मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आपले काय मत ?

रोमना · · काथ्याकूट
नमस्ते मिपाकरांनो, सर्वप्रथम मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. साधारण १० ते १२ वर्षापासून काही धार्मिक साधना सुरु केली. नंतर मांसाहाराचे आकर्षण वाटेनासे झाले, पुढे कितीहि जन्म आले तरी मांस खायचे नाही हा निर्धार केला. म्हणून दिले सोडून. हे माहित असतानही कि मांसाहारातून सर्वात जास्त शक्ती, प्रथिने वगैरे मिळतात (घरचे सर्व मांसाहारी पण वार सण पाळून आहेत). परंतु आपण प्राण्याला मारुन खावे हे काही मनाला पटत नव्हते. यानिमित्ताने काही कट्टर मासभक्षक नातेवाईकांचा मी मांसाहाराकडे पुन्हा वळावे म्हणून प्रयत्न सुरु झाला. (कदाचित त्यांच्याकडे गेल्यावर वेगळे जेवण करावे लागेल म्हणून असेल) त्या निमित्ताने पुढील प्रश्न मला विचारले गेले व जातात . या पुढील प्रश्नांची उत्तरे त्यांना देणे काही जरुरीचे नव्हते परंतु, एक विचारचक्रचं जणु सुरु झाले असे का? १. तु मांसाहार म्हणजे प्राण्यांना खात नाहीस, पण ज्या भाज्या खातोस त्यामध्येसुध्दा जीव असतोच कि? २.तु मद्य पी म्हणजे तुला सर्दिवगैरेचा त्रास होणार नाही. नाहीतरी औषधे घेतोस त्यात मद्य असतेच कि? अरे तुझे शिवशंकर सुध्दा सोमसर पियत होते ? ३. सोमरस व मद्य एकच का? कारण बालाजी तांबे यांच्या कार्यक्रमात त्यांनी सांगितले होते कि, सोमरस म्हणजे दिव्य/उत्तम वनस्पतीपासून बनविलेले पेय. ४. अरे, तुमच्या देवीपुराणात सुध्दा देवीमातेनी राक्षसांचा वध करण्याआधी म्हशीचे मांस खाल्लेहोते व मद्य प्राशन केले असा उल्लेख आहे. ५. श्रीरामाने वनवास भोगात मद्यप्राशन, मांसभक्षण केले होते. तु सुध्दा सुरुकर ना पुन्हा ? ६. किमान अंडे तरी खा? व्हेज आहे???? (अ‍ॅ......) दुधात सुध्दा जिवाणू असतात मग ते नॉनव्हेज नाहि का ? ७. पुर्वी आर्य लोकं गोमास भक्षण करीत असत? परंतु गोमातेचे दिव्य गुणांमुळे त्यांनी ते खायचे सोडले. तेव्हा किमान कोंबडी किंवा बकरी तरी. ८. आपल्या देवाला कोंबडा (काहिंच्या देवाना बकरा लागतो). ( देवाला नाही, पण काही ठिकाणी देवीला व देवाच्या गणांना मांस /तसेच मद्य लागते असे ऐकिवात आहे माझ्या!) तरी प्रसाद म्हणून वर्षातुन एकदा तरी खा ना! ९. अरे शहाण्या पुर्वी अथिती घरी आले कि मधुपर्क द्यायचे (घोडा/गाय यांचे मांस मधाबरोबर शिजवुन) तेव्हा पाहुण्यांबरोबर खायला हरकत नाही. १०. मांसाचे औषधी गुण बघावेत, मांस खायला काय हरकत. प्राण्यांचा जन्मच सत्कर्मी लागतो. ११. एका महानुभावाने सांगितले कि बघ भाज्यांने सत्वगुण वाढतात असे म्हणतोस, तर त्या भाज्या खाणारे प्राणी खाल्लेस तरी सत्वगुण अजुन वाढतील. उदा. बडे वगैरे तर किती शांतताप्रिय प्राणी आहेत. आता एवढ्या सर्व प्रश्नांची उत्तरे तर माझ्याकडे नाहीत परंतु मांस भक्षण करणार नाही हे पक्के. तरी तज्ञांनी आपले मतं मांडावित. यावर माहित असल्यास धार्मिक दृष्टीकोनातुनही प्रकाश टाकावा. या विषयावर विनोदही होतील हे माहित आहे. पण कृपया जास्त विषयांतर करू नये धन्यवाद! आपला नम्र रो.म.ना.

वाचन 11309 प्रतिक्रिया 0