आपले काय मत ?

रोमना's picture
रोमना in काथ्याकूट
14 Jan 2011 - 1:15 pm
गाभा: 

नमस्ते मिपाकरांनो,

सर्वप्रथम मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

साधारण १० ते १२ वर्षापासून काही धार्मिक साधना सुरु केली. नंतर मांसाहाराचे आकर्षण वाटेनासे झाले, पुढे कितीहि जन्म आले तरी मांस खायचे नाही हा निर्धार केला. म्हणून दिले सोडून. हे माहित असतानही कि मांसाहारातून सर्वात जास्त शक्ती, प्रथिने वगैरे मिळतात (घरचे सर्व मांसाहारी पण वार सण पाळून आहेत). परंतु आपण प्राण्याला मारुन खावे हे काही मनाला पटत नव्हते.
यानिमित्ताने काही कट्टर मासभक्षक नातेवाईकांचा मी मांसाहाराकडे पुन्हा वळावे म्हणून प्रयत्न सुरु झाला. (कदाचित त्यांच्याकडे गेल्यावर वेगळे जेवण करावे लागेल म्हणून असेल)
त्या निमित्ताने पुढील प्रश्न मला विचारले गेले व जातात . या पुढील प्रश्नांची उत्तरे त्यांना देणे काही जरुरीचे नव्हते परंतु, एक विचारचक्रचं जणु सुरु झाले असे का?

१. तु मांसाहार म्हणजे प्राण्यांना खात नाहीस, पण ज्या भाज्या खातोस त्यामध्येसुध्दा जीव असतोच कि?
२.तु मद्य पी म्हणजे तुला सर्दिवगैरेचा त्रास होणार नाही. नाहीतरी औषधे घेतोस त्यात मद्य असतेच कि? अरे तुझे शिवशंकर सुध्दा सोमसर पियत होते ?
३. सोमरस व मद्य एकच का? कारण बालाजी तांबे यांच्या कार्यक्रमात त्यांनी सांगितले होते कि, सोमरस म्हणजे दिव्य/उत्तम वनस्पतीपासून बनविलेले पेय.
४. अरे, तुमच्या देवीपुराणात सुध्दा देवीमातेनी राक्षसांचा वध करण्याआधी म्हशीचे मांस खाल्लेहोते व मद्य प्राशन केले असा उल्लेख आहे.
५. श्रीरामाने वनवास भोगात मद्यप्राशन, मांसभक्षण केले होते. तु सुध्दा सुरुकर ना पुन्हा ?
६. किमान अंडे तरी खा? व्हेज आहे???? (अ‍ॅ......) दुधात सुध्दा जिवाणू असतात मग ते नॉनव्हेज नाहि का ?
७. पुर्वी आर्य लोकं गोमास भक्षण करीत असत? परंतु गोमातेचे दिव्य गुणांमुळे त्यांनी ते खायचे सोडले. तेव्हा किमान कोंबडी किंवा बकरी तरी.
८. आपल्या देवाला कोंबडा (काहिंच्या देवाना बकरा लागतो). ( देवाला नाही, पण काही ठिकाणी देवीला व देवाच्या गणांना मांस /तसेच मद्य लागते असे ऐकिवात आहे माझ्या!) तरी प्रसाद म्हणून वर्षातुन एकदा तरी खा ना!
९. अरे शहाण्या पुर्वी अथिती घरी आले कि मधुपर्क द्यायचे (घोडा/गाय यांचे मांस मधाबरोबर शिजवुन) तेव्हा पाहुण्यांबरोबर खायला हरकत नाही.
१०. मांसाचे औषधी गुण बघावेत, मांस खायला काय हरकत. प्राण्यांचा जन्मच सत्कर्मी लागतो.
११. एका महानुभावाने सांगितले कि बघ भाज्यांने सत्वगुण वाढतात असे म्हणतोस, तर त्या भाज्या खाणारे प्राणी खाल्लेस तरी सत्वगुण अजुन वाढतील. उदा. बडे वगैरे तर किती शांतताप्रिय प्राणी आहेत.

आता एवढ्या सर्व प्रश्नांची उत्तरे तर माझ्याकडे नाहीत परंतु मांस भक्षण करणार नाही हे पक्के. तरी तज्ञांनी आपले मतं मांडावित. यावर माहित असल्यास धार्मिक दृष्टीकोनातुनही प्रकाश टाकावा. या विषयावर विनोदही होतील हे माहित आहे. पण कृपया जास्त विषयांतर करू नये

धन्यवाद!
आपला नम्र
रो.म.ना.

प्रतिक्रिया

टारझन's picture

14 Jan 2011 - 1:20 pm | टारझन

ज्याला जे पटते ते करावे , खावे , वागावे. आवडते ते खावे , नाही आवडत ते नाही खावं :) जबरदस्ती आहेच कुठे ? वादाचा प्रश्नंच नाही ;०

बाकी १०० प्रतिसादांबद्दल हार्दिक अभिनंदन ;)

गणपा's picture

14 Jan 2011 - 1:26 pm | गणपा

हॅ हॅ हॅ... शक्यता कमी वाटते.. खुपच चोथा झालेला विषय आहे.. पण नवीन (डु) आयडींचा भरवसा नाही.
कदाचीत तुझ भविष्य खरही होईल ;)

प्रसन्न केसकर's picture

14 Jan 2011 - 7:03 pm | प्रसन्न केसकर

पुनममधे नाही का तु चिकन लॉलिपॉप खातो तेव्हा मी तो आजुबाजुला पसरलेला पालापाचोळा साफ करत.

आता एवढ्या सर्व प्रश्नांची उत्तरे तर माझ्याकडे नाहीत परंतु मांस भक्षण करणार नाही हे पक्के.

संपला विषय ! काथ्या कुटुन काय फायदा?

+१

कन्क्लूजन ठरले आहेच. या चर्चेने आपल्या खाण्यात न खाण्यात बदल होणार नसेल तर मग काय ? यू आर ऑलरेडी कन्विन्स्ड..

गवि's picture

14 Jan 2011 - 1:55 pm | गवि

प्र्.का.टा.आ.

रोमना's picture

14 Jan 2011 - 1:22 pm | रोमना

हो ते तर आहेच
धन्यवाद टारझन दादा.

विसोबा खेचर's picture

14 Jan 2011 - 1:31 pm | विसोबा खेचर

१. तु मांसाहार म्हणजे प्राण्यांना खात नाहीस, पण ज्या भाज्या खातोस त्यामध्येसुध्दा जीव असतोच कि?

सहमत..

२.तु मद्य पी म्हणजे तुला सर्दिवगैरेचा त्रास होणार नाही. नाहीतरी औषधे घेतोस त्यात मद्य असतेच कि? अरे तुझे शिवशंकर सुध्दा सोमसर पियत होते ?

सहमत. शंकर फुल्टूच आहे. पार्वतीची चकण्याची नेहमी अगद जय्यत तयारी असते म्हणे..! :)

३. सोमरस व मद्य एकच का? कारण बालाजी तांबे यांच्या कार्यक्रमात त्यांनी सांगितले होते कि, सोमरस म्हणजे दिव्य/उत्तम वनस्पतीपासून बनविलेले पेय.

अहो स्वत: तांबेच रोज संध्याकाळी एक क्वार्टर मारतात असं ऐकलं आहे.. :)

४. अरे, तुमच्या देवीपुराणात सुध्दा देवीमातेनी राक्षसांचा वध करण्याआधी म्हशीचे मांस खाल्लेहोते व मद्य प्राशन केले असा उल्लेख आहे.

अरे वा..! तसाही देवीला मटणाचाच नैवेद्य लागतो. नळ्या मस्ट..! :)

५. श्रीरामाने वनवास भोगात मद्यप्राशन, मांसभक्षण केले होते. तु सुध्दा सुरुकर ना पुन्हा ?

हो, श्रीराम एक नंबर मटण खाणारा होता असं मीही ऐकून आहे..!

असो..

साधारण १० ते १२ वर्षापासून काही धार्मिक साधना सुरु केली.

नापास..!

ही गोष्ट आपण चारचौघात सांगितलीत इथेच आध्यात्माच्या प्रथम परिक्षेत नापास झालात असं माझं मत आहे. आध्यात्म करताना त्याचा कुठेही उल्लेख/गवगवा करायचा नसतो साहेब..!

आपला नम्र,
तात्याभैय्या देवासकर,
देवासकरांची कोठी,
इंदौर.

तांबेच रोज संध्याकाळी एक क्वार्टर मारतात असं ऐकलं आहे

आम्ही मात्र तांबे फॅमिली डॉक्टरसाठी लिहायला बसले की क्वार्टर मारुनच बसतात असे ऐकले आहे. ;-)

नावातकायआहे's picture

14 Jan 2011 - 2:58 pm | नावातकायआहे

आम्ही मात्र तांबे फॅमिली डॉक्टरसाठी लिहायला बसले की क्वार्टर मारुनच बसतात असे ऐकले आहे.

सहमत.
लिखाण वाचल्यावर खात्री पटते.

रोमना's picture

14 Jan 2011 - 2:09 pm | रोमना

आपल्या धार्मिक मताबद्दल मनापासुन धन्यवाद.!

शुचि's picture

14 Jan 2011 - 2:52 pm | शुचि

Not that which entereth into the mouth defileth the man; but that which proceedeth out of the mouth, this defileth the man.

मुलूखावेगळी's picture

14 Jan 2011 - 3:12 pm | मुलूखावेगळी

आता एवढ्या सर्व प्रश्नांची उत्तरे तर माझ्याकडे नाहीत परंतु मांस भक्षण करणार नाही हे पक्के. तरी तज्ञांनी आपले मतं मांडावित.

मग निर्नय बदलनारच नसेल तर निदान ह्या प्रश्नान्ची उतारे विचाराय्साठी तरी धागा काढायचात
खुप उत्तरे मिळली असती आनि आमचे पन नॉलेज/एन्टरटेनमेन्ट वाढले/झाले असते

पण कृपया जास्त विषयांतर करू नये

न्हाय करत.

सूर्यपुत्र's picture

14 Jan 2011 - 5:07 pm | सूर्यपुत्र

>>साधारण १० ते १२ वर्षापासून काही धार्मिक साधना सुरु केली :
धार्मिक साधना म्हणजे कोणती साधना? कारण साधनेत जे काही समोर येईल, ते भिक्षा समजून सन्यस्त वॄत्तीने ग्रहण करावे लागते.
( उदा. : जगन्नाथ कुंटे नर्मदा परिक्रमा करत होते, त्यावेळी त्यांनी एका घरी भिक्षा मागितली. त्या घरातील वॄद्ध आजीबाईंनी त्यांना नजरचुकीने खराब झालेली आमटी दिली. तर त्यांनी कुरबुर न करता ती आमटी भाकरीत कालवून खाल्ली.)
आता या अंगाने विचार करावयाचा, तर , भिक्षा म्हणून एखाद्याने मांसाहारी पदार्थ दिले, तर ते खाणे कितपत योग्य ठरेल?
किंवा, अँडीज पर्वतावर विमान दुर्घटना घडल्यानंतर त्या प्रवाशांनी जिवंत राहण्यासाठी सहप्रवाशांचे मांस खाल्ले.

मग धार्मिक साधना करतांना शाकाहार पाळणे योग्य की अयोग्य??

योगी९००'s picture

14 Jan 2011 - 4:58 pm | योगी९००

सोमरस व मद्य एकच का? कारण बालाजी तांबे यांच्या कार्यक्रमात त्यांनी सांगितले होते कि, सोमरस म्हणजे दिव्य/उत्तम वनस्पतीपासून बनविलेले पेय.
या कार्यक्रमाला जायच्या आधी तांब्यानीच सोमरस किंवा मद्य घेतले असावे...

परिकथेतील राजकुमार's picture

14 Jan 2011 - 5:20 pm | परिकथेतील राजकुमार

नंतर मांसाहाराचे आकर्षण वाटेनासे झाले, पुढे कितीहि जन्म आले तरी मांस खायचे नाही हा निर्धार केला.

पुढचा जन्म वाघ अथवा शिंव्हाचा मिळाला तर ?

चित्रा's picture

14 Jan 2011 - 7:05 pm | चित्रा

बेस्ट प्रतिसाद.

(अर्थात तुम्ही मांसाहाराकडे वळावे असे सुचवायचे नाही. )

रेवती's picture

14 Jan 2011 - 7:19 pm | रेवती

खी खी खी!
अरे किती वाट लावशील?
तशीही कुणी कुणाची किती वाट लावावी हे सांगण्याचा अधिकार मला नाही. फक्त एक निरिक्षण नोंदवले इतकेच!;)

परिकथेतील राजकुमार's picture

15 Jan 2011 - 11:19 am | परिकथेतील राजकुमार

तशीही कुणी कुणाची किती वाट लावावी हे सांगण्याचा अधिकार मला नाही. फक्त एक निरिक्षण नोंदवले इतकेच!


बादवे प्रियालीतैचा प्रतिसाद वाचुन आणि एकुणच धाग्याचे रंग-रुप आणि लेखीकेचा 'प्रण' पाहुन मला प्रियालीतैच्या लाडक्या एडवर्ड आणि कलिन्स कुटुंबीयांची आठवण झाली ;)

प्रियाली's picture

14 Jan 2011 - 7:28 pm | प्रियाली

पुढचा जन्म वाघ अथवा शिंव्हाचा मिळाला तर ?

गेल्या जन्मातील दुष्कृत्यांचे परिणाम पुढील जन्मात भोगावे लागतात. जर पुढला जन्म वाघ-सिंहाचा मिळाला तर देवबाप्पाला मांसाहार न करणे दुष्कृत्य वाटते असे मानण्यास जागा आहे. ;)

प्राजु's picture

14 Jan 2011 - 9:49 pm | प्राजु

ठ्ठ्यॉ!!!!
वात्रट पर्‍या!

=)) =))

मराठे's picture

14 Jan 2011 - 11:42 pm | मराठे

:bigsmile: क्या बोल्या!

रोमना तुमचा मठ कुठे आहे?

चिगो's picture

14 Jan 2011 - 7:19 pm | चिगो

>>तु मांसाहार म्हणजे प्राण्यांना खात नाहीस, पण ज्या भाज्या खातोस त्यामध्येसुध्दा जीव असतोच कि?

माझापण हाच फंडा आहे. मांसाहाराची किळस/नावड असेल तर ठीक आहे, पण भूत-दयेचे फंडे नकोत. शेवटी जगण्यासाठी दुसर्‍याला मारावंच लागतं, मग वनस्पती असो वा प्राणी...

>>पुर्वी आर्य लोकं गोमास भक्षण करीत असत? परंतु गोमातेचे दिव्य गुणांमुळे त्यांनी ते खायचे सोडले.

माझ्या माहितीप्रमाणे असं काही नाही. आर्यांमधे पाहुण्याकरीता "गोघ्न" (गो+घ्न= गायीला मारणारा) हा शब्द होता, असे वाचले आहे. यज्ञांमधे वगैरे बळी म्हणून गायी, गुरे वापरली जात. धार्मिक आडंबरांमध्ये होणारी प्राणी-हत्या आणि त्यायोगे होणारे नुकसान ह्यामुळे कृषी-बहुल समाजाचा ओढा बौद्ध, जैन इत्यादी कर्म-कांडावर भर नसलेल्या, अहींसा-पुरस्कार करणार्‍या धर्मांकडे वाढायला लागला. आणि त्यामुळे आर्य समाज-संस्कृतीत तुम्ही म्हणता ते बदल करण्यात आले...

अर्धवटराव's picture

14 Jan 2011 - 9:11 pm | अर्धवटराव

वर इतरांनी म्हटल्याप्रमाणे जर तुमची इच्छा नसेल होत तर नकाच करु ना मांसाहार. तुमच्या सर्व प्र्श्नांना, प्रश्नकर्त्या नातेवाइकांना एकच उत्तर... "मेरी मर्झी...."

अध्यात्मीक साधनेच्या अनुसंगाने मांसाहारा बद्दल सांगतात कि मनुष्याचे मन, विचार त्याच्या आहारानुसार बनतात, तेंव्हा तामसी आहार घेउ नये जेणे करुन सात्वीक वृत्ती वाढायला मदत होईल. काहि काहि लोक तर कांदा, लसुण सुद्धा खात नाहि. रामकृष्ण परमहंस आपल्या शिष्यांना तामसी आहार घ्यायला मनाई करायचे (स्वामी विवेकानंद मात्र मांसाहारी होते. त्यांच्या मनोबलावर तामसी आहाराचा परिणाम होत नसे.... असं म्हणतात )

आता शुद्ध शाकाहारी लोकांची वृत्ती किती सात्वीक असते हा संशोधनाचा विषय आहे. मला तरी मांसाहारी लोक जास्त तामसी वगैरे कधी वाटले नाहित... किंबहुना "सगळं करुन सवरुन आनंद भोगणारे" जास्तच तृप्त आणि प्रसन्न वाटतात. अगदी कांदा लसुण वगैरे न खाउन जगणार्‍या लोकांना तर काय म्हणावे... आपलं तर अश्या लोकांना एकच सांगणं असतं... "हाय कंबख्त, तुने पी ही नहि"

(मांसाहारी, मद्यप्रेमी) अर्धवटराव

आत्मशून्य's picture

14 Jan 2011 - 9:53 pm | आत्मशून्य

आता शुद्ध शाकाहारी लोकांची वृत्ती किती सात्वीक असते हा संशोधनाचा विषय आहे.

मी स्वतः शाकाहारी आहे म्हणून स्वानूभवाने सांगतो मला माझी व्रूत्ती तामसी व असमाधानी पध्दतीचीच फार वाटते. आहारामूळे तर सात्वीकता नक्कीच आलेली नाहीये. आणी माझा नैसर्गीक स्वभाव हा अत्यंत बंडखोर तसेच थोडा स्पर्धात्मकच आहे.

पण माझे एक नीरीक्षण असेही आहे की मी जेव्हा जरा आवडीचे असे मस्त,चमचमीत,तीखट थोडक्यात शाकाहारीच पण जीभेचे चोचले पूरवणार्‍या विशेष रेसीपी /पदार्थ भोजनामधे थोडे जास्तच खातो त्या दीवशी (व पूढील १-२ दीवस) मला माझी कामवासना नेहमी पेक्षा प्रखर जाणवते (अर्थात कांदा/लसूण सोडून अथवा पकडून काही फरक जाणवला नाही.) तसेच जे मित्र त्यांना झेपेल तसा मासांहार नीयमीत करतात ते खरोखर जास्तच तृप्त आणि प्रसन्न वाटतात. म्हणजेच माझ्या तौलनीक अतृप्तीचे कारण माझा शाकाहार आहे काय ?

अर्धवटराव's picture

15 Jan 2011 - 3:28 am | अर्धवटराव

रोमना १०-१५ वर्षांच्या शाकाहारी अनुभवाबद्दल सांगत आहेत. तुमच्या जीभेचे चोचले पुरविण्यात आणि कामेच्छा चाळवळ्यात एखाद्या अन्न घटकाचा/मसाल्याचा परिणाम असेलही... काय सांगावे. (तसं असेल तर वायगारासारखं एखादं पेटंट मिळु शकतं ;) विचार करा )

(मसालाप्रेमी) अर्धवटराव

आत्मशून्य's picture

15 Jan 2011 - 8:06 am | आत्मशून्य

एखाद्या अन्न घटकाचा/मसाल्याचा परिणाम असेलही...

ह्या गोश्टी मांसाहारात असतीलच की ? आणी वीशेष म्हणजे जसे मि सांगीतले की मी आजन्म शाकाहारी राहीलो आहे, (प्रसंगी मीत्रांच्या अनावश्यक थट्टेचा वीशय बनून) .

माझा स्वभाव मी सात्वीक ठेवाय्चा प्रयत्न कातोय का याचे ऊत्तर हो असेच आहे पण माझा स्वभाव हा सात्वीक आहे का याचे स्पष्ट ऊत्तर नाही असेच आहे.

म्हणून इतकेच म्हणायचे आहे की शाकाहाराने स्वभाव सात्वीक राहतो काय याचे उत्तर नाही असे वाटते. बाकी अयूष्य प्रसंन्नपणे जगण्यात, अध्यात्मीक प्रगती होण्यात ह्याचा हात्भार कीती याचे काही नीरीक्षण नाही. तसेच आपल्याला कूतूहल/ ऊत्सूकता असलेले पेटंटही शाकाहाराच्या जोरावर मीळवता येइल काय या बाबतही सशांक आहे. म्हणून माझ्या शाकाहाराबाबत मराठीत मि फक्त इतकेच म्हणेन की Earlier it was (idiotic)restriction, which becomes a habit, and now it's turns into an attitude :)

अवांतरः परंतू मी स्वतः मासाहाराचा पूरस्कर्ता बनलो जेव्हा अगदी क्रीकेटर्स पासून तूका-माका सार्ख्या सामान्य लोकापर्यंत जे लोक मास खात नाहीत त्यांची प्रक्रूती/पर्सनॅलीटी अगदीच फडतूस वाटतेअथवा हे लोक चार्चौघात फारसे चीत्तकर्शक असलेले ही अनूभवाला आलेले नाही.:(
(अपवाद असतीलच पण ते फक्त अपवादच).

अर्धवटराव's picture

15 Jan 2011 - 11:37 pm | अर्धवटराव

>>(अपवाद असतीलच पण ते फक्त अपवादच)
या अपवादाच्या लिस्ट मध्ये दारासिंग, शाहिद कपुर वगैरे बलदंड मंडळी आहेत मालक. माझ्या आजोबांचे चुलत भाऊ नावाजलेले पैलवान, लाठी फायटर होते... १००% शाकाहारी. मला वाटते आपण काय खातो यापेक्षा ते बॅलेन्स डायट आहे का आणि अंगाला व्यवस्थीत लागतं का हे महत्वाचे आहे.
राहिला प्रश्न आध्यात्मीक पातळीवर शाकाहाराच्या परिणामाचा, तर मला थेरॉटीकली हे पटतं कि फुड इन्टेक निश्चितच प्रभाव पाडत असणार...

(मिश्राहारी) अर्धवटराव

आहे तो, आणी मी शाकाहारी आहे असेच बोलतो तो. कीम्बहूना सर्व मॉडेल्स ना डाएट्मधे सकाळी जेवणाला फक्त ऊकडलेल्या पालेभाज्याच खायच्या असतात असे जॉण, शाहीद आणी तूशार कपूर सांगतात. पण मी बॅलेन्स डायटबद्दल बोलतच नाहीये तो फार महागडा प्रकार आहे. मी सामान्य लोक जे भूक लागली म्हणून शाकाहार अथवा मांसाहार करतात त्यांबाबत बोलतोय.

मी क्रीकेटर्सला इन्क्लूड केले कारण बघाना साक्षात क्रीकेटचा परमेश्वर विश्ववीक्रमी सचीन फक्त अंडी खातो, आणी धोनी बघा, युसूफ पठान बघा कस्ला फडतूस गेमप्ले पण केवळ ताकतीच्या जोरावर आज स्टार आहेत, तीच गोश्ट गोर्‍या खेळांडूची (अथवा दूर्दैवाने पाकीस्तानी क्रीकेटर्स पण घ्या उदाहरण म्हणून) साले काय स्टायलीश पर्सनालिटी आणी हेल्थ वाटते त्यांची,? भारतीय एकदमच हे दीसतात त्यांच्या पूढे याचे कारण काय ?

बायचूंग भूतीयाचे ऊदाहरण घ्या , त्याने तर ऊघड ऊघड वक्तव्य केले होते भारतीय फूट्बॉलर्स आणी यूरोपीअन फूट्बॉलर्स याच्या स्टॅमीन्याची तूलनाच होवू शकत नाही.. कारण काय ? भावना दूखवल्या जाणार असतील तर पूढील लेख वाचू नका... ऊत्तर सोप आहे ते लोक पीढ्यान पीढ्या हींदूना नीशीध्द असलेले मांस भक्षण करत आले आहेत, थोडक्यात मांसाहारी आहेत.

अर्धवटराव's picture

16 Jan 2011 - 1:48 am | अर्धवटराव

सॉरी, पण मी मुळ मुद्दा काय हेच विसरलो :D

बाकी आपला सामान्य माणासाचा रोजचा आहार बॅलेन्स डायट असतो बरं का... जर व्यवस्थीत घेतला तर... म्हणजे वरण, भात, चपाती, भाजी, कोशिंबीर, ताक, दुध, तूप, लोणी आणि सिजनल फळं.

(खादाड) अर्धवटराव

स्वानन्द's picture

16 Jan 2011 - 7:48 am | स्वानन्द

सहमत!

विकास's picture

14 Jan 2011 - 9:57 pm | विकास

>>मला तरी मांसाहारी लोक जास्त तामसी वगैरे कधी वाटले नाहित...

मला वाटते, मांसाहाराला तामसी आहार म्हणलेले नाही आहे, तर, शिळे, उष्टे वगैरेला तामसी म्हणतात. मांसाहार हा राजसीक आहार आहे.

विवेकानंद मासे खायचे (आणि मला वाटते रामकृष्ण परमहंसपण), कारण सोपे होते - स्थानिक अन्न.

बाकी कोणी काय खावे हा ज्याचात्याचा प्रश्न (जो पर्यंत आपले डोके खात नाहीत तो पर्यंत. ;) ) ज्यांना अमुक एक (कुठल्याही बाजूने) म्हणजेच चांगले वगैरे वाद घालण्याची आवड असेल त्यांना काहीतरी न्यूनगंड आहे असे समजावे आणि सोडून द्यावे. अर्थात त्यासाठी आपण देखील तसे वागत नाही आहोत ना ह्यावर लक्ष द्यावे इतकेच...

अर्धवटराव's picture

14 Jan 2011 - 11:12 pm | अर्धवटराव

>>मांसाहाराला तामसी आहार म्हणलेले नाही आहे, तर, शिळे, उष्टे वगैरेला तामसी म्हणतात

तसं असेल तर मात्र आम्ही तामसी आहार घेत नाहि ;) शक्यतो शिळे खाणे टाळतो(कसलं सात्वीक वगैरे वाटायला लागलं अच्यानक.. वाह वाह). बाकी बर्‍याचदा "उष्टे" खावेसे वगैरे वाटतात हो... पण मनातले मांडे मनात :(

विवेकानंद चिकन खायचे, खास करुन त्यांच्या परदेश वारीत, असं त्यांच्या चरित्रात कुठेतरी वाचल्याचे आठवते. मासे हे बंगालचं लोकल अन्न तर आहेच आहे.

(चिकनप्रेमी) अर्धवटराव

पंगा's picture

15 Jan 2011 - 6:52 pm | पंगा

वर इतरांनी म्हटल्याप्रमाणे जर तुमची इच्छा नसेल होत तर नकाच करु ना मांसाहार. तुमच्या सर्व प्र्श्नांना, प्रश्नकर्त्या नातेवाइकांना एकच उत्तर... "मेरी मर्झी...."

सहमत आहे.

आता शुद्ध शाकाहारी लोकांची वृत्ती किती सात्वीक असते हा संशोधनाचा विषय आहे.

मुळात आहार आणि वृत्ती यांचा काही परस्परसंबंध असतो याबद्दल साशंक आहे. हं, आता आहाराबद्दलच्या गंडाचा वृत्तीशी संबंध असू शकेलही. (हे शाकाहारी/मांसाहारी/मत्स्याहारी/अंडाहारी/व्हेगन/नरभक्षक सर्वांनाच लागू आहे.)

लग्नाआधी शाकाहारी होते. लग्नानंतर मांसाहारी बनले. एक पॉझीटीव्ह बदल आयुष्यात घडला.

"जीवो जीवस्य जीवनम!". मग कोणीही कितीही लेख लिहो वा काही करो.
माशांतून ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिडस मिळतात. मासे मेंदूला छान. तसेच बदामही. मला बदामापेक्षा मासे आवडतात.

पिवळा डांबिस's picture

14 Jan 2011 - 11:37 pm | पिवळा डांबिस

लग्नाआधी शाकाहारी होते. लग्नानंतर मांसाहारी बनले. एक पॉझीटीव्ह बदल आयुष्यात घडला.
जियो!
आजकाल मिपाकरांकडून लग्नानंतर येणार्‍या (बराचश्या काल्पनिक) हलाख्यांची वर्णनं इतकी वाचलीत की हे पॉझिटिव्ह मत वाचून खरंच बरं वाटलं!

मासे मेंदूला छान. तसेच बदामही. मला बदामापेक्षा मासे आवडतात.
डब्बल जियो!!!
मलाही!

आमचं मत,
"जो जे वांछिल तो ते खावो, एकजात"
:)

पंगा's picture

15 Jan 2011 - 7:49 pm | पंगा

मासे मेंदूला छान.

माशांतून फॉस्फरस हे द्रव्य मिळते, जे मेंदूच्या वाढीसाठी पोषक असते, म्हणून मासे मेंदूला चांगले, असे म्हटले जाते. असेलही. शक्य आहे. पण हे मत्स्याहार करण्याकरिता कारण अथवा समर्थन असू नये, असे वाटते.

'शून्याला कोणत्याही संख्येने गुणले, तरी गुणाकार शून्यच येतो', असे काहीसे शाळेत (गणिताच्या तासाला) शिकल्याचे आठवते. त्यामुळे, असा काही फायदा होईलच, याची शाश्वती देता येईलसे वाटत नाही.

उलटपक्षी, केळ्यांमधूनही भरपूर फॉस्फरस मिळू शकते, असे कळते. तेव्हा असा काही फायदा मिळायचाच असल्यास, हाच फायदा कच्ची केळी, फ्रूट सॅलड किंवा शिक्रण ("खाण्याची आवडः रोज शिक्रण पाहिजे. कारण शेवटी आम्ही भटेच! त्याला काय करणार?" - संदर्भः पु.ल.) यांमधूनही मिळू शकावा, असे वाटते.

तसेही, मेंदूची वाढ आणि बुद्धिमत्ता यांचा थेट संबंध असण्याबद्दल साशंक आहे.

तेव्हा, "मला मत्स्याहार आवडतो म्हणून मी मत्स्याहार करतो/करते" असे कोणी म्हटल्यास ते पटण्यासारखे आहे, आणि ज्यांना मत्स्याहार आवडतो त्यांना त्यासाठी एवढे एकच कारण पुरेसे ठरावे. "मत्स्याहार मेंदूसाठी चांगला म्हणून करतो/करते/करावा" वगैरे (माझ्या मते भंपक) मखलाशीवजा स्पष्टीकरणाची गरज आहे असे वाटत नाही.

(हेच शाकाहाराबद्दलही म्हणता येईल. एखाद्याला शाकाहार आवडतो किंवा भावतो तर त्याने जरूर शाकाहार करावा. कारणे देत बसू नये. कोणीही विचारलेले नाही, आणि कोणालाही घेणेदेणे नाही. किमानपक्षी, कोणालाही घेणेदेणे असू नये.)

लग्नाआधी शाकाहारी होते. लग्नानंतर मांसाहारी बनले. एक पॉझीटीव्ह बदल आयुष्यात घडला.

या बदलात पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह यांपैकी काहीही आहे असे वाटत नाही. शाकाहार अथवा मांसाहार यांपैकी कशातही वाईट किंवा हीन प्रतीचे असे काहीही नाही. कोणी काय खावे अथवा खाऊ नये अथवा खायला सुरुवात करावी अथवा खाणे सोडून द्यावे आणि कोणत्या कारणासाठी, हा ज्याचात्याचा प्रश्न आहे. आधी शाकाहारी होतात, तुमचा प्रश्न. नंतर मांसाहारी बनलात, पुन्हा तुमचा प्रश्न. जोपर्यंत आपली पद्धत कोणी इतरांवर लादत नाही, तोपर्यंत कोणीही काहीही खावे, आणि आहारशैली मनात आले तर बदलावी नाही तर बदलू नये. हे ज्यानेत्याने ठरवावे. यात युनिवर्सली पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असे काही असू शकत नाही. माझ्या मते हा बदल आहे खरा, पण न्यूट्रल बदल आहे, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह यांपैकी काहीही होऊ शकत नाही.

(हेच शाकाहाराबद्दलही म्हणता येईल. आधी मांसाहार करत असल्यास कोणतेही पाप केले जात नव्हते, त्यामुळे नंतर सोडून दिलेला असल्यास "पॉझिटिव्ह" असे काही घडलेले नाही. उलटपक्षी, बदलाचा निर्णय स्वखुशीने - कोणत्याही कारणासाठी - घेतला असल्यास निगेटिव्हही काही घडलेले नाही. तेव्हा बदल न्यूट्रल आहे.)

समांतर उदाहरण द्यायचे झाले, तर समजा मी उद्या असे विधान केले, की 'पूर्वी मी ष्टेक / गोमांस खात नव्हतो, नंतर खाऊ लागलो. एक पॉझिटिव्ह बदल आयुष्यात घडला.' ठीक आहे, एक नवीन गोष्ट मी खाऊ लागलो, एका नवीन गोष्टीचा आस्वाद मला मिळू लागला वगैरे वगैरे. पण 'पॉझिटिव्ह बदल' म्हटल्यावर माझ्या आधीच्या पद्धतीत तुलनेने काही 'निगेटिव्ह' होते काय? किंवा आज जे ष्टेक खात नाहीत / गोमांसभक्षण करत नाहीत, ते किंवा त्यांची आहारशैली तुलनेने "निगेटिव्ह" - पर्यायाने "हीन" - ठरतात का?

ष्टेकचे जाऊ दे. सफरचंदाची सफरचंदाशी तुलना होऊन जाऊ दे - मत्स्याहाराची गोष्ट चालली आहे, तर मत्स्याहाराबद्दल बोलू. पु.लं.नी कोठेतरी - बहुधा 'पूर्वरंग'मध्ये - 'मी पिढीजात मत्स्याहारी असलो तरी मी किंवा माझ्या पूर्वजांनी कधी कच्चा मासा खाल्लेला नसल्याने जपान एअरलाइन्सच्या प्रवासात मिळालेली सुशी झेपली नाही आणि हाल झाले' अशा अर्थाचे विधान केलेले आहे. (उद्धरण मूळ शब्दांबरहुकुम नाही. मूळ स्रोत सध्या माझ्यासमोर नाही, आणि मूळ अवतरणातून ओसंडणारी 'हॉरर ऑफ हॉरर्स'ची सूक्ष्मछटा नेमकी चित्रित करण्यास माझा कळफलक असमर्थ आहे.) किंवा, इतरत्र - 'हसवणूक'मधील 'माझे खाद्यजीवन'मध्ये - 'बूयाबेस' हा (समुद्राहाराचा) प्रकार (हजार फ्रँक टिकवून) चाखल्यावर फारसा न झेपल्याचे सूचित केले आहे. हरकत नाही. ज्याचीत्याची आवड.

आता पुन्हा माझे उदाहरण घेऊ. माझ्या पूर्वजांपैकी कोणी कच्चा तर सोडाच, पण कोणत्याही प्रकारचा मासा खाल्लेला नाही. पण मी सर्वप्रथम वेगवेगळ्या प्रकारची सुशी खाल्ली तेव्हा मला हा प्रकार भयंकर आवडला, आणि अजूनही संधी मिळेल त्याप्रमाणे आणि खिशाला परवडेल तसे हा प्रकार मी अधूनमधून आवडीने खात असतो. आणि मध्यंतरी कोठेतरी रेसिपी मिळाल्यावर (हाताशी उपलब्ध असलेल्या घटकांप्रमाणे त्यात सोयिस्कर फेरफार करून पण मिळालेल्या रेसिपीशी जमेल तितके प्रामाणिक राहत) 'बूयाबेस'चा एक छोटा प्रयोग करून पाहिला, आणि त्यातून निर्माण झालेला 'बूयाबेस'सदृश पदार्थ (ऑथेंटिक पारंपरिक देऋब्रा आवृत्ती - कोळंबी, तिसर्‍या, स्क्यालप आणि क्याटफिश घालून - गरिबाला प्रयोगासाठी एवढेच परवडते.) स्वतःही खाल्ला आणि पोरालाही खाऊ घातला. दोघांनाही आवडला. ठीक आहे. पुन्हा ज्याचीत्याची आवड.

पण आता समजा की मी म्हणू लागलो, की 'पूर्वी मी सुशी किंवा बूयाबेस खात नव्हतो, पण नंतर खाऊ लागलो, आणि ते आवडूही लागले हा एक पॉझिटिव्ह बदल झाला.' म्हणजे पूर्वीची माझी अवस्था निगेटिव्ह होती काय? किंवा सुशी आणि बूयाबेस न खाणार्‍या (किंवा एकदा खाऊन कौटुंबिक परंपरेशी किंवा नेहमीच्या सवयीच्या चवीशी विसंगत निघाल्यामुळे न आवडणार्‍या) पु.लं.सारख्यांची खाद्यजीवनशैली तुलनेने 'निगेटिव्ह' होती ('थूत् त्यांच्या जिंदगानीवर' किंवा 'गाढवाला गुळाची चव ती काय?'च्या थाटात) असे मी त्यातून अप्रत्यक्षपणे सुचवावे काय?

तर तसे नसावे. मला सुशी किंवा बूयाबेस आवडत असेल तर तो माझा प्रश्न. पु.लं.ना नसेल आवडत तर तो त्यांचा प्रश्न. यात 'पॉझिटिव्ह' किंवा 'निगेटिव्ह' अशी तुलना होऊच शकत नाही. दोघांच्या खाद्यजीवनशैलीत 'फरक' आहे खरा, पण हा 'फरक' पॉझिटिव्ह' किंवा 'निगेटिव्ह'च्या स्वरूपात मांडता येत नाही. कारण मुळात अशी तुलनाच असू नये. दोघांपैकी कोणाचीच पद्धत 'पॉझिटिव्ह' किंवा 'निगेटिव्ह' (पर्यायाने 'श्रेष्ठ' किंवा 'कनिष्ठ') नाही. त्यामुळे दोघांपैकी (किंवा इतरांपैकीही) कोणी आपली शैली बदलून दुसरी कोठली शैली अंगीकारल्यास त्यात 'पॉझिटिव्ह' किंवा 'निगेटिव्ह' असे काही म्हणता येऊ नये.

'आपण अमूकअमूक गोष्ट खातो' किंवा 'आपण अमूकअमूक गोष्ट खात नाही' यावरून पॉझिटिव्ह-निगेटिव्ह-श्रेष्ठ-कनिष्ठ वगैरे कसे ठरते, हे मला आजतागायत न उलगडलेले कोडे आहे.

आमेन!

चवीने खाणार त्याला देव देणार असे म्हणतात म्हणुन मी चवीने मांसाहार करतो. ;-)

-चविष्ट नास्तिक.

कवितानागेश's picture

14 Jan 2011 - 11:32 pm | कवितानागेश

निदान महिनाभर नॉनवेज खा. न कन्टाळता खा.
वृत्तीत काही फरक पडतोय का ते स्वतःच तपासा.
आपोआपच उत्तरे मिळ्तील.
तरीसुद्धा इलाज नसेल तर खुशाल खावे, असे मला वाटते.

--शुद्ध शाकाहारी माउ

रेवती's picture

14 Jan 2011 - 11:56 pm | रेवती

आपले काय मत ?
कश्याबद्दल?
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
तुम्हालाही.
मांस खायचे नाही हा निर्धार केला.
बरं झालं कि मग!
देवीला व देवाच्या गणांना मांस /तसेच मद्य लागते
त्यांना लागू द्या हो, तुम्हाला काय लागतय ते बघा की!
मांस भक्षण करणार नाही हे पक्के
कळलं.
जास्त विषयांतर करू नये
केले नाही.
माझ्यामते (विचारलत म्हणून सांगतिये) आपण काय खावे काय खाऊ नये यासारखे लहानसान पण आपल्यापुरते महत्वाचे निर्णय आपले आपण घ्यावेत आणि पार पाडावेत. दुसर्‍यावर सोपवू नयेत नाहीतर नंतर आपलीच चिडचिड होते. त्यासाठी तुम्हाला (आय. टी. वाले असलात तरी) गरजेपुरता स्वयंपाक येणे जरूरीचे आहे. जर स्वयंपाकाची अज्जीबात आवड नसेल, आवड उत्पन्न होण्याची शक्यता नसेल तर घरी जो स्वयंपाक शिजतो तो विनातक्रार खावा.

सोमरस आणि मद्य एकच का? या तुमच्या प्रश्नावर काही माहिती देईन म्हणतो.

धान्य अथवा फळे आंबवून त्यापासून मद्याचे विविध प्रकार (बिअर/लिकर/वाईन) बनवले जातात. मद्यार्क (शुद्ध अल्कोहोल ) मानवी आतड्याला सहनच होणार नाही म्हणून त्यात साधारणपणे निम्मे प्रमाण पाण्याचे असते. बिअरमध्ये ६ ते ८ टक्के, वाईनमध्ये २० ते २५ टक्के तर नेहमीच्या मद्यात ५२ टक्क्यांपर्यंत अल्कोहोल असते. हे अल्कोहोल रक्तावाटे शरीरात पसरते आणि लहान मेंदूवर परिणाम घडवते. त्यामुळे प्रारंभी बधीरता येणे, हालचालींवरचे व नंतर भावना आणि वाणीवरचे नियंत्रण शिथील होणे व मात्रा जास्त झाल्यास शुद्ध हरपणे असे प्रकार घडतात. (मोठ्याने बोलणे/भांडणे/बरळणे, गाणी गाणे, तोल जाणे, कपड्यातच विधी करणे, रस्त्याकडेला लोळत सुखनिद्रा अशी मैफल रंगल्याचे नेहमी पाहाण्यात येते.)

सोमरस हा सोमवल्ली नामक वनस्पतीपासून बनवला जात असे. सोमवल्ली कुटून त्या रसात आणखी काही उत्तेजके मिसळून सोमरस सिद्ध होई. हा सोमरस उत्साह वाढवणारा असे कारण सोमरस प्राशन करुन देव असुरांवर तुटून पडत, असा उल्लेख पुराणांत आहे. मद्य हे शिथीलता आणते आणि सोमरस उत्साह वाढवतो त्याअर्थी सोमरस हे मद्य नसून स्टेरॉइडचा काही प्रकार असावा, असा एक अंदाज. खरे-खोटे ते देव आणि त्यांचा राजा इंद्र यालाच ठाऊक. वैदिक प्रार्थनांमध्ये सोम हा पवित्र मानला आहे म्हणूनच 'वैनतेय सोमं पिब सोमं पिबतु वृत्रहा, सोमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिनः' अशी विनवणी देवतेकडे केलेली आढळते. ही सोमवल्ली नावाची वनस्पती प्राचीन काळातच नामशेष झाली. मध्यंतरी संशोधकांना ती रशियामध्ये सापडल्याची बातमी वाचली होती. पुढे काय झाले ठाऊक नाही. पूर्वी यज्ञ अनेक दिवस चालत आणि ऋचापठण व आहुती देणारे ऋषीही सोमसेवन करत, असा उल्लेख आहे. म्हणजे सोमरस हे सर्वमान्य पेय असावे.

गवि's picture

15 Jan 2011 - 7:53 am | गवि

Good info. Thanks.

Just in lighter tone:

म्हणजे सोमरस हे प्राचीन Cloud9 असावे..

अमित देवधर's picture

15 Jan 2011 - 3:43 pm | अमित देवधर

नमस्कार.

काही वाचलेल्या माहितीवरून तुमच्या प्रश्नांबद्द्ल काही मुद्दे लक्षात आले. ते खाली देत आहे.

१. तु मांसाहार म्हणजे प्राण्यांना खात नाहीस, पण ज्या भाज्या खातोस त्यामध्येसुध्दा जीव असतोच कि?
जगातल्या सगळ्या वस्तू पंचमहाभूतांपासून तयार झाल्या आहेत, असं आपल्या अध्यात्मशास्त्रामध्ये म्हटलं जातं. आणि दुसरं म्हणजे शाकाहारी आहार सामान्य परिस्थितीत सत्वगुण वाढवण्यासाठी जास्त योग्य मानला जातो.
मध्ये असं वाचनात आलं होतं की, वनस्पतीजन्य पदार्थांमध्ये पंचमहाभूतांमधल्या 'जल' या भूताचं प्रमाण सर्वाधिक असतं. इतर पदार्थ जे मांसाहारी समजले जातात, त्यात इतर भूतांचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे, शाकाहारी अन्नामध्ये हे 'मांसाहारी' म्हणजे 'इतर भूतांचं प्रमाण जास्त असलेले पदार्थ'वर्ज्य आहेत, किंवा 'जल' या भूताचं प्रमाण अधिक असलेले पदार्थ चालतात (आपल्या शरीरात ५५ ते ७८% पाणी असतं हे लक्षात घेता).
हे असं का, हे माहित नाही; ते शोधावं लागेल. पण हे कारण इतर कारणांपेक्षा अधिक तर्कशुध्द दिसतं. आपल्या अध्यात्मशास्त्रामध्ये साधना करणार्‍या लोकांना विशिष्ट मूलद्रव्याने तयार झालेल्या वस्तू (उदा. दर्भासन इ.) वापरायला सांगितलं जातं; हे बघितलं की, सत्व, रज, तमोगुण आणि वस्तूंमधील पंचमहाभूतांचा काहीतरी संबंध शास्त्राच्या संशोधकांना अपे़क्षित असावा असं मानायला हरकत नाही. आणि वस्तूंमधील पंचमहाभूतांचा संबंध महत्वाचा मानला गेला असेल तर, अन्नामधला तो संबंध महत्वाचा मानला जाईल हे तर्कशुध्द दिसतं.

२ ते ११. हे प्रश्न एकतर शाकाहारी / मांसाहारी मध्ये इतिहासात झालेल्या अपवादांबद्द्ल आहेत, किंवा धर्म आणि नीतीनियमांबद्द्ल आहेत. म्हणून ते एकत्र धरतो आहे. सोमरसाबद्द्ल 'योगप्रभूं'नी माहिती दिली आहेच.
आपल्या धर्माच्या मूळ संकल्पनेमध्ये प्रमाणे बघितलं तर; जो माणसाला आहे त्यापेक्षा उच्च स्तरावर नेतो तो मूळ धर्म आहे (आपल्या वर्तनापासून ते अध्यात्मातील अवस्थेपर्यंत). त्यामुळे, त्या त्या प्रसंगी परिस्थितीप्रमाणे त्या त्या लोकांनी ही संकल्पना जाणून हे अपवाद केलेले आहेत. त्यामुळे, त्यांनी त्यावेळी हे केलं त्यावरून आत्ता तसं करावं की नाही; हा निर्णय करणं काही योग्य मार्ग नाही. नीतीच्या मूळ व्याख्येवरून यथानुशक्ती विचार करून योग्य पर्याय काढणं हे जास्त युक्त आहे. इतिहासातले संदर्भ बघायचे असतील तर त्यासाठी माझा उपयोग नाही. त्यावर त्या शास्त्राच्या लोकांनी प्रकाश टाकावा.

रोमना's picture

17 Jan 2011 - 12:40 pm | रोमना

धन्यवाद

ऐक शुन्य शुन्य's picture

15 Jan 2011 - 4:04 pm | ऐक शुन्य शुन्य

मी चर्चा वेगळ्या दिशेने विशद करतो.
धान्यः जे धान्य वापरले जाते त्याचा रन्ग हिरव्यापासुन ताम्बुस झालेला असतो. म्हन्जे त्याचा अर्थ की धान्यातुन जीव निघुन गेलेला असतो. ऐका धान्यापासुन अनेक धान्य बनतात. म्हनुन धान्यचा थोडा भाग परत पेरन्यास थेवले जातात.
भाजी: मेथी जी वापरतात ती तिच्या जीवन चक्राच्या शेवटी तोड्ली जाते.
शाकाहार म्हनजे कमीत कमी हत्या!
मानव हा त्याच्या अन्नसाखळीत उच्च जागेवर आहे (पिरयामिडच्या टोकावर). पिरयामिडच्या बेसला जिवाणु असुन नन्तर वन्स्पती मग प्राणी आणी मानव. त्यामुळे शाकाहारी वन्स्पती पासुन अन्न घेवुन अन्न साख्ळी बलन्स करतात तसेच मासाहारी पन.
थन्ड भागात उर्जेची ज्यादा गरज असते म्हनुन मासाहार केला जातो
वाळवन्टात वन्स्पती कमी असतात म्हनुन मासाहार केला जातो.
जाणकार प्रकाश टाकतील , अपेक्शा.

रोमना's picture

17 Jan 2011 - 12:41 pm | रोमना

धन्यवाद

आज किंक्रात आहे. आज नळी ओरपायची सोडुन डोक्याला कशाला त्रास देतील. तोवर तुम्ही अजुन एक शुन्य लावुन जेवुन घ्या.

विजुभाऊ's picture

17 Jan 2011 - 4:24 pm | विजुभाऊ

शाकाहारी लोक अतीरेकी असतात.
ते शाकाहाराबद्दल अजिबात तडजोड करीत नाहीत.
त्याम्च्या घती आलेल्या पाहुण्याना ते शाकाहारच घडवतात. पण ते जेंव्हा मांसाहारी पाहुण्यांकडे जातात तेंव्हा देखील यजमानने शाकाहारीच असावे असा त्यांचा आग्रह असतो.
यजमानाने चुकून मांसाहारी पदार्थ दिला यजमानाच्या भावना दुखावल्या जातील याची पर्वा न करतउ र्मटपणे नाकारतात.
मांसाहारी लोक फारच उदार असतात. यजमानाने फक्त शाकाहारी पदार्थ दिला म्हनून ते कधीच नावे ठेवत नाहीत. यजमान जे देइल ते ते आनन्दाने खातात.
शाकाहारी लोक त्यातुन जे बटाटे काम्दा लसून वगैरे देखील खात नाहीत ते लोक मांसाहारी लोकाना खालच्या दर्जाचे समजतात. एखाद्याचे त्याना जेवायला अथवा काही समारंभाला बोलावले तेर ते यजमानाला सरळ तुम्ही मांसाहर करता म्हनू आम्ही तुमच्या समारंभाला सहभागी होऊ शकत नाही असे उद्दाम पणे साम्गतात. मांसाहारी लोकानी असे म्हणल्याचे एकही उदाहरण ऐकीवात नाही

परिकथेतील राजकुमार's picture

17 Jan 2011 - 4:35 pm | परिकथेतील राजकुमार

शाकाहारी लोक अतीरेकी असतात.

संदर्भासहीत स्पष्टीकरण द्या !

स्वानन्द's picture

18 Jan 2011 - 10:42 pm | स्वानन्द

संदर्भासह स्पष्टीकरण द्या.

बाकी, तुम्ही जे मांसाहारींबद्दल बोलताय.. ते मांसाहारी असतात की मिश्राहारी?