भारतातील विद्यार्थ्यांची रोजगार-योग्यता?
भारतातील विद्यार्थ्यांची employability (रोजगार-योग्यता ?) - खरं तर आतापर्यंत हा विषय बरेचदा वाचला होता आणि ह्याविषयी छापल्या गेलेल्या टक्केवारीबद्दल व्यक्तीशः साशंकच होतो. पण सध्या आमच्या छोट्या कंपनीसाठी निवड-चाचणी आणि मुलाखती घेताना येत असलेल्या अनुभवावरून हा प्रश्न अधिकच गंभीर आणि मोठा असल्याचं जाणवलं. पण हे चित्र सार्वत्रिक आहे की मी अनुभवलेला अपवाद आहे, ह्याची खात्री करण्यासाठी हा काथ्याकूट. माहितगार लोकांनी अधिक प्रकाश टाकावा, ही विनंती!
काही अंदाजांनुसार, भारतातील अभियान्त्रिकीच्या विद्यार्थ्यांची employability २५% पेक्षाही कमी असल्याचे वाचनात आले होते. (काही ठिकाणी ही टक्केवारी ठरावीक उद्योगांसाठी असल्याचे नमूद केले आहे.)
http://news.in.msn.com/national/article.aspx?cp-documentid=3373712
http://www.rediff.com/getahead/slide-show/slide-show-1-career-jobs-7-questions-with-infosys-srikantan-moorthy/20101230.htm
ह्या संबंधात माझी काही सामान्य निरिक्षणे-
१. संवाद-कौशल्याची कमतरता (म्हणजे फक्त फाड-फाड भाषा नव्हे)
२. ज्या क्षेत्रात career करायचे ठरवले आहे, त्या क्षेत्राविषयी मूलभूत माहितीचा अभाव (उदा. विविध जबाबदार्या, सध्या वापरात असलेल्या पध्द्ती इ.) - [ घोकंपट्टी / पुस्तकी ज्ञानावर असलेला भर आणि शैक्षणिक संस्था व उद्योगांमध्ये पुरेश्या प्रमाणात नसलेला संपर्क कारणीभूत असेल काय? ]
३. कौशल्य-संच, कष्ट घेण्याची तयारी आणि अपेक्षा ह्यांचे प्रतिकूल समीकरण
माझा अनुभव अभियांत्रिकीपुरता मर्यादित नाही. management च्या विद्यार्थ्यांविषयीही अनुभव असाच काहीसा आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांबाबतीत वरील निरिक्षणांचे आश्चर्य वाटायला नको, पण शहरी भागातील विद्यार्थीदेखील सरसकट पुढे आहेत, असं काही मला आढळून आले नाही...
अनेक मोठ्या कंपन्या आणि शैक्षणिक संस्था ह्यावर मार्ग काढण्यासाठी नक्की प्रयत्न करत असतील. पण नक्की काय चाललय?
इतर शैक्षणिक क्षेत्रांमधील स्थिती काय आहे?
प्रश्न खरंच गंभीर आणि व्यापक असेल, तर त्यावर सध्या काय उपाययोजना होत आहेत?
अश्या काही उपाययोजनांमध्ये व्यक्तीशः आणि छोट्या कंपन्यांकडून काय करता येणे शक्य आहे?
माहितगार लोकांनी अधिक प्रकाश टाकावा, ही विनंती!
प्रतिक्रिया
:)
अश्या काही उपाययोजनांमध्ये व्यक्तीशः आणि छोट्या कंपन्यांकडून काय
हा
पण...
काय करावे??
अहो ....
खरे आहे
गुणवत्ता/ योग्यतेवरच घेतात