तात्पर्यात गडबड? नेहमीच्या कथा..

गवि's picture
गवि in काथ्याकूट
10 Jan 2011 - 3:39 pm
गाभा: 

लहानपणापासून (किंवा लहानपणीच !!) नेहमी ऐकलेल्या काही कथा. त्यातली एकदोन सँपल उदाहरणं उचलून दाखवतो. यातल्या काही कथा तर उदाहरण / चांगले विचार / बोध याकरता सांगितल्या जातात..अजूनही सांगितल्या जातात का माहीत नाही. पण बर्‍याच कथा त्या त्या वेळी शाळेतल्या बाई किंवा आजूबा आज्जींकडून ऐकून घेतल्या. आता त्याविषयी उलट विचारही मनात येतात :

१) द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी वस्त्रहरण करणार्‍याच्या मनात शरम उत्पन्न करणं किंवा त्याचे हात लुळे पाडणं किंवा त्याचं डोकं कलम करणं अशा प्रकारे मदत करण्याऐवजी फक्त वस्त्रपुरवठा करत राहून तो "शो" लांबवत का ठेवला..? हाही उपाय जादुई शक्तिवाला आणि तो ही..

ही कथा काल्पनिक आहेच पण तरी ती सांगितली जाते एक शील / लज्जा वाचवणार्‍या नायकाची महती ठसवण्यासाठी. लज्जारक्षणाचा कोणता मार्ग शिकायचा यातून ?

२) युद्धात कन्फ्यूज झालेल्या "सीदन्ति मम गात्राणि" म्हणणार्‍या अर्जुनाला श्रीकृष्णांनी उपदेश केला, त्याविषयी मागे तेंडुलकरांनी (बहुधा) एक मुद्दा मांडला होता.. त्यांनी मांडला असो नसो..मला असं वाटतं.. की अर्जुनाचं म्हणणं फार इन्व्हॅलिड नव्हतं असं म्हणून विचार केला तर..?

त्याचं म्हणणं युद्धाच्या विरोधात जात होतं.. त्याला समोर ज्येष्ठ लोक दिसत होते.. आता त्याने कच खाल्ली तर सगळा बनाबनाया डाव किंवा सीन उलटणार होता…एकूण (पांडवांचं) नुकसान खूप होणार होतं..

सैन्याची हानी आणि युद्धाचे दुष्परिणाम कदाचित टळले असते.. पण वाईट लोकांचा फायदा होण्याची जास्त शक्यता होती..

तेव्हा अशा काँटेक्स्ट मधे केलेला उपदेश आणि त्याचं मन वळवणं यात तत्वज्ञान जास्त की manipulation आणि brainwash जास्त ??

मी संपूर्ण गीतेविषयी म्हणत नाहीये.. प्लीज गैरसमज करून घेऊ नका.. (नाहीतर "तुम्ही गीता नीट पूर्ण वाचली तरी आहे का?" असे अभिप्रायच जास्त येतील..) बाकीच्या गीतेत या युद्धातल्या डायलेमाशी संबंधित नसलेलेही खूप तत्वज्ञान आहे आणि त्याचा आदर आहेच.

सोयीचा उपाय ज्याला म्हणतात तो गळी उतरवणं? .. .. युद्धस्व .. ??!!

जे केलं ते योग्यच होतं.. पण त्याला मुत्सद्देगिरी म्हणणं योग्य..

त्याच्या बदल्यात अर्जुनाची बाजू पूर्ण झाकली गेली हेही खरंच.. त्याच्या बाजूच्या सर्व शक्यता वर आल्याच नाहीत..

३) राजीव साने यांनी त्यांच्या "युगांतर" मधे उल्लेखलेली लोकमान्य टिळकांची शाळेतली कथा आणि त्यावरची टिपणी:

"मी शेंगा खाल्ल्या नाहीत (टरफले सांडली नाहीत.) आणि मी चहाडी करणार नाही" असे बाणेदार उत्तर दिल्याची कथा ऐकून असं नाही वाटत की "टरफले वर्गात सांडून कचरा केला जाऊ नये" या नियमाच्या पालनासाठी / शिस्तीसाठी रेग्युलेशन करणारी शाळा (मास्तर) नावाची यंत्रणा कार्यरत असताना त्यांना मदत करणे सोडून इथे नुसताच बाणेदारपणा किंवा सत्यकथनच दाखवले गेले? कोणी टरफले सांडली हे माहीत असेल तर मास्तरांना दाखवून द्यायला नको?

या जागी म. गांधी असते तर "मी माझ्या वर्गमित्रांचे घाण न करण्याबद्दल किंवा सत्य बोलण्याबद्दल मतपरिवर्तन करु शकलो नाही म्हणून जणू मीच तो कचरा केला असे समजून आपल्या हातावर छड्या घेतल्या असत्या असे विचाराअंती वाटते.

वैचारिक गोंधळ असल्याची शंका येणार्‍या अजून काही अशा कथा आठवतात का? अशा कथा नवीन रेफरन्समधेही तयार होत असू शकतील की ज्या पुढच्या पिढ्यांना "इतिहासातल्या" म्हणून सांगितल्या जातील.

प्रतिक्रिया

योगी९००'s picture

10 Jan 2011 - 3:59 pm | योगी९००

जर कंसाला माहित होते की देवकीच्या सातव्या (की आठव्या..?) बाळाकडून त्याचे मरण आहे तर त्याने तिला कारावसात ठेवले. ठेवले ते ठेवले पण तिच्या बरोबर तिच्या नवर्‍याला पण त्याच कारावासात का ठेवले..?

एकत्र का ठेवले असेल असा विचार करताना असे वाटले की :

कारण
१. कंसाला माहीत असेल की आकाशवाणी तर झाली आहेच, आणि "वर" मिळवुन येथे मुले होतात.. आणि मग देवकीला "वरा" पासुन मुल झाले तर कदाचीत ती वासुदेवाच्या मुलापेक्षा ही भारी असतील ..वासुदेव देवकीचे पोर त्यांचे सारखेच असेल मग मी मारेण त्यांना

२. कंसाला स्वताचा खुप अहंकार होता, आणि त्याला बघायचे होते कसे काय देवकीचे पोर आपल्याला मारेल मी येव्हडा पराक्रमी आहे ते.( महाभारत लिहिणार्‍यांनी असे लिहिले पाहिजे होते खरे तर, म्हण्जे नंतर देवकी -वासुदेव ला एकत्र का ठेवले हा प्रश्नच उरला नसता ) ..

नरेशकुमार's picture

11 Jan 2011 - 11:50 am | नरेशकुमार

एक आख्याईका ऐकलि आहे,
त्यावेळेस केवळ नजर मिलनाने, शरिरावरिल घामाने, नुसते मनात विचार करुन सुद्धा गर्भधारना होत असे.

युयुत्सु's picture

10 Jan 2011 - 4:47 pm | युयुत्सु

पण वाईट लोकांचा फायदा होण्याची जास्त शक्यता होती..

कौरव वाईट होते हे एकच आपल्या मनावर बिंबवले गेले आहे. किरातार्जुनीयाचा १ला सर्ग वाचलात तर कौरव किती चांगले होते हेही कळेल. जेत्यांचा इतिहास फक्त आपल्या पुढे मांडला जातो. एकदा वेणीसंहार नाटक शिकत असताना मी आमच्या बाईना वर्गात विचारले होते की पांडवानी चावटपणा केला असण्याची पण खूप शक्यता आहे. त्यावर त्यांनी "तुझे म्हणणे बरोबर आहे पण बाहेर असे बोलू नको" असे बजावून उरलेला तास पांडवानी शेण कुठे कुठे खाल्ले हे स्पष्ट करण्यात घालवला...

विश्वनाथ मेहेंदळे's picture

10 Jan 2011 - 5:55 pm | विश्वनाथ मेहेंदळे

महाभारताबद्दल चर्चा करताना किरातार्जुनीय, वेणीसंहार,......,मृत्युंजय, राधेय यांचे दाखले देऊ नयेत. कारण ह्या सगळ्या साहित्यकृती महाभारतावर आधारित आहेत, पण मूळ साहित्यकृतीशी प्रामाणिक न राहता प्रत्येक लेखक/कवीने कथा, पात्रे आणि प्रसंग बदलण्याचे स्वातंत्र्य घेतले आहे. त्या त्या साहित्यकृती महान असतीलही पण त्या महाभारताच्या प्रमाण आवृत्या नव्हेत. उदा. मृत्युंजय मधील कर्ण हा व्यासांच्या कर्णापेक्षा वेगळा आहे. आणि महाभारत हे साहित्य न मानता इतिहास मानला तरीही हाच युक्तिवाद लागू पडतो.

बाकी पांडवांनी काय शेण खाल्ले ते सांगितलेत तर ज्ञानात भर पडल्याने आनंद होईल. (तत्कालीन समाजाच्या प्रथांप्रमाणे त्या कृतींना शेण खाणे म्हणता येईल का? आजचे नियम नका लावू.)

एक बायको पाच जणात वाटून घेतली आणि त्याचे बिल कुंतीच्या माथी मारले.
यात काहीच खटकण्यासारखे नाही ?

(बेगडी स्त्रीमुक्तीवादी लगेच बहुपत्नीकत्त्व रूढ होते मग हे का नाही असे विचारू शकतात. माझा मुद्दा फक्त विश्वनाथ मेहेंदळे यांच्या "तत्कालीन समाजाच्या प्रथांप्रमाणे" या चौकटीपुरता सीमित आहे.)

तसेच कुंतीचे विवाहपूर्व संबंध ज्याची किंमत कर्णाला आयुष्यभर चुकवावी लागली.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

11 Jan 2011 - 5:56 pm | विश्वनाथ मेहेंदळे

इतर काही लिहिण्यापूर्वी,
मी महाभारताची जी आवृत्ती पहिल्यांदा वाचली ती म्हणजे त्याचे गो. नी. दांडेकरांनी केलेले भाषांतर. मग अजून एक दोन छोट्या आवृत्त्या चाळल्या होत्या. त्या नंतर महाभारतावर आधारित पण विश्लेषणात्मक काही पुस्तके वाचली. (महाभारतातील व्यक्तीदर्शने, युगांत, स्वयंभू ई). खाली जे लिहित आहे ते नक्की कुठे वाचले ते आत्ता आठवत नाही, पण वरीलपैकी कुठल्यातरी पुस्तकात वाचले असणार. आधीच्या प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे राधेय, मृत्युंजय सारख्या पुस्तकांना मी संदर्भ म्हणून वापरत नाही.

>>एक बायको पाच जणात वाटून घेतली आणि त्याचे बिल कुंतीच्या माथी मारले.
यात काहीच खटकण्यासारखे नाही ?

प्रथम म्हणजे, त्यांनी या प्रकारचे लग्न विधिवत केले होते. तेव्हा त्याला शेण खाणे म्हणता येणार नाही. आज ही गोष्ट खटकत असली तरी त्याकाळी समाजबाह्य नक्कीच मानली गेली नव्हती. एका स्त्रीने अनेक पुरुषांशी लग्न करण्याची प्रथा तत्कालीन आर्यांमध्ये सर्रास (किंवा अजिबात) नसेलही कदाचित. पण आज हे जितके खटकण्यासारखे वाटते आहे तितके त्या काळी नसावे. नाहीतर असा प्रस्ताव कुणाच्या डोक्यातही आला नसता आणि दृपदासमोर मांडलाही गेला नसता. त्या काळी काही अनार्य समाजात अशा प्रथा होत्या म्हणे. या प्रकारचे लग्न केले जावे का असा प्रश्न साहजिकच द्रुपदाला पडला आणि त्यावर चर्चा झाली. त्यात कृष्णाने पांडवांची वकिली केली होती आणि अशाच प्रकारच्या काही प्रसिद्ध विवाहांचे दाखले दिले होते असे वाचल्याचे स्मरते. महाभारतातील व्यक्तीदर्शने या पुस्तकात यावर बराच उहापोह केला आहे. महाभारत हा ज्यांचा आवडीचा विषय आहे त्यांनी ते पुस्तक जरूर वाचावे.

>>तसेच कुंतीचे विवाहपूर्व संबंध ज्याची किंमत कर्णाला आयुष्यभर चुकवावी लागली.
हे पांडवांच्या जन्माआधी घडल्याने मुळात ह्यात पांडवांची काही चूक नाही. आणि याला शेण खाणे म्हणायचे असेल तर ते या सर्वांची पूर्वज असलेल्या सत्यवतीने पण केले होते. त्याबद्दल या स्त्रियांना बोल लावल्याचे ऐकिवात नाही. अशा संबंधातून जन्माला आलेल्या व्यासांना पण त्यांच्या योग्यतेप्रमाणे सन्मान मिळत होता. विवाहेतर संबंधातून जन्माला आल्याबद्दल त्यांची कधी कुणी हेटाळणी केले असे नाही ऐकले. मुद्दा हा की लैन्गिकतेबद्दल आपली जशी मते आहेत तशी त्या काळात असतील असे नाही. असे संबंध उजळ माथ्याने मिरवीत नसतील कदाचित पण आभाळ कोसळले असेही वाटत नसावे.

पांडवांनी जे जे केले ते योग्य असे मला अजिबात म्हणायचे नाही. पण आजच्या नियमांची चौकट नाही म्हटले तरी लावतोच आपण मनातल्या मनात.

मृत्युन्जय's picture

11 Jan 2011 - 7:22 pm | मृत्युन्जय

द्रौपदीने पांडवांशी लग्न करायच्या आधी एका स्त्रीने अनेक पुरुषांशी लग्न केल्याची केवळ २ उदाहरणे होती असे महाभारतात म्हटले आहे. २ उदाहरणे ही अपवाद म्हणुनच बघता येतील, रुढ समाजमान्य व्यवस्था म्हणुन नाही. एका स्त्रीचे अनेक पती ही संकल्पना त्याकाळी देखील लोकांना पटली नाही. म्हणुनच कर्ण आणि दुर्योधन तिल वेश्येची उपमा देउ धजावले.

५ जणांबरोबर तिचे लग्न लावुन देण्याची कल्पना द्रुपदालादेखील नंतर कळाली. तिचे लग्न न लावुन देता तिल अर्जुनाबरोबर पाठवण्यात आली होती.

महाभारत नीट वाचले असता हे आपल्या ध्यानात येइल की युधिष्ठीर स्वतः असे म्हणाला की द्रौपदी पाचही पांडवांच्या मनात भरली असल्यामुळे भावाभावांमध्ये फूट पडु नये यासाठी सर्वांनी तिच्याशी लग्न करावे. अर्जुनाने खळखळ न करता या गोष्टीला मान्यता दिली.

कुंतीने मागे वळून न बघता भिक्षा वाटुन घ्या असे सांगितली ही कथा महाभारतात देखील आहे आणि ती तद्दन बजवास, भंकस कथा आहे. द्रौपदीने पाच जणांशी लग्न केले हे जस्टिफाय कसे करावे या संभ्रमात शचि आणि पाच इंद्रांची कथा देखील घुसडण्यात आली, द्रौपदी अयोनीज असुन देखील तिच्या पुर्वजन्मीच्या वरदानाची कथा देखील घुसडण्यात आली आणि वर हे दोन्ही कमी पडेल असे वाटल्यामुळे कुंतीची आणि भिक्षेची कथा देखील तोंडी लावायला दिली. कुंतीचे बोल म्हणजे जणु तोंडातुन पडले आणु जमिनीत विरघळले. परत नाही घेता आले. किंवा योग्य तो निवाडा नाही करता आला? जणू कुंती बोलली आणि परिस्थितीचा फायदा घेउन भीमाने दुसर्‍या हाताने द्रौपदीला उचलले आणि पळत सुटला आणि चान्स जाउ नये म्हणुन सगळे पांडव त्याच्या मागे पळत सुटले ते सगळेच्या सग्ळे लग्न लावुनच परत आले त्यामुळे कुंतीला रिवाइज्ड इंस्ट्रक्शन्स देता आल्या नाहीत.

मला कधीकधी प्रश्न पडतो की समजा ... समजा... त्या दिवशी कुंतीला खुप भूक लागलेली असली असती आणि ती म्हणाली असती की ६ वाटे करा भिक्षेचे, मला पण एक वाटा हवा आहे. तर? मग काय कुंतीने पण द्रौपदीशी लग्न केले असते काय? माझे या अनुषंगाने अजुन बरेच प्रश्नदेखील आहेत पण ते इथ विचारत नाही.

एकुणात महाभारत कसे चुकीचे आहे हे दाखवण्याचा हा प्रयत्न नाही. फक्त एवढेच की पांडवांना शेण खायचे होते ते त्यांनी खाल्ले आणि उगाच त्यांच्यात एका बाईमुळे फूट पडु नये म्हणुन सगळ्या मान्यवरांनी त्यांना योग्य ते सहकार्य केले.

पांडवांनी अजुन एकदा असेच शेण खाल्ले. लाक्षागृहात दुर्योधनाने म्हणे त्यांना मारण्याचा प्लॅन केला होता. पण प्रत्यक्षात पांडव तिथे १ वर्ष राहिले तरी दुर्योधनाने काहीच केले नाही म्हणुन बहुधा कंटाळुन पांडवांनीच त्या महालाला आग लावली. त्यात पुरोचन (दुरोधनाचा विश्वासु नौकर) जळुन मेला हे ठीकच. पण त्यात ५ निष्पाप आदिवासी आणि त्यांची आई पण जळुन मेली. हा निव्वळ योगायोग समजावा का? की पांडवांनी स्वतःच्या मृत्युचे खोटे नाटक वठवण्यासाठी त्या ६ आदिवाश्यांचा जीव घेतला?

द्युताच्या वेळेस शकुनीने कपट केले हे ठीक आहे. पण सगळी संपत्ती अगदी आपले भाऊ आणि वर आपली बायको सुद्धा पणाला लावणे आणि हारणे हे शेण खाण्यात जमा होउ नये काय?

पाहुण्यांना घरी बोलावुन ते पाण्यात पडल्यावर "आंधळ्याचा मुलगा देखील आंधळा" असे म्हणणे शेण खाण्यात जमा होउ नये काय? (हे मूळ महाभारतात नाही हे मला माहिती आहे)

इच्छा असेल तर अजुनही उदाहरणे देता येतील. तुर्तास एवढे पुरे.

हे जास्तच न पचणारे आणि पटणारे आहे.
वस्त्रे पुरवून लज्जा रक्षणा पेक्षा मुळात ती संपत्ती - private property असं गृहीत धरून तिला पणाला लावता येतं हेच पटत नाही.
तसंच जर वस्त्र हरण झालं नसतं आणि शेवटचा डाव लावला नसता तर काय द्रौपदी दुर्योधनाची दासी म्हणून सोडून हे तिथून सगळं हरून गेले असते काय ?
मग दरबारात वस्त्रं फेडायच्या ऐवजी वाट बघून एकवस्त्रा नसताना महालात फेडली असती काय ? आणि त्याला तेव्हाच्या समाजनियमांचा विचार करता कोणीही आक्षेप घेऊ शकलं नसतं?

म्हणून मुळात द्रौपदीला पणाला लावणंच पटत नाही. गवि महाभारतात अशा अनेक गोष्टी आहेत....
येऊ द्या आता स्पॉट बॉयज ची फौज...

स्मिता.'s picture

12 Jan 2011 - 2:41 pm | स्मिता.

मैत्र यांच्या प्रतिक्रियेला +१.

एक प्रश्न मला अनेक दिवसांपासून पडलाय... विषय निघालाच आहे तर विचारून घेते. पण तो पुस्तकातल्या बोधकथेवर नसून टीव्ही वरच्या मालिकेवर आहे.

महाभारत बघताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे सगळ्याच सकारत्मक पात्रांना श्रीकृष्ण म्हणजेच भगवान विष्णू आहे, त्याच्याच चरणी मोक्ष मिळणार आहे, तो सर्वज्ञ आहे, इ. कसे काय माहिती असते? (अर्थातच श्रीकृष्णाच्या महानतेवर आक्षेप नाही)
पांडवांचा तर तो भाऊच होता आणि भीष्म, विदुर हे एका मोठ्या राज्यातले 'जाणते' राजनीतीज्ञ होते त्यामुळे त्यांना श्रीकृष्णाची महानता माहिती होती/कळली होती असे समजू. (तरी एखाद्याला महान मानणे आणि देव मानणे यात फरक आहेच.) पण कोणत्यातरी लहानश्या राज्यातल्या भिल्लाला देखील माहिती असते की श्रीकृष्ण देव आहे आणि एखाद्या नगरातल्या एका गरीब म्हातारीलाही कळले असते की तो देव आहे.

असं कसं फक्त सकारत्मक पात्रांना त्याचं देवपण लगेच कळतं?

विश्वनाथ मेहेंदळे's picture

13 Jan 2011 - 7:02 pm | विश्वनाथ मेहेंदळे

अशी लग्ने सर्रास होत नसत, हा अपवाद होता वगैरे वगैरे आधीच लिहिले गेले आहे आणि सर्वमान्य आहे. त्याबाबत काही वाद उद्भवत नाही. पण हे अशाप्रकारचे पहिले लग्न नव्हते हे अनेकांना माहित नसते. इथे एक लक्षात घेतले पाहिजे की स्वयंवर घडले तेव्हा द्रुपद हा बलवान राजा होता. पांडव हे कौरवांनी दगाफटका करू नये म्हणून वेष पालटून वावरत होते. द्रुपदाशी सोयरिक केली म्हणून त्यांना कौरवांकडे वाटणी मागणे सोपे पडले. द्रुपदाच्या पाठबळामुळेच त्यांना स्वयंवरानंतर प्रगट होता आले. अशी परिस्थिती असताना द्रुपदाला जर हा प्रकार बिलकुल पसंत नसता तर पांडवांना हे लग्न करता येणे कठीण होते. पाचही पांडवांशी लग्न होण्यापूर्वी असे होणार आहे हे द्रुपदाला सांगण्यात आले होते. स्वत: द्रौपदीने पण या लग्नाला आक्षेप घेतल्याचे आढळून येत नाही. द्रौपदी ही ज्वालेतून निर्माण झालेली तेजस्वी स्त्री होती. जर ती भर स्वयंवरात कर्णाला अव्हेरू शकत होती तर असे लग्न तिला पूर्णपणे अयोग्य वाटले असते तर तिने नक्की आक्षेप घेतला असता.

या लग्नाला समाजातील इतर घटकांचापण विरोध होता असे दिसत नाही. सीतेवर तिच्या मर्जीविरुद्ध अपहरणाचा प्रसंग ओढवला, तिने अग्निपरीक्षा घेतली असून देखील जनतेत कुजबुज होत होती असे उत्तर रामायणात लिहिले आहे (काही अभ्यासकांच्या मते ते ही प्रक्षिप्त आहे म्हणा). अशी कुजबुज द्रौपदी विरुद्ध झाली असे मी वाचलेल्या महाभारतात तरी कुठे लिहिले नव्हते. लाख श्लोकांच्या आवृत्तीत लिहिले आहे का माहित नाही. कुणाला माहित असेल तर सांगावे.

राहता राहिला प्रश्न दुर्योधन आणि कर्णाने तिला वेश्या म्हणण्याचा. या दोघांचे पांडवांशी तर वैर होतेच पण द्रुपदाशीही होते. द्रौपदीचा अपमान करण्याची संधी ते कशाला सोडतील? असो, राजरोसपणे आणि विधिवत लग्न केले असताना त्याला शेण खाणे मी तरी म्हणणार नाही.

लाक्षागृहाच्या प्रसंगी पांडवांच्या हातून गुन्हा झाला. आपला जीव वाचवण्यासाठी त्यांनी ६ निरपराधांना बळी दिले असे म्हणता येईल. द्यूताच्या वेळेलाही युधिष्ठिराचे चुकलेच. त्या बद्दल त्याची निर्भत्सना महाभारतातही अनेक जणांनी अनेक वेळी केली आहे. भीम यात आघाडीवर असे. भर दरबारात तो युधिष्ठिराचे हात जाळायला निघाला होता. युधिष्ठिराचे चुकले याबद्दल वाद नाही, होऊच शकत नाही.

"आंधळ्याचा मुलगा आंधळा" हे वाक्य महाभारतात कुठेही नाही. तुम्हालाही हे माहित असताना त्याचा उल्लेख करून काय लाभले देव जाणे. जे मूळ कथेत नाही त्याचा उल्लेख कुठलाही मुद्दा साबित करण्यासाठी करता येत नाही.

असो, महाभारतातील पात्रे पूर्ण सज्जन किंवा पूर्ण खलवृत्तीची नाहीत. सर्व पात्रे ही ग्रे शेड असे ज्याला म्हणता येईल त्या प्रकारे रंगवली आहेत. एक साहित्यकृती म्हणून महाभारताचे हे एक मोठे बलस्थान आहे.

गणेशा's picture

10 Jan 2011 - 5:15 pm | गणेशा

तात्पर्य .. कथा .. वगैरे ज्याने कधी तेंव्हा लिहिल्या आहेत ..त्यांनी त्यांच्या म्हणण्याने बरेच भाग टाकलेले असतीलहि.
टिळक हे जेंव्हा कर्तबगार झाले तेंव्हा त्यांची जरब जबरी होती मान्य, म्हणुन त्यांनी लहानपणी कसे बाणेदार उत्तर दिले हे कसे कोणाला अआठवले काय माहीत. ७ वी-८ वी तील पण बाणेदार पणाची वाक्य आठवत नसतात येथे .. अशी वाक्य येव्ह्द्या लहानपआणाची विषेश आहे.
"स्वराज्य हा माझा ..." हे वाक्य लक्षात राहिले पाहिजेच .. कारण ती परिस्थीती .. वेळ .. वय सगळे बरोबर आणि सत्य आहे.

---
बाकी .. महाभारत हे सुद्धा एक महाकाव्य आहे .. हे जर एखाद्या घडलेल्या परिस्थीतीवर लिहिले असेल तर लिहिणार्‍यांनी त्यात त्यांचे शक्ती वापरली असेनच ,.. आणि हे जर काल्पणिक असेल तर ते तसेच असणार असे माणावे.

बाकी तुम्ही म्हणाला तसे विरोधाभास खुप आहेत , येवुद्या बाकीच्यांचे वाचत आहे

सूर्यपुत्र's picture

10 Jan 2011 - 5:53 pm | सूर्यपुत्र

"मोठी माणसे ही लहानपणापासूनच मोठी होत असतात" हा गैरसमज पसरवणार्‍या असाव्यात.

अभिषेक पटवर्धन's picture

10 Jan 2011 - 6:24 pm | अभिषेक पटवर्धन

महाभारतातली नाही, पण वाचुन घासुन गुळगुळीत झालेली लाईन म्हणजे 'प्रयत्ने वाळुचे'. शाळेत असताना याच्यावर निबंध हमखास. आणि मग प्रयत्न केल्यावर सगळ कसं शक्य होतं यावर पानच्या पानं खरडायचो. नंतर कधीतरी एकदा माणसे, अरभाट आणि चिल्लर वाचलं आणि डोळे उघडले. श्लोक असा आहे:

प्रयत्ने वाळुचे कण रगडीता तेलही गळे,
परंतु मुर्खाचे ह्रुदय धरवेना क्षणभरे' (चु.भु.दे.घे.)

एक वेळ वाळुतुन तेल गळेल ( अर्थात त्यावेळी अमच्या दुबईमधे तेलाचा शोध लागला नवता, नंतर खरच वाळु मधुन तेल निघालं), पण मुर्खाची संगत नको, असा या ओळीचा अर्थ. हे म्हणजे, एक वेळ मी काड्याची पेटी चहामधे बुडवुन खाईन, पण ते ग्लुको बिस्कीट.......(पु.ल: माझा शत्रुपक्ष), चा अर्थ काड्याची पेटी चहामधे बुडवुन खायला चांगली लागते असा काढण्यासारंखं आहे.

युयुत्सु's picture

10 Jan 2011 - 6:44 pm | युयुत्सु

प्रयत्ने वाळुचे कण रगडीता तेलही गळे,
परंतु मुर्खाचे ह्रुदय धरवेना क्षणभरे' (चु.भु.दे.घे.)

हा मूळ भर्तृहरीच्या 'लभेत सिकतासु तैलमपि यत्नतः पीडयन' या श्लोकाचा वामन पंडिताने केलेला अनुवाद आहे. पूर्ण अनुवादित श्लोक असा आहे...

प्रयत्ने वाळुचे कण रगडिता तेलही गळे
तृषार्ताची तृष्णा मृगजळ पिउनीही वितळे
सशाचे ही लाभे बिपिनी फिरता शृंगही जरी
परंतु मूर्खाचे हृदय धरवेना क्षणभरी

युयुत्सु धन्य्वाद ज्ञानात फर मोलाची भर टाकलीत राव..
मी आजवर ही मराठीतली म्हण आहे असेच समजत होतो..
असे काहि अजुन भांडार असेल तर उघडा की आम्हा पामरांसमोर....

युयुत्सु's picture

11 Jan 2011 - 10:43 am | युयुत्सु

अवश्य!

परिकथेतील राजकुमार's picture

10 Jan 2011 - 6:43 pm | परिकथेतील राजकुमार

चला धर्म, संस्कृंती आणी देवाच्या नावाने ओकार्‍या काढणार्‍यांना नविन धागा मिळाला :)

गवि तुम्हारा चुक्याच.

अगदी अगदी.

अर्थात धाग्याचे शीर्षक बोलके आहेच तात्पर्यात गडबड.

टारझन's picture

11 Jan 2011 - 2:31 pm | टारझन

या जागी म. गांधी असते तर "मी माझ्या वर्गमित्रांचे घाण न करण्याबद्दल किंवा सत्य बोलण्याबद्दल मतपरिवर्तन करु शकलो नाही म्हणून जणू मीच तो कचरा केला असे समजून आपल्या हातावर छड्या घेतल्या असत्या असे विचाराअंती वाटते.

=)) =)) =)) =)) असो .. अधिक प्रकाश गगनबिहारींसारखे जाणकार टाकतीलंच .. :)

- यमनतुतारी

गवि's picture

11 Jan 2011 - 5:55 pm | गवि

ते गांधीजींनी काय केलं असतं ही कल्पना म्हणजे मूळ काय करायला हवं ते नेमकं न करता इतरच काहीतरी करण्याचा (आणि वैचारिक गोंधळ करण्याचा) अजून एक काल्पनिक नमुनाच आहे. (..असे काही घडले नव्हते..मी फक्त अजून एक राजीव सानेंनी युगांतरमधे मांडलेलेच हे म. गांधींचे उदाहरण उचलले..)

हा घ्या टाकला प्रकाश.

(स्पॉट बॉय) ग.बि.

पुनर्वाचन आणि पुनर्विचार यानंतर परा आणि अवलिया यांनी म्हटलेल्या मुद्द्यामधे अल्प तथ्य आहे असं वाटतं.

त्यांचे शब्द काही असले तरी एकूण हा धागा देव धर्म यांच्यावर घसरू नये असं वाटतंय हे खरं. (मुळात उल्लेख केलेल्या तीनपैकी दोन कथा श्रीकृष्णांशी संबंधित आणि पुराणातल्या आहेत. प्रत्यक्ष धर्माचा / देवत्वाचा वगैरे कुठे अर्थाअर्थी संबंध आणायचा नव्हता..पण ते कॉमेंट्समधे घडू शकतं..)

म्हणून एक विनंती.

फक्त लोकमान्य टिळकांच्या संदर्भातली कथा संदर्भास घेऊन तत्सम (अधार्मिक) कथांवर चर्चा / संदर्भ आल्यास बरे वाटेल.

उदा. नरेशकुमारांनी म्हातारीच्या गोष्टीविषयी म्हटलं आहे तसं.

पण त्या बाबतीत आम्हांस असे वाटते की आपल्याला खाऊन टाकण्याची धमकी देणार्‍या प्राण्याशी सत्य बोलावे हे आवश्यक वाटत नाही..

:)

नगरीनिरंजन's picture

10 Jan 2011 - 6:59 pm | नगरीनिरंजन

'मी खीर खाल्ली असेल तर बुडबुड घागरी' या कथेचे तात्पर्य आधुनिक काळाप्रमाणे बदलून चोरी करू नये व खोटे बोलू नये या ऐवजी चोरी केल्यावर खोटे बोलताना अजिबात डगमगू नये असे केले पाहिजे.

खादाड अमिता's picture

10 Jan 2011 - 7:41 pm | खादाड अमिता

इरावती कर्वे ह्यान्च्या युगान्त नामक पुस्तकात पण महाभारतात्ल्या अश्या खूप डिस्क्रेपन्सिस चे विश्लेषण केले आहे.

छान लेख गवि!

अमिता ताई युगांत च्या दुव्या साठी धन्यु..

प्रदीप's picture

10 Jan 2011 - 7:48 pm | प्रदीप

"मी शेंगा खाल्ल्या नाहीत (टरफले सांडली नाहीत.) आणि मी चहाडी करणार नाही" असे बाणेदार उत्तर दिल्याची कथा ऐकून असं नाही वाटत की "टरफले वर्गात सांडून कचरा केला जाऊ नये" या नियमाच्या पालनासाठी / शिस्तीसाठी रेग्युलेशन करणारी शाळा (मास्तर) नावाची यंत्रणा कार्यरत असताना त्यांना मदत करणे सोडून इथे नुसताच बाणेदारपणा किंवा सत्यकथनच दाखवले गेले? कोणी टरफले सांडली हे माहीत असेल तर मास्तरांना दाखवून द्यायला नको?

माझे एन. जी. कुळकर्णी नावाचे सर होते त्यांनी नेमकी हीच व्यथा आम्हा मुलांना बोलून दाखवली होती. त्यातून प्रत्यक्ष आचार्य अत्रेंनीही हा दाखला देऊन बाल टिळकांची भलावण करावी ह्याचा एन. जींना मनोमन विषाद वाटला होता.

डावखुरा's picture

10 Jan 2011 - 11:39 pm | डावखुरा

१) द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी वस्त्रहरण करणार्‍याच्या मनात शरम उत्पन्न करणं किंवा त्याचे हात लुळे पाडणं किंवा त्याचं डोकं कलम करणं अशा प्रकारे मदत करण्याऐवजी फक्त वस्त्रपुरवठा करत राहून तो "शो" लांबवत का ठेवला..? हाही उपाय जादुई शक्तिवाला आणि तो ही..

हे तुमचे मत आहे...पण त्याचे हात लुळे पाडणं किंवा त्याचं डोकं कलम करणं हे म्हण्जे हिंसा होते..आणि संकटात असलेल्याला मदत करणे हे महत्वाचे ना.. ना मग ती कशीही असो..
आणि कथाकर्त्यानुसार तिथे बरेच ज्येष्ठ श्रेष्ठ उपस्थित होते ज्यांच्या आज्ञेबाहेर पांडव किंवा कौरव यांपैकी कोणीच नव्हते..ह्यात तुमच्या दृष्टीला जो शो वाटतो ना तो घडलाच नाहीये..

२) युद्धात कन्फ्यूज झालेल्या "सीदन्ति मम गात्राणि" म्हणणार्‍या अर्जुनाला श्रीकृष्णांनी उपदेश केला, त्याविषयी मागे तेंडुलकरांनी (बहुधा) एक मुद्दा मांडला होता.. त्यांनी मांडला असो नसो..मला असं वाटतं.. की अर्जुनाचं म्हणणं फार इन्व्हॅलिड नव्हतं असं म्हणून विचार केला तर..?

तुमच्या म्हणण्यानुसार किंवा खरेही असेल तो वाद नाहीये.. पण महाभारत ही जर काल्पनिक कथा असेल तर हा वाद घाल्णात अर्थच नाहीते..लेखकाचा मुळ उद्देश हा कथेतुन तत्वज्ञानाचे सार्,काही महत्वाचा उपदेश देणे हा होता ..आणि त्यासाठी त्याने अर्जुनाची आपल्या ज्येष्ठ व नातलगांसमोर झालेली हत्बलता व त्याला समजवणारा कृष्ण ही चाण्गली पार्श्व्भुमी घेतली आहे..यातुन कथालेखकाचा हेतु साध्य होत आहे..
आणि कथालेखकाने अनुयायांच्या (वाचकांच्या ) मनाचा ठाव घेउन देवा धर्माच्या नावाआडुन तत्वज्ञान देण्याचा डाव नक्किच अयशस्वी ठरलेला नाही हे विशेष..

३) राजीव साने यांनी त्यांच्या "युगांतर" मधे उल्लेखलेली लोकमान्य टिळकांची शाळेतली कथा आणि त्यावरची टिपणी:

"मी शेंगा खाल्ल्या नाहीत (टरफले सांडली नाहीत.) आणि मी चहाडी करणार नाही"

"मी शेंगा खाल्ल्या नाहीत (टरफले सांडली नाहीत.) आणि मी (शिक्षा) छड्या घेणार नाही"
अशा आशयाचे काहीसे वाक्य आहे असे वाटते...(चु.भु.दे.घे.)

असो चांगला विषय आहे..

आत्मशून्य's picture

11 Jan 2011 - 3:53 am | आत्मशून्य

१) द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी वस्त्रहरण करणार्‍याच्या मनात शरम उत्पन्न करणं किंवा त्याचे हात लुळे पाडणं किंवा त्याचं डोकं कलम करणं अशा प्रकारे मदत करण्याऐवजी फक्त वस्त्रपुरवठा करत राहून तो "शो" लांबवत का ठेवला..? हाही उपाय जादुई शक्तिवाला आणि तो ही..

ही कथा काल्पनिक आहेच पण तरी ती सांगितली जाते एक शील / लज्जा वाचवणार्‍या नायकाची महती ठसवण्यासाठी. लज्जारक्षणाचा कोणता मार्ग शिकायचा यातून ?

.

मला वाटतेय हा पर्याय लज्जारक्षणाचा कोणताच मार्ग शिल्लक राहीला नसल्यानंतर अवलंबण्यात आला होता.

लज्जारक्षणाचा कोणता मार्ग शिकायचा यातून ?

नाही हा स्वसंरक्षण अथवा लज्जारक्षण कसे करावे याचा तास न्हवता म्हणून शाळा यात शोधू नका पण तरी माझे वैयक्तीक मत हे आहे की प्रत्यक्ष पत्नीची अशी विटंबना होत असेल तर मान खाली घालून बसण्यापेक्षा असे म्हणा की धर्म गेला चूलीत आणी सर्व सामर्थ्यानीशी शत्रूवर तूटून पडा. त्याच काय आहे यूध्दात आणी प्रेमात सगळे क्षम्य असते हो.

मदत करण्याऐवजी फक्त वस्त्रपुरवठा करत राहून तो "शो" लांबवत का ठेवला

इतक्या लवकरच शो आटोपला असता तर महाभारत सूध्दा टाळले असते. तसेच मदत कशीही होवो ऊद्देश साध्य होणे जास्त महत्वाचे. बीचारा राक्षस त्याचा राक्षसीपणा करता करता थकला पण इश्वर त्याच्या भक्ताचे रक्षण करायला थकला नाही असे सूध्दा सूचीत करायचे होते म्हणा हवे तर :)

____________________________________________________________

२) युद्धात कन्फ्यूज झालेल्या "सीदन्ति मम गात्राणि" म्हणणार्‍या अर्जुनाला श्रीकृष्णांनी उपदेश केला, त्याविषयी मागे तेंडुलकरांनी (बहुधा) एक मुद्दा मांडला होता.. त्यांनी मांडला असो नसो..मला असं वाटतं.. की अर्जुनाचं म्हणणं फार इन्व्हॅलिड नव्हतं असं म्हणून विचार केला तर..?

त्याचं म्हणणं युद्धाच्या विरोधात जात होतं.. त्याला समोर ज्येष्ठ लोक दिसत होते.. आता त्याने कच खाल्ली तर सगळा बनाबनाया डाव किंवा सीन उलटणार होता…एकूण (पांडवांचं) नुकसान खूप होणार होतं..

सैन्याची हानी आणि युद्धाचे दुष्परिणाम कदाचित टळले असते.. पण वाईट लोकांचा फायदा होण्याची जास्त शक्यता होती..

तेव्हा अशा काँटेक्स्ट मधे केलेला उपदेश आणि त्याचं मन वळवणं यात तत्वज्ञान जास्त की manipulation आणि brainwash जास्त ??

मी संपूर्ण गीतेविषयी म्हणत नाहीये.. प्लीज गैरसमज करून घेऊ नका.. (नाहीतर "तुम्ही गीता नीट पूर्ण वाचली तरी आहे का?" असे अभिप्रायच जास्त येतील..) बाकीच्या गीतेत या युद्धातल्या डायलेमाशी संबंधित नसलेलेही खूप तत्वज्ञान आहे आणि त्याचा आदर आहेच.

सोयीचा उपाय ज्याला म्हणतात तो गळी उतरवणं? .. .. युद्धस्व .. ??!!

जे केलं ते योग्यच होतं.. पण त्याला मुत्सद्देगिरी म्हणणं योग्य..

त्याच्या बदल्यात अर्जुनाची बाजू पूर्ण झाकली गेली हेही खरंच.. त्याच्या बाजूच्या सर्व शक्यता वर आल्याच नाहीत..

खरे आहे मूळात गीतेचा ऊद्देश यूध्दासाठी प्रोवोकेशन असाच आहे.

पण हे करता करता त्याला दीलेल्या अनूभूती आणी ज्ञानाचा दर्जा हा इतका)शूध्द व सर्वोच्च होता की ते शेवटी धर्म्/तत्वज्ञान्/आणी शूध्द ज्ञानाच्या पातळीला पोचला. ले लक्षात घ्या अर्जून जस जसे फाटे फोडत राहीला तस तसे भगवान त्याला ज्ञान आणी अनूभवाच्या वरील स्तरावर न्हेत गेले. ऊगीच फटदीशी विश्वरूप दर्शन दीले नाही. म्हणूनच ही फक्त मूत्सद्देगीरी अथवा एकाद्याची बाजू झाकाय्ची क्रूती ठरत नाही. मराठीत सांगाय्चे तर It was a lot lot more than that. आणी नेमक्या याच ज्ञान आणी आत्माच्या स्थीतीसाठीच तर साधक अख्खे आयूश्य अथवा जन्म वेचतात .

३) राजीव साने यांनी त्यांच्या "युगांतर" मधे उल्लेखलेली लोकमान्य टिळकांची शाळेतली कथा आणि त्यावरची टिपणी:

जाऊदेहो कूठे टीळक आणी गांधी यांच्या वादात पडता ;) ऊगीच डोक्याला कलै ;) व्यक्ती तीतक्या प्रक्रूती समजून जे चांगले घेता येइल ते तात्पर्य म्हणाय्चे आणी इतर दूर्लक्शीत कराय्चे शेवती तात्पर्याचा ऊद्देश कल्याण व्हावे हाच तर असतो ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Jan 2011 - 4:21 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

लॉक किया जाये?

नरेशकुमार's picture

11 Jan 2011 - 6:41 am | नरेशकुमार

मला भोपळ्यातल्या म्हतारीची ती गोश्ट अजिबात आवडत नाही,
त्यात म्हतारी सर्व प्रान्यांशी खोटे बोलते, आनि त्यानां फसवते. ते चुक आहे.

भक्षाच्या शोधात शहरात घूसल्यामूळे पोळीसांकडून मारळे गेळे नसटे

नरेशकुमार's picture

11 Jan 2011 - 7:33 pm | नरेशकुमार

इतके टोकाचे मला अपेक्षित नव्हते,
पण एकाच इयत्तेत एके ठिकानी राजा शिबी, ज्याने पक्ष्याला दिलेले वचन पाळन्यासाठि आपले देह दान करायला तयार झाला, तिथेच हि आजी प्राण्यांशि खोटे बोलते.

लहान मुलांनि नेमका काय धडा घ्यावा ? संभ्रम तिथुनच सुरुवात होतात.

पंगा's picture

11 Jan 2011 - 9:21 pm | पंगा

गंमत म्हणजे, (नक्की खात्री नाही*, पण) मराठी माध्यमाच्या पहिल्या इयत्तेत या कथा 'इतिहास' या विषयाखाली शिकवल्या जात, असे वाटते.

(*'नक्की खात्री नाही' अशासाठी, की माझे चौथीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमाच्या शाळेत झाले नाही, त्यामुळे याचा प्रत्यक्ष अनुभव नाही. मात्र माझ्या तत्कालीन बालमैत्रिणी मराठी माध्यमाच्या शाळेत शिकत असत, त्यांच्या 'इतिहास' या विषयाच्या गृहपाठाच्या वहीत 'चल रे भोपळ्या टुणूक टुणूक' या गोष्टीवरची प्रश्नोत्तरे पाहिल्याचे इतक्या वर्षांनंतरही चांगलेच आठवते.

आमचा इतिहास थोर आहे, याबद्दल वाद नाही, आणि म्हणूनच इतक्या लहानपणापासूनच अशा प्रकारे इतिहासाच्या अभ्यासाचे बाळकडू पाजण्याचा - किंवा मराठीत बोलायचे झाले तर ग्राउंडिंग देण्याचा - हा प्रयत्न स्तुत्य असला, तरी अपुरा आहे, असे खेदाने म्हणावेसे वाटते. आमच्या इतिहासाचे यथायोग्य ग्राउंडिंग देण्याचा कोणताही प्रयत्न हा त्याचा श्रीगणेशा काऊचिऊच्या गोष्टीने झाल्याशिवाय संपूर्ण होणार नाही, असे आमचे प्रांजळ मत आहे. पण लक्षात कोण घेतो?)

आत्मशून्य's picture

11 Jan 2011 - 11:31 pm | आत्मशून्य

राजा शीबी हा सत्यव्रतता आणी दानशूरता याचे व्रत पाळत होता म्हणून एखादे व्रत पाळताना मनूश्याने कोणत्या पातळी पर्यंत गेले पाहीजे याचे तात्पर्य त्या कथेत मीळते.

तर संकटकाळी प्रसंगावधान राखून धोक्याच्या क्षणी बूध्दीचातूर्याने स्वतःचा जीव कसा वाचवावा याचे तात्पर्य म्हातारीच्या कथेत आहे.

म्हणून लक्षात घ्या म्हातारीने तीचे उदीष्ट (ज्या कारणासाठी ती प्रवासाला बाहेर पडली) जे लेकीला भेटून सूखरूपपणे घरी परतने जसे साध्य केलेले आहे तसेच राजा शीबिने सूध्दा त्याचे उदीष्ट सत्य आणी दानशूरतेचे व्रत पाळून साध्य केलेले आहे.

मूळातच दोन वेग वेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या उदीष्टाच्या यशस्वी साध्याच्या ताप्तर्याची तूलना कशाला करायची आहे? हे म्हणजे comparing apple with orange नाही काय ?

नरेशकुमार's picture

12 Jan 2011 - 5:21 am | नरेशकुमार

संकटकाळी प्रसंगावधान राखून धोक्याच्या क्षणी

माझ्या मनात नेहमिच अजुन एक शंका येते ह्या कथेच्या बाबतित,
त्या म्हतारीच्या वेळेस इतर लोकं या गावतुन दुसर्‍या गावि कशे जात असतिल, ते सुध्दा त्या म्हतारि सारखे जंगलातुन जात असतिल का, कि म्हतारिने शॉर्टकट म्हनुन जंगलाचा वापर केला.
मला वाटते कि एखादा छानसा (लॉगकट) रोड नक्कि असावा, पन म्हतारीला इतकि घाई झालि होति कि तिने आपला जिव धोक्यात घातला , आप्ल्याला काय वाटते ?

बाकि आप्ले विचार बरोबर आहेत

विश्वनाथ मेहेंदळे's picture

13 Jan 2011 - 3:39 pm | विश्वनाथ मेहेंदळे

"चर्चासत्रात चेंगरलेली म्हातारी" नावाचा एक लेख मागे वाचला होता त्याची आठवण झाली. कुठे मिळाला तर जरूर वाचा. मुंबई विद्यापीठाच्या ११वी च्या मराठीच्या पुस्तकात होता तो. मूळ पुस्तक आठवत नाही.

नरेशकुमार's picture

13 Jan 2011 - 3:56 pm | नरेशकुमार

जरुर वाचेन,
आभारी आहे.

kamalakant samant's picture

11 Jan 2011 - 2:22 pm | kamalakant samant

या जागी म. गांधी असते तर "मी माझ्या वर्गमित्रांचे घाण न करण्याबद्दल किंवा सत्य बोलण्याबद्दल मतपरिवर्तन करु शकलो नाही म्हणून जणू मीच तो कचरा केला असे समजून आपल्या हातावर छड्या घेतल्या असत्या असे विचाराअंती वाटते
हे म्हणणे बरोबर वाटते का?
कुठ्ल्याही क्रा॑तीकार॑काच्या शिक्षेबद्दल गा॑धीजी असे कधीच म्हणाले नाहीत की मी माझ्या देशबा॑धवा॑चे हि॑सा न करण्याबद्दल
मतपरिवर्तन करू शकलो नाही -म्हणून-मीच शिक्षा घेतो.
उलट
स्वतः न लिहीलेल्या लेखाबद्दल टिळका॑नी शिक्षा भोगली.

मी शेंगा खाल्ल्या नाहीत (आणि म्हणुन कचरा ही केला नाही) म्हणून मी शिक्षा भोगणार नाही अशा आशयाचं ते वाक्य होतं असं मला वाटतं.
गवी , तुम्ही स्वतःला बाल टिळकांच्या जागी ठेवून बघा. न केलेल्या वाईट (कचरा करणे) गोष्टीबद्द्ल शिक्षा भोगायला तुम्हाला तरी आवडले असते का?
मी शिक्षा भोगणार नाही हे त्या संदर्भात बरोबर वाटते. गुरुजींनी छड्या मारण्याऐवजी कचरा कोणी जरी केला तरी आपला वर्ग साफ ठेवणे हे प्रत्येक विद्यार्थ्याचे कर्तव्य आहे हे शिकवले असते तर ? मुले positive enforcement मधून जास्त पटकन शिकतात . पण त्याकाळी शिक्षकांना हे माहित नसावे.

गवि's picture

12 Jan 2011 - 5:52 am | गवि

agreed..

न केलेल्या गुन्ह्याची घाऊक शिक्षा घेऊ नये असे वाटणे अगदी योग्य. घेण्यास नकार देणे हा at that age and at any age,बाणेदारपणाच.

त्याबद्दल कौतुकच.

आक्षेप फक्त असा की आपला गुन्हा नाकबूल करून शिक्षा टाळण्यापर्यंत हा बाणेदारपणा limited राहिला.शाळेच्या कचराविरोधी अतएव शासनयंत्रणेला त्याच बाणेदारपणाने नावे सांगायला हवी होती ना?

तेही at that age न जमल्यास समजणेबल,पण मग ती story खास मुलांना सांगणेबल कशी काय?

कारण अशा कथा मुलांना सांगताना नक्कीच टिळकांचे बालमन कसे चारचौघांसारखेच होते हे सांगण्यापेक्षा "मुलांनो तुम्हीही हा गुण घ्या आणि असे बाणेदार वागणे आदर्श आहे अतएव थोरांचे लक्षण आहे" असा उद्देश असतो.

म्हणजे उद्या पोलीस तपास झाला की असे म्हणायचे,"मी सी एस टी त गोळीबार केला नाही.मी गुन्हेगार नाही बस्स.बाकी मी प्रत्यक्षदर्शी असलो तरी ओळखपरेडमधे वगैरे काही मदत करणार नाही."अशी मोठेपणीची एडिशन झाली तर ती तुमची आमची common manची गोष्ट होते.

की नुसतीच एक गमतीशीर घटना म्हणून ऐकायची ?


पक्या's picture

12 Jan 2011 - 12:27 pm | पक्या

मी शेंगा खाल्ल्या नाहीत म्हणून शिक्षा भोगणार नाही (छड्या खांणार नाही) असं काहीसं ते वाक्य मी वाचलेल्या गोष्टीतं होतं असं आठवतयं. चहाडी करणार नाही हे वाक्य त्या गोष्टी मधे आहे की नाही ह्याबद्द्ल साशंक आहे.

गवि's picture

12 Jan 2011 - 12:59 pm | गवि

http://balsanskar.com/marathi/lekh/36.html

हे उदाहरण कदाचित ऑथेंटिक नाही असं आपल्याला वाटेल. पण रँडम सर्चमधे सापडलंय.

मला स्वतःला "मी चहाडी करणार नाही" असे शाळेतल्या बाईंची आणि इतर गोष्ट सांगणार्‍यांचे शब्द आठवताहेत.

"चुगली करणे वाईट गोष्ट आहे" अशी पुस्तीही जोडली जात होती.

शिवाय राजीव साने या पुरेशा अभ्यासू व्यक्तीने लिहिलेल्या युगांतर पुस्तकातही हा "चहाडी / चुगली करणार नाही "असा उल्लेख अधोरेखित केला आहे.

शिक्षकांनी त्यांना विचारले होते "सर्वांना शिक्षा होऊ नये असं वाटत असेल तर कोणी केलं त्याचं नाव सांग.." अशे स्पष्ट नोंद अनेक ठिकाणी ऐकली/दिसली आहे.

इतरत्र प्रिंटेड माध्यमात कुठे गोष्ट असली तर तिचा दुवा इथे देता येणार नाही.

अजून काही ऑनलाईन दुवे (निदान गोष्ट अशी सांगितली जाते आहे हे नक्की होतंय यामुळे):

http://yousigma.com/biographies/balgangadhartilak.pdf - page 3

http://www.india-intro.com/lokmanya-balgangadhar-tilak.html - para 3

"Well, if no one wants to come forward, the whole class gets the punishment." The teacher began to give two cuts with cane to each child on the hand. This was a common form punishment at schools. "I did not eat those peanuts, I will not take the punishment" said Bal. "Well, if you do not want the punishment, tell me the name of the boy who did eat" said the angry teacher. "I am taught not to tell tales and I cannot tell you the name of the boy. However, I did not make that mess and I will not be punished for it."

आणखी:

http://www.sankalpindia.net/drupal/node/2318

तुमचा मुद्दा (ज्याची चूक त्याचे नाव सांगणे) पटला नाही असे नाही .
पण त्यावेळी बाल टिळकांना गुरुजींनी मुलांना छड्या मारणे हे आवडले नसावे. wink
अशी गोष्ट वाचलेली मला आठवत नाहीये (म्हणजे चहाडी वगैरे)
त्यामुळे कोणाला ही गोष्ट सांगायची असेल तर मी त्या वाक्यापर्यतच सांगतो (शिक्षा भोगणार नाही वगैरे इथपर्यतच ).

भारी समर्थ's picture

12 Jan 2011 - 1:13 pm | भारी समर्थ

लहानपणी पाठ्यपुस्तकात वगैरे असणार्‍या कथा या बोध घेऊन तसं वागण्यासाठी असतात या गोष्टीवरचा माझा विश्वास काही दिवसांपूर्वी माथेरानमधील एका प्रसंगामूळे उडाला.

शाळेतल्या पाठ्यपुस्तकातून टोप्यांच्या व्यापार्‍याची कथा वाचलेली आपण सर्वांनी वाचलेली असेलच. ती नको त्या वेळी आठवून आचरणात आणली, आणि एका माकडाने माझा पोपटच केला.

आम्ही माथेरानच्या सो कॉल्ड पॉईंट्सवर (काय ते पॉईंट्स, सगळीकडे फक्त दरी आणि डोंगर) भटकून भटकून पायाच्या काटक्या करून घेतल्या. चला म्हटलं, मार्केटमधल्या बागेत बसून वेफर्स खाऊया. एक मोठं आणि एक लहान अशी पाकिटं घेतली आणि मोठं पाकिट उघडून त्यातलं दुसरं चिप्स तोंडात टाकतच होतो एवढ्यात आमच्यासमोर आमचे 'प्रगत न झालेले' भाऊबंद येऊन उभे ठाकले. त्यांचा रागरंग पाहून त्यांनाही चिप्स खायची प्रबळ इच्छा असल्याचे कळले. म्हणून एक चिप्स पुढे केले तर त्यांनी पूर्ण पुडाच हवा असल्याचे निर्देशक हावभावांवरून सुचित केले. मग काय, त्यांच्याबरोबर भांडण्यात काहीच पॉईंट नसल्याने आम्ही नमते घेऊन त्याला एक पुडा दिला. दुसरा होताच जवळ म्हणून... वास्तविक तिथून उठून, दुसरीकडे जाऊन खाण्याचे सुचले होते. त्यानूसार मी उठणार एवढ्यात मला शाळेतल्या 'त्या' (^) गोष्टीची आठवण झाली. मी माझ्याकडचा लहान पुडा त्या मर्कटासमोर टाकला. गोष्टीप्रमाणे, आता तो त्याच्याकडचा पुडा खाली टाकेल अशी एक माफक अपेक्षा होती. पण कसलं काय, त्याने तो दुसरा पुडाही उचलला आणि दूर जाऊन बसला.

ज्या ज्या लोकांचं माझ्या या कृतीकडे लक्ष होतं, ते ते सगळे खो-खो हसले. त्यांच्या हसण्याचं काही नाही हो, पण शाळेत आपल्याला काहिच्या काही कसे शिकवले जात होते आणि आपणही नाइलाजास्तव कसं सर्व खरं मानून घेतलं याची खंत मम मनी दाटून आली.

तेव्हापासून मी शाळेत शिकलेल्या सर्व गोष्टी माझ्या स्मृतीतून कायमच्या पुसून टाकल्या आहेत.

भारी समर्थ

सविता's picture

14 Jan 2011 - 10:16 am | सविता

हे बाकी भारी होतं!!!!!!

नगरीनिरंजन's picture

14 Jan 2011 - 10:19 am | नगरीनिरंजन

हा हा! तुम्ही ती टोपीवाल्याच्या नातवाची गोष्ट नव्हती वाचली वाटते.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

13 Jan 2011 - 3:36 pm | विश्वनाथ मेहेंदळे

गवि, तुमचा गीतेबद्दलचा शेवटचा मुद्दा नीट कळला नाही. अर्जुनाने आपल्याला पडलेल्या सर्व शंकांचे निरसन करून घेतले असा माझा समज होता. अख्खी गीता हि प्रश्नोत्तराच्या स्वरुपात आहे. मग त्याचे कुठले मुद्दे ऐकायचे राहून गेले असतील असे तुम्हाला वाटते?

Manipulation आणि Brainwash म्हणता येईल गीतेला, पण समजावणे आणि brainwash यातील सीमारेषा नक्की कशी ओळखायची? आणि शेवटी युद्धाला उभे राहणे पांडवांच्या दृष्टीने योग्य आणि आवश्यक असल्याने Brainwash केला असे म्हटले तरी त्यात वावगे काहीच वाटत नाही (पांडवांच्या दृष्टीने).

असो, काही तज्ञांच्या मते संपूर्ण गीताच प्रक्षिप्त आहे. ७०० च्या आसपास श्लोक असलेली गीता सांगायला २-३ तास सहज लागतील. दोन्ही कडून लाखो माणसे युद्धाला उभी असताना केवळ एका योद्ध्याला समजवण्यासाठी २-३ तास खर्ची पडतील हे कठीण वाटते असे त्यांचे म्हणणे आहे. इतरही मुद्दे आहेत. कसेही असले तरी तत्वज्ञान म्हणून गीता श्रेष्ठच आहे.

वस्त्रहरणाच्या वेळेच्या चमत्काराचे समर्थन करायचे झाले तर असे म्हणता येईल की गुन्ह्यात भागीदार असलेल्या सगळ्यांच्या वधाच्या प्रतिज्ञा नुकत्याच झाल्या होत्या. आणि एकाने अशी प्रतिज्ञा केली असताना तिसऱ्याने मध्ये पडून परस्पर त्याचा वध करणे तत्कालीन प्रथेत बसत नव्हते :-) महाभारतात अशी अनेक उदाहरणे आहेत. अर्थात तरीही तुम्ही सांगितलेले बाकीचे उपाय करता आले असते.

प.वि. वर्तकांच्या मते (स्वयंभू चे लेखक) वस्त्रहरणाचा प्रसंग खरा घडलाच नव्हता. तसा प्रयत्न केल्या केल्या भीमाच्या प्रतिज्ञेमुळे गर्भगळीत होऊन दु:शासनाने तो प्रयत्न सोडून दिला. आणि मग प्रकरण हाताबाहेर जाते आहे हे बघून लगोलग ज्येष्ठांनी हस्तक्षेप केला. वस्त्र पुरवण्याचा प्रसंग चमत्काराचे महत्त्व वाढवण्यासाठी नंतर घुसवला गेला. महाभारताचा अभ्यास इतिहास म्हणून करायचा झाला तर अशा चमत्कारांचे योग्य त्या पद्धतीने interpretation करावे लागते. तसा प्रयत्न अभ्यासक करतात (इति मन्ये).

सोनल कर्णिक वायकुळ's picture

1 Aug 2012 - 3:23 pm | सोनल कर्णिक वायकुळ

खुप दिवसानी तुझ्या हातच वाचुन जाम बर वाटलय. बाकि लेख फर्मास आणि विचार करायला लाव्णारा. त्या निमिताने बरेच view points वाचायला मिळाले. हा thread trigger केल्यबद्दल वेगळे thanks.

गवि's picture

1 Aug 2012 - 3:26 pm | गवि

हा thread trigger केल्यबद्दल वेगळे thanks.

आँ? कोणी केला थ्रेड ट्रिगर? अगो तूच आणलास की वर... :)

.... प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद...

महाभारतातील सर्वात इनोदी कथा म्हणजे
कंसाने नंद आणि देवकीला कारागृहात बंद केले होते.
त्याने दोघानाही वेगवेगळे ठेवले असते तर देवकीला ८ मुले झालीच नसती.
कंसालाही मुले मारायचा खटाटोप करावा लागला नसता.
( कम्साला एवढाही कॉमन सेन्स नव्हता का?)

फक्त 'देवकी'चा अमुकवा पुत्र अशी मोघम शापवाणी झाली असल्यास कंसाने डबल कन्फर्म टेस्टिंगसाठी मुलं निश्चित जन्मास आली आणि आपण स्वहस्ते त्यांचा बंदोबस्त केला अशी खबरदारी घेतली असेल. त्याकाळी कुठूनही काहीही होऊन पुत्रप्राप्ती होण्याची शक्यता असत असे हे विसरलात का विजुभौ? (उदा. फळ खाऊन, चुकून कुठूनसा जंगलात वृक्षाखाली बसल्याजागी साधूच्या वीर्याचा प्रादुर्भाव होऊन, एखाद्या मुनींचा चुकून दिलेला अष्टपुत्रा आशिर्वाद खरा ठरावा म्हणून.इइइ..)

इरसाल's picture

1 Aug 2012 - 3:40 pm | इरसाल

नसबंदीने कदाचित हा प्रश्न सुटला असता.