भारतातील विद्यार्थ्यांची employability (रोजगार-योग्यता ?) - खरं तर आतापर्यंत हा विषय बरेचदा वाचला होता आणि ह्याविषयी छापल्या गेलेल्या टक्केवारीबद्दल व्यक्तीशः साशंकच होतो. पण सध्या आमच्या छोट्या कंपनीसाठी निवड-चाचणी आणि मुलाखती घेताना येत असलेल्या अनुभवावरून हा प्रश्न अधिकच गंभीर आणि मोठा असल्याचं जाणवलं. पण हे चित्र सार्वत्रिक आहे की मी अनुभवलेला अपवाद आहे, ह्याची खात्री करण्यासाठी हा काथ्याकूट. माहितगार लोकांनी अधिक प्रकाश टाकावा, ही विनंती!
काही अंदाजांनुसार, भारतातील अभियान्त्रिकीच्या विद्यार्थ्यांची employability २५% पेक्षाही कमी असल्याचे वाचनात आले होते. (काही ठिकाणी ही टक्केवारी ठरावीक उद्योगांसाठी असल्याचे नमूद केले आहे.)
http://news.in.msn.com/national/article.aspx?cp-documentid=3373712
http://www.rediff.com/getahead/slide-show/slide-show-1-career-jobs-7-que...
ह्या संबंधात माझी काही सामान्य निरिक्षणे-
१. संवाद-कौशल्याची कमतरता (म्हणजे फक्त फाड-फाड भाषा नव्हे)
२. ज्या क्षेत्रात career करायचे ठरवले आहे, त्या क्षेत्राविषयी मूलभूत माहितीचा अभाव (उदा. विविध जबाबदार्या, सध्या वापरात असलेल्या पध्द्ती इ.) - [ घोकंपट्टी / पुस्तकी ज्ञानावर असलेला भर आणि शैक्षणिक संस्था व उद्योगांमध्ये पुरेश्या प्रमाणात नसलेला संपर्क कारणीभूत असेल काय? ]
३. कौशल्य-संच, कष्ट घेण्याची तयारी आणि अपेक्षा ह्यांचे प्रतिकूल समीकरण
माझा अनुभव अभियांत्रिकीपुरता मर्यादित नाही. management च्या विद्यार्थ्यांविषयीही अनुभव असाच काहीसा आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांबाबतीत वरील निरिक्षणांचे आश्चर्य वाटायला नको, पण शहरी भागातील विद्यार्थीदेखील सरसकट पुढे आहेत, असं काही मला आढळून आले नाही...
अनेक मोठ्या कंपन्या आणि शैक्षणिक संस्था ह्यावर मार्ग काढण्यासाठी नक्की प्रयत्न करत असतील. पण नक्की काय चाललय?
इतर शैक्षणिक क्षेत्रांमधील स्थिती काय आहे?
प्रश्न खरंच गंभीर आणि व्यापक असेल, तर त्यावर सध्या काय उपाययोजना होत आहेत?
अश्या काही उपाययोजनांमध्ये व्यक्तीशः आणि छोट्या कंपन्यांकडून काय करता येणे शक्य आहे?
माहितगार लोकांनी अधिक प्रकाश टाकावा, ही विनंती!
प्रतिक्रिया
28 Jan 2011 - 5:01 pm | टारझन
सहमत आहे . टेक्निकल स्किल्स मधे पारंगत असलेल्यांचे कम्युनिकेशन स्किल्स पाहिले की तोंडात बोटे घालावीशी वाटतात :) काहींचा तर दोन्ही कडे अंधार असतो :)
आमचा तर पारंच अंधार बघा ;)
बाकी प्रकाश जाणकार टाकतील .
- किल्विश
अंधेरा कायम रहे !!
28 Jan 2011 - 5:35 pm | छत्रपति
सद्ध्या आम्ही रोजगार आणि स्वय॑रोजगार खात्या साठी एक अस॑ स॑केतस्थळ बनवत आहोत की जे वापरायला सोप॑ असून खूप देखील उपयोगी आहे...!!! ज्याद्वारे बराच वेळ वाचुन (बेरोजगारा॑चा आणि सरकारी कर्मचार् या॑चा ) त्याचा योग्य तो फायदा सर्वा॑नाच होईल...!!!
ता.क. अधिक माहिती साठी व्य.नि. करावा...!!!
28 Jan 2011 - 5:53 pm | चिरोटा
ही समस्या सगळीकडे असते.प्रगत देशांमध्येही तिकडेचे विद्यार्थी 'अप टू डेट' नाहीत असे म्हंटले जाते.बर्याच वेळा हा (अप्)प्रचार ट्रेनिंग संस्था,व्य्वस्थापन संस्था ह्यांच्यातर्फे केला जातो.त्यात अगदीच तथ्य नसते असे नव्हे .पण विद्यापीठे,कॉलेजेस इंडस्ट्रीप्रमाणे बदलती रहावीत अशी अपेक्षा करणे चूक आहे.बरे, ह्याच कंपन्या लोकांना बाहेर पाठवतात किंवा मोठे काम आणतात तेव्हा मात्र त्यांच्याकडचे लोक अगदी हुषार आहेत असे म्हंटले जाते.
31 Jan 2011 - 5:44 pm | साधा_सरळ
पण चिरोटाजी, मी कोणत्याही ट्रेनिंग / व्यवस्थापन संस्थेशी संलग्न नाही आणि माझा प्रश्न ऐकीव माहितीबरोबरच स्वानुभवावर आधारित आहे.
'ह्याच कंपन्या लोकांना बाहेर पाठवतात किंवा मोठे काम आणतात तेव्हा मात्र त्यांच्याकडचे लोक अगदी हुषार आहेत असे म्हंटले जाते.'
माफ करा, पण आमच्या छोट्याश्या कंपनीतही freshers ना योग्य ट्रेनिंग दिल्याखेरिज बाहेर पाठवत नाहीत (locally सुध्दा...). मला खात्री आहे की इतर कंपन्यांमध्येही योग्य तयारी पूर्ण झाल्याशिवाय कोणा fresher ला 'बाहेर' किंवा 'मोठे काम आणायला' पाठवत नसावेत. ह्या योग्य तयारीमध्ये अर्थातच संभाषण-कौशल्य आणि त्या-त्या क्षेत्रातील आवश्यक ते ज्ञानसंपादन ह्यांचा समावेश असतो.
बरं, विद्यापीठे,कॉलेजेस इंडस्ट्रीप्रमाणे बदलती रहावीत अशी अपेक्षा करणे का चुकीचे आहे ते कळले नाही. कारण शेवटी विद्यार्थ्याला industry ready बनवणे ही त्यांची जबाबदारी आहेच की...
28 Jan 2011 - 10:47 pm | लॉरी टांगटूंगकर
कॅम्पस चालू आहेत.काय करू सांगा .थोडे जास्त विस्तारानी बोललात तर थोडा फायदा होईल मला .
२ ठिकाणहून मुलाखतीतून बाहेर पडलोय.
28 Jan 2011 - 10:51 pm | कुंदन
शिक्षणसंस्था हा एक धंदा झालाय , जिथे Quality पेक्शा Quantity ला जास्त महत्व दिले जातेय.
31 Jan 2011 - 6:03 am | गुंडोपंत
संवाद-कौशल्याची कमतरता
२. ज्या क्षेत्रात career करायचे ठरवले आहे, त्या क्षेत्राविषयी मूलभूत माहितीचा अभाव
३. कौशल्य-संच, कष्ट घेण्याची तयारी आणि अपेक्षा ह्यांचे प्रतिकूल समीकरण
अगदी बरोबर आहे! हेच मलाही वाटते.
31 Jan 2011 - 7:50 am | Pain
गुणवत्ता/ योग्यतेवरच घेतात असे थोडेच आहे? हे तपासायला लागले तर कितीतरी लोक बाहेर पडतील.