राधा - भक्त का प्रेयसी

सायली थत्ते's picture
सायली थत्ते in काथ्याकूट
27 Jan 2011 - 1:55 pm
गाभा: 

घरच्या वास्तुशांतीच्या दिवशी अनेक भेटवस्तू मिळाल्या. त्यात एक राधा-कृष्णाची फ्रेम पण मिळाली होती. त्यामध्ये श्रीकृष्ण राधेपेक्षा उंच दिसत होते, हातात बासरी होती आणि राधेनी त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवले होते. फ्रेम बघून माझ्या पाच वर्षांच्या भाच्यानी मला लगेच विचारलं, "राधा ही कृष्णाची 'गर्ल फ्रेंड' होती ना?" मी एकदम दचकले. "नाही रे, राधा ही कृष्णाची खूप मोठी भक्त होती." या माझ्या उत्तरावर शांत न बसता त्यानी पुन्हा एक शंका विचारली - "पण माझ्या वर्गातले मित्र म्हणतात, ते दोघं 'गर्ल फ्रेंड- बॉय फ्रेंड' होते!". "अरे नाही म्हंटलं ना, राधा एक श्रेष्ठ भक्त होती श्रीकृष्णाची" असं सांगून नंतर मी त्याचं लक्ष दुसरीकडे वेधलं.

मला मात्र त्या दिवसापासून चैन पडत नव्हतं. ज्यांनी 'भागवत' ग्रंथ वाचला, ऐकला आहे आणि ज्यांनी श्रीकृष्णाच्या आयुष्यावर अभ्यास केला आहे अशा अनेक जणांना मी एक प्रश्न विचारला - "श्रीकृष्णांनी गोकुळ सोडले तेव्हा त्यांचे वय काय होते आणि रासक्रिडा ही त्याच्या आधीची ना?" यावर सगळ्यांकडून मला असे उत्तर मिळाले की श्रीकृष्णांच आयुष्य साधारण १२० ते १२५ वर्षांचे होते. त्यातील ८ ते १० वर्षांचे असेपर्यंत ते गोकुळ आणि वृंदावन मध्ये होते. साधारण वयाच्या १०व्या वर्षी त्यांनी कंसाचा वध केला. गोप-गोपींबरोबरची रासक्रिडा ही त्याच्या आधीचीच. रासक्रिडेनिमित्त लहान वयातील श्रीकृष्णाच्या सहवासात गेल्याने गोपिकांच्या मनातील विकार नाहीसे होऊन त्यांना आध्यात्मिक आनंद मिळाला. ८व्या वर्षी गोकुळ सोडल्यानंतर श्रीकृष्णांनी रासक्रिडा कधीही केली नाही"यावरून ही गोष्ट तर नक्की की श्रीकृष्ण जेव्हा गोपींबरोबर खेळायचे तेव्हा त्यांचं वय साधारण ८ पेक्षा कमी होतं आणि इतर गोपी या निश्चितच तरूणी होत्या. गोपींचं श्रीकृष्णवर खूप प्रेम होतं हे जे म्हणतात ते प्रेम 'भक्त-देव' या अर्थानी होतं.

आजच्या तरूण पिढीला 'राधा-कृष्ण' किंवा 'कृष्ण आणि गोपी' य नात्यांबद्दल काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी मी नंतर एक सर्वेक्षण केलं त्यावरून मी खात्रीनी सांगू शकते की आजच्या तरूण पिढीमध्ये या नात्यांबद्दल खूप गैरसमज पसरले आहेत. आजच्या तरूण-तरूणींकडून 'राधा-कृष्ण' या नात्याबद्दल हे विचार आले -

१. राधा गोकुळातील एक गोपी होती. राधा आणि कृष्ण हे 'प्रियकर-प्रेयसी' होते.

२. ते दोघे खूप प्रेमात होते पण, दुर्दैवाने लग्न नाही झाले.

३. दोघांनी लग्नही केलं होतं पण कोणाला सांगितलं नव्हतं!

4. ते दोघं 'लिव्ह इन रिलेशनशीप' मध्ये होते !!

एवढचं नाही तर जेव्हा 'लिव्ह इन रिलेशनशीप' साठी आपल्या देशात परवानगी मिळाली तेवा कोर्टाकडून याला जी पुष्टी मिळाली ती अशी -

'The court said even Lord Krishna and Radha lived together according to mythology. '

http://timesofindia.indiatimes.com/india/Live-in-relationship-pre-marita...

आज अनेक नाटक, चित्रपट, गाणी, मालिका यात सर्रास दाखवलं जातं की श्रीकृष्ण बनलेला पुरूष (मोठ्या वयाचा) इतर गोपींची (त्याच्याच वयाच्या) छेड काढत आहे. वास्तविक पाहता असे दाखविणे पूर्णपणे चूक आहे. रासक्रिडा जर दाखवायचीच असेल तर कृष्ण म्हणून ८ पेक्षा कमी वय असलेला मुलगा घ्यावा व गोपी मोठ्या घ्याव्यात आणि त्यांच्यातलं प्रेम वेगळ्या प्रकारे (भक्ती युक्त) सादर करावे. श्रीकृष्ण यांची प्रत्येक कृती, त्यांचा प्रत्येक निर्णय हे आपल्यासाठी आदर्शांचा मोठा ठेवा आहे. 'त्यांनी अत्यंत लहान वयात त्यांच्या आईच्या वयाच्या गोपींची खोडी काढली' याचा चुकीचा अर्थ घेऊ नये. व आपल्या मुलांनाही ते समजावून सांगावे नाहीतर त्यांचा गैरसमज होऊन 'ही चुकीची गोष्ट जर देव करू शकतो तर आपण का नाही' असा विचार करून युवापिढी उद्या बिघडायला लागली तर तेव्हा त्यांना दोष देण्यात अर्थ राहणार नाही.

--- सायली अनिल थत्ते

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

27 Jan 2011 - 2:31 pm | परिकथेतील राजकुमार

मुळात राधा ह्या नावाच्या किती व्यक्तीरेखा होत्या ह्याची माहिती घेतली तर बरेच प्रश्न सुटतील ;)

कॉलींग नाना....

राधा ही काल्पनिक व्यक्तिरेखा आहे कारण मुळात कृष्ण हीच काल्पनिक व्यक्तिरेखा आहे.

नन्दादीप's picture

27 Jan 2011 - 2:54 pm | नन्दादीप

>>कारण मुळात कृष्ण हीच काल्पनिक व्यक्तिरेखा आहे.

मग महाभारत, गीता (श्रीक्रुणाचा अर्जुनास उपदेश) याबद्दल आपले काय सांगणे आहे?

अवलिया's picture

27 Jan 2011 - 2:55 pm | अवलिया

काय सांगु त्याबद्दल?

शिल्पा ब's picture

27 Jan 2011 - 10:45 pm | शिल्पा ब

जे माहीती आहे ते सांगा.

पैसा's picture

28 Jan 2011 - 10:03 pm | पैसा

माहिती असलेलं सांगितलं तर लोक म्हणतात. "काय भंकस!"
माहिती नसलेलं सांगितलं तर " मोठा तज्ञ आहे हो!"

कृष्ण किंवा महाभारतातील पात्रे काल्पनिक नाहीत , हे सर्व घडले होते साधारण ९ व्या किंवा १० व्या शतकात अंदाजे .... मथुरा किंवा महाभारतात सांगितलेली पुष्कळ ठिकाणे आज हि अस्तित्वात आहेत .....

हुप्प्या's picture

27 Jan 2011 - 9:11 pm | हुप्प्या

डॅन ब्राऊनचे दा विन्ची कोड वा एन्जल्स अँड डिमन्स वाचले आहे का? दोन्ही पुस्तकात खर्‍याखुर्‍या जागा, खर्‍या ऐतिहासिक व्यक्तिरेखा ह्यात काल्पनिक व्यक्ती आणि घटना मिसळून मनोरंजक कादंबर्‍या बनवल्या आहेत.
त्याच्या लाखो काप्या विकल्या गेल्या आहेत. पण म्हणून काय तो इतिहास समजायचा का?
तीच गोष्ट महाभारताची. जागा खर्‍या पण घटना काल्पनिक. कुठलाही भौतिक पुरावा नसल्यामुळे महाभारत आणि त्यातल्या व्यक्ती काल्पनिकच आहेत.
अन्यथा पुरावे द्या. नाणी, शिलालेख, गाडगी मडकी असे काही तरी ठोस.

चिगो's picture

27 Jan 2011 - 11:24 pm | चिगो

+१....
मलाही हेच वाटतं भौ.. नाहीतर मी आत्ताच मंदार, फिरोज आणि अमरला भेटायला मुंबईला आणि दारा ला भेटायला राजस्थानात जायला तयार आहे..
(सुशिंचा चारपाती पंखा) चिगो

ह्ये भलतंच अवांतर झालं ह्यासाठी स्वॉरी हां, हुप्प्याराव/जी/ पंत...

मग भगवद गीता कोणी लिहिली ?
जर गीता आहे तर मग कृष्ण असलाच पाहिजे !!!
असे म्हटले जाते कि कृष्ण अवतार साधारण पणे ३२२८ BC झाला होता ......
मथुरा आणि महाभारतातील घटना यावर देखील संशोधन चालू आहे .
अशी त्या काळातील विशिष्ट लिपी व पत्रे सापडली आहेत पण त्या लिपीचा अर्थ लागत नाही असे ऐकले आहे .........

हुप्प्या's picture

28 Jan 2011 - 2:51 am | हुप्प्या

जर गीता आहे तर कृष्ण असलाच पाहिजे? का बरे? काय गरज आहे?
कुणी प्रतिभावंत लेखक जर इतके मोठे महाकाव्य लिहू शकतो तर त्याला गीता लिहिणे अशक्य का असावे? त्याकरता कृष्णाचे असणे का जरूरी आहे बरे?

आपण जी पत्रे आणि विशिष्ट लिपीतली पत्रे म्हणत आहात ती कुठे सापडली आहेत? जरा जास्त माहिती द्या की राव.

मलाही महाभारत हा इतिहासच आहे असे शाबित झाले तर आवडेल. पण आंधळ्या भक्तीपोटी नाही तर खणखणीत पुरावे मिळूनच. आणि तसे जोवर होत नाही तोवर ते माझ्या मते काल्पनिक महाकाव्यच रहाणार.

इथे त्या काव्याचे मोठेपण आणि त्याचा भारतीय उपखंडातील संस्कृतीवर असलेला प्रचंड प्रभाव ह्याला कमी लेखण्याचा माझा उद्देश नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Jan 2011 - 9:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>> राधा ही काल्पनिक व्यक्तिरेखा आहे
मान्य.

>>>मुळात कृष्ण हीच काल्पनिक व्यक्तिरेखा आहे.
कसं काय ? काही संदर्भ ?

-दिलीप बिरुटे

विकास's picture

28 Jan 2011 - 5:33 am | विकास

मुळात कृष्ण हीच काल्पनिक व्यक्तिरेखा आहे.

असे विचारवंत म्हणतात का? ;)

बाकी, "राधा कैसे न जले?" अथवा "राधा का भी शाम हो तो..." वगैरे वरून ठरवायचे असले तर भक्त म्हणता येणार नाही. पण तसे नसले तर मी देखील अवलीयांशी सहमत आहे की राधा ही काल्पनिक व्यक्तीरेखा आहे.

८ पेक्षा कमी वय असलेला मुलगा घ्यावा व गोपी मोठ्या घ्याव्यात आणि त्यांच्यातलं प्रेम वेगळ्या प्रकारे (भक्ती युक्त) सादर करावे.

असं कसं करणार?

विशेषत: लहान मुलांना हे पटणे की आईच्या वयाच्या बायकांची हा आठ वर्षांहून लहान बालक छेड (कृष्णविषयक गाण्यांतून उचललेला शब्द) काढतो आहे आणि तरीही नाते भक्तीचे आहे..आणि भक्तीही उलट्या दिशेत, म्हणजे आईच्या वयाच्या स्त्रियांची त्या लहान मुलावर भक्ती असे आहे.

पोरं आधी काय कमी अक्कलवान असतात का? आणि त्यांना हे पटलं तर आपण (पक्षी आईबापांनी) त्यांची भक्ती करावी अशी अपेक्षा त्यांनी ठेवली नाही म्हणजे मिळवली.

रासक्रीडा म्हणजे नेमके काय? तो लहान पोराने करण्याचा प्रकार आहे का? अशा प्रश्नांची उत्तरे पोरांसमोर तयार ठेवावी लागतील.

पुन्हा

"रासक्रिडेनिमित्त लहान वयातील श्रीकृष्णाच्या सहवासात गेल्याने गोपिकांच्या मनातील विकार नाहीसे होऊन त्यांना आध्यात्मिक आनंद मिळाला"

म्हणजे काय? विकार गेले ते लहान मुलाशी रासक्रीडा करून ? का गेले विकार? कसे गेले विकार? विकार म्हणजे नक्की काय गेले? म्हणजे पुढे त्या ब्रम्हचारी झाल्या का?

गोपींना सरळसरळ प्रेमभाव उत्पन्न झालेला सर्वत्र सांगितला दाखवला जात असताना.

एक राधा एक मीरा, एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी इ इ इ

या सर्वांच्या पार्श्वभूमीवर श्रीकृष्ण आठ वर्षांहून कमी वयाचे होते म्हणणे म्हणजे गुंता कमी करण्याऐवजी वाढवणे होय..त्यापेक्षा गैरसमज तर गैरसमज..असू दे..

नन्दादीप's picture

27 Jan 2011 - 2:51 pm | नन्दादीप

>>८ पेक्षा कमी वय असलेला मुलगा घ्यावा व गोपी मोठ्या घ्याव्यात आणि त्यांच्यातलं प्रेम वेगळ्या प्रकारे (भक्ती युक्त) सादर करावे.
मला नाही वाटत ८ वर्षांचा मुलगा आंघोळीला गेलेल्या गोपींचे कपडे पळवील.

तात्पर्य : वरील प्रमाणे दिले गेलेले वयाबाबतचे दाखले चुकीचे आहेत.

वपाडाव's picture

3 Feb 2011 - 11:56 am | वपाडाव

>>मला नाही वाटत ८ वर्षांचा मुलगा आंघोळीला गेलेल्या गोपींचे कपडे पळवील..

कपडे पळवायला काही वयाची सीमा नाही...
खोड म्हणून करता येईलही...

पण झाडामागे/झाडावर लपून "ते" बघायला मात्र ८ पेक्षा जास्त वय लागेल.....
काय म्हणता ??

पण सारखा सारखा हा "८" वर्षांचा उल्लेख थोडासा विचित्र वाटतो...

विजुभाऊ's picture

28 Jan 2011 - 10:59 am | विजुभाऊ

राधा ही एक काल्पनीक व्यक्तीरेखा आहे. पण भागवतात राधेचा पती " अनय" आहे असे देखील सांगितलेले आहे.
जर भागवतानुसार गेलो तर कृष्ण आठ नऊ वर्षाचा होता तेंव्हा राधा बारा तेरा किंवा थोडी मोठी असावी.
महाभारातातकाळात ( इ स ३१०० ख्री पू. ) कृष्णाच्या ज्या व्यक्तीरेखा आहेत त्या नुसार गोकुळातील कृष्ण , मथुरेतील कृष्ण आणि द्वारकेतील कृष्ण या तीन वेगवेगळ्या व्यक्तीरेखा होतात.
राधे सोबतचा कृष्ण हा गोकुळातील कृष्ण आहे.
आजदेखील भागवत धर्मातील ( श्रीमद वल्लभाचार्य प्रणीत ) कृष्णाचे स्वरूप हे लहान मुलाचेच आहे असे मानले जाते.
गुजरातेत बर्‍याच ठीकाणी कृष्णाची पूजा तो एक छोटे बाळ आहे असे मानुनच त्याचे लाड कौतूक करावे तशी केली जाते.
लहान बाळाला आपण काय मागणार? बाळाला खेळवायचे हीच भक्ती.
खरे तर निष्काम भक्तीचा हा कळस ठरावा. पण तेथेही कर्मकान्ड सुरू झाले. ओरीसातील वैष्णव धर्म हा तर मानतो की कृष्ण हा पूर्नपुरुषोत्तम आहे आणि इतर सर्व गोपी आहेत.
( हा धर्म पाळणारे पुरुष तेथे साड्या नेसतात ,महिन्याचे चार दिवस बाहेर बसतात. कर्मकान्डाचे हे दुसरे बीभत्स टोक )
राधा कृष्ण भाव हा नहान मुलांच्या मनात असलेला प्रीती भाव आहे. क्षणभर मानूया की राधा ही एक मोठी स्त्री आहे.
त्या स्त्रीला एखाद्या लहान मुलाबद्दल अतीव माया ममता असेल तर ती स्त्री त्यामुलाबद्दल वेडी होईल. पण ते प्रेम शारीरीक किंवा आपण म्हणतो त्याप्रमाणे गर्ल फ्रेन्ड बॉय फ्रेन्ड सारखे नसावे.
एखाद्या लहान मुलाचा लळा लागणे या भावनेचा पुढच्या काळात विपर्यास केला गेला.
राधा का भी शाम होतो मीरा का भी शाम्...असे म्हणण्यात काही चूक नाही.
आपण लहान बाळाला विचारतोच ना की तू आईचा की मावशीचा म्हणून.
मीरा आणि राधा यांच्यात कित्येक शतकांचे कालान्तर आहे.
लहान मुलाने खोडीलपणे कोणाचे माठ फोडणे किंवा अंघोळीला गेलेल्या गवळणींचे कपडे पळवणे यात वयाचा काय संबन्ध येतो?
रास क्रीडा हा एक खेळ आहे. आजदेखील स्त्री पुरुष एकत्र येवून काही सामुदायीक अ‍ॅक्टीव्हीटी किंवा गमतीचे खेळ खेळतात हे फक्त महाराष्ट्रातच दिसत नाही . उत्तरभारतात हे सर्वत्र आढळुन येते. गरबा , बैसाखी , होली , लोढी वगैरे प्रसंगी स्त्रीपुरुष एकत्र येवून नाचतात. गाणी म्हणतात.
रास हा खेळ आहे त्यात अश्लील काहीच नाही. तो आजही समाजमान्य आहे. गुजरात मधे खेळला जातो.
राधा कृष्ण हे प्रेमाचे प्रतीक आहेत ही कवीकल्पना. प्रत्यक्ष प्रेम प्रदर्षीत करण्या ऐवजी कित्येक कविनी राधा कृष्णावर गीते लिहिली

शिल्पा ब's picture

28 Jan 2011 - 11:13 am | शिल्पा ब

उत्तर आवडले.

गणपा's picture

28 Jan 2011 - 1:00 pm | गणपा

विजुभौंचा प्रतिसाद आवडला.

प्रचेतस's picture

27 Jan 2011 - 2:35 pm | प्रचेतस

मुळात महाभारतात आणि हरिवंशात राधेचा उल्लेखच नाही तेव्हा राधा ही काल्पनिक हरदासी पात्र.

गणपा's picture

27 Jan 2011 - 2:42 pm | गणपा

वल्लींशी सहमत.
ह्या सगळ्या कवी कल्पनांना चित्रपट निर्मात्यांनी फुकाची हवा दिली आहे असे वाटते.

चित्रपट निर्मात्यांनी की मध्ययुगात रागदारी, शास्त्रीय संगीत रचणार्‍यांनी अशा कल्पना करुन त्याभोवती रागदारी रचली? कृष्ण वजा करा, भारतीय संगीतात भले मोठे शून्य राहील.

रमताराम's picture

27 Jan 2011 - 11:33 pm | रमताराम

अवलियांशी सहमत. रागसंगीतातील बहुसंख्य बंदिशी या राधा-कृष्णाच्या वा त्यांच्या संदर्भातच प्रथम रुजलेल्या मधुराभक्तीच्या कहाण्या सांगतात. महाभारतात नसलेले राधेचे पात्र हे भागवतकारांची निर्मिती आहे असे म्हणतात.

अवांतरः राधेबद्दल म्हणतात हे ठीक आहे पण श्रीकृष्ण हीसुद्धा काल्पनिक व्यक्तिरेखा आहे असे नाना म्हणतायत हे पाहून नानांचाही विचारवंत होऊ घातलाय की काय या विचाराने जीव घाबरा झालाय.

llपुण्याचे पेशवेll's picture

28 Jan 2011 - 8:10 am | llपुण्याचे पेशवेll

-१
आपण भागवत वाचले आहे का?
भागवत वाचलंत तर त्यात राधा या पात्राचा उल्लेख नाही स्पष्ट दिसून येते.

रमताराम's picture

28 Jan 2011 - 12:18 pm | रमताराम

अहो म्हणून तर 'म्हणतात' असे लिहिले कारण ही माहिती 'सेकंड सोर्स' मधून आली होती. (पक्की माहिती असती तर 'आहे' असे म्हटले असते.) की भागवत या ऐवजी भागवतधर्म म्हणायला हवे होते? जरा गोंधळ आहे माझा. आता विषय निघालाच आहे तर थोडा अधिक प्रकाश टाकावा ही विनंती. मधुराभक्तीचा संप्रदाय कोठून निर्माण झाला नि त्यात राधा-कृष्णाची प्रियकर-प्रेयसी अशी जोडी प्रथम कोणत्या काळात दिसू लागली हे जरा बयाजवार सांगाल तर चांगले काम होईल.

नितिन थत्ते's picture

27 Jan 2011 - 2:58 pm | नितिन थत्ते

गैरसमज पसरले आहेत की राधा कृष्णावर लेखन करणार्‍यांनीच तशा प्रकारचे लेखन केले आहे?

-सुटली वेणी केस मोकळे...... या सार्‍याचा उद्या गोकुळी होईल अर्थ निराळा
-आज पहाटे श्रीरंगाने मजला पुरते लुटले गं
-त्या तिथे अनंगरंग रास रंगला, गोपगोपिकांसवे मुकुंद दंगला

मागे इथेच एकागौळणीवर चर्चा घडली होती त्यातही गोपी आणि कृष्णाच्या संबंधावर प्रकाश पडला होता.

ही अजून एक.

टारझन's picture

27 Jan 2011 - 3:05 pm | टारझन

अवघडलो :) चर्चा वाचण्यास मात्र उत्सुक :)

नितिन थत्ते's picture

27 Jan 2011 - 3:08 pm | नितिन थत्ते

तुम्हाला अवघडन्यासारखं काय आहे? तुम्ही तर ८ पेक्षा मोठे आहात ना?

लहान असाल तर असल्या चर्चा वाचू नका. :)

तुम्हाला अवघडन्यासारखं काय आहे?

आता ८ पेक्षा छोटा असतो तर अवघडलो नसतो , हे तुम्हाला कळायला हवं होतं राव .. काय राव तुमी बी :)

तुम्ही तर ८ पेक्षा मोठे आहात ना?

बराच :)

- ( रासक्रिडापटु) टारझन

( ८ पेक्षा म्हणजे ८ वर्षांपेक्षा , आम्ही कोणत्याही कँसर वर जनजागृती करत नाही )

llपुण्याचे पेशवेll's picture

27 Jan 2011 - 9:08 pm | llपुण्याचे पेशवेll

वय होय , मला वाटलं इंचातला हिशोब चालला आहे.

इंचा-इंचाने माघार घेणे वगैरे आठवून डोळे पाणावले.

कुठ्लाश्या मराठी पिक्चर मध्ये अशोक सराफ ला श्रीकृष्ण म्हणून दाखवण्यात आलेले होते,
ते रूप बघून, माझ्या बालमनावर विपरीत परिणाम झाला..
आणि कृष्णावरून विश्वास उडायची वेळ आली होती

३ इडियट मधे जेंव्हा तिथे शर्मन जोषीच्या घरी जेवायला बसतात ,तेंव्हा शर्मनची दुष्काळी आई त्या लाटण्याने जेंव्हा त्याच्या बाबांची छाती खाजवुन देते , तेंव्हा मला अशोक सराफची आठवण होते ..

गणपा's picture

27 Jan 2011 - 3:27 pm | गणपा

अग नाच नाच राधे उडवुया रंग...
आसाच विश्वास माझा राधेवरुन उठला होता हे गाण पाहुन.

गाण चांगल आहे. काळेआज्जी दिसल्याही सुंदर आहेत.. पण त्यांना नाचताना पहावत नव्हत.

हा गणपा तेच गाणं....
गाणं छान आहे पण.......

असो ;)

स्पा,

अता तुझ बाल मन ठिक आहे का रे....... ???

माफ करा, मी सायलींचा धागा ह्याक तर नाही ना केला??

संपादक मंडळ मला ओरडणार तर नाही ना????

नरेशकुमार's picture

27 Jan 2011 - 3:46 pm | नरेशकुमार

आपल्याला राधा म्हणले कि हेच आठवते.
http://www.youtube.com/watch?v=XCiiCapMBrg

गणेशा's picture

27 Jan 2011 - 5:04 pm | गणेशा

वास्तव आणि इतिहासात लिहिलेल्या गोष्टी यांचा ताळमेळ लागणे बर्‍याचदा अवघड होते. म्हणुन आताची ५ वर्षाची मुले पुढे जावुन १५-२० वयाची होतात तेंव्हा त्यांना समर्पक ठोस उत्तर तेंव्हा न मिळाल्याने त्यांचा इतिहासात लिहिलेल्या बर्‍याच गोष्टींवर विश्वास उरत नाही असे वाटते.

अवांतर : मला वाटते इतिहासाचे संशोधन होण्यापेक्षा भविष्याचे संशोधन व्हावे. इतिहासात केंव्हा काय झाले यापेक्षा त्यातुन चांगले काय ते घेवुन आपल्या मुलांच्या मनावर ते चांगले कसे बिंबवावे हे पाहिले पाहिजे.
इतिहास संशोधना ला ना नाहि पण त्यातुन ठोस .. समर्पक .. चांगले काही तरी नक्कीच निघाले पाहिजे असे मनापासुन वाटते.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

27 Jan 2011 - 5:13 pm | निनाद मुक्काम प...

माझ्या मते रंजना जेव्हा उच्च पदावर होती .सराफ साहेब स्ट्रगलर होते .बहुतांशी सिनेमात ते दुय्यम नायकांच्या भूमिका करत नि ह्या बाईसाहेब लीड रोल मध्ये असायच्या .नंतर ते दोघाही नायक नायकीण म्हणून पडद्यावर आले .तिच्या अपघाता नंतर सराफ साहेबांनी जोशी बाईंशी लगीन लावले .त्यावेळी महागुरू जातीने उपस्थित होते असे वाचले आहे .
ह्यांची मैत्री जगप्रसिध्ध आहे .
दुर्दैवाने ह्यांच्या प्रभावाने म्हणा किंवा अजून कशाच्या ह्या चतुरस्त्र लेडी अमिताभ ची आजकालची प्रसारमाध्यमे दखल घेत नाही .
सारे गामा च्या एवढ्या पर्वत ह्या अभिनेत्रीची गाणी किंवा तिच्यासाठी एखादा भाग असू नये हि शरमेची गोष्ट आहे .
कोण होता स तू काय झालास तू हे दंद्वागीत माझ्या मते मराठीतील नंबर १ आहे .त्यातील सवाल जवाब निव्वळ अप्रतिम .
हा सागरी किनारा गाणे असो किंवा
फिटे अंधाराचे जाळे ह्यात तिचा वावर गाण्याला एक उंची देतो .त्याच सिनेमात तिचा तोंडात काही तरी चघळत बेरक्या नजरेने श्रीमंत गर्विष्ठ सुनबाई तोर्यात उभी राहिली आहे .
तिचे नायक महाजनी अनू कुलदीप पवार हे अगदी साजेसे होते .
शहरी व ग्रामीण भागात मराठी सिनेमा विभागल्या गेल्यावर त्यांचा सेतू जोडणारी नायिका कुठे अनू अप्सरा पर्वातील डेली सोपच्या गिरण कामगार ह्यांची तुलना होऊ शकत नाही .
अभिनेत्रीला नृत्य पेक्षा अभिनय व त्याहून महत्वाचे एक अदा असली पाहिजे .रसिकांच्या कलिजा खलास करणारी .
सध्या सराफ मामा आपल्या गत कर्तुत्वाला काळिमा फासणाऱ्या ज्या भूमिका करतो .त्या ह्या नटीने नक्कीच केला नसत्या .
तिचा चानी अजून आठवतो .

छान लिहिले आहे,
पण जरा मुळ विषय जो आहे त्यावर पण २ ओळी तर लिहा राव ..

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

27 Jan 2011 - 11:30 pm | निनाद मुक्काम प...

फार पूर्वी कृष्ण महात्म्य वाचले होते . त्यात असे म्हटले आहे कि कितीतरी ऋषी मुनींनी अनेक वर्ष तप केले तेव्हा कुठे कृष्ण अवतारात त्यांना परत मनुष्य देह प्राप्त होऊन गोप गोपिका होऊन देवाच्या बाललीला ते पौगुदावस्थेत अश्या प्रवासाचे साक्षीदार व भागीदार बनता आले .त्यात असे म्हटले आहे .इंद्राणीला एकदा विष्णू च्या रूपाचा व कर्तुत्वाचा मोह पडून रत होण्याची इच्छा झाली ती ह्या पदावर असतांना कशी पूर्ण करायची
ह्या विवंचनेत असताना तिला कुणीतरी (बहुदा बृहस्पती ) ह्यांनी कृष्ण अवतारात राधा बनून भू लोकी अवतरण्याचे सांगितले .व तिची इच्छा पूर्ण झाली .
अशीच गोष्ट चंद्र व बहुदा देवांचे गुरु बृहस्पती ह्यांची बायको ह्या बाबत वाचली होती .
तेव्हा चंद्राला शाप मिळाला होता कि तुझा शय होईल व तेज( रूप ) लयाला जाईन. व त्यासाठी उशाप बहुदा गणपतीने त्याला दिला त्यामुळे आपल्या कडे वर्षातून एकदा चंद्र दर्शन टाळायचे असते .
फार पूर्वी वाचलेल्या पुरण कथा .
बाकी मंथरेला पुढच्या जन्मात तिच्या पापाचे फळ म्हणून कुब्जा दासीच्या रुपात जन्म झाला व हे नाव तिला जन्मजात कुबड असल्याने मिळाले .व कृष्ण स्पर्शाने ते नाहीसे झाले .अशी एक सुध्धा कथा आहे .

पिवळा डांबिस's picture

28 Jan 2011 - 1:41 am | पिवळा डांबिस

बाकी मंथरेला पुढच्या जन्मात तिच्या पापाचे फळ म्हणून कुब्जा दासीच्या रुपात जन्म झाला व हे नाव तिला जन्मजात कुबड असल्याने मिळाले .व कृष्ण स्पर्शाने ते नाहीसे झाले .अशी एक सुध्धा कथा आहे .
ओ शेठ! मंथरा रामाच्या काळात होती ना? मग तिला कॄष्णस्पर्श कधी झाला? :)
का ती पण चिरंजीव आहे?
(तुम्ही कैकयीची दासी मंथरा हिच्याबद्दल बोलत आहांत हे अ‍ॅझ्मशन केले आहे!!)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

28 Jan 2011 - 3:16 am | निनाद मुक्काम प...

हो तिच ति
आग लावि (ललिता पवार ह्यांनी काय काम केले होते कुब्जेचे )
अरे बाबा तू पुराणकथा सोड .पण बी आर चोप्राचे महाभारत नाही का पहिले ?
मी लिहिल्या प्रमाणे तिला परत पुनर्जन्म हा कुबडीचा मिळाला ती कंसाकडे दासी होती .कंस वध होण्याआधी कृष्ण व बलराम ह्यांची तिची भेट मथुरेच्या रस्त्यात झाली .
महाभारताच्या ह्या भागामध्ये राधा आणि कृष्णाचा शेवटच्या भेटीचा करुणामय प्रसंग व नि पिवळ्या चे कुबजा प्रकरणी शंका समाधान http://www.youtube.com/watch?v=8Un7wKoA5iA&feature=channel

शेखर काळे's picture

28 Jan 2011 - 5:41 am | शेखर काळे

मंथरा .. किंवा कुब्जा .. तिला इतके वर्ष का वाट पहायला लागली जन्मासाठी ?
रामाच्या नंतर किंवा त्यावेळेला परशुराम वगैरे होते की.

अशीच गोष्ट चंद्र व बहुदा देवांचे गुरु बृहस्पती ह्यांची बायको ह्या बाबत वाचली होती .
म्हणजे सगळ्या देवांच्या बायकांना खेळण्यासाठी कृष्णाचा जन्म झाला म्हणा की ..

बरं .. देवांना खेळायची इच्छा झाल्यावर कोणाचा जन्म झाला म्हणायचा ?

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

28 Jan 2011 - 12:50 pm | निनाद मुक्काम प...

अहो काळे साहेब
चंद्राची गोष्ट वेगळी आहे .
त्याच्यावर देवांचे गुरु बृहस्पती ह्यांची पत्नी तारा भाळली त्याने प्रथम अधे वेढे घेतले .पण तिच्या पुढे काही त्याचे चालले नाही .पुढे बिंग फुटल्यावर त्याला शाप मिळाला .कि तुझे तारुण्य (तेज लयाला जाईन).
गणपतीने त्याला उशाप दिला वर्षातून एकदा फक्त त्याचे दर्शन टाळावे
जो पाहीन त्यावर आपटी येईल .
हो गोष्ट आठवण्याचे कारण म्हंजे कृष्णावर त्याची दुसरी पत्नी सत्यभामा हिचा भावाचा एक दिव्य मणी चोरल्याचा आरोप आला .तेव्हा तो मणी शोधून आणून स्वताचे निर्दोष पणा त्याला सिद्ध करावा लागला .
ह्याचे कारण म्हणजे कृष्णाने त्या दिवशी गोकुळात पाण्यात चंद्राचे प्रतिबिंब पहिले होते .
जसे आठवले तसे लिहिले .बाकी राम अवतारानंतर कृष्ण अवतार येतो . परशुराम हा रामाच्या पहिला अवतार
बाकी परशु धारण करतो म्हणून परशुराम नाव पडले .
खुद्द इंद्र व अहिल्येची कथा आपल्याला ठावूक असेलच
तिची शापाने शिळा झाली होतो .राम अवतारात तिची मुक्ती रामाच्या स्पर्शाने झाली .

गोष्ट आठवण्याचे कारण म्हंजे कृष्णावर त्याची दुसरी पत्नी सत्यभामा हिचा भावाचा एक दिव्य मणी चोरल्याचा आरोप आला .तेव्हा तो मणी शोधून आणून स्वताचे निर्दोष पणा त्याला सिद्ध करावा लागला .

तो स्यमन्तक मणी . ह आगोदर सत्रजीताकडे होता . कृष्णाने त्यासाठी जांबुवन्ताशी लढाई केला. आणि नन्तर जांबुवन्ताने त्याची कन्या जांबुवन्तीशी कृष्णाचे लग्न लावून दिले. लग्नात आहेर म्हणून स्यमन्तक मणी कृष्णाला दिला .
सध्या आस्तित्वात असलेला "कोहीनुर" हीरा हाच " स्यमन्तक" मणी असल्याचे काहीजण सांगतात

नरेशकुमार's picture

29 Jan 2011 - 12:59 pm | नरेशकुमार

सध्या आस्तित्वात असलेला "कोहीनुर" हीरा हाच " स्यमन्तक" मणी असल्याचे काहीजण सांगतात

मग आपन ब्रिटीशांकडुन परत मागुन का घेत नाही

विश्वनाथ मेहेंदळे's picture

28 Jan 2011 - 6:07 pm | विश्वनाथ मेहेंदळे

>>देवांना खेळायची इच्छा झाल्यावर कोणाचा जन्म झाला म्हणायचा ?
अप्सरांचा !!!! त्यांना विसरलात काय ??

आवशीचो घोव्'s picture

27 Jan 2011 - 6:17 pm | आवशीचो घोव्

...नंतर ते दोघाही नायक नायकीण म्हणून पडद्यावर आले...

तुम्हाला "नायक नायिका" असे म्हणायचे आहे, नायकीण या शब्दाचा अर्थ वेगळा होतो.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

28 Jan 2011 - 2:56 am | निनाद मुक्काम प...

नायकीण म्हणजे काय रे भाऊ
तुला रे कसे बरे ठाऊक ?

योगी९००'s picture

27 Jan 2011 - 7:02 pm | योगी९००

फिटे अंधाराचे जाळे ह्यात तिचा वावर गाण्याला एक उंची देतो .त्याच सिनेमात तिचा तोंडात काही तरी चघळत बेरक्या नजरेने श्रीमंत गर्विष्ठ सुनबाई तोर्यात उभी राहिली आहे .
असाच रोल रंजनाने हीच खरी दौलत मध्ये केला होता... त्यातही ती एका श्रीमंत गर्विष्ठ सुनबाई च्या रोल मध्ये होती.. त्यातले तिचे आणि रवीन्द्र महाजनीचे "लाखामधली नवतरूणी तू देखणी" हे गाणे छान होते..कोणाकडे आहे का ते गाणे..?

मूकवाचक's picture

27 Jan 2011 - 5:19 pm | मूकवाचक

१. नवविधा भक्ती (श्री सन्त बाबा महाराज आर्वीकर लिखीत) हे पुस्तक मिळाल्यास अवश्य वाचा.
२. सन्त गुलाबराव महाराज ज्ञानेशकन्या या भावाने कशी भक्ती करत असत याविषयी माहिती मिळवा. (कदाचित उपयुक्त ठरेल.)

च्यामारी पार अवांतराने खरडफळा केला राव धाग्याचा...

राधा - भक्त का प्रेयसी ते ठरो न ठरो................अशोक सराफ आणि रंजना यांच्या प्रेमात पडुन त्यांची भक्ति नक्किच सुरु झाली आहे..........

छोटा डॉन's picture

27 Jan 2011 - 5:54 pm | छोटा डॉन

कुणालाच काही बोलण्याची सोय राहिली नाही.

गप्पा आणि माफक थट्टामस्करी वगैरे जरी काही प्रमाणात चालत असले तरी कुठे, केव्हा आणि किती वेळा अवांतर आणि मुद्दा सोडुन इतर गप्पा माराव्यात, वाद घालावे किंवा विषय तिसरीकडेच वळवावा ह्याला आता काही लिमिट्स राहिली नाहीत.
वारंवार सांगुन, समजावुनही अजिबात उपयोग होतो आहे असे वाटत नाही.

जरा आवरा असे सांगतो.
कुठलीही गोष्ट अति होऊ नये, काही ठिकाणी जाणिवपुर्वक केले जाणारे दुर्लक्ष ( धाग्याचा विषय, हेतु आणि इतर पैलु पाहुन ) हे सर्वच ठिकाणी गोंधळ घालण्यासाठी दिलेला परवाना असु शकत नाही ह्याची नों घ्यावी.

बाकी इथले अनावश्यक प्रतिसाद उडवणेही शक्य होते, पण उगाच ह्या निमित्ताने वारंवार अशा वागण्याचा होणारा त्रास तुमच्याबरोबर शेअर करु वाटला म्हणुन हे अवांतर ४ शब्द.
ह्या प्रकाराला कंटाळुन इथे नवे लिखाण करायला भिती वाटेल अशी परिस्थीती निर्माण होणार नाही ह्याची सर्वांनी काळजी घ्यावी ही विनंती, असे काही प्रतिसाद आम्हाला आले आहेत, असो.
बाकी आम्ही सतर्क आहोतच :)

- ( वैतागलेला ) छोटा डॉन

सुहास..'s picture

27 Jan 2011 - 9:22 pm | सुहास..

एस्क्युज मीSSSSSSSSSSSSSS !!!!!!!

कणेकरी थाटातल भाषण बंद करा मालक !!

किती ठिकाणी अवांतर दाखवु आपल स्वताच ? चॅलेंज घेता का ? किती ठिकाणी आपण स्वता अवांतराला आमंत्रण दिले आहे ?

हे फक्त पहिले !!

चालेल ...
प्रेषक छोटा डॉन दि. मंगळ, 21/12/2010 - 14:51.
>>तिथे आमचा एक छोटासा बंगला आहे. ( ही आमची झैरात ) टेरेस वर जागा देवू. मटीरीयल ,स्टॉक वगैरे उत्तम दर्जाचा असेल तर फीमध्ये सवलत देण्याचा विचार करू.

बेश्ट, चालेल, अगदी १००% ओके.
बाकी फी मध्ये सवलत वगैरे नको, फक्त एकच करा, आम्ही तिथे असोस्तोवर तुम्ही तेवढे आमच्या पुण्यातल्या ३ बीएचके फ्लॅटमध्ये रहायला जा, अगदी फुक्कट बरं का

म्हणजे ' हम करे सो कायदा '

असो ..बोलुनच काय पण दाखवुन ही फायदा नाही. आपण केलीत तर ती गम्मत जम्मत आणि इतरांनी केली ती .

आणि हे 'अवांतर' आपण आपली 'संपादकीय शायनिंग' मारायला इथे लाबंलचक अवांतर घेवुन आलात ना त्या करिता

सहमत आहे .
आम्हाला अषोक सराफ मधे श्रिकृष्ण आणि रंजना मधे राधा दिसते . त्याच अनुशंगाणे आम्ही चर्चा केली होती. हटकुन किंवा टार्गेट करुन धागा खरडफळा केला असतात तर संपादक श्री डॉण यांचे आरोप मान्य होते.

बोला , प्रेमासाठी झुकले खाली धरती वर आकाश ...
प्रेमासाठी झुकले खाली धरतीवर आकाश .. तुका म्हणे

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

27 Jan 2011 - 5:45 pm | निनाद मुक्काम प...

http://www.youtube.com/watch?v=nkwoJHcvNos
झुंज सिनेमातील हेच ते प्रसिध्द दंद्वागीत
तिचा संवाद अथवा गाण्याचे बोल नसले तरी नुसत्या देहबोलीतून तिचा आत्मविश्वास झळकतो .

विश्वनाथ मेहेंदळे's picture

27 Jan 2011 - 7:46 pm | विश्वनाथ मेहेंदळे

कृष्णाचा उल्लेख प्रथम महाभारतात झाला परंतु महाभारतात राधेचा उल्लेख नाही (वल्लींनी वर हे म्हटलेच आहे). महाभारत हे काव्य आहे की इतिहास यावर संशोधकांत मतभेद आहेत. पण काहीही असले तरीही राधा हे पात्र त्यात नाही आणि कृष्णाचे म्हणून जे प्रसिद्ध किस्से आहेत, त्यातील बरेचसे किस्सेही त्यात नाहीत असे ऐकून आहे.

यानंतर भागवतात श्रीकृष्णावर बरेच लिहिले गेले, पण त्यातही राधेचा उल्लेख नाही. राधेचा उल्लेख प्रथम आढळतो तो पद्मपुराणात आणि तिला प्रसिद्ध केले ते जयदेवाच्या गीतगोविंद ने. नंतर अनेक पुराणिक आणि प्रवचनकारांनी आपापल्या परीने कथा रचल्या. आता गोंधळ इतका वाढला आहे की बरेचदा आपल्याला मूळ महाभारतात अमुक एक गोष्ट नाही हे माहीतच नसते. (ह्यातील संदर्भ नक्की कुठे वाचले ते लक्षात नाहीत :-( )

आणि महाभारताखेरीज बोलायचे झाले तर मग पात्र आणि प्रसंग रचना ही त्या त्या लेखक / कवीच्या मनावर असते. मग कृष्णाची राधा कोण होती, त्यांची वये किती होती, राधा किती होत्या या प्रश्नांना काय उत्तरे देणार?

प्रचेतस's picture

28 Jan 2011 - 8:55 am | प्रचेतस

मूळ महाभारत म्हणजे हा 'जय' नामक इतिहास आहे असे स्वतः व्यासांनीच लिहून ठेवले आहे. नंतर वैशंपायनांनी त्यात भर घालून त्याचे 'भारत' ग्रंथात रूपांतर केले व त्याहीनंतर सौती व इतर अर्वाचीन कथाकारांनी त्याचे 'महाभारत' केले.
या सगळ्या रूपांतरात राधेचा कुठेही उल्लेख नाही.

राधा नव्हती तर हे कुणी म्हटलंय मग ? ;-)
कृष्ण चालले वैकुंठाला
राधा बोले पकडून बाही
इथे माईल्ड मारून घे रे
तिथे कन्हैया माईल्ड नाही...

रमताराम's picture

27 Jan 2011 - 11:48 pm | रमताराम

तुमच्या 'पानवाल्या'कडे ( ;) ) १२०-३०० नाही का, नाही माईल्ड कशाला हवी नाहीतर?

यकु's picture

28 Jan 2011 - 12:28 am | यकु

पण आम्ही १२०-३०० खात नाही.
म्हणून तमाखू सुरळी करून तिची शिग्रेट केली ;-)

तिमा's picture

27 Jan 2011 - 9:22 pm | तिमा

राधा खरी होती की खोटी हा विषय वेगळा आहेच. पण जे काही वर्णनात वाचले आहे त्यानुसार राधा ही कृष्णाची प्रेयसी होती असे म्हटले तर दचकायला काय झाले ? पौगंडावस्थेत कुणाबद्दलही आकर्षण वाटू शकते. काहींच्या कामभावना या लवकर जागृत होतात.त्यांत कृष्ण हा असामान्य होता. तेंव्हा जे वर्णन केले गेले आहे ते तसेच्या तसे स्वीकारण्यात काय हरकत आहे ?

भडकमकर मास्तर's picture

28 Jan 2011 - 1:57 am | भडकमकर मास्तर

राधा कलियुगातल्या एखाद्या पोलीस ऑफिसराच्या अंगात येऊ शकते म्हणजे ती नक्कीच अस्तित्त्वात असणार कधीतरी...
राधेविषयीचे माझे ज्ञान संपले....

सेरेपी's picture

28 Jan 2011 - 2:19 am | सेरेपी

हाहाहा
हा सर्वांत भारी प्रतिसाद =)

गणपा's picture

28 Jan 2011 - 2:46 am | गणपा

हा हा हा
मास्तर आमची ट्युब जरा उशीराच पेटली बॉ. =))

शिल्पा ब's picture

28 Jan 2011 - 9:59 am | शिल्पा ब

आरं तिच्यायला!!! हि काय नविन भानगड? लिंका द्या की..

अहो शिल्पाताई, मधे बरंच गाजलेलं प्रकरण आहे हे... जुनं आहे बर्‍यापैकी..

मानसिक संतुलन बिघडले आहे म्हणून या पोलीस अधिकार्‍याला सस्पेंड केलं होतं.

टी.व्ही.वर खूपदा राधा बनून नाचून बिचून दाखवलेलन..

शिल्पा ब's picture

28 Jan 2011 - 11:44 pm | शिल्पा ब

http://www.youtube.com/watch?v=Io1x-utf6A8&feature=related

खुप शोधुन शोधुन हे सापडलं =))

llपुण्याचे पेशवेll's picture

28 Jan 2011 - 8:14 am | llपुण्याचे पेशवेll

मास्तर या विकेन्डला या प्रकाराने करून बघेन हा पदार्थ.

सायली थत्ते's picture

28 Jan 2011 - 10:07 am | सायली थत्ते

हा लेख मीच काल टाकला होता या साईट वर . जे काही रिप्लाय आलेले आहे ते वाचून मी थक्क झाले. आपल्या लोकांमध्ये उदासीनता आहे की विचार करण्याची शक्ती संपली आहे हे कळत नाही. ज्या लोकांच अस म्हणण आहे की जर गाण्यांमधून जे दाखवतात किंवा जे शब्द आहेत ते ८ वर्षांचा मुलगा कसा करू शकेल त्यांनी जरा तरी विचार करावा की श्रीकृष्ण आधी झाले आणी नंतर ही गाणी. त्यामुळे गाण्यांना बेस धरून श्रीकृष्ण यांच्यावर विचार करू नका. गाणी जी दाखवतात किंवा लिहिली जातात ती अत्यंत चूक आहेत आणि हेच मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि लहान मुलगा आणि मोठी स्त्री यांच्यात भक्तीयुक्त प्रेम दाखवता येत नसेल तर निदान ते प्रेम श्रीकृष्णाच्या रासाक्रीडेवरून घेऊच नका. जर सिनेमा वाल्यांना प्रेम दाखवायचं असेल तर जरुर दाखवाव पण ते श्रीकृष्णांच्या नावावर जे खर आणि योग्य नाही ते खपवू नये. मी लेखातून हेच सांगायचा प्रयत्न केला आहे की श्रीकृष्ण यांच्या रासक्रीडेचा अर्थ लोक वेगळा घेतात. प्रेम ही खूप पवित्र आणि छान भावना आहे आणि प्रेमाला वयाची मर्यादा नसते त्यामुळे गोपी आणि श्रीकृष्ण यांच्यात प्रेम होते हे मान्य पण त्याला 'बोय-फ्रेंड, गर्ल-फ्रेंड' किंवा 'लिव इन रिलेशनशिप' हे नाव देण्यात येणार असेल तर ते नक्कीच आक्षेपार्ह आहे. माझा आक्षेप या उपमांना नसून या उपमा श्रीकृष्णांना कारण नसताना दिल्या जात आहे यावर आहे

विरोधासाठी विरोध असं करण्याचा कोणाचा उद्देश नसावा. तसं अनवधानाने झालं असेल तर क्षमस्व. पण याच क्षमेसह असं म्हणावसं वाटतं की आत्ताच्या या स्पष्टीकरणातही नेमका मुद्दा अधोरेखित होत नाहीये.

आता लक्षात आलं की "लहान मुलगा आणि मोठी स्त्री यांच्यात भक्तीयुक्त प्रेम दाखवता येत नसेल तर निदान ते प्रेम श्रीकृष्णाच्या रासक्रीडेवरून घेऊच नका"

हे ठीक..

बादवे भक्तियुक्त प्रेम ही कन्सेप्ट आणि त्याचसोबत:

प्रेम ही खूप पवित्र आणि छान भावना आहे आणि प्रेमाला वयाची मर्यादा नसते त्यामुळे गोपी आणि श्रीकृष्ण यांच्यात प्रेम होते हे मान्य पण त्याला 'बोय-फ्रेंड, गर्ल-फ्रेंड' किंवा 'लिव इन रिलेशनशिप' हे नाव देण्यात येणार असेल तर ते नक्कीच आक्षेपार्ह आहे. माझा आक्षेप या उपमांना नसून या उपमा श्रीकृष्णांना कारण नसताना दिल्या जात आहे यावर आहे

याविषयी मतांचा गलबला होऊ शकतो.. पण प्रेम या कल्पनेविषयी इथे अनेक गोंधळ झाले आहेत असं वाटतंय.

llपुण्याचे पेशवेll's picture

28 Jan 2011 - 10:33 am | llपुण्याचे पेशवेll

तुम्ही जर त्या उद्देशाने लेख लिहीला असेल तर खरेच चांगले आहे. लेख आवडला.

नितिन थत्ते's picture

28 Jan 2011 - 10:52 am | नितिन थत्ते

राधा कृष्ण यांच्यातले भक्तीस्वरूप नसलेले प्रेम हे सिनेमा वाल्यांनी निर्माण करून रंगवले आहे असे मला वाटत नाही.

मी वर दुवे दिलेल्या दिलेल्या लेखातल्या गौळणीतही अशाच अर्थाने 'प्रेम' दाखवलेले आहे आणि ते सिनेमा यायच्या काही शतके आधीचे आहे.

इनफॅक्ट राधा कृष्णाचे परमेश्वर-भक्त असे नाते दाखवणारे काही जुने (१९व्या शतकापूर्वीचे) साहित्य आहे का हे जाणून घ्यायला आवडेल.

विजुभाऊ's picture

28 Jan 2011 - 11:07 am | विजुभाऊ

Hereunder is provided a short table dates of important Mahabharat events in years. (Dates and Tithis in years in Rama Samvat assuming Shri Rama Samvat 1st January. 1 equivalent to 1st Jan 7323 B.C. Rama's birth date has been conclusively proved to be 4th Dec. 7323 B.C.( "Vastav Ramayan").

EVENT DATE

Going to forest 4th Sept. 5574 BC

Kitmeet Killed 7th Sept. 5574 BC

Going underground 19th May 5562 BC

Keechak killed 1st April 5561 BC

Anukeechak-Massacre 2nd April 5561 BC

End of secret life 9th April 5561 BC

Cows stolen 15th April 5561 BC

Arjuna exposed 16th April 5561 BC

All pandavas exposed 19th April 5561 BC

Marriage of Uttara 4th May.
& Abhimanyu.

Krishna set out for a treaty. 27th Sept.

Stay at Upaplavya 27th Sept.

Stay at Vrukshthala 28th Sept.

Dinner to Brahmins 29th Sept.

Entry into Hastinapur 30th Sept.

Krishna meets Kunti etc. 1st Oct.

Invited for meeting 2nd Oct.

First meeting 3rd Oct.

Second meeting and an attempt 4th Oct.
to arrest Krishna.

Third meeting Vishvaroopa 7th Oct.

Stay at Kunti 8th Oct.

Krishna meets Karna. War 9th Oct.
fixed.

Krishna returns 9th Oct.

Pandavas preparation 11th Oct.
Balaram's visit.

Mahabharat war started 16th Oct.

Abhimanyu killed 28th Oct. 5561 BC.

End of War 2nd November 5561 B.C.

Yudhishthira crowned 16th Nov. 5551 BC.

Bhishma expired 22nd Dec. 5561 BC

Pandava campaign 15th Jan. 5560 BC
for wealth

Parikshita born 28th Jan. 5560 BC

Pandavas return 25th Feb. 5560 BC

Ashvamedh Deeksha. 1st March 5560 BC

Return of Arjuna Horse 15th Jan. 5560 BC

Ashvamedh yajna 22nd Feb. 5559 BC

Dhrutarashtra went to forest 18th Aug. 5545 BC

Pandavas visited Kunti 18th Aug. 5543 BC
Vidura expired

Death of Kunti, Dhrutarashtra, Sept./Oct. 5541 BC
and Gandhari

Yadava Massacre 5525 B.C.

Parikshit Dead 5499 B.C.

प्यारे१'s picture

28 Jan 2011 - 11:11 am | प्यारे१

तसे आणखी बरेच आक्षेप श्रीकृष्णांवर घेतले जातात.

जर राधा, रासलीला आणि अनेक बायकांवर आक्षेप आहे तर याचा अर्थ तुम्ही भागवत, महाभारत अथवा हे सगळे मानता ना....???

मग याच भागवतात लिहिलेले श्रीकृष्णांनी बालपणात मारलेले राक्षस, करंगळीवर उचललेला गोवर्धन, मुखातून आईला विश्वदर्शन, अर्जुनाला दाखवलेले विश्वरुप, इ.इ. सगळे मान्य का नाही करत? होती त्याची क्षमता १६१०८ बायका करायची आणि त्यांना 'सांभाळायची' पण.आहे कोणाला ऑब्जेक्शन....??? स्वतःची एक सांभाळताना ****. कशाला गप्पा मारायच्या राव?

इथे आम्ही विचारजंत,' नाही पण मला असे वाटते की', 'असे नसेल हो', 'हे कसे शक्य आहे' असे म्हणणार. उगाच विंडो शॉपिंग सारखे.... अथवा उगाच आज काही उद्योग नाहीय तर चला थोडी 'मज्जा' करु असे असते.....

एक तर १००% स्वीकारा नाही तर डिस्कार्ड करा.

मधेच लटकत नेहमी. सातत्याने बुद्धीभेद करणे हेच का यांचे काम?

सामान्य श्रद्धा अथवा रुढी या पायात नी पंखात बळ आलेल्या नसतात ( जस्ट घरात पूर्वीपासून आहे म्हणून करतोय स्वरुपाच्या) त्यामुळे असे आक्षेप हे त्यांना मुळातून हादरवतात. श्रद्धांना नुसते पांगळे, लुळे करण्याचे काम करत नाहीत तर त्यांचा प्रचंड वैचारिक गोंधळ उडवतात. मानसिक ताकद नसते देव बिव झुगारण्याची आणि स्विकारावं तर कस स्विकारावं हे कळत नाही. असले व्यभिचारी देव??? उत्तरं नसतात.

जंतांची वळवळ सुरुच राहतेआणि मजा ही.....

शिल्पा ब's picture

28 Jan 2011 - 11:15 am | शिल्पा ब

लै भारी फटका..

सायली थत्ते's picture

28 Jan 2011 - 11:49 am | सायली थत्ते

"जर राधा, रासलीला आणि अनेक बायकांवर आक्षेप आहे तर याचा अर्थ तुम्ही भागवत, महाभारत अथवा हे सगळे मानता ना....???" असे वर वाचनात आले. बहुदा मी कय लिहायचा प्रयत्न केला आहे तेच समजलेले दिसत नाही. लेख काळजीपुर्वक वाचल असेल तर लक्षात येइल की मी 'भागवत' ग्रन्थचाच अधार घेउन तो लिहिला आहे. तुम्ही स्वत:हा भागवत ग्रन्थ वाचावा म्हणजे तुम्हाला समजेल की श्रीक्रुष्ण यान्च नात इतर गोपीन्बरोबर जे आज्काल्चे लोक समजतात ते किती अयोग्य आहे. पूर्वी शिल्पान्मधून किन्वा गण्यान्मधून जे दाखवल अहे तेच खर अस क्रुपया मनू नका. पूर्वीच्या लोकन्नी चूक केलि म्हणून आपण केली तरी हरकत नही असा द्रुस्टीकोन ठेऊ नका.

म्हणजे फक्त भागवतात लिहिलेलं ते योग्य किंवा खरं अन बाकी सब झुट असं का?

प्यारे१'s picture

28 Jan 2011 - 12:05 pm | प्यारे१

मॅडम,

तुम्ही विचार' वं/जं' त आहात का...???

लेखावरुन वाटले नाही.

'त्ये तुमच्या साटी ल्हिवल्यालं न्हाय वो ताय!

द्येव, धरम आसलं काय दिसलं की गिदाडावानी तुटून पड्त्यात तेंच्यासाटी ल्हिव्लंय.

म्या थोडा येगळ्या पद्दतीनं इचार मांडला येवडंच.

तुमी म्हंता तसं मुळात तेंचं 'तसं काय' नव्हतं. म्या म्हंतो आगदी समजा 'तसंच व्हतं'.
आवो,पाटलाची हाय हिम्मत धा लफडी कराची आनि निस्तराची पन.

हेंच्या बा चं काय जायलंय....????

प्रशु's picture

28 Jan 2011 - 12:06 pm | प्रशु

राधा ह्या शब्दाचा सुंदर अर्थ शिवाजी सावंतांच्या 'युगंधर' मधे सापडतो. राधा म्हणजे मोक्षा साठी आतुरलेला जीव म्हणजेच भक्त. आणि भक्त नसेल तर भगवंताच्या अस्तित्वाचा का अर्थ? उत्तरेत राधा श्रीकृष्णांच्या बाजुला देवळाराऊळात उभी असली तरी महाराष्ट्रात मात्र रुक्मीणीच आहे अपवाद पंढरपुरचा, तिथे तो द्वारकेचा राणा राहि (राधा) आणि रखमाबाई च्या सोबत उभा आहे.

बाकि राधेचा उल्लेख महाभारतात नाही हे सर्वमान्य आहे. परंतु श्रीकृष्णांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह पाहुन अंमळ हसु आले. हेच सगळे आक्षेप बाकी सर्वच प्रेषितांवर घेता येतील पण वळवळणारे जंत त्या बाजुला कधी जात नाहित.

नानाने पक्ष बदललेला पाहुन वाईट वाटले. आणि हुप्या नेहमी मिपा वर महाभारताचे पुरावे मागतो पण त्या आधि स्वतः गुगल का नाहि करत हे श्रीकृष्णा जाणे..

बाकि ते नेहमीचचं.

'कुणी कसे वागावे हे सांगण्याचा मला अधिकार नाहि मी फक्त एक मत नोंदवले'

सायली थत्ते's picture

28 Jan 2011 - 12:14 pm | सायली थत्ते

जर भागवत ग्रन्थ आणि इतर यान्मधे एकवाक्यता नसेल तर 'हो' भागवत ग्रन्थालाच मानावे कारण एक तर तो ग्रन्थ महर्षी व्यासांनी लिहिला आहे अणि दुसरं म्हणजे श्रीक्रुष्ण यांच अयुष्य पूर्णपणे मांडणारा तोच पहिला आणि मूळ ग्रन्थ आहे.

अमित देवधर's picture

28 Jan 2011 - 3:14 pm | अमित देवधर

नमस्कार.
राधा आणि कृष्णाबद्दल 'विजूभाऊ'नी निष्काम भक्तीचा दृष्टीकोन मांडला आहे, त्याशी सहमत आहे.

या विषयावर वर बरीच चर्चा झालेली आहे. या विषयाचा विचार करताना काही गोष्टी लक्षात घेतल्या तर योग्य उत्तर मिळायला मदत होइल असं वाटतं.
१. आपल्या प्राचीन इतिहासामध्ये काही इतिहास उपलब्ध नाहीये. काही इतिहास पुराण स्वरूपामध्ये आहे. खूप थोडा इतिहास 'इतिहास' स्वरूपात आहे; जसं की महाभारत. (जिथे व्यासांनी लिहिलं आहे की हा 'इतिहास' आहे आणि म्हणून महाभारत ती जाणीव ठेऊन लिहिलं गेलं आहे असं आपण म्हणू शकतो.) या इतिहासातसुध्दा हजारो वर्षांमध्ये अनेक पुराणिकांनी, संतानी आपल्या कल्पना त्यात घुसवल्या आहेत. (वाईट उद्देशाने नव्हे, तर हा 'इतिहास' आहे ही जाणीव नसल्याने). आणि त्या कल्पना असल्यामुळे त्यात काही अतिशयोक्ती, निरूपयोगी / नैतिकदृष्ट्या चूकीचा भाग समाविष्ट झालेला आहे. पुराणांमध्ये असा भाग बराच आहे, आणि शुध्द इतिहास कमी (सामान्यपणे).
२. दुसरी गोष्ट की, प्राचीन संस्कृती अध्यात्मावर घट्ट आधारलेली असल्यामुळे त्यावेळच्या इतिहासपुरूषांमध्ये आध्यात्मिक सामर्थ्याचा भाग आहे, त्यामुळे चमत्कारही आलेच. त्यामुळे अशा इतिहासामधला अतिशयोक्त चमत्कारी भाग या पुराणिक, भक्तगण, प्रवचनकार यांच्या 'अरे तो अमका परमेश्वराचा अंश, त्याला काय अशक्य आहे?' अशा प्रभावयुक्त भक्तीभावातून आलेला आहे.
अर्थात, त्यात चमत्कार अजिबात नाहीत असं नाही, पण आध्यात्मिक चमत्कार करण्याच्या सामर्थ्याबरोबर वागण्याच्या अनेक मर्यादाही येतात. उदा. कृष्ण गोपींबरोबर 'लिव्ह इन' रहात असता, किंवा टीकाकारांच्या म्हणण्याप्रमाणे अयोग्य चाळे करत असता, तर नंदाचा मुलगा म्हणून त्याची हाइप केली गेली असती ही गोष्ट खरी; पण त्याला इतर उत्तम पण मानवी गुणसुध्दा आचरणात आणता आले नसते, जसं की, कृष्णशिष्टाई: कृष्णाचे मूळ भाषण वाचा किंवा इतर चतुराईचे, शहाणपणाचे प्रसंग जे महाभारतात अनेक ठिकाणी दिसतात. आध्यात्मिक चमत्कार तर याच्या पुढे त्याने गरजेप्रमाणे दाखवले आहेत, उदा. कर्णवधाच्यावेळी सूर्य झाकोळून टाकणे.
३. एक भाग राजकीय आहे, पण त्याचाही इथे परिणाम होतो की; आपल्या सरकारचं धोरण आपला इतिहास 'प्रोअ‍ॅक्टिव्हली' शोधून काढण्याचं नाहीये (विशेषतः काँग्रेस.). त्यामुळे अनेक गोष्टींवर अजून योग्य ते संशोधनच झालं नाहीये; ज्यामुळे रामायण, महाभारत, पुराणं यातला इतिहास आपण प्रत्यक्ष उत्खननांमधल्या पुराव्यांबरोबर पडताळून बघू शकू. (काही महिन्यांपूर्वी टाईम्स ऑफ इंडिया च्या क्रेस्ट आवृत्तीमध्ये 'भारतातील प्राचीन अवशेषांचे उत्खनन' यावर कव्हर स्टोरी आली होती. पुरातत्व विभागाच्या लोकांना साधं लॅन्ड अक्विझिशन (जमीन अंदाजे ४-५ एकर) करता येत नाही, त्यानी जमीन विकत घ्यायची तयारी दाखवूनसुध्दा).

या गोष्टी लक्षात घेतल्या की वरच्या विषयाबाबतीत असं दिसेल की;
१. प्राचीन ग्रंथ पूर्ण खोटे नाहीत, पण त्यात काही नंतर समाविष्ट केलेला भाग आहे, जो खरा नाही (मग तो बरा असेल वा वाईट.) तो काढून टाकणं गरजेचं आहे. म्हणून ते ग्रंथ वर लिहिलेलं तारतम्य पाळून खरे मानायला हरकत नाही.
२. पुराणं, काव्यं, सिनेमे यात राधा, कृष्ण व इतर ऐतिहासिक पुरुषांबद्दल जो अर्थहीन अंदाज बांधला जातो, त्यावरून कृष्ण व तशा इतर लोकांचं चूकीचं मूल्यमापन होण्याची शक्यता जास्त आहे. पुराणांच्या बाबतीत तर्कशुद्ध विचार आणि पुराव्यांचा शोध गरजेचा आहे.
३. जरी ग्रंथ आपल्याकडे पुरावे म्हणून असले तरी आपल्या लोकांनी शक्यतो प्रत्यक्ष पुरावे मिळवून प्राचीन ते अर्वाचीन इतिहासाची तर्कशुद्ध रीतीने मांडणी / अर्थ लावणे, या गोष्टी 'प्रोअ‍ॅक्टिव्हली' करायला हव्यात. ज्यांचा विश्वास नाही त्यांच्यासाठी व आपल्या पुढच्या पिढ्यांच्या हितासाठी इतिहास 'सिध्द होणं' गरजेचं आहे.

सायली थत्ते's picture

28 Jan 2011 - 4:01 pm | सायली थत्ते

नमस्कार,

अमित देवधर यांची प्रतिक्रिया आवडली. प्रत्यक्ष पुरावे शोधण्याची कल्पना छान आहे पण त्यात वेळ खूप जाईल म्हणून जो मूळ ग्रंथ आहे ते सत्य मानायला काहिच हरकत नाही म्हणजेच या बाबतीत 'भागवत'. नंतर अनेकांनी त्यांच्या कल्पना घुसडल्या आणि म्हणूनच आज श्रीक्रुष्ण यांबद्दल्च्या कल्पना चुकीच्या झाल्या.

राधा ही व्यक्ती अस्तित्वात होती की नव्हती या वर दुमत असु शकेल ..
पण मला माहित असलेला (आणि पटलेला ) अर्थ असा आहे ..

कृष्ण - राधा ही प्रतिके आहेत. (माझ्या सारख्या सर्वसामान्य आणि बिगर अध्यात्मिक ) लोकांना अमूर्त अशा गुण , अवगुणांची चर्चा कळत नाही त्यांच्यासाठी ही मूर्त रूपे असावीत .

कृष्ण ही व्यक्तिरेखा ही दैवी गुणांनी युक्त असुनही मानवी भावभावनांना वृथा समजत नाही तर त्यांनाच जीवनाधार मानते.
उदा. गोकुळा मधील त्याच्या क्रीडा ... लोणी चोरणे, गोप गोपींना सतावणे इ. यातही गहन अर्थ आहे असे जाणकार सांगतात.. उदा. गोपीकांची वसने पळवली म्हणजे त्यांच्या आत्म्यावर जी बाह्य आवरणे होती ती लपवली आणि त्या आवरणांखेरीज ( म्हणजे सामान्य शब्दात मुखवट्यांखेरीज ) या जगात वावरणे अशक्य आहे .
पण या सर्व बाललीला करताना तोच कॄष्ण गोवर्धन पर्वत आपल्या करांगुलीवर पेलून वरूणाच्या कोपा पासून गोकुळाचे रक्षण करतो , कालियाचा वध करून यमुना नदीचे पाणी निर्विष करतो, आणि पुतना मावशीचा वध .... इ. म्हणजे थोडक्यात आदर्श आहे आणि म्हणून अनुकरणीय ..
यांत परमार्थ साधन म्हणजे स्वार्थ ( स्वहीत/ स्व जीवन इ.) त्याग नाही असाच संदेश यात असावा .

आणि राधा ही प्रेम आणि भक्ती , समर्पण यांच प्रतिक .. ती विवाहीत (संसारी ) आहे आणि तरीही कॄष्ण प्रेमाने वेडी झाली आहे . ( मीरे प्रमाणेच). आणि कॄष्ण म्हणजेच जे दैवी गुणांचे प्रतिक आहे, जीवनाने युक्त आहे आणि तरीही मानवधर्म स्विकारणारे आहे, 'अशा' कॄष्णाला राधेने दिलेली ती शरणागती आहे.
तुम्ही उल्लेख केला की तुम्हाला मिळालेल्या प्रतिमेमधे राधा कॄष्णाच्या खांद्यावर मस्तक विसावलेली आहे .. याचा अर्थ ती सर्वार्थाने त्याच्यावर ( म्हणजे आध्यात्मात सांगतात तसे परमात्म्यावर / सद् गुरूवर ) विश्वास ठेवून नि: शंक, निर्भय आहे . असा असावा. त्यात कॄष्ण राधे पेक्षा उंच कसा वगैरे चर्चा करण्यात काय अर्थ आहे?

**** आणि तुम्ही म्हणता रासक्रीडा करताना कॄष्ण लहान (८ वर्षांचा) मुलगा आहे असे दाखवावे .. मग ते पाहणार्‍या लहान मुलांवर काय संस्कार होतील ?

त्यामुळे जे ईतिहासात/ पुराणात सांगीतले आहे ते निवडून, पाखडून ( त्यातले हीण काढून ) योग्य तो अर्थ घ्यावा. आहो साध्या कानगोष्टीच्या खेळात पहिल्याने सांगितलेल्या गोष्टीचे आठव्या पर्यंत जाताना काय होते हे तुम्ही अनुभवले असेलच .. मग या तर हजारो वर्षांपासून चालत आलेल्या कथा .

अर्धवटराव's picture

3 Feb 2011 - 2:05 am | अर्धवटराव

राधा आणि कृष्ण प्रेमीच होते (आहेत). कृष्णाच्या सर्व लीला, म्हणजे रासक्रीडा, गोवर्धन पर्वत उचलणे, यशोदेला ब्रह्मांड दाखवणे वगैरे... सर्व सत्य आहेत. खरच कोणाला हे सगळं समजुन घ्यायचं असेल सरळ कृष्णाला काँटॅक्ट करावा. ज्ञानबा-तुकाराम सारख्यांकडे कृष्णाची काँटॅक्ट इन्फोर्मेशन आहे. गरज पडल्यास त्यांना साकडे घालावे. जाणुन घ्यायची खरच गरज असेल तर फार अवघड काम नाहि ते... पण खरच गरज आहे का तशी??

लुफ्त पे तुझसे मै क्या कहु हमदम, हाय कंबख्त तुने पी ही नही

(नशेमे) अर्धवटराव

पण आजच्या प्रेमकथांपेक्षा राधेचे प्रेम मनाला भुरळ घालते!

पण आजच्या प्रेमकथांपेक्षा राधेचे प्रेम मनाला भुरळ घालते!