शिळा घास होता

मयुरेश साने's picture
मयुरेश साने in जे न देखे रवी...
26 Jan 2011 - 6:29 pm

खरा कायदयाने मला फास होता
कुठे न्याय ? तो फक्त आभास होता

तराजू कधी पावला सांग त्यांना ?
उभा जन्म ज्यांचा शिळा घास होता

लुबाडून खाती सदा तूप-रोटी
गुन्हेगार तेथेच हमखास होता

अरे ! कायद्या काय देऊ पुरावे ?
दलालीत वाटा तुझा खास होता

तुझ्या चोर-वाटां मुळे न्याय मेला
फरारी च आरोपि सर्रास होता

अशा कायद्याला कुणी भीक घाला ?
स्वतः न्याय केला ! सुरा पास होता

रौद्ररसगझल

प्रतिक्रिया

नरेशकुमार's picture

26 Jan 2011 - 6:48 pm | नरेशकुमार

वॉव !
आवडेश.............

स्पा's picture

26 Jan 2011 - 6:55 pm | स्पा

अहाहा
क्या बात हे

प्राजु's picture

26 Jan 2011 - 8:03 pm | प्राजु

वाह वा! क्या बात है!

अशा कायद्याला कुणी भीक घाला ?
स्वतः न्याय केला ! सुरा पास होता

जबरदस्त!! :)

कच्ची कैरी's picture

26 Jan 2011 - 8:10 pm | कच्ची कैरी

हा जबरदस्त फंडा करलो दिमाग ठंडा !

दैत्य's picture

26 Jan 2011 - 8:58 pm | दैत्य

सुंदर कविता....! मोजक्या शब्दांत पण अतिशय प्रभावी...