपर्यंत अखंड हिंदुस्थाना'ची घोषित भूमिका त्याच्याशी किंचित विसंगत ठरून त्याला आड येते. जरा तेवढ्या इतिहासाचे पुनर्लेखन करता आले तर बघावे (सावरकरांच्या इतिहासाच्या सोनेरी पानांतून* 'आसिंधुसिंधुपर्यंत अखंड हिंदुस्थाना'चा उल्लेख पूर्णपणे पुसून टाकता आल्यास उत्तमच!), म्हणजे मग श्रेय घ्यायला जरा अधिक सोपे जाईल.

तेवढे 'फाळणी झाली हे चांगले झाले की वाईट झाले' हे मात्र अगोदर निश्चितपणे ठरवावे. नाही म्हणजे काय आहे, की एकाच फाळणीसाठी सावरकरांचा गौरव आणि जीनांच्या (आणि फॉर गुड मेझर गांधींच्याही) नावाने खडे हे आम्हा सामान्य वकुबाच्या मंडळींना किंचित विसंगत वाटते, म्हणून हो.

बाकी चालू द्या.

* याचे पार्सिंग "[सावरकरांच्या इतिहासाच्या] [सोनेरी पानांतून]" असे व्हावे, "[सावरकरांच्या] ['इतिहासाच्या सोनेरी पानां'तून]" असे नव्हे, ही नम्र विनंती.

या विषयावर माझे वाचन पुरेसे नाहीं. म्हणून यावर कुणी तरी जाणकाराने एकादा लेख लिहावा अशी विनंती!

ऋषिकेश's picture

29 Jan 2011 - 11:04 am | ऋषिकेश

इतके दिवस विरोधी पक्ष काश्मिरात झेंडा फडकवावा की नाही यावर रान माजवत होते. प्रजासत्ताक दिन झाल्यानंतर पुन्हा विरोधी पक्ष महागाई-भ्रष्टाचारावर येईल की काय अशी भिती वाटल्याने हे सोडलेले पिल्लू दिसते आहे :)

बाकी मुळ विषयावद्दल काहिहि मते असतील तरी तुर्तास त्यावरून वाद घालण्याच्या/चर्चा करण्याच्या मुड मधे नाही आणि तेही दिग्गीराजासारख्याच्या सवंग वक्तव्यावरून तर नाहीच नाही

प्रजासत्ताक दिन झाल्यानंतर पुन्हा विरोधी पक्ष महागाई-भ्रष्टाचारावर येईल की काय अशी भिती वाटल्याने हे सोडलेले पिल्लू दिसते आहे

माझ्या मते यामागे सोमशेखर आयोगाने दिलेली क्लीन चीट असावी.

ऋषिकेश's picture

29 Jan 2011 - 11:24 am | ऋषिकेश

ह्म्म असेलही.. तात्पर्य सोमशेखर यांच्या अहवालानंतर 'पोपट' झालाच मात्र त्याबरोबर भ्रष्टाचारवगैरेवरून लक्ष हटवायची एक संधी गेली.. म्हणून आता दिग्गीराजाकडून अजून एक सवंग वक्तव्य आले आहे.

पक्ष महागाई-भ्रष्टाचारावर येईल की काय अशी भिती वाटल्याने हे सोडलेले पिल्लू दिसते आहे

........ मुड मधे नाही आणि तेही दिग्गीराजासारख्याच्या सवंग वक्तव्यावरून तर नाहीच नाही

हायकमांडच्या आदेशाप्रमाणे बोलणारे/ नाचणारे ते एक बाहुले आहे. आपली उपयुक्तता सिध्द करण्यासाठी असले चाळे करावेच लागतात त्या संस्कृतीत. आपण सगळेजण उगाचच तसल्या फालतु वक्तव्यावर चर्चा करून वेळेचा अपव्यय करीत आहोत.

बाकी दिग्गीराजांनी आणि त्यांना पाठींबा देणा-यांनी स्वा.सावरकर किती समजले आहेत ही शंकाच आहे.

चिप्लुन्कर's picture

29 Jan 2011 - 11:56 am | चिप्लुन्कर

फाळणीला सावरकर जवाबदार असतील तर आत्ताच्या पाकिस्तानच्या प्रगतीला (?) पैसे देण्यास उपोषण करणारे राष्ट्र पिता गांधीजी हे कोण आहेत ?
सावरकरांच्या आत्म्यास नक्कीच वेदना होत असतील . भारतापेक्षा अंदमानच ठीक होते असेच त्यांच्या मनास कदचित वाटू शकेल.

एखादी व्यक्ती जेंव्हा राष्ट्रा पेक्षा मोठी होते, तेन्व्हा ..................

सावरकर भक्त , नथुराम समर्थक -- चिपळूणकर

पंगा's picture

29 Jan 2011 - 6:14 pm | पंगा

भारतापेक्षा अंदमानच ठीक होते असेच त्यांच्या मनास कदचित वाटू शकेल.

फाळणीमध्ये अंदमान "पलीकडे" गेल्याबद्दल काही ऐकण्यात किंवा वाचण्यात आलेले नव्हते.

"आसिंधुसिंधुपर्यंत अखंड हिंदुस्थाना"च्या संकल्पनेत अंदमान मोडत नाही काय?

(कदाचित आपल्याच देशातील आपल्याव्यतिरिक्त इतर भूभागांबद्दलचे / समाजघटकांबद्दलचे मूलभूत अज्ञान आणि अनास्था ही फाळणीस कारणीभूत ठरली असावी काय?)

इन्द्र्राज पवार's picture

29 Jan 2011 - 1:15 pm | इन्द्र्राज पवार

वास्तविक पाहाता उठसूट कोणत्याही विषयावर पत्रकारांना खाद्य पुरविण्यात वाकबगार असलेल्या दिग्विजय सिंह यांच्यासारख्या नेत्याच्या वरील विषय संदर्भातील शेर्‍याला/मताला किंमत देण्याचे कारण नसते कारण श्री.सिंह यांच्या वक्तव्यावर खुद्द कॉन्ग्रेसमधील जाणकार मनोमनी हसले असतील. पण होते काय की येनकेन प्रकारे लाईमलाईटमध्ये राहाण्याच्या अट्टाहासापोटी अशा टिपण्यांचे पिल्लू मिडिया कोर्टवर सोडले की होते सुरू शटलकॉकींग. (हेमंत करकरे यांच्यासमवेत झालेल्या खाजगी संभाषणात ते - करकरे - जे काही म्हणाले होते ते त्यांच्या हत्येनंतर मिडीयाला सांगून याच दिग्विजयाने कॉन्ग्रेस पक्षाचीच जी गोची केली होती ती सर्वज्ञात आहे. खुद्द सेक्रेटरी जनार्दन द्विवेदी याना त्याबद्दल सारवासारव करावी लागली होती).

पण या निमित्ताने का होईना 'फाळणी' घटनेचा धांडोळा घेता येईल, या हेतूनेच हा थोडासा सविस्तर प्रतिसाद ~~

सावरकर याना जो "अखंड हिंदुस्थान" अपेक्षित होता तो कर्णावती (अहमदाबाद) येथे डिसेंबर १९३७ च्या हिंदुमहासभेच्या अधिवेशनातील भाषणात दिसून येतो. ते म्हणाले होते, "हिंदुस्थानातील इतर अल्पसंख्याकांचा प्रश्न असा कठीण नाही. पारशी सतत हिंदूंच्या खांद्याला खंदा लावून स्वातंत्र्यासाठी लढत आले आहेत. खिश्चन व ज्यूंचा प्रश्न सोपा आहे. अँग्लो इंडियन्सचा प्रश्न इंग्रज जाताच संपेल. पण इथले मुसलमान हे स्वतःला एक वेगळे राष्ट्र मानत असल्याने त्यानी बाहेरच्या मुसलमान देशांशी संगनमत करून येथे इस्लामी राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न चालविला तर तो हाणून पाडण्यासाठी हिंदूंना स्वतःच्या पायावरच उभे राहावे लागेल." तर १९३९ च्या कलकत्ता अधिवेशनातील भाषणात त्यानी सांगितले होते की, "हिंदुस्थान सतत अखंड ठेवण्यासाठी आपण राजकीय उपाय योजले पाहिजेत. हिंदुस्थानमध्ये हिमालय ते कन्याकुमारी नि सिंधू ते नेपाळ, पाँडेचेरी, गोवा यासह सर्व भाग समाविष्ट झाला पाहिजे. या हिंदुस्थानचे विभाजन करण्याचा कोणताही प्रयत्न हा देशद्रोह समजला पाहिजे...."

अजूनही उदाहरणे देता येतील, पण वरील दोन संदर्भावरून लक्षात येईल की सावरकरांना 'अखंड हिंदुस्थान" म्हणजे नेमके काय अपेक्षित होते. 'विभाजन' ही कल्पना त्याना कदापिही मान्य नव्हती. पण मग "विभाजन/फाळणी" चा उगम झाला तर कुठे? हा प्रश्न उरतोच.

याचे बीज रोवले गेले होते ते ब्रिटिश पंतप्रधान मॅक्डोनाल्ड यानी १६ ऑगस्ट १९३२ रोजी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये जातीय निवाडा (Communal Award) घोषित केला त्यावेळी. जिनांनी मुस्लिम लीगच्या दिल्ली येथील अधिवेशनातच सरकारकडे ज्या १४ मागण्या केल्या त्यात सिंध प्रांत मुंबई प्रांतापासून वेगळा करावा ही मागणी होती. जातीय निवाड्यात ही मागणी मान्य करण्यात आली (२४ डिसेंबर १९३२). शिवाय पंजाब प्रांत कायदेमंडळा ५१ टक्के तर बंगालमध्ये ५० टक्के जागा बहाल करण्यात आल्या. पंजाब आणि बंगाल स्वातंत्र्यानंतर "फुटणार" हे स्वातंत्र्यापूर्वी १५ वर्षे अगोदरच जाहीर झाले होते, आणि त्याचे 'क्रेडिट' जाते अर्थातच महम्मद अली जिना यानाच. [यातही विशेष म्हणजे अ‍ॅटली यानीच या बिलावर "हा निवाडा हिंदूंवर अन्याय करणारा व मुसलमानांना पोषक असा आहे." असे स्पष्ट मत नोंदवले होते.]. पाटणा कॉन्ग्रेस कार्यकारिणीमध्ये एकट्या पंडित मदनमोहन मालविय यानी म.गांधींच्या उपस्थितीत जातीय निवाड्याबाबत "तो धि:क्कारावा" अशी ठाम भूमिका घेतली. पण कार्यकारिणीने याबाबत बोटचेपी भूमिका स्वीकारल्याचे पाहताच मालवीय यानी पार्लमेन्टरी बोर्डाचा राजिनामा दिला. पुढे बिलाचे कायद्यात रुपांतर झाल्यावर त्या कायद्यानुसारच होणार्‍या निवडणुका लढवण्याचे ठरवून काँग्रेसने मागल्या दाराने 'फाळणीची बिजे' असलेल्या कायद्यापुढे मान तुकविली होतीच.

जिनाच्या नेतृत्वाखाली मुस्लिम लीगची वाटचाल [जी ब्रिटिशांच्या आशीर्वादाने फोफावत होतीच] चालू असतानाच दुसरे महायुध्द भडकले आणि स्वातंत्र्य नजरेच्या टप्प्यात येत आहे हे दिसताच कॉन्ग्रेसकडून पुनश्च मुस्लिमांचा अनुयय चालू झाला. १९४० मध्ये रामगढ येथील अधिवेशनात कॉन्ग्रेस अध्यक्ष मौलाना आझाद (ज्यांची 'Showboy of Congress' अशी जिना कुचेष्टा करीत) यानी ठरावात "हिंदू-मुस्लिम प्रश्न सोडवण्याचा उपाय म्हणून घटना समिती सरकारने बोलवावी.' असे मत मांडले. पण रामगढ अधिवेशनानंतर चारच दिवसांनी (२२ मार्च १९४०) लाहोर येथे भरलेल्या मुस्लिम लीगच्या अधिवेशनात जिनांनी आझादांचा हा प्रस्ताव ठोकरून लावत "इस्लाम व हिंदू हे धर्म नव्हेत तर निश्चित स्वरूपाच्या सामाजिक संहिता आहेत आणि त्या परस्परविरोधी असल्याने, कधी काळी एक राष्ट्रीयत्व निर्माण होईल हे केवळ एक स्वप्न आहे.' असा थेट पुकाराच केला...आणि दुसर्‍याच दिवशी लाहोर येथेच मुस्लिम लीगने 'पाकिस्तान निर्मिती'चा म्हटला जातो तो ठराव मंजूर केला.

(दुर्गादास या त्या काळातील प्रसिद्ध पत्रकाराच्या लेखनात स्पष्ट उल्लेख आहेत की, ज्यावेळी महम्मद अली जिना यानी त्याना मुलाखत दिली होती त्यावेळी ते 'द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांतावरच मुसलमानांचे प्रश्न सोडविले जातील' या मतावरच ठाम होते.)

पुढे चर्चिल यानी नियुक्त केलेल्या 'क्रिप्स मिशन' मध्येही (११ मार्च १९४२) स्पष्ट संकेत होतेच की, "युद्ध समाप्तीनंतर हिंदुस्थानला साम्राज्यांतर्गत स्वराज्य देण्यात येईल. राज्यघटना ब्रि.पार्लमेंट करील; पण एखाद्या प्रांताला हे स्वराज्य नको असेल तर त्या प्रांताला फुटून वेगळे निघण्याचा अधिकार असेल...". मग जिना तरी वेगळे काय सांगत होते?....मुस्लिम लीगने ठराव केला, "हिंदुस्थानात दोन किंवा अधिक सार्वभौम संघराज्ये यांच्या स्थापनेला योजनेत स्थान देऊन पर्यायाने 'पाकिस्तान' ची शक्यता मान्य करण्यात आली, याब्द्दल ही कार्यकारिणी संतोष व्यक्त करते..." लीगच्या या ठरावाला म्हणजेच दुसर्‍या अर्थानी पाकिस्तान निर्मितीला त्यावेळच्या कॉन्ग्रेस कमिटीने काय उत्तर दिले? एप्रिल १९४२ च्या अधिवेशनात पास झालेला ठराव पाहा :

"कोणत्याही प्रादेशिक घटकांतील जनतेला, तिच्या उदघोषित आणि प्रस्थापित इच्छेविरुद्ध हिंदुस्थानच्या संघराज्यात सामील होण्याची सक्ती करण्याचा विचारही काँग्रेसच्या मनाला शिवणार नाही..."

~ आता इथे एवढ्या पसार्‍यात 'विनायक दामोदर सावरकर' नावाची व्यक्ती कुठे येते हे दिग्विजय सिंह सांगू शकतील? सांगतील ही....कारण त्यांच्या दप्तरी पिवळ्या डोळ्यांनीच लिहिलेला जर इतिहास असेल तर अवघड काहीच नाही.

इन्द्रा

पंगा's picture

29 Jan 2011 - 8:09 pm | पंगा

अँग्लो इंडियन्सचा प्रश्न इंग्रज जाताच संपेल.

कसा?

इन्द्र्राज पवार's picture

29 Jan 2011 - 9:41 pm | इन्द्र्राज पवार

श्री.पंगा यानी जी शंका उपस्थित केली आहे तीवर खुलासा तर करतोच, पण येथेही सावरकरांची काळाच्या पुढे जाऊन एखाद्या गोष्टीची शक्यता अजमावण्याची दृष्टी दिसून येते. "अँग्लो इंडियन्सचा प्रश्न इंग्रज जाताच संपेल....." हे वाक्य त्यानी जाहीरपणे उच्चारले होते १९३७ मध्ये आणि त्याची प्रचिती अगदी स्वातंत्र्याच्या वर्षापासून (१९४७) पासूनच येण्यास सुरूवात झाली तर १९७० पर्यंत 'अँग्लो-इंडियन' म्हणजे काय हे आता म्युझियममध्ये पाहाण्यास जावे लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. याला कारण म्हणजे या 'Ango-Indians' नी 'भारत हा माझा देश आहे' असे कधीच मानले नव्हते. फक्त ब्रिटिश राज्यकर्ते आहेत म्हणून 'नेटिव्हा'सोबत राहायचे अशी तुच्छतापूर्व भावना त्यांच्यात होती.

स्वातंत्र्यपूर्व काळातील देशाच्या जडणघडणीत ब्रिटिशांनी सैनिकी तसेच नागरी सेवेत चांगलाच जम बसविला असल्याने साहजिकच सामाजिक संबंधही दृढ होत गेले आणि यातूनच अटळपणे ब्रिटिश बाप आणि हिंदुस्थानी आई यांच्या संबंधातून जन्माला आलेली अपत्ये याच मातीत वाढू लागली. मात्र बापाकडून ते "ब्रिटिश" असल्याने त्यानी स्वतःला कधीच इथल्या हवेत राहणे पसंत केले नाही, मात्र त्यांच्या मोठेपणी त्याना सिव्हील सर्व्हीसेसमध्ये चांगल्या जागा मिळत गेल्याने सामाजिक दर्जाही चांगल्यापैकी मिळत गेला. मात्र युद्धानंतर भारत स्वतंत्र होणार हे अटळ झाल्याचे दिसताच या अँग्लो-इंडियन्समध्ये हकनाक असुरक्षिततेची भावना निर्माण झाली....म्हणजे "आमचा बाप इथून गेला की, आमचे काय होणार?" त्यामुळे १९४७ च्या आगेमागेच या जमातीने (जी संख्येने साधारणतः सर्वत्र मिळून एक लाखाच्या आसपास होती) भारतातून Exodus सुरू केले. बहुतांशी इंग्लंडमध्ये स्थायिक होण्यासाठी गेले तर बाकीचे ऑस्ट्रेलिया, कॅनडा येथे गेले....कायमचे. त्याना हिंदुस्थानच्या फाळणीशी कसलेही सोयरसुतक नव्हते.

"भारताचे भारतात खाणार, पण भारताला आपला देश म्हणणार नाही..." असली अँग्लो-इंडियन्स मनोवृत्ती सावरकरांना माहिती होतीच त्यामुळे १९३७ साली अध्यक्षपदावरून बोलताना त्यानी 'ते' उदगार काढले होते....जे अचूकच ठरले.

इन्द्रा

सुनील's picture

29 Jan 2011 - 9:55 pm | सुनील

राज्यसभेतील दोन जागा अँग्लो-इंडियन जमातीतील व्यक्तींसाठी राखीव असतात, ज्या भरण्याचे अधिकार राष्ट्रपतींकडे असतात.

बाकी चर्चा छान चालली आहे.

इन्द्र्राज पवार's picture

29 Jan 2011 - 10:18 pm | इन्द्र्राज पवार

सुनील....थोडीशी दुरुस्ती ~ राज्यसभेतील नव्हे "लोकसभे"तील दोन जागा.

सध्या १. चार्ल्स दियाझ हे थिरुवनंतपूरम, केरळ व २. श्रीमती इंग्रीड मॅकलीअड, बिलासपूर, छ्त्तीसगड हे ते दोन अँग्लो-इंडियन्स लोकसभेतील राष्ट्रपती-नियुक्त खासदार आहेत.

इन्द्रा

भारतरत्न आपल्याला मिळणार नाहि याचि खात्रि आसल्याने पकिस्तान कडुन काहि ऐखादा पुरसकार मिळविण्याचा दिग्विजय सिंह यानि प्रयत्न चालु केलेला दिसतो .

विनित

रमेश आठवले's picture

29 Jan 2011 - 3:36 pm | रमेश आठवले

बिहारमधे अल्पसंख्यकानी सपशेल नाकार्ल्यावर या कॉन्ग्रेस सचिवान्चे प्रयत्न उत्तर प्रदेशात तरी त्यान्चि मत मीळावीत या साठी चालू आहेत.

अप्पा जोगळेकर's picture

29 Jan 2011 - 3:57 pm | अप्पा जोगळेकर

थोर माणसांवर टीका केली की आपोआप प्रसिद्धी मिळते. म्हणून केलं असेल कदाचित.

आजकाल दिग्गी म्हणजे वाद हे समिकरण झाल आहे त्यामुळे दिग्गीराजा बोलतो आणि वादग्रस्तच बोलतो त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही. त्यांना १० जनपथ वरुन आशिर्वाद मिळतात . दिग्गी किमान १५ दिवसात एक वादग्रस्त वक्तव्य नक्कीच करतात. कदावित वादग्रस्त बोलल्याशिवाय आणि लोकांच्या शिव्या खाल्ल्याशिवाय त्यांना शांत झोप येत नसावी................फाळणीला जबाबदार कोणी का असेना समजा फाळणी झाली नसती आणि सध्याचे तमाम पाकीस्तानी भारतात राहीले असते तर ????

सुनिलपाटील's picture

29 Jan 2011 - 8:44 pm | सुनिलपाटील

फाळणीचा गुन्हेगार ? फाळणी झाली , काय वाईट झाले ? एक काश्मीर साम्भाळताना आपली किती शक्ती , पैसा आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे सैनिक खर्ची पडत आहेत. असले अजुन ५ काश्मीर हवेत कुणाला ?

पंगा's picture

29 Jan 2011 - 9:29 pm | पंगा

प्रश्न एवढाच आहे, की याला मर्यादा कोठे घालून द्यावी. काल पाकिस्तान झाला, मध्यंतरी खलिस्तान चळवळ जोरावर होती, कश्मीरमध्येही गडबड आहेच, ईशान्येकडच्या राज्यांतूनही आवाज ऐकू येतात म्हणतात. उद्या स्वतंत्र महाराष्ट्र का नको? स्वतंत्र मुंबई का नको? स्वतंत्र सदाशिव पेठ का नको?

किंवा सामाजिक गटांच्या आधारावरच जर फाळणी करायची आहे (जशी पाकिस्तानच्या वेळी झाली), तर मग (मराठी मुलुखापुरतेच बोलायचे तर) स्वतंत्र ब्राह्मणिस्तान, मराठाइस्तान, सीकेपिस्तान, बहुजनिस्तान वगैरे का नकोत? त्यातही पुन्हा ब्राह्मणिस्तानची फाळणी करून भटिस्तान आणि शेणविस्तान, त्यापुढे भटिस्तानाची फाळणी करून कोब्रिस्तान, देब्रिस्तान, कर्‍हाडिस्तान वगैरे, मराठाइस्तानची फाळणी करून शहाण्णवकुळिस्तान आणि बिगरशहाण्णवकुळिस्तान, किंवा देशावरला-मराठा-इस्तान, कोंकणी-मराठा-इस्तान वगैरे, झालेच तर बहुजनिस्तानाचीसुद्धा फाळणी करून त्यांत जितकी म्हणून उपराष्ट्रे असतील त्यांची वेगळी इस्ताने का नकोत? (एखाद्या गटाचा किंवा उपगटाचा उल्लेख राहून गेला असल्यास अनवधानाबद्दल, अज्ञानाबद्दल आणि स्वतःच्या इस्तानाचे नाव स्वतःच घालावे लागण्याच्या दिलेल्या तसदीबद्दल क्षमस्व.) आधीच या सर्व 'इस्तानां'त वितुष्टे आहेतच, कितीही नाही नाही म्हटले तरी प्रसंगी बाहेर पडत असतातच. त्यात पुन्हा भौगोलिक फाळणी करून नवीन सीमाप्रश्नापोटी यांना एकमेकांच्या नरडीचा घोट घ्यायला का उद्युक्त करायचे?

एक काश्मीर साम्भाळताना आपली किती शक्ती , पैसा आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे सैनिक खर्ची पडत आहेत.

कश्मीरचा प्रश्न हा मुख्यतः भारत आणि पाकिस्तानमधील सीमाप्रश्न आहे. ('आज़ादी'वादी, 'सार्वमत'वादी स्थानिक गटही आहेत म्हणा, पण या प्रश्नाच्या अनुषंगाने त्यांना फारसे महत्त्व नाही. संधी दिली तर काय, उद्या मीही स्वतःला स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित करेन! आणि त्यासाठी माझ्या एकट्यापुरते 'सार्वमत' घेतल्यास माझ्या स्वातंत्र्याच्या बाजूने शंभर टक्के मते पडतील याची मला खात्री आहे.) मुळात फाळणी झाली, म्हणूनच तर कश्मीरप्रश्न निर्माण झाला नाही काय? मुळात भारत आणि पाकिस्तानच जर वेगळे नसते, तर कश्मीरसाठी आपापसात भांडते कशाला? (फार फार तर अखंड हिंदुस्थान जम्मू आणि कश्मीर संस्थानाशी भांडता.)

बाकी कश्मीरमधली परिस्थिती वगैरे म्हणाल, तर तो भारताची अंतर्गत समस्या आहे. फाळणी झाली नसती, तरीसुद्धा व्हायचे असते तर झालेच असते. आणि फाळणी झाल्यानेही तो प्रश्न काही सुटलेला नाही, उलट चिघळलेलाच आहे. असो.

पंगा's picture

29 Jan 2011 - 9:39 pm | पंगा

'द्विराष्ट्र संकल्पना सर्वप्रथम सावरकर यांनी मांडली होती. त्यानंतर महम्मद अली जीना यांनी ती उचलून धरली आणि त्यामुळेच पुढे भारताची फाळणी झाली'

द्विराष्ट्रवादाची संकल्पना सावरकर आणि जीना या दोघांनीही मांडली असणे शक्य आहे. त्यातही कालक्रमानुसार सावरकरांनी ती महंमद अली जीना यांच्या आधी मांडलेली असणे अशक्य नाही. परंतु म्हणून 'सावरकरांनी मांडलेली कल्पना जीनांनी उचलून धरली' असे म्हणणे सयुक्तिक वाटत नाही.

दोघेही प्रगल्भ बुद्दिमत्तेचे गृहस्थ होते. दोघांनाही ही कल्पना स्वतंत्रपणे सुचू शकत नाही काय? त्यासाठी जीनांनी सावरकरांचे शिष्यत्व पत्करण्याची काय गरज आहे? जीनांना स्वतंत्र विचारांचे क्रेडिट द्या ना! त्यासाठी सावरकरांना त्यांच्या गुरुपदी का लादायचे?

दिग्विजयसिंह हे छुपे सावरकरवादी आहेत काय?

चिरोटा's picture

30 Jan 2011 - 12:14 am | चिरोटा

एका जुन्या बातमीत हे दिसले-

It is the very stuff of revisionist history of the kind politicians favour that propels Savarkar into being projected by the Sangh Parivar as a nationalist, despite arguing in 1937, three years before Jinnah formally mooted the two-nation theory, that Hindus and Muslims were "two antagonistic nations living side by side in India".

http://www.hindu.com/2005/06/08/stories/2005060806951300.htm

हिंदुराष्ट्राचे घटक
'हिंदू'शब्द मूलत: देशवाचक, राष्ट्रवाचक आहे. याचे मुख्य अधिष्ठान आसिंधु सिंधू अशी ही भारतभूमिका आहे. 'आसिंधु सिंधू' अशा त्या भारतभूमिकेत अत्यंत प्राचीन काळापासून ज्यांचे पूर्वज परंपरेने निवसत आले, ज्या राष्ट्रात प्रचलित असलेली सांघिक संस्कृती, घडलेला इतिहास, बोललेल्या भाषा, अनुसरलेले धर्म; ज्यांचे संस्कृती, इतिहास, भाषा, धर्म आहेत ते सारे हिंदु होत. त्या हिंदुराष्ट्राचे घटक होत. - (स.सा.वा. ३ : ७१३)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
हिंदुधर्म
'हिंदुधर्म' हे नाव कोणत्याही एका विशिष्ट धर्माचे वा पंथाचे विशेष नि अनन्य नाव नसून ज्या अनेक धर्मांची नि पंथांची ही भारतभूमी हीच पितृभूमी नि पुण्यभूमी आहे त्या सार्‍यांना समावेशिणार्‍या धर्मसंघाचे हिंदुधर्म हे सामुदायिक अभिधान आहे. - (१९४९ स.सा.वा. ३ : ७१३)